Thursday 30 September 2021

DIO BULDANA NEWS 30.9.2021

 

पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पुर्वसूचना द्यावी

• प्रधानमंत्री पीक विमा योजना

• कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जिल्ह्यात 25 ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत गुलाब चक्रीवादळामुळे पूर आल्याने क्षेत्र जलमय होवून शेतामध्ये पाणी घुसले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी व मका या पिकांचे क्षेत्र बाधीत झाले आहे. त्याअनुषंगाने पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तात्काळा विमा कंपनीला तक्रार दाखल करावी.

       शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विमा कंपनीस सर्वप्रथम 18001024088 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नुकसानीबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करावी. टोल फ्री क्रमांकावर संपर्क न झाल्यास क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करावी. क्रॉप इन्शुरन्स ॲप वर तक्रार दाखल न झाल्यास   तालुका स्तरावर विमा कंपनीच्या प्रतीनिधीकडून पुर्व सुचना फॉर्म घेऊन त्यामध्ये नुकसानीबाबत अचूक माहिती भरावी व त्यासोबत पिक विमा भरल्याची पावती, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत जोडून ऑफलाईन सूचना फॉर्म द्यावे. नुकसानीबाबत ऑनलाईन सूचना फॉर्म देणे शक्य न झाल्यास पुर्वसुचनेचा फॉर्म नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि सहायकांकडे सुचना फॉर्म भरून देऊन पोच घ्यावी. कृषि सहायक यांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले पूर्व सुचना फॉर्म  एकत्रित करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे देऊन पोच घ्यावी.

 सुचना फॉर्म भरताना नोंदणी अर्ज  क्रमांक, नाव, वडीलांचे नाव, मोबाईल क्रमांक, कर्जदार / बिगर कर्जदार, गाव, पिकांचे नाव, विमा संरक्षीत क्षेत्र, सर्वे क्रमांक, पिक विमा भरलेल्या पावतीनुसार व्यवस्थित भरल्याची खात्री करावी. नुकसानीचा प्रकार हा क्षेत्र जलमय झाल्यामुळे टाकावा. तसेच नुकसानीचा तारिख, नुकसानीची टक्केवारी अचूक भरल्याची खात्री करावी. एकापेक्षा जास्त गट क्रमांक किंवा एकापेक्षा जास्त पिकाचे पिक विमा भरले असल्यास स्वतंत्र पूर्वसुचना फॉर्म भरून द्यावे. बाधित झालेल्या क्षेत्राचा सुस्पष्ट जिओ टॅग फोटो काढुन आपल्याकडे जतन करून ठेवावे.  तरी    पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये पिक विमका योजनेत सहभाग नोंदविलेल्या नुकसानग्रस्त 100 टक्के शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत पूर्व सुचना द्यावी, असे आवाहन  कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

*****

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा

बुलडाणा, (जिमाका) दि.30 : शासन निर्णय अन्वये 28 सप्टेंबर हा दिवस प्रतिवर्षी "माहिती अधिकार दिन" म्हणुन साजरा करण्यात येतो.  त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दिनांक 28 सप्टेंबर  रोजी निवासी उपजिल्हाधिकारी  दिनेश गिते यांचे प्रमुख उपस्थितीत कोविड  बाबत निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री गीते  यांनी माहितीचा अधिकाराबाबत  मार्गदर्शन केले. कार्यक्रमास तहसीलदार श्रीमती प्रिया सुळे  यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास नायब तहसीलदार संजय बनगाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार व हेड कॉस्टेबल आपत्ती व्यवस्थापन पथक तारासिंग पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

***

कोरोना अलर्ट : प्राप्त 452 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

       03 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                                   

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 453 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 452 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 67 तर रॅपिड टेस्टमधील 385 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 482 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगाव तालुका : काळेगाव 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचाराअंती 03 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                              

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 718216 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86879 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86879 आहे.  आज रोजी 615 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 718216 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87565 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86879 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर शेती उपयोगी साहित्याचे वितरण

जि.प सेसफंडातून योजना, 11 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्हा परिषदेचा कृषि विभागामार्फत सन 2021-22 वर्षाकरीता जिल्हा परिषद सेसफंड योजनेमधून शेतकऱ्यांना  75  टक्के अनुदानावर ताडपत्री, पॉवर स्प्रेअर, 5 एचपी विद्युत पंप, पीव्हीसी पाईप व ट्रॅक्टरचलीत औजारे पुरवितण्या येणार आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर कृषि कार्यालयात उपलब्ध आहे.  अर्ज विहीत नमुन्यात परिपूर्ण असावा. अर्जासोबत 7/12, नमुना 8 –अ, बँकेचे पासबुकची प्रत, आधार कार्ड आदी सर्व कागदपत्रे असावीत. सदर अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात 11 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे.  तरी योजनेत लाभासाठी शेतकरी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर करावे. या योजनेचा शेतकरी बांधवांनपी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा घ्यावा, असे आवाहन कृषि विषय समिती सभापती  राजेंद्र सदाशिव पळसकर यांनी केले आहे.  

