Wednesday 27 September 2017

news 27.9.2017 dio buldana

मतदार यादीतील आपल्या नावाची निश्चिती करावी
-         जिल्हाधिकारी
·                    दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांनी एकच नाव ठेवावे
·                    जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत 35 हजार 123 मतदारांची नोंदणी
·                    जिल्ह्यात एकूण 19 लक्ष 11 हजार 123 मतदारसंख्या
बुलडाणा, दि‍.27 -  राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 3 ऑक्टोंबर 2017 ते 5 जानेवारी 2018 पर्यंत राबविण्याचे घोषीत करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरूस्त करणे, मतदार यादीतील नावाची निश्चिती करण्यात येणार आहे. तरी मतदारांनी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची निश्चिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेंद्र देशमुख व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
  मतदारांची दोन ठिकाणी नावे असल्यास ती त्वरित स्वत:हून नागरिकांनी रद्द करण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, एकच नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्यास मतदारांनी एक नाव त्वरित वगळावे. एकाच ठिकाणी नाव ठेवावे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून  दोन ठिकाणी नाव असल्यास एकच नाव ठेवावे. त्यासाठी प्रारूप मतदार यादी 3 ऑक्टोंबर 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, चूक दुरूस्त करणे यासाठी विशेष मोहिमांचेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे.
     ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नवीन मतदारांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात 35 हजार 123 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या 19 लक्ष 11 हजार 123 मतदारसंख्या आहे. तसेच या मोहिमेत 10 हजार 443 मतदार मयत आहेत. त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत.
असा आहे संक्षिप्त मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम
हा कार्यक्रम ERO-Net अंतर्गत प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर राबविण्यात येणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : प्रारूप मतदारय याद्यांची प्रसिद्धी करणे : 3 ऑक्टोंबर 2017, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : 3 ऑक्टोंबर ते 3 नाव्हेंबर 2017 पर्यंत, मतदार यादीमधील सबंधीत भागाचे/सेक्शनचे ग्रामसभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूएसोबत बैठक आणि नावांची खातरजमा 7 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर 2017, विशेष मोहिमांचे आयोजन : 8 ऑक्टोंबर व 22 ऑक्टोंबर 2017, दावे व हरकती निकालात काढणे : 5 डिसेंबर 2017पर्यत, डाटाबेसचे अद्यावतीकरण : 20 डिसेंबर पर्यंत, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2018.
*****
क्रॉपसॅप प्रकल्पातंर्गत सोयाबीन व कापूस पीक पाहणी
बुलडाणा, दि‍.27 -  मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळीया प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी बोंड अळी, मावा, तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प 2017-18 अंतर्गत मोताळा व मलकापूर तालुक्यातील प्रादुर्भावग्रस्त पीकांची प्रत्यक्षात शेतात जावून पाहणी केली. या चमूमध्ये कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी.पी जायभाये, डॉ. मिलींद गिरी, किडनियंत्रक जी. टी सांगळे, मंडळ कृषि अधिकारी के. एल कंकाळ, एस.एच पवार, कृषि पर्यवेक्षक व्ही. आर धांडे, विशाल महाजन, डी. बी नवले, किड सर्वेक्षक विकास ताठे, मयूर मेहसरे यांचा समावेश होता.
    शेतकऱ्यांनी बांधावरील किडींना पुरक असणाऱ्या वनस्पतींचा नाश करावा, अंडपुंज असलेली पाने नष्ट करावी. पाच ते दहा कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावे, सोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झकार्ब 15.6 ई.सी 7 मि.ली किंवा क्लारन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 3 मि.ली किंवा लॅमडा सॅहलोथ्रीन 4.9 सि.एस 6 मि.ली 10 लीटर पाण्यात फवारावे, कापूस पिकावर ॲसीटामाप्रीड 20 एस.पी 2.5 ग्रॅम, थायमिथॉक्साम 25 डब्ल्यू जि 2.5 ग्रॅम, डायमेथोएट 30 इ.सी 10 मि.ली  यापैकी एका औषधाची 10 लीटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनॉफॉस 50 इ.सी 20 मि.ली किंवा थायोडिकार्ब 75 डब्ल्यु पी 20 20 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकरी बंधूनी नियमित पिकांची पाहणी करून एकात्मिक किड नियंत्रणाचा मार्ग अवलंबवावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
                                                            **************
जिल्हाधिकारी कार्यालयात
 3 ऑक्टोंबर रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.27 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र या महिन्याच्या पहिल्या सोमवारला, दि. 2 ऑक्टोंबर  2017 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सदर लोकशाही दिन मंगळवार 3 ऑक्टोंबर 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात,  प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *******


  

Monday 25 September 2017

news 25.9.2017 dio buldana

    
प्रधानमंत्री पिक विमा योजना
नुकसान झाल्यास 48 तासाच्या आत विमा कंपनीला कळविणे आवश्यक
  • 18001030061 टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची माहिती द्यावी
बुलडाणा, दि. 25 – शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या आर्थिक नुकसानीसाठी विम्याचे कवच प्रदान केले आहे. या खरीप हंगामातही योजनेच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची मदत मिळणार आहे. त्यासाठी वैयक्तिक स्तरावर पिकांचे नुकसान झाले असल्यास अशा शेतकऱ्यांनी 48 तासाच्या आंत विमा कंपनीला कळवावे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001030061 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नुकसानीची माहिती तात्काळ द्यावी. या क्रमांकावर संपर्क न झाल्यास विमा कंपनीचे प्रतिनिधी दिलीप लहाने यांच्या  9881017458 क्रमांकावर कळवावे.
    त्याचप्रमाणे संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील पिक सुचना अर्ज शेतकऱ्यांनी भरून द्यावे. सदर अर्ज भरणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात उडीद पिकाची काढणीपश्चात नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे भुस्खलन, पुराचे पाणी शेतात शिरून नुकसान होणे, गारपीट व काढणी/ कापणसी पश्चात पिक सुकविण्यासाठी  ठेवले असता नुकसान होणे या नुकसानीकरीता शेतकरी वैयक्तिक नुकसान भरपाईस पात्र आहे. कापणी अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 14 दिवसापर्यंत नुकसान भरपाई देय आहे. तरी अशा्रपकारे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत विमा कंपनी व कृषि विभागाकडे तक्रार  करावी, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
                                                                                    ********
जिल्ह्यातील 4.31 लक्ष शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा
  • 1724 मे.टन गहू व 431 मे.टन तांदुळाचे नियतन
  • 16 गोदामांच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांना शेतकरी लाभार्थ्यांच्या धान्याचे वाटप
बुलडाणा, दि‍ 25 राज्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा मिळावी, या हेतूने राज्य शासनाने मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश केला आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्याची अन्नधान्यासाठी पायपीट होवू नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत केला. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळत आहे.  योजनेच्या माध्यमातून दरमहा शेतकरी लाभार्थ्यांना शासन जिल्ह्यामध्ये 1724 मेट्रीक टन गहू व 431 मेट्रीक टन तांदूळाचे नियतन प्राप्त होते. प्राप्त नियतन व गोदामातील प्रत्यक्ष शिल्लक धान्यसाठा लक्षात घेवून दरमहा नियतन आदेश निर्गमित करण्यात येतात.
  शेतकरी लाभार्थी योजनेतंर्गत कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहत नाही व अशाप्रकारची कोणत्याही तहसील  कार्यालयाकडून लेखी तक्रार प्राप्त नाही. राष्ट्रीयअन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांकरिता माहे ऑगस्ट 2017 चे नियतनातील  गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात  वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि, टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून करण्यात आलेली आहे. सदर धान्य गोदामांमधूनही स्वस्त धान्य दुकानांना वाटप करण्यात आलेले आहे.
     स्वस्त धान्य दुकानदारांनी गोदामातून पुढीलप्रमाणे गहू व तांदुळाची शेतकरी लाभार्थ्यांकरीता वाटप केलेली आहे.   बुलडाणा गहू 1546 क्विंटल व तांदूळ 364,  चिखली गहू 1425 व तांदुळ 403, अमडापूर गहू 601 व तांदुळ 150, दे.राजा गहू 1271 व तांदुळ 491, मेहकर गहू 1850 व तांदूळ 418, डोणगांव गहू 571 व तांदूळ 125, लोणार गहू 1577 व तांदुळ 409, सिं.राजा गहू 1196 व तांदुळ 254, साखरखेर्डा गहू 720 व तांदुळ 160, मलकापूर गहू 1113 व तांदुळ 274, मोताळा गहू 1142 व तांदुळ 296, नांदूरा गहू 1351 व तांदुळ 331, खामगांव गहू 1224 व तांदुळ 292, शेगांव गहू 1267  व तांदुळ 312, जळगांव जामोद गहू 923 व तांदुळ 230, संग्रामपूर गहू 1274 व तांदुळ 313 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू व तांदुळा  क्विंटल धान्याचे वितरण स्वस्त धानय दुकानदारांना करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

*********
विधान परीषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, दि.25 - विधान परीषदेचे  उपसभापती  माणिकराव ठाकरे  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, 27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 4.45 वाजता मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 6.10 वाजता  शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव, दुपारी 12.00 वाजता  माजी केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या गर्दे हॉल येथील कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथून खामगांवमार्गे अकोलाकडे  प्रयाण करतील.
0000
खामगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
  • 200 पदांसाठी होणार भरती
  • www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर उमेदवारांनी नोंदणी करावी
बुलडाणा, दि. 25 - खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी हेरून बेरोजगार युवक-युवतींना त्या उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नेहमी तत्पर असतो. त्यानुसार येत्या मंगळवार, 27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता गो. से विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव येथे बेरोजगारांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नवकिसान फर्टिलायझ, जळगांव या कंपनीला विक्री प्रतिनिधी, लॉकसेफ सेक्युरीटी सर्व्हीस औरंगाबाद कंपनीला सुरक्षा रक्षक/हेल्पर पदाकरीता आणि युरेका फोर्ब्स अकोला कंपनीमध्ये प्रोफेशनल सेल्स ट्रेनी पदाकरीता भरती होणार आहे. ही भरती एकूण 200 पदांसाठी  करण्यात येणार आहे.
   या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. संकेतस्थळावर Employment टॅबवर क्लिक करा, जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी/आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने sign in  करावे. त्यानंतर होमपेजवरील जॉब फेअर  हा पर्याय निवडून बुलडाणा जिल्हा निवडावा. तसेच 27 सप्टेंबर 2017 रोजी होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करावी व आय ॲग्री या बटनावर क्लिक करावी. त्यान्रतर आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनावर क्लिक करावी.  इच्छूक पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने संबंधित ठिकाणी उपस्थित राहून नोंद करावी व  या मेळाव्यास उपस्थित रहावे.  सहभागाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास 18602330133 क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मेळाव्याकरीता 07262-242342, 07263-255200 व सचिन पवार यांच्या 9552319696 व व्ही.एस आठवर यांच्या 9422884584  क्रमांकावर संपर्क साधावा.
    मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी कार्यालयाचे नोंदणी ओळखपत्र, शैक्षणिक अहर्ततेच्या मूळ प्रमाणपत्र व पाच प्रती, बायोडाटा, आधार कार्ड/ निवडणूक ओळखपत्र, 5 पासपोर्ट फोटो सोबत आणावे. तरी मोठ्या संख्येने उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे आणि आपली संधी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. चिमणकर यांनी केले आहे. 
                                                                        *********




जीएसटीच्या आपसमेळ योजनेची निवड करण्यासाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, दि.25 – वस्तु व सेवा कर कायदा, 2017 (जीएसटी) अंतर्गत आर्थिक वर्ष 2017-18 साठी आपसमेळ (कम्पोजीशन) योजना जाहीर केली आहे. या योजनेची निवड करण्यासाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तरी योजनेची निवड करण्यासाठी इच्छूक असलेल्या व्यापाऱ्यांनी 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जीएसटीच्या www.gst.gov.in  या पोर्टलवरून योजनेची निवड करावी. निवड केलेल्या व्यापाऱ्यांना 1 ऑक्टोंबर 2017 पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
   जे व्यापारी याआधी या योजनेसाठी पात्र असुनसुद्धा योजनेची निवड करू शकले नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी पात्र व इच्छुक व्यापाऱ्यांनी या संधीचा पुरेपुर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी www.gst.gov.in  संकेतस्थळ, वस्तू व सेवा कर भवन, खामगांव येथील दूरध्वनी क्रमांक 07263-258769 व इमेल आयडी milindkhune3@gmail. com, rnzanke@gmail.com या पत्यांवर संपर्क करावा, असे राज्य कर उपायुक्त टि. के पाचरणे यांनी कळविले आहे.
                                                            ******
पं. दिनदयाल उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 25 - पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज  25 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रकतमेला पुष्पहार अर्पण केला, तर उपस्थितांनी पुष्प अर्पण केले. याप्रसंगी प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती नम्रता चाटे, राजेश देशमुख आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                

Friday 22 September 2017

news 22.9.2017 dio buldana

ग्राहक संरक्षण हितासाठी काम करावे
-         जिल्हाधिकारी
·        जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक
बुलडाणा,दि. 22 :  ग्राहकांना विविध समस्या भेडसावत असतात. शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यात येतात. अनेकवेळा या सेवा देताना तक्रारी येतात. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करून आलेल्य तक्रारी सोडविल्या पाहिजे. त्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद व शासनाच्या विविध विभागांनी काम करावे, अशा सूचना प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख यांनी आज दिल्या.
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक संरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तक्रारींवर सुनावणी करताना ते बोलत होते. यावेळी बीएसएनएलचे श्री. रजोरीया, महावितरणे कार्यकारी अभियंता श्री. पाठक आदींसह अमरचंद संचेती, श्री. बैरागी, संजय जोशी, जिवनसिंग राजपूत आदी सदस्य उपस्थित होते.
   प्रत्येक विभागाने तक्रारींचा निपटारा त्वरित करून तक्रारदाराचे समाधान करण्याचे सांगत श्री. देशमुख म्हणाले, जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारी समोर येतात. मात्र अशा अनेक तक्रारी कार्यालयांकडे येत असतात. या सर्व तक्रारींचा निपटारा करावा.
   याप्रसंगी महावितरण, सहकार विभाग व मलकापूर नगर पालिका यांच्याकडील तक्रारी सोडविण्यात आल्या. तसेच संबंधित विभागांना कळविण्यात आले. बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*********
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 22 :  राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री 23 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :  दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 10.25 वाजता खामगांव येथून शासकीय मोटारीने गो. से महाविद्यालयकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता गो. से महाविद्यालय येथे आगमन व स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्यावरील कार्य सुगंध या स्मरणिकेचे विमोचजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता खामगांव येथून शासकीय मोटारीने हिवरखेड ता. तेल्हाराकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता हिवरखेड ता. तेल्हारा येथे आगमन व अकोला जिल्हा बँकेच्या हिवरखेड शाखा इमारतीचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता हिवरखेड येथून नांदुरा जि. बुलडाणाकडे प्रयाण, सायं 7.30 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावर आगमन व हावडा मेलने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                                        ************
शालेय डेंग्यू जागृती मोहिमेतंर्गत जनजागृती कार्यक्रम
बुलडाणा, दि. 21 :  शालेय डेंग्यू जागृती मोहिमेतंर्गत बुलडाणा शहरात माध्यमिक शाळा  व कनिष्ठ महा विद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू विषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले. प्रबेाधन विद्यालय, सरस्वती उच्च प्राथमिक शाळा, राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा, न.प उर्दू वरीष्ठ प्रा. शाळा क्रमांक 3, महात्मा फुले उच्च प्राथमिक शाळा या शाळांमध्ये कार्यक्रम पार पडले. जिल्हाभर डेंग्यू जनजागृती मोहिम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा हिवताप अधिकारी श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जात आहे.
  त्याअनुषंगाने उपरोक्त शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सहायक आर जी पाखरे, आरोग्य कर्मचारी श्री. बाहेकर, श्री. जुमडे, श्री. लोखंडे, श्री. वनारे, आर.एस जाधव, श्री. पडोळकर, पी.एस जाधव व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदांसाठी मुलाखतीचे आयोजन
बुलडाणा, दि. 22 :  खामगांव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पकारागीर योजनेतंर्गत शिल्पनिदेशकांची दोन पदे तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर मुलाखतींचे आयोजन गुरूवार 28 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे. ही दोन पदे थेअरी व प्रॅक्टीकल शिकविण्याकरीता भरावयाची आहेत. यामध्ये गवंडी व्यवसायाकरीता एक व साचेकार व्यवसायाकरीता एक पदाचा समावेश आहे.
   उमदेवारांची संख्या जास्त झाल्यास लेखी परीक्षा घेवून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिल्पनिदेशक तसेच संबंधित शाखेतील किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी/पदविका उत्तीर्ण असावा. त्यानंतरचा एक वा दोन वर्षाचा अनुभव किंवा संबधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र, एनसीव्हीटी/एटीएस परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतरचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी कळविले आहे.
                                                                        ************

Thursday 21 September 2017

news 21.9.2017 dio buldana

सुलतानपूर गावसमूहाचा विकास करण्यासाठी समन्वयाने काम करा
-         जिल्हाधिकारी
·        रूरअर्बन मिशनची बैठक, गावसमूहात 13 गावांचा समावेश
बुलडाणा, दि. 21 :  शामा प्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावसमूहाची निवड करण्यात आली आहे. या मिशन अंतर्गत निवडलेल्या गावसमूहामध्ये पायाभूत सोयी सुविधा, विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केल्या जाणार आहे. सुलतानूपर गावसमूहात 13 गावे असून या सर्व गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्भूत असेलल्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या आहेत.
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शामाप्रसाद मुखर्जी रूरअर्बन मिशनच्या नियामक समितीची बैठक आज 21  सप्टेंबर 2017 रोजी पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल साकोरे, नगर रचनाकार ए. के जोशी, कार्यकारी अभियंता श्री. शेगोकार, गटविकास अधिकारी श्रीमती पाटील आदींसह उपस्थित होते.
    सुलतानूपर गावसमूहातील गावांमध्ये रस्ते, पथदिवे, आरोग्याच्या सुविधा दर्जेदार करण्याचे सूचीत करीत जिल्हाधिकारी म्हणाले, या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा, संपूर्ण हगणदारीमुक्ती व नियमिती शौचालयांचा वापर, शोषखड्यांची निर्मिती करण्यात यावी. या गावांना अंतर्गत रस्त्यांनी जोडण्यात यावे. या गावसमूहाचा आराखडा त्वरित बनवावा. त्यामध्ये गाव विकासाच्यादृष्टीने आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा.
   यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, जिल्हा परीषदेचे संबंधीत अधिकारी, निवडलेल्या गावांचे ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
*********
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 21 :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 22 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :  दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 2.30 वाजता अमरावती येथून खामगांव, जि. बुलडाणाकडे प्रयाण, सायं 5 वाजता खामगांव येथे आगमन व शोकसभेत सहभाग, सायं 6 वाजता बुलडाणा येथे आगमन व हॉटेल राधिका समोर , जैस्वाल ले आऊट मैदानावर सार्वजनिक सभेस उपस्थिती, सोयीनुसार बुलडाणा विश्राम गृह येथे रात्री मुक्काम असेल. दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 वाजता बुलडाणा येथून चिखलीकडे प्रयाण, सकाळी 8.30 वाजता चिखली येथे आगमन व स्थानिक भेटी, सकाळी 8.45 वाजता चिखली येथून शिंदेफळ, ता. सेनगांव, जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.
                                                *************
जिल्ह्यात संततधार...
·                    संग्रामपूर  तालुक्यात सर्वात जास्त 63 मि.मी पावसाची नोंद
·                    सरासरी 19.1 मि.मी पाऊस
बुलडाणा, दि. 21 -  जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रीय झाला असून सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे.  या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे.   जिल्ह्यात आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 63  मि.मी  पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे.
      जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सर्वात जास्त पाऊस संग्रामपूर :63 मि.ली (484 मि.ली), चिखली : निरंक (653), मेहकर: 3 (694), दे.राजा: 11 (697),  लोणार: 4 (592), खामगांव : 15 (580.3), शेगांव : 20 (458), मलकापूर : 22 (649), मोताळा : 19 (607), नांदुरा: 23 (624.5), जळगांव जामोद : 20 (702), सि.राजा: 24 (682.1), बुलडाणा : 24 (926) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.  अशाप्रकारे  जिल्ह्यात एकूण 248  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 19.1  मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस  बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची  सरासरी 642.2  मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार  पुढीलप्रमाणे आहे :
नळगंगा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 34.55 टक्के, पेनटाकळी प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 17.10 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 5.05, पलढग प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 89.61 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 38.25 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 26.99, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12  टक्के, आजचा पाणीसाठा: 33.13 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 23.35 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 28.39 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 24.86 टक्के.
                                                                        ***********
कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस..
-    सर्व कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र
-    नव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावी
- जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये करावी
बुलडाणा, दि 21 :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अर्ज भरण्याचा उद्या 22 सप्टेंबर 2017 शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर जावून अर्ज भरावेत. तसेच  कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्यांनी ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेकडे आधार कार्ड व इतर माहिती सादर करावी.
    शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँकाकडून कर्ज घेतले असले तरी त्यांना एकूण 1.50 लक्ष रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँक व इतर बँकेकडे आधार कार्ड आणि के.वाय.सी कागदपत्रे द्यावीत.  
       अशी माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतेलल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकाकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. तरी शेतकऱ्यांनी सर्व कर्ज खात्यांची माहिती ऑनलाईन्‍ अर्जात नमूद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात व जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
*********
ई पॉस मशीन नसणाऱ्या 147 दुकानदारांची अनामत रक्कम जप्त
  • जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कारवाई
  • 1 लक्ष 47 हजार रूपयांची रक्कम शासन जमा करण्याचे आदेश
बुलडाणा, दि. 21 -  जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांना ईपॉस मशीनचे वितरण करण्यात आले होते. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणून गैरव्यवहारांना आळा घालणे यामागील उद्देश होता. तसेच रास्तभाव पात्र लाभार्थ्यांना धान्याचे सुरळीत वितरण व्हावे. मात्र जिल्ह्यातील 147 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे यांनी रास्तभाव दुकानाच्या प्राधिकार पत्राची 100 टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा केली आहे. दंडाच्या रक्कमेपोटी 1 लक्ष 47 हजार रूपये शासनजमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे यांनी कळविले आहे.

