अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

 



            बुलडाणा, (जिमाका) दि. 14:  पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथून अनोळखी महिलेला दिव्या फाँडेशन बुलडाणा यांच्या कडुन अपघात विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा येथे उपचारासाठी दि. 12 जानेवारी 2026 रोजी भरती करण्यात आले.  उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या मृत महिलेला ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

            प्राप्त माहितीनुसार, अनोळखी महिलेचे वय 65 ते 68 वर्ष, उंची 160 सेमी, बांधा सळपातळ, सावळा रंग, डोक्याची केस पांढरे, अंगात लाल व पांढऱ्या रंगाचा गाऊन व कपाळावर मध्यभागी टिकली गोंदलेले दिसत आहे. या वर्णनाचा महिलेचा कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, बुलढाणा(ग्रामीण) येथे किंवा तपास अधिकारी  9823717180 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर