Wednesday 31 March 2021

DIO BULDANA NEWS 31.3.2021

 


पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि.31 : जिल्ह्यातील शहीद जवान प्रदीप साहेबराव मांदळे (युनिट 10 महार रेजिमेंट) रा. पळसखेड चक्का, पो सावखेड तेजन ता. सिं. राजा  हे देशातंर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन रक्षक मोहिमे अंतर्गत नियंत्रण रेषेजवळ द्रास सेक्टर येथील ऑपरेशन एरियामध्ये हिमस्खलनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे 15 डिसेंबर 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानच्या कुटूंबियांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया,  सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती कांचन प्रदीप मांदळे, वीरमाता श्रीमती सुनंदा साहेबराव मांदळे यांना 40 लक्ष  रूपयांचा धनादेश देण्यात आला. 

                                                                                    **********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 3923 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 630 पॉझिटिव्ह

• 886 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4553 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3923 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 630 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 366 व रॅपीड टेस्टमधील 264 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 387 तर रॅपिड टेस्टमधील 3536 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3923 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 65, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2,  रायपूर 1, डोंगरखंडाळा 1, पाडळी 2,  सागवन 3, येळगांव 1, देऊळघाट 1,    खामगांव शहर : 65, खामगांव तालुका : सज्जनपूरी 3, पिं. राजा 6, हिंगणा 1,  पिंप्री कोरडे 4, गणेशपूर 1, शिरसगांव दे 1, जळका 2, राहुड 1, पळशी 1, आमसरी 3, आडगांव 1, टेंभुर्णा 1,  घाटपुरी 9, पारखेड 1, ढोरपगांव 2, बोरजवळा 1,   सुटाळा 7, गोंधनपूर 1, शेगांव शहर : 8,   शेगांव तालुका : गव्हाण 1, पहुरजिरा 1, जळगांव जामोद शहर : 11, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 5, काजेगांव 3, सावरगांव 13, खेर्डा बु 7, रूधाना 1, जामोद 1, आसलगांव 5, वाडी खु 2,  पिं. काळे 1,  सुलज 2,  उटी खु 43, धानोरा 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : काटेल 8, खिरोडा 1, रोहणा 1, टुनकी 1, पातुर्डा 1, वरवट 3, काकडेश्वर 1, कोलद 1, एकलारा 1, सायखेड 1, बोरखेड 1, बावनबीर 1, सगोडा 1, सोनाळा 3,  उकडगा 1, कथरगांव 1, मनार्डी 1, असोदा 1, काकनवाडा 1, बोडखा 1, वानखेड 2, चिखली शहर : 21,  चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 2, अमडापूर 1, सवणा 1, एकलारा 3, मुरादपूर 1, खैरव 1, मालखेड 2, गांगलगाव 1, चंदनपूर 1, शेलगांव आटोळ 1, करवंड 1, माळविहीर 1,     