                                                            ******* 

Tuesday 19 September 2017

loan weiver news 19.9.2017 dio buldana

कर्जमाफी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य
-    सर्व शेती कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र
-    नव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावी
बुलडाणा, दि 19 :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अर्ज भरण्याची शेवटची मुदत 22 सप्टेंबर 2017 असून अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता शेतकऱ्यांनी अर्ज भरावे. मात्र कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न भरल्यास असे अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.
  अशी माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतेलल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकाकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. अशी माहीती सादर न केल्यास व अर्जदाराचा अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहील्यास त्याला स्वत: अर्जदार जबाबदार राहील. तरी ज्यांनी अशी माहिती सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाईन एडीट ऑप्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पत्रकान्वये केले आहे.
                                                                           *********
विविध धार्मिक संस्थानच्या महाप्रसाद वितरणबाबत कार्यशाळा
·        अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने प्रशिक्षण
·        सहा संस्थानचे विश्वस्त उपस्थित
बुलडाणा, दि 19 :  जिल्ह्यात विविध धार्मिक संस्था, देवस्थान यांच्याकडून तसेच संस्थान परिसरातील अन्न व्रिकेते व्यावसायिक यांच्याकडून भाविकांसाठी प्रसाद, महाप्रसादाचे उत्पादन, वितरण, विक्री केली जात आहे. या प्रसादाची गुणवत्ता, दर्जा, अन्न सुरक्षीतता याबाबत माहिती देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बुलडाणा कार्यालयाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा शेगांव येथील अन्नपुर्णा व्हेज प्लाझा हॉटेलात नुकतेच पार पडले.
   या कार्यशाळेत श्री. संत गजानन महाराज संस्थान मंदीर परीसरातील अन्न व्यावसायिक, संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी ता. शेगांव, वारी हनुमान वारी ता. संग्रामपूर, संत सोनाजी महाराज संस्थान सोनाळा ता. संग्रामपूर, हिवरा आश्रम संस्थान ता. मेहकर आणि बालाजी संस्थान वाशिम यांचे विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यालयाचे सहआयुक्त (अन्न) सी.डी. साळुंके, अमरावती विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दीप प्रज्वलन करून केले.
  कार्यशाळेत एफएसएसएआय दिल्लीचे फॉस्टेक ट्रेनर डॉ. रश्मी कोल्हे यांनी प्रोजेक्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सहआयुक्त यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. तसेच सुरक्षीत व निर्भेळ प्रसाद भाविकांना मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेचे संचलन व आभार प्रदर्शन अन्न सुरक्षा अधिकारी स.ल. सिरोसीया यांनी केले. याप्रसंगी  बुलडाणा कार्यालयातील सहा्यक आयुक्त ज.रा.वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी यदुराज दहातोंडे, निलेश ताथोड, रावसाहेब वाकडे, गजानन गोरे व रा.ब यादव आदींसह अन्न व्यावसायिक उपस्थित होते.
सर्व बँक कर्ज खात्यांचे वरिष्ठ पातळीवरून एकत्रीकरण होणार
·        नव्याने अर्ज न भरता जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून कर्ज खात्यांची माहिती द्यावी
·        आधार क्रमांक न दिल्यास कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर सवलतीचा लाभ नाही
बुलडाणा, दि 19 :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. या अर्जासोबत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, गट सर्वे क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व बॅकांमधील सर्व कर्जखात्यांची माहिती सादर करणे आवश्यक आहे. कारण सर्व बँकेच्या कर्ज खात्यांचे वरिष्ठ पातळीवरून एकत्रीकरण होणार आहे.
     मात्र काही कर्जदार शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जखात्यांची माहिती ऑनलाईन अर्जात सादर केलेली नाही. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँक कर्जदार शेतकऱ्यांनी आधार कार्ड संबंधित बँक शाखेत सादर केलेले नाहीत. सर्व बॅकांचे कर्ज खात्यांचे एकत्रीकरण वरिष्ठ पातळीवर होणार आहे, तेव्हा कुणीही थकीत कर्जदार व नियमित परतफेड केलेल्या सभासदाने आधारकार्ड न दिल्यास त्यांना कोणत्याही राष्ट्रीयकृत अथवा ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीचा किंवा प्रोत्साहनपर सवलतींचा लाभ मिळणार नाही.
    तेव्हा सर्व कर्जदार शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्याकडील सर्व प्रकारच्या कर्जखात्यांची माहिती द्यावी.  त्याकरीता नव्याने अर्ज न करता, त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे सदरचा बदल करता येईल. सर्व कर्जखाते असणाऱ्या बँक शाखांमध्ये आधार कार्ड जमा करावे. अन्यथा त्यामुळे कुणीही कर्जदार शेतकरी संबंधीत लाभापासून वंचीत राहतील, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                        **************