****

 

ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

  • मोबाईल क्रमांक 9922899855 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.30: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

     या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9922899855 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

   तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

******

 

Wednesday 29 September 2021

DIO BULDANA NEWS 29.9.2021

 शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

• 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 - इंडियन कौन्सील फॉर चाईल्ड वेलफेअर, नवी दिल्ली यांनी मुलांचे शौर्य पुरस्कार -2021 करीता नामांकन प्रस्ताव मागितले आहे. सदर प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जोशी नेत्रालयाच्या बाजुला, मुठ्ठे ले आऊट, बस स्टॅण्डच्या मागे, बुलडाणा या कार्यालयात 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत सादर करावेत.

 सदर शौर्य पुरस्कार पराक्रमाच्या तोडीने स्वत:चा जीव धोक्यात घालून सामाजिक अपराध किंवा गुन्ह्याविरूद्ध धिटाईने, धैर्याने कृत्य केलेल्या दृष्यमान आणि सुस्पष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी मुलांना देण्यात येतो.

   पुरस्कारासाठी अर्ज www.iccw.co.in या संकेतस्थळावर करण्यात यावे. पुरस्काराच्या प्रस्तावावर संबंधीत शाळा / महाविद्यालये यांचे प्राचार्य, जिल्हाधिकारी किंवा समकक्ष अधिकारी, पोलीस अधिक्षक यांची शिफारस असणे आवश्यक आहे. यासाठी मुलाचे वय 6 ते 18 वर्षापर्यंत असावे. या पुरस्कारासंदर्भात अधिक माहितीसाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात 5 ऑक्टोंबर 2021 पूर्वी संपर्क साधावा, असे जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी कळविले आहे.

*****


मतदारांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा

-          उपजिल्हाधिकारी गौरी सावंत

  • 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 29: उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तरी मतदार म्हणून नोंदणी झालेली नसलेल्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी संधी मिळावी व त्याचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागरिक घरबसल्या मतदार नोंदणी, नाव दुरूस्ती, नाव वगळणे आदी सुविधा वोटर हेल्पनलाईन ॲपचा उपयोग करून मिळवू शकणार आहे. तरी नागरिकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांनी केले आहे. मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   पुर्व पुर्ननिरीक्षण उपक्रमामध्ये दुबार अथवा समान नोंदणी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, योग्यप्रकारे विभाग / भाग तयार करणे आदी बाबी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत  राबविण्यात येत आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  या यादीवर दावे व हरकती 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.  

     तरी सदर कालावधीमध्ये मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करणे, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे आदी प्रकारची कामे होणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.

******

 

 

अन्न व्यावसायिकांसाठी 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान परवाना व नोंदणी मोहिम

बुलडाणा,दि.29 (जिमाका) : अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांना परवाना घेणे किंवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवाना व नोंदणी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोंबर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त स. द. केदारे यांनी केले आहे.

    जिल्ह्यातील ज्या अन्न व्यवसायिकांनी अद्यापपर्यंत परवाना घेतला नाही अथवा नोंदणी केली नाही, अशांकरीता ही मोहिम आहे. ज्या अन्न व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत आहे, असे अन्न व्यावसायिक, यात प्रामुख्याने हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रेते, चहा स्टॉलधारक, फळे व भाजीपाला विक्रेते, पाणीपूरी, भेळपूरी, वडापाव स्टॉलधारक व तत्सम किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ही 12 लाखापेक्षा जास्त आहे, अशा अन्न आस्थापनांनी परवाना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याच गटातील व्यावसायिकांनी केवळ नोंदणी घेतली असेल त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

    सर्व अन्न पदार्थ उत्पादक यांनी त्यांच्या अन्न पदार्थाच्या वर्गिकरणानूसार परवाना करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत सर्व अन्न व्यावसायिकांनी https:foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर परवाना व नोंदणीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना अडचण उद्भवल्यास किंवा अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, तळमजला, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कार्यालयात वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परवाना व नोंदणी मंजूर झाल्यानंतर ती अन्न व्यवसायीकांच्या खात्यात किंवा ईमेलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल. त्याची प्रत आपल्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावावी. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी विशेष मोहिम कालावधीत पात्रतेनुसार परवाना व नोंदणी प्राप्त करुन घ्यावी. परवाना व नोंदणी न करणाऱ्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सहायक आयुक्त श्री. केदारे यांनी कळविले आहे.

*******

 

पीक नुकसानीची माहिती देताना ऑनलाईन अडचण असल्यास ऑफलाईन द्यावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा,दि.29 (जिमाका) : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी. पीक नुकसानीची माहिती देताना ऑनलाईन अडचण येत असल्यास नजीकचे कृषी विभागाचे कार्यालय, संबंधित कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांचेकडे ऑफलाईन नुकसानीची माहिती द्यावी.  जेणेकरून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्यची मदत मिळेल.  त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती देताना अडचण येत असल्यास तातडीने ऑफलाईन पद्धतीने पीक नुकसानीची माहिती द्यावी, आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.  कृषी विभागाने संबंधीत शेतकऱ्यांनी ऑफलाईन माहिती स्वीकारावी. कुणीही विमाधारक शेतकरी पिक विम्याच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहे.  

*********

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करावे

  • इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल विद्यार्थी
  • 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अंतिम मुदत

बुलडाणा,दि.29 (जिमाका) : सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. तसेच अर्ज सादर करतेवेळी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज barti.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर CCVIS  प्रणालीवर अर्ज करावेत.  ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर फायनल सबमिशन करावेत, जेणेकरून समिती कार्यालयास ऑनलाईन द्वारे अर्ज आढळून येईल व समिती अर्जाची तपासणी करता येईल. ऑनलाईन अर्ज करताना फॉर्म – 15 ए व त्यावर प्राचार्यांची सही, शिक्का व शिफारस पत्र घ्यावे. जात प्रमाणपत्र पडताळणी नियमावली मधील नमुना क्रमांक 3 व 17 अन्वये 100 रूपये स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र / नोटरी केलेले सादर असावेत. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशीत विद्यार्थ्यांनी माहे नोव्हेंबर 2021 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन अर्जाद्वारे पुर्ण करावी. तसेच वंशावळीनुसार आजोबा / पणजोबा यांचे शालेय /महसूली पुरावे अपलोड करून त्याची हार्ड कॉपी समिती कार्यालयास सादर करावी. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केले असल्याची स्वत: खात्री करावी. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10.8.1950 पुर्वी, विजाभज प्रवर्गासाठी 21.11.1962 पूर्वी आणि इमाव, विमाप्र प्रवर्गासाठी 13.10.1967 पूर्वीचे महाराष्ट्राचे रहिवासी व जातीचे पुरावे आवश्यक आहेत. समिती कार्यालय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणी विनियमन) अधिनियम 2000 व जात पडताळणी नियमावली 2012 नुसार कार्यवाही करण्यत येते. तेव्हा आपले प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे अर्ज नमूद केलेल्या बाबीनुसार तपासणी करून या कार्यालयास सहकार्य करावे,   असे आवाहन सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

******

                         जिल्हा सर्वेक्षण अहवालानुसार रेतीघाटांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

बुलडाणा, दि.29 (जिमाका) : जिल्हा सर्वेक्षण अवाहल यापूर्वी तयार करण्यात आला आहे. तसेच वाळू / रेती लिलाव सन 2021-22 करीता योग्य असलेल्या रेतीघाटांची यादी www.buldhana.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी सदर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर आक्षेप नोंदवायचे असल्यास 26 ऑक्टोंबर 2021 पावेतो नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

****

बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदांची कामे प्राप्त

· 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, बुलडाणा येथे कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद असून ते रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता काम प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था वरील काम करण्यास इच्छूक असल्यास 7 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.

    सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त प्रा. यो बारस्कर यांनी   प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*********

मागासवर्गीय शेतकरी व आत्महत्याग्रस्त विधवेस 100 टक्के अनुदानावर ताडपत्री

• जि.प सेसफंडातून योजना, 14 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागामार्फत सन 2021-22 वर्षाकरीता जिल्हा परिषद 20 टक्के सेसफंड योजनेमधून मागासवर्गीय शेतकरी / मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर ताडपत्री देण्यात येणार आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज विहीत नमुन्यात परिपूर्ण असावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रे असावीत. सदर अर्ज पंचायत समिती कार्यालयात 14 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मागासवर्गीय शेतकरी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सादर करावे. या योजनेचा मागासवर्गीय शेतकरी व आत्महत्याग्रस्त विधवा महिला लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई राठोड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

**************

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करावे

• 30 ऑक्टोंबर 2021 अंतिम मुदत

बुलडाणा ,(जिमाका) दि. 29: सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

  माहे सप्टेंबर 2021 अखेरचे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे व त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 30 ऑक्टोंबर 2021 आहे. त्यानंतर वेबपोर्टलवरील ही सुविधा बंद होणार आहे. कसुरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी सर्व आस्थापना /उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .07262- 242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रां. यो बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  

                                                                                ***********

गाय, म्हैस, शेळी पालन व्यवसायाचे प्रशिक्षणाचे ऑनलॉईन पद्धतीने आयोजन

• प्रवेश नोंदणी 7 ऑक्टोंबर पर्यंत करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे गाय, म्हैस, शेळी व कुक्कुट पालन या प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 7 ते 11 ऑक्टोंबर 2021 दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता प्रवेश नोंदणी दि. 7 ऑक्टोंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201, 9011578854 वर करावी. तसेच उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड, बुलडाणा येथे संपर्क करावा.

   तसेच प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 5 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात गाय, म्हैस, शेळी व कुक्कुट पालनाचे तंत्र, गाय, म्हसीचे प्रकार व त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, शेळी केंद्रास प्रत्यक्ष भेट, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0000000

आजी व माजी सैनिक अत्याचार निवारण समित्यांच्या बैठकांचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : युद्ध विधवा, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, कार्यरत सैनिक, विधवा पत्नी व अवलंबित यांच्या कुटूंबीयांवर होणा-या अन्याय, जमीन अतिक्रमण, शेतीसाठी पांदण रस्ते, गावगुंडाकडून होणाऱ्या त्रासाबाबत, मालमत्ता कराबाबत आदी अत्याचार दूर करण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली  आहे. या समित्यांच्या बैठकांचे नियोजन 4 ऑक्टोंबर पासून करण्यात आले आहे. समितीची बैठक तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहे. तक्रारी बाबतचे अर्ज संबंधित कार्यालयात व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्काळ सादर करावे. उशीरा प्राप्त अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तालुका समितीच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त माजी सैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

                                                            अशा होणार बैठका

बुलडाणा : 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे, चिखली: 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, दे. राजा : 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, सिं.राजा : 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, मेहकर : 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, लोणार : 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे, मलकापूर: 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे, मोताळा : 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, जळगांव जामोद : 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, संग्रामपूर : 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, नांदुरा : 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय किंवा पंचायत समिती सभागृह येथे, खामगांव : 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे आणि शेगांव येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय किंवा पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

************

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज आठव्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 509 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 509 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 108 तर रॅपिड टेस्टमधील 401 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 509 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 717764 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86876 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86876 आहे. आज रोजी 479 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 717764 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87564 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86876 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****


Tuesday 28 September 2021

DIO BULDANA NEWS 28.9.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

• 02 रूग्णांना मिळाली सुट्टी       

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना विषाणूचा प्रकोप आता हळू हळू दूर व्हायला लागला आहे. रूग्णवाढीचा वेग कमालीचा मंदावला असून विषाणूने सपशेल माघार घेतल्याचे दिसून येत आहे. पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज सातव्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 438 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 438 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 तर रॅपिड टेस्टमधील 419 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 438 अहवाल निगेटीव्ह आहेत.

   तसेच आज 02 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 717255 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86876 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86876 आहे. आज रोजी 562 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 717255 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87564 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86876 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

*********

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

-  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात  काल व आज अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. काल रात्री जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी नोंदविल्या गेली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.  परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे नद्यांना आलेल्या पुरामुळे चिखली – खामगांव रस्त्यावर पेठ जवळ पैनगंगा नदीच्या  पुलावरून पाणी वाहत आहे. नांद्राकोळी पुलावरून पाणी असल्यामुळे रायपूर – बुलडाणा वाहतूकही बंद आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करू नये. आपले वाहन पुलावरील पाण्यातून काढू नये, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

   जिल्ह्यातील पैनगंगासह अन्य नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काही गावे बाधीत झाली आहे.  या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाणा 88.8 मिली, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चिखली तालुक्यातील चांधई 65.3, नांदुरा तालुक्यातील निमगांव 67.3, मोताळा तालुक्यातील धा.बढे 70.8 मिली अशाप्रकारे अतिवृष्टी झाली आहे.

 तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी. जेणेकरून पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानची माहिती घेवून पंचनामे करतील व शेतकऱ्यांना मदत देतील. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीला द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.  

  काही नागरिकांच्या घरांचीही पडझड आली आहे. त्यामुळे संसार उघड्यावर आले आहे. अशा बाधित नागरिकांना तातडीने मदत करावी. तसेच काही शेतकऱ्यांच्या जनावरे सुद्धा वीज पडून किंवा पुरात वाहून मृत पावली आहे. बाधित शेतकऱ्यांनाही मदत द्यावी लागणार आहे. तरी यंत्रणांनी पंचनामे पूर्ण करावे, असे आदेशही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.

**********

                                          जिल्ह्यात संततधार…!

  • सरासरी 36.2 मि.मी पावसाची नोंद
  • बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पाऊस
  • मेहकर, दे. राजा, सिं.राजा, लोणार तालुक्यांनी ओलांडली शंभरी
  • 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात मुसळधार, तर कुठे दमदार, कुठे मध्यम अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठावरील धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.

  जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.2 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यंत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 128.79 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर पाठोपाठ   सिं. राजा 111.45, दे. राजा 103.70, लोणार तालुक्यात आतापर्यंत 107.11 टक्के पाउस झाला आहे.

   जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची.  बुलडाणा : 89.7 मि.मी (880.5), चिखली : 29.3 (761.9), दे.राजा : 45 (730.7), सिं. राजा : 16.2 (893.7), लोणार : 15.1 (934.6), मेहकर : 26.4 (1080.2.), खामगांव : 36.4 (697.5), शेगांव : 33.3 (524.4), मलकापूर : 28.8 (567.4), नांदुरा : 48.1 (608.9), मोताळा : 48.6 (642.9), संग्रामपूर : 24.7 (638.1), जळगांव जामोद : 28.4 (487.5)

  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9448.3 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 726.8 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 487.5 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 68.95 आहे. तसेच जिल्ह्यात 9 महसूल मंडळात अ‍तिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.  बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा मंडळात 88.8, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चांधई ता. चिखली 65.3, निमगांव ता. नांदुरा 67.3, धा. बढे ता. मोताळा 70.8 मिली या अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 55.01 दलघमी (79.35), पेनटाकळी : 45.50 दलघमी (75.85), खडकपूर्णा : 84.39 दलघमी (90.36), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.77), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 10.18 दलघमी (67.74), तोरणा : 7.66 दलघमी (97.12) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

                                                                प्रकल्पांमधून विसर्ग सुरू

जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.50 मीटर असून जीवंत पाणी साठा 98.77 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4.50 वाजता 5 दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात एकूण 120.00 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 25 से.मी ने 34.65 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 19 दरवाजे 50 से.मी उघडल्यामुळे नदीपात्रात 37940.7 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  ज्ञानगंगा प्रकल्पाच्या सांडव्यावरून 112.67 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच पलढग प्रकल्पाच्या सांडव्यावरून 20 से. मी उंचीवरून 47.29 क्युमेक विसर्ग सुरू आहे.  प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पेनटाकळी प्रकल्पातून पुर नियंत्रणासाठी सायं 4.45 वा दोन वक्रद्वार 25 से.मी उघडून नदीपात्रात 181.167 क्युमेक विसर्ग  करण्यात येत आहे.

*************

                                प्रकल्पांमधून विसर्ग सुरू ; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरले आहे. त्यामधील काही मध्यम प्रकल्पांचा सांडवा प्रवाहीत झाला आहे, तर काही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. पुर नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात आज दुपारी 4 वा 96.55 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या 19 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे. नदीपात्रात 71 हजार 846 क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रती सेकंद सुरू आहे.  

  तसेच पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे सांडवा प्रवाहीत झाला आहे. त्यामुळे विश्वगंगा नदीकाठावरील तारापूर, कोथळी, सुलतानपूर, वरूड, शेंबा बु, डोलखेड ता. मोताळा,  निमखेड, लासूरा, पिंपळखुटा खु, पिंपळखुटा बु, वरखेड ता. मलकापूर, तांदुळवाडी, बुर्टी, वडनेर, सानपुडी, डिघी, चांदुर बिस्वा ता. नांदुरा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नळगंगा धरण 80 टक्के भरले असल्यामुळे नळगंगा नदी काठावरील भोरटेक, पिंपळपाटी, शेलापूर, घुसर ता. मोताळा, दाताळा, निंबारी, वाकोडी, कुंड खु, कुंड बु, तांदुलवाडी, म्हैसवाडी, नरवेल, तालसवाडा ता. मलकापूर या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.   

********************


अंगणवाडी ताई सुदृढ झाली तर संपूर्ण गाव सुदृढ होईल

- खासदार प्रतापराव जाधव

  • राष्ट्रीय पोषण अभियान -क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबादचा उपक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : शासनाच्या पोषण आहाराविषयी अधिकार व आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पोषण आहार व्यवस्थित मिळाला तर बालके सुदृढ होण्यास मदत होईल. अंगणवाडी ताई सुदृढ झाली, तर संपूर्ण गाव सुदृढ होईल असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमात केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद जिल्हा प्रशासन, बुलडाणा आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालय, लोणार येथे आज 28 सप्टेंबर 2021  रोजी करण्यात आले.

  खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन करून आणि रानभाजी व पोषण आहाराच्या प्रदर्शनाचे उदघाटन फित कापून केले. यावेळी महिला व बाल कल्याण सभापती ज्योतीताई पडघान, लोणारच्या माजी नगराध्यक्षा रंजनाताई मापारी, पंचायत समिती उपसभापती मदनराव सुटे, जिल्हा परिषद सदस्य गोदावरीताई कोकाटे, नंदुभाऊ मापारी, पांडुरंग सरकटे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अरविंद रामरामे, तहसिलदार श्री. नदाफ, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, टिटवीचे सरपंच भगवान कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डी. एस. बलशेटवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, पत्रकार  शेख समद शेख अहमद,  नंदकुमार डव्हळे, उमेश कुटे, विट्ठल घायाळ,  संतोष पुंड आदी उपस्थित होते.

   यावेळी महिला व बाल विकास सभापती ज्योती पडघान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अरविंद रामरामे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन नंदिनी चव्हाण यांनी केले. यावेळी आयोजित पोषण आहार, रानभाजी बनविणे, रांगोळी, सुदृढ़ बालक आदि विविध स्पर्धांच्या विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो तर्फे Poshan Abhiyaan-सही पोषण देश रोशन छापलेले पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर डी आर इंगळे आणि संच यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेवटी पोषण आहार शपथ घेण्यात आली. यावेळी सही पोषण-देश रोषण नारे देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद चे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी  प्रदीप पवार,  प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार व संपूर्ण ICDS विभागाने प्रयत्न केले.