Saturday 16 September 2017

NEWS 16.9.2017 DIO BULDANA

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
  • अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा करू नये
     बुलडाणा,दि‍. 16 - : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी राज्य शासनाने 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेतंर्गत शेवटची तारिख 15 सप्टेंबर 2017 होती. ती आता 22 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात तालुका अथवा ग्रामपातळीवर 1892 केंद्र सुरू आहेत. त्यामध्ये आपले सरकार, महा ई सेवा केंद्र  यांचा समावेश आहे.
  शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता अर्ज भरावे. आपल्या जवळच्या शासनमान्य आपले सरकार, महा ई सेवा केंद्र, ई संग्राम केंद्रांवर जावून कर्जमाफीचा अर्ज भरावा. त्यासाठी आधार कार्ड, पॅन क्रमांक, बँक बचत खातेपुस्तिका, 7/12 उतारा व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे सोबत घेवून जावीत. अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                           **********
जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच्या बैठकीचे आयोजन
     बुलडाणा,दि‍. 16 - : जिल्हा स्तरावरील जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच बैठकीचे आयोजन दरमहा करण्यात येते. त्यानुसार 22 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा ग्राहक संरक्षण बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तरी नागरिकांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात. जेणेकरून तक्रारींचे निराकारण करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
शेतकऱ्यांनी माल साठवणूक करताना गोदामाच्या परवान्याची खात्री करावी
     बुलडाणा, दि‍. 16 - : शेतकरी बांधव व माल साठवणूकदारांनी गोदामात माल साठवणूकीस ठेवताना गोदामाचा परवाना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयातून घेतलेला किंवा नुतनीकरण केलेला आहे किंवा नाही, याची खात्री करावी. खात्री केल्यानंतरच माल सदर मोदामामध्ये ठेवण्याचा निर्णय घ्यावा.  सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक (व्यक्ती / फर्म) तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यावसायिक आस्थापना हे विना परवाना माल साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
    अशा्रपकारे विनापरवाना माल साठवणूक तारण पावती आणि तत्सम प्रकारचा व्यवसाय करीत असल्यास ही बाब मुंबई वखार अधिनियम 1959 चे कलम 35 चे उल्लंघन करणारी आहे. या अधिनियमाच्या कलम 11 नुसार सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यावसायिक आस्थापना यांना गोदाम परवाना घेणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे परवाना नसताना माल साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पत्रकान्वये दिला आहे.
                                                            ***********
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 18 सप्टेंबर रोजी आयोजन
     बुलडाणा,दि‍. 16 - : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन 18 सप्टेंबर 2017 रोजी निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी महिलांनी तक्रारी असल्यास महिला लोकशाही दिनामध्ये सोडविण्यासाठी आणाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
पशुसंवर्धन विभागाची गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना जाहीर
  • 27 सप्टेंबर 2017 पर्यंत स्वीकारणार अर्ज
  • गोशाळांना अर्थसहाय्य करणारी योजना
     बुलडाणा, दि‍. 16 - : पशुसंवर्धन विभागाने गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देण्याकरीता राज्यस्तरीय योजना गोवर्धन गोवंश सेवा केंद्र जाहीर केली आहे. ही योजना या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी अर्जाचा नमुना व माहिती पंचायत समिती स्तरावर प्राप्त करून घ्यावी. पंचायत समिती कार्यालयात पशुधन विस्तार अधिकारी यांच्याकडे अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. या योजनेनुसार अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 27 सप्टेंबर 2017 रेाजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या मुदतीनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
   राज्यात 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकामासाठी व ओझी वाहण्यासाठी, पैदाशीकरीता उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल आणि वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच गाय, बैल, वळु यांच्या कत्तलीकरीता परराज्यात करावयाची वाहतूक व अनुषंगीक खरेदी/विक्री करण्याससुद्धा प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. परीणामी कालांतराने शेती व दुग्ध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असून या सर्व पशुधनाचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्याकरीता शासनाने गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंमलात आणली आहे. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जायभाये यांनी केले आहे.
                                                            *******
                मानवी वस्त्यांमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शिघ्र कृती दल…
     बुलडाणा, दि‍. 16 - : मानव व वन्यप्राणी यांच्यामध्ये संघर्षाच्या घटना वारंवार होत असतात. तसेच मानवी वस्तीमध्ये वन्यप्राणी आढळून येणे व वन्यप्राण्याचा जीव धोक्यात असल्याच्या घटनाही निदर्शनास येतात. त्याचप्रमाणे वन्यप्राण्याचा अपघाती मृत्यू/ जखमी झाल्याचेही दृष्टीस पडते, अशावेळी वन विभागाचे शिघ्र कृती दल मदतीस धावणार आहे. या शिघ्र कृती दलास संपर्क केल्यास अशा घटनांमध्ये निश्चितच मदत मिळणार आहे.
  यामध्ये प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा जी. ए झोळ आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 7030255444 आहे. तसेच सहायक वनसंरक्षक अधिकारी एस.एस गिरी यांचा मोबाईल क्रमांक 9922744798 असून उपप्रमुख एस.एच राठोड यांचा मोबाईल क्रमांक 9922937974 आहे. तसेच शिघ्र कृती दल वाहन चालक भुषण जाधव यांचा मोबाईल क्रमांक 9423722233 आहे. उपरोक्त क्रमांकावर अशा घटनांवेळी संपर्क करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी केले आहे.
                                                            ***********
जिल्ह्यात दमदार पाऊस...
·                    बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 92 मि.मी पावसाची नोंद
·                    सरासरी 25.7 मि.मी पाऊस
बुलडाणा, दि. 16 -  गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची हजेरी लावणे सुरू आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या पावसाने कुठे साधारण, तर कुठे दमदार स्वरुपाच्या पावसाची नोंद झली आहे. या पावसामुळे  शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधानाचे हास्य आले आहे.  कालही जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्याचा अपवाद वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली.  जिल्ह्यात आज 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 92  मि.मी  पावसाची नोंद बुलडाणा तालुक्यात झाली आहे.
      जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सर्वात जास्त पाऊस बुलडाणा :92 मि.ली (902 मि.ली), चिखली : 15 (590), मेहकर: 26 (682), दे.राजा: 4 (586),  लोणार: 7 (583), खामगांव : 13.2 (564), शेगांव : 12 (436), मलकापूर : 4 (627), मोताळा : 35 (576), नांदुरा: 24 (601), जळगांव जामोद : 60 (682), सि.राजा: निरंक (589.8), संग्रामपूर : 42 (421) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.  अशाप्रकारे  जिल्ह्यात एकूण 334.2  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 25.7  मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस  बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची  सरासरी 577.4  मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार  पुढीलप्रमाणे आहे :
नळगंगा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 32.31 टक्के, पेनटाकळी प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 10.95 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : निरंक, पलढग प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 79.23 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 32.21 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 24.87, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12  टक्के, आजचा पाणीसाठा: 12.57 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 17.02 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 14.70 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 23.65 टक्के.
                                                                        ***********