---------------


Saturday 25 September 2021

DIO BULDANA NEWS 25.9.2021

 


सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूंची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी

*खासदार सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती
बुलडाणा, (जिमाका) दि. २५: सिंदखेड राजा ऐतिहासिक व पुरातन वास्तूंची पाहणी आज २५ सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा पुरातन वास्तूंची पाहणी केली. 
  यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ,  मोती तलाव,  निळकंठेश्वर मंदिर,  रामेश्वर मंदिर,  राजे लखुजीराव जाधव यांची समाधी यासह अन्य ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे. मान्यवरांनी वस्तूंना भेटी देत प्रत्येक ठिकाणची माहिती घेतली. 
  याप्रसंगी नियोजन समिती सदस्य ॲड नाझेर काझी,  नगराध्यक्ष सतीश तायडे,  उपनगराध्यक्ष विजय भाऊ तायडे,  राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव,  समाज कल्याण सभापती सौ पुनम ताई राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मधुकर गव्हाड, राम राठोड, सौ अनुजा ताई सावळे-पाटील,  जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत, शाम मेहेत्रे, नगरसेविका सौ सारिका मेहत्रे  माजी नगराध्यक्ष राजू आप्पा बोंद्रे,  नगरसेवक गौतम खरात,  गणेश झोरे, बालाजी मेहेत्रे,  योगेश मस्के, नरहरी तायडे, सतीश काळे,  राजेंद्र अंभोरे, संदीप मेहेत्रे, पंचायत समिती माजी सभापती जगन मामा सहाने,  शहाजी चौधरी, बुद्ध चौधरी  आदी उपस्थित होते.  तसेच महसूल विभाग पोलीस विभाग पुरातत्त्व विभाग पर्यटन विभाग यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.️ 
******

                           

सिंदखेडराजा येथील  विकास कामे गतीने पूर्ण करावे
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
* सिंदखेड राजा येथे पुरातन वास्तू विकास कामांची आढावा बैठक 
बुलडाणा, (जिमाका) दि. २५: शहराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवुन या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावयाचे आहे. तसे प्रयत्न सुरु देखील आहे. परंतु कोवीड मुळे या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. आता कोविड असला तरी निर्बंध शिथील झाले आहे. त्यामुळे शहराच्या विकासाची कामे सुरु करण्यात येत आहे. ही विकास कामे गतीने पूर्ण करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. 
    सिंदखेड राजा पंचायत समिती सभागृहात  सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, नियोजन मंडळाचे सदस्य ॲड नाझेर काझी, सभापती मीनाताई बंगाळे, जिल्हाधिकारी एस राममुर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते,  वंशज शिवाजी जाधव, नगराध्यक्ष सतिश तायडे,  राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वाहणे, केंद्रीय पुरातत्व विभागाचे संर्वधक मिलींद अंगाईतकर,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.  काळवाघे, विद्युत मंडळाचे अभियंता आदी उपस्थित होते. 
  पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंदखेड राजा शहराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी आपणाला शब्द दिला आहे.  तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संपूर्ण विकास कामाची दखल घेणार आहे.  तसेच खासदार सुप्रीयाताई सुळे  दिल्ली दरबारी मदत करणार आहे.  त्यामुळे त्यांनी सांगीतलेले प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सुचनाही पालकमंत्री यांनी दिल्या. 
   या बैठकीत मान्यवरांनी राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकारयांकडुन स्मारकांच्या विकास कामाचा आढावा घेतला. खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या,  ज्या गोष्टी अन्य देशात पाहयला मिळत नाहीत,  त्या आपल्याकडे अधिक आहेत. विशेष करुन पर्यटन वाढीसाठी ऐतिहासिक वास्तुंचे जतन, संर्वधन झाले पाहीजे. यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे.  सिंदखेड राजा, लोणार व शेगाव या तिनही महत्वपुर्ण शहरांना जोडण्याची योजना आखली जावी. सिंदखेड राजा शहरातील पायाभुत सुविधांवर काम करण्याची आवश्यकता आहे.  सिदखेड राजाच्या पर्यटन आणी ऐतिहासीक वास्तु संर्वधनासाठी आपण पालकमंत्री डॉ शिंगणे याचेंसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्रयाची भेट घेणार आहोत.  येथील विकास कामासंदर्भात सर्व प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाने तत्काळ आपल्याकडे पाठवावे, अशा सूचनाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्या. 
 त्या पुढे म्हणाल्या, लखोजिराव जाधव यांच्या राजवाडयाला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यासाठी आपण संसदेत हा विषय मांडणार आहे. दरम्यान वन विभागातील इको टुरीझम प्रकल्प, जालना-खामगाव-शेगाव रेलवेमार्ग हे विषय त्यांनी समजुन घेतले. सावित्री जिजाउ दशरात्रोत्सव महोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान शहरात  साजरा केला जातो. हा महोत्सव वेरुळ महोत्सवाच्या धर्तीवर साजरा व्हावा, या मागनीला त्यांनी दुजोरा दिला. हा कार्यक्रम महीला सक्षमीकरणासाठी संदेश देणारा ठरावा आशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बैठकीला संबधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Friday 24 September 2021

DIO BULDANA NEWS 24.9.2021

 

                 व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवावे

  • अल्पसंख्यांक नोंद असलेल्या महाविद्यालये व विद्यालयांना मिळणार अनुदान

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान योजना अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे व व्यायाम साहित्य खरेदी करणे याकरीता प्रती बाब 7 रूपये लक्ष इतके अनुदान मंजुर करण्यात येते.  तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगणे समपातळीत करणे, क्रीडांगणाभोवती संरक्षण भिंत बांधणे, क्रीडांगणावर विविध खेळांची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह बांधणे, भांडारगृह बांधणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इ. बाबींसाठी प्रती बाब 7 रूपये लक्ष इतके अनुदान मंजुर करण्यात येते.   सदर अनुदान प्राप्तीकरीता अल्पसंख्यांक म्हणून प्रमाणपत्र प्राप्त तथा शिक्षण विभागाद्वारा मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानीत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इत्यादींनी या कार्यालयात कार्यालयीन वेळेत येऊन योजनेचा विहीत नमुना प्राप्त करुन परिपुर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा.  प्रस्ताव सादर करतांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असे  जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.  

***********

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर

  • मतदार नोंदणीकरीता व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करून घ्यावी. प्रारूप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही, तसेच दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पूर्ण होईल, अशा मतदारांनी दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदारांना मतदार नोंदणी करणे सोयीचे व्हावे, याकरीता भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. तरी सर्व नागरिकांनी मतदार नोंदणीकरीता सदर ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती गौरी सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

**********

 


                      कृषी आधारीत वस्तुंच्या निर्यातीसाठी नवउद्योजकांनी पुढे यावे

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एक्सपोर्टर कॉन्क्लेव्हचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योग, मुल्य साखळी वृद्धींगत करणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे. उद्योगांमध्ये नवउद्योजक आले पाहिजे. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगासाठी शेतमाल सहज उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे नवउद्योजकांनी कृषी आधारीत वस्तुंच्या निर्यातीसाठी पुढे यायला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.  जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने बुलडाणा अर्बन रेसीडेंन्सी क्लब येथे एक्स्पोर्टर कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

  उद्योगात पुढे येण्यासाठी सकारात्मक मानसिकता अंगीकारण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, उद्योग उभारण्यासाठी इच्छाशक्ती असावी. नकारात्मकता येवू देवू नये. संकुचीत विचारशैली असल्यास उद्योगात प्रगती करता येत नाही. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेला कच्चा माल, कुशल मनुष्यबळ, मार्केटचा वेध, ग्राहकांचा कल, आंतरराष्ट्रीय बाजार आदींचा विचार करून उद्योगात पुढे जाता येते. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभही घ्यावा.

   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यावेळी म्हणाले, जिल्ह्यात मिरची, कांदा, कापूस, सोयाबीन आदींचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यात येते. या शेतमालावर आधारीत उद्योग उभारून प्रक्रिया केलेल्या वस्तुंच्या निर्यातीला आपणाला वाव आहे. त्यासाठी कृषि विभागाच्या योजनाही लाभकारक आहे.  महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी निर्यात प्लॅन सादर केला. या प्लॅनवर उद्योजकांसोबत चर्चा करण्यात येवून जिल्ह्यात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन सामुग्री व त्यावरील अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले. निर्यातदार संकल्प तायडे व सुबोध पाटील यांनी नव उद्योजकांना निर्यातीची कार्यपद्धती, शासकीय योजना व विविध शासकीय परवानग्या आदींबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, संचलन व आभार प्रादर्शन व्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाला निर्यातदार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                            **********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1166 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 10 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1176 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1166 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 10 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपिड अँटीजेन चाचण्यांमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 268 तर रॅपिड टेस्टमधील 898 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1166 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  सिं.राजा तालुका : कुंबेफळ 6, लोणार शहर : 2, बुलडाणा शहर : विश्वास नगर 1, चिखली शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 10 रूग्ण आढळले आहे.                                           

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 714802 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86865 आहे.  आज रोजी 719 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 714802 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87560 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