Tuesday 12 September 2017

football festival news 12.9.2017, dio buldana

कर्जमाफीचे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज भरावे
-       जिल्हाधिकारी
•       15 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदत
•       अर्ज भरण्यासाठी उरले थोडे दिवस..
•       कर्जमाफीमध्ये ऑनलाईन नाव पाहण्यासाठी http://CSMSSY.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी
बुलडाणा, दि. 12 : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेनुसार 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले नसतील, अशा शेतकऱ्यांनी त्वरित ग्रा.पं. आपले सरकार *सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्रांच्या* माध्यमातून अर्ज भरून घ्यावे. मुदत संपत असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
    जिल्ह्यात 1210 केंद्रांवर बायोमॅट्रीक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रांवरून विनाशुल्क शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता अर्ज भरून घ्यावेत.  तसेच शेतकऱ्यांनी कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाईन पाहण्यासाठी http://CSMSSY.in या संकेतस्थळाला भेट देवून नावाची खात्री करून घ्यावी. जर नाव नसेल तर पुन्हा अर्ज भरून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        असे पहा आपले नाव
सर्वप्रथम http://CSMSSY.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळाच्या खालील बाजूस अर्जदाराची यादी अशी लिंक असेल, ही लिंक निवडावी, त्यानंतर आपला जिल्हा, तालुका व गाव निवडावे. आपल्या गावाची यादी आपल्या समोर येईल. या यादीमध्ये आपले नाव असल्याची खातरजमा करावी. जर नाव नसेल तर अर्ज भरून घ्यावा.                                                                                              *******
नेहरु युवा केंद्राव्दारे निबंधस्पर्धा व लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि. 12 : नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दीतक  या विषयांतर्गत निबंध स्पर्धा व लघुचित्रफीत स्पर्धेचे आयोजन 14 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत असून जिल्हास्तरावर निवड झालेला स्पर्धक राज्यस्तरासाठी व राज्यस्तरावर निवड झालेला स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरणार आहे.
निबंध स्पर्धेचे विषय : मी स्वच्छतेसाठी काय करु शकतो / शकते ?
नियम व अटी : 250 शब्द मर्यादा. वेळ : 1 तास,  निबंध निळयाशाईने लिहावा, निबंध लेखन स्पर्ध दरम्यान मोबाईल/इलेक्टॉनिक वस्तूंचा वापर करता येणार नाही,  निबंध भाषा : इंग्रजी/ हिंदी /मराठी असावी.
लघुचित्रपट स्पर्धेचे विषय : माझा देश स्वच्छ करण्यासाठी माझे योगदान.
नियम : कालावधी : 2/3 मिनिट, स्पर्धकाने लिखीत स्वरुपात लघुपट तयार केला असल्याचे सादर करावे,  कोणत्याही वादाच्या बाबतीत त्यांना वैयक्तीक जबाबदार धरले जाईल, स्पर्धकाने ओळख म्हणून पुढील तपशिलाचा उल्लेख करावा, लघुचित्रपटाचे नांव, कालावधी, स्पर्धकाचे नांव, लिंग,वय,पुर्णपत्ता,ईमेल व मोबाईल क्रमांक  दयावा.
या स्पर्धेकरीता जिल्हास्तरावरील बक्षीस - प्रथम रु. 500, व्दितीय रु.300/- आणि तृतीय रु.200/-, राज्यस्तरावरील बक्षीस प्रथम रु. 5000, व्दितीय रु.3000/- आणि तृतीय रु.2000/-आणि राष्टीयस्तरावरील बक्षीस प्रथम रु. 25000, व्दितीय रु.10000/- आणि तृतीय रु.5000/- असे आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या महाविदयालयात अथवा नेहरु युवा केंद्र बुलडाणा कार्यालयात संपर्क साधावा व जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा युवा कार्यक्रम समन्वयक डॉ. दत्ता देशमुख यांनी केले आहे.
************
अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय.. जिल्ह्यात रंगणार फुटबॉल फेस्टीवल
  • जिल्ह्यातील 587 शाळांचा असणार सहभाग
  • जिल्ह्यात पाच ठिकाणी विशेष सेल्फी पॉईंट
  • 15 सप्टेंबर 2017 रोजी फुटबॉल फेस्टीवल
बुलडाणा, दि. 12 : जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल होय. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने राज्यात होत आहे. यामध्ये एकूण 24 देशांचे संघ सहभागी होणार आहे. राज्यात स्पर्धेच्या अनुषंगाने फुटबॉल खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी फुटबॉल मिशन 1 मिलीयन कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2017 रेाजी फुटबॉल फेस्टीवल रंगणार आहे. अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.
   फुटबॉल फेस्टीवलची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. देशमुख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदी उपस्थितहोते.
   जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या शाळा व वसतीगृह तयारीला लागले आहे. फुटबॉलचे सामने 15 सप्टेंबर 2017 रोजी होणार असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
   जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 587 शाळा या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. तसेच स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या 287 शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल, तर शाळा नोंदणी न केलेल्या शाळांना प्रत्येकी 2 फुटबॉल देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात या फेस्टीवलमध्ये 30 महाविद्यालये, न.पच्या 8 शाळा सहभागी होणार असून 720 ठिकाणच्या मैदानांवर फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने आयोजित केल्या जाणार आहे. फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने पाच ठिकाणी विशेष सेल्फी पॉईंटची उभारणी केली आहे. त्यामध्ये शेगांव येथील आंनद सागर प्रवेशद्वार, नांदुरा येथील हनुमान मुर्तीजवळ, लोणार सरोवराजवळ, सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्याजवळ आणि हिवरा आश्रम येथील विवेकानंद नगर या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात किमान 50 हजार खेळाडू एकाच दिवशी फुटबॉल खेळतील याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
    फुटबॉल फेस्टीवलमध्ये 30 बाय 20 मीटर प्रमाणे मैदान आखणी करण्यात येणार असून 15 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 8 ते 12 सामने खेळविले जातील. प्लॅस्टीक कोन, विटा आदी साहित्य वापरून गोलपोस्ट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक सामना हा 30 मिनीटांचा असणार आहे. मध्ये 5 मिनीटांचा ब्रेक असणार आहे. एका संघात पाच खेळाडू राहतील. तसेच दोन खेळाडू राखीव असतील. एकापेक्षा जास्त संघ असतील तेथे संघ क्रमांक ठरवून देण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली.  
                                                                        ****
जिल्हास्तर शालेय शुटींगबॉल क्रीडा स्पर्धेचा सुधारीत कार्यक्रम.

            बुलडाणा, दि. 12 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय शुटींगबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन 14 ते 15 सप्टेंबर 2017 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे करण्यात आले होते.  परंतु काही अपरिहार्य कारणास्तव सदरच्या स्पर्धांचे आयोजन 25 सप्टेंबर 2017 रोजी तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे करण्यात आलेले आहे.  तरी या तारीख व स्थळ बदलाची नोंद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, एकविध खेळ संघटना, खेळाडू, पालक व नागरीकांनी घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.