आयुष्यमान भारत पंधरवड्याला जिल्ह्यात थाटात सुरूवात

  • 30 सप्टेंबर पर्यंत चालणार पंधरवडा

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : आयुष्मान भारत पंधरवड्याला जिल्ह्यात सर्व अंगीकृत रूग्णालयांच्या माध्यमातून थाटात सुरूवात करण्यात आली आहे. हा पंधरवडा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. मोफत उपचार करिता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना  आहे. आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी देशामध्ये इतर राज्यात देखील उपचार घेऊ शकतात. तसेच इतर राज्यातील लाभार्थी देखील महाराष्ट्रातील अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. देशात 23 सप्टेंबर हा दिवस आयुष्यमान भारत दिवस म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे आजपासून आयुष्यमान भारत पंधरवड्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली.  आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी शासनाची मोफत आरोग्य विमा सेवा देणारी योजना म्हणून ओळखल्या जाते.  जिल्ह्यात योजनेमध्ये 25 अंगीकृत रूग्णालये आहेत. येथे मोफत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप सुरू आहे. पात्र कुटूंब निवड अधिकार केवळ केंद्र शासनाला आहे. पंधरवाड्यादरम्यान अंगीकृत रूग्णालयांमध्ये आरोग्य मित्र मोफत गोल्ड कार्ड वितरीत करून योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्याकडून प्राप्त निमंत्रण पत्र घेवून लाभार्थी यांनी आपले गोल्ड कार्ड तयार करून घ्यावे. प्रशासन योजनेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करीत आहे. योजनेला आज तीन वर्ष पुर्ण होत आहे.  एकत्रित योजनेतंर्गत 1743 कोविड लाभार्थी व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी संख्या 51 हजार 270 आहे. या लाभार्थ्यांना 117 कोटी रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना  अंतर्गत एकूण 1 लक्ष 3 हजार 249 लाभार्थी असून त्यापोटी 246.39 कोटी रूपये लाभ देण्यात आला आहे. किडनी रूग्णांची संख्या 1942 व दिलेला लाभ 12.86 कोटी रूपये, बुरशीजन्य म्युकर मायकोसिस 49 रूग्णांना लाभ देण्यात आला आहे. योजनेसाठी जिल्ह्यात 38 आरोग्य मित्र, 25 वैद्यकीय समन्वयक, 25 शिबिर समन्वयक व 5 जिल्हास्तरीय अधिकारी कार्यरत आहेत.  जिल्ह्यात गोल्ड कार्डचे वितरण 39.3 टक्के पुर्ण झाले असून लाभार्थी संख्या 7 लक्ष 22 हजार आहे.   

   नागरिकांनी सीएससी सेतू केंद्र ,नागरी  सुविधा कॉमन सर्विस सेंटर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक देखील आयुषमान भारत गोल्ड कार्ड वितरित करत आहेत. आयुषमान भारत गोल्ड कार्ड  प्राप्त करण्यासाठी आरोग्य मित्राकडून शिधापत्रिकेच्या आधारे व आधार कार्ड किंवा माननीय प्रधानमंत्री यांच्याकडून आलेले निमंत्रण पत्र किंवा इतर शासकीय फोटो ओळखपत्र याच्या माध्यमातून आयुष्यमान चे लाभार्थी आयुष्मान भारत से कार्ड प्राप्त करू शकतात . तरी जास्तीत जास्त  नागकरिकांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

योजनेच्या लाभासाठी संपर्क करावा

 योजनेच्या माहितीसाठी 1800111565 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा आरोग्य मित्रास भेटावे.  महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी  18002332200 वर संपर्क करावा.  निवडक  रुग्णालयात मोफत उपचार रूग्ण घेऊ शकता.  जिल्ह्यातील  योजने मधील २५  अंगीकृत रुग्णालय येथे मोफत आयुष्मान भारत चे  कार्ड  वाटप सुरु आहे. जिल्ह्यातील २ लक्ष ७६ हजार ७०४ पात्र कुटुंबा करिता आयुष्मान भारत चे कार्ड वटप सुरु आहे.

जिल्ह्यातील अंगीकृत रूग्णालये

जिल्हा रुग्णालय बुलडाणा, सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगांव, ग्रामीण रुग्णालय  सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगांव राजा, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, साई बाल रुग्णालय खामगाव, ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल,माऊली डायलेसिस सेंटर शेगाव, मेहेत्रे होस्पिटल बुलढाणा, संचेती हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, अमृत हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, आसथा हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, मेहकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, सोनटक्के हॉस्पिटल खामगाव, सिलवरसिटी हॉस्पिटल खामगाव (केवळ डायलिसिस व आयुष्मान भारत कार्ड गोल्ड कार्ड साठी ), धनवे हॉस्पिटल चिखली, तुळजाई हॉस्पिटल चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली.

********

                        ग्रामसेवकांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : शासन निर्णय 31 मार्च 2017 नुसार ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा अंतर्गत ग्रामसेवक संवर्गाच्या सन 2000 ते 2021 पर्यंतच्या एकत्रित व वर्षनिहाय सुधारीत तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची 12.8.21 अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तरी ग्रामसेवक संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी त्या त्याय पंचायत समितीला जावून सेवाज्येष्ठता याद्यांचे अवलोकन करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं यांनी केले आहे.

                                                                ********