   मोताळा शहर : 4,  मोताळा तालुका : सांगळद 2, रोहीणखेड 1,  अंत्री 1, बोराखेडी 4, पोफळी 1,  काबरखेड 2, कोथळी 4, खरबडी 1, आव्हा 2, धामणगांव दे. 2, परडा 3, शिरवा 1,   धा. बढे 2,  शेलापूर 3, पिंप्री गवळी 2,   मेहकर शहर : 12, मेहकर तालुका : अंजनी खु 1, अंत्री देशमुख 1, डोणगांव 2, लव्हाळा 1,  लोणी गवळी 1, उकळी 1,   नांदुरा शहर : 10,  नांदुरा तालुका : निमगांव 2,  सावरगांव 5, अवधा 2,  खुमगांव 8, नवीन येरळी 1,  वडाळी 1,  धाडी खु 1,  भोरवट 1, पातोंडा 1, चांदुर बिस्वा 1, खैरा 1, टाकरखेड 1,   मलकापूर शहर : 28, मलकापूर तालुका : दसरखेड 19, धरणगांव 1, कुंड बु 6, दुधलगांव 1, दाताळा 1, पिंपळखुटा 1, घिर्णी 1, नरवेल 5, विवरा 2,   दे. राजा शहर : 33,  दे. राजा तालुका : गारखेडा 1, असोला जहा 1,  जांभोरा 2, चिंचाली बु 1, सावखेड भोई 2, तुळजापूर 1, टाकरखेड भागीले 1, गिरोली खु 1,  देवखेड 1, दगडवाडी 1, निमखेड 1, सातेगांव 2, मंडपगांव 1, नागणगांव 1,जळगांव 1, दे. मही 1,   सिं. राजा शहर :10,  सिं. राजा तालुका : किनगांव राजा 1, पिंपळगांव 2,  सोयंदेव 4, देवखेड 1, सवडत 3, भोसा 1,  शेंदुर्जन 2, आंबेवाडी 1, शिवणी 1, उगला 1, कडपंची 1, वाघोरा 2, पळसखेड 1,  मलकापूर पांग्रा 1, दुसरबीड 3, हनवतखेड 1,  शिंदी 1, कंडारी 1, लोणार शहर : 1 , लोणार तालुका : महारचिकना 1, गनपूर 1,देऊळगांव कोळ 1, पळसखेड जहा 2, वढव 2,     परजिल्हा अकोला 1,  कुर्हा ता. मुक्ताईनगर 1, जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 630 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान महीमळ ता. चिखली येथील 65 वर्षीय व 78 वर्षीय पुरूष, निमगांव ता. नांदुरा येथील 79 वर्षीय महिला, आदर्श नगर, खामगांव येथील 74 वर्षीय पुरूष, वालसावंगी ता. भोकरदन जि जालना येथील 68 वर्षीय महिला  रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3196 नमुने घेण्यात आले आहे.  तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 886 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 218713 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 31990 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 31990 आहे. 

   आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 218713 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 37744 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 31910 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 5494 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 260 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

********


नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

-    पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
  • वाढती रूग्णसंख्या बघता प्रशासनाने सज्ज रहावे

बुलडाणा, (जिमाका) दि 31 :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोना संसर्ग सुरक्षा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कुणालाही सोडू नये, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

  कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक आज 31 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

  जिल्ह्यात  भविष्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने आपली तयारी ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले,  प्रशासनाने रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता बेड, ऑक्सीजन पुरवठा, औषधी पुरवठा आदींची सज्जता ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नये. ऑक्सीजनची पर्याप्त व्यवस्था करून ठेवावी. येणारे दोन महिने जिल्ह्यासाठी चिंतेचे असून या परिस्थितीवर समन्वयाने मात केल्या जाईल.  गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

   ते पुढे म्हणाले,  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. नियमानुसार पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी कालमर्यादा ठेवावी.  तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याप्रसंगी जिल्ह्यातील टाळेबंदीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले.

    मरण दारी आणि तोरण दारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  लोकांना सांगून देखील लोक ऐकत नाही, नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यात किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा लागेल असे मत सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यानुसार पालकमंत्री यांनीदेखील नागरिक अशाचप्रकारे नियमांचे पालन करीत नसतील, तर लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा यावेळी दिला.  

*********

 


कोविड नियंत्रणासाठी लसीकरणाची गती वाढवा

-    पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • सिंदखेड राजा येथे कोविड नियंत्रण बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि 31 :  कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड नियंत्रणासाठी विविध उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत. सध्या कोविड नियंत्रणासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. नियमानुसार पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करण्यासठी लसीकरणाची गती वाढवावी , अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी  आज सिंदखेड राजा ग्रामीण रूग्णालयात आयोजित बैठकीत दिल्या.

  बैठकीला तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार जयवंत सातव, आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ बनसोड, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी देव गुन्हावत आदी उपस्थित होते.   

   परिसरात रूग्ण आढळून येत असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, ज्या गावांत रूग्ण आढळून येत आहे त्याठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या. तसेच रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात. गृह विलगीकरणातील रूग्णांवर लक्ष ठेवावे. तसेच गावागावात लसीकरण करण्यासाठी यंत्रणांनी सामुहिक प्रयत्न करावे. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

                                                            *********

 

Friday 26 March 2021

DIO BULDANA NEWS 26.3.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 3613 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 903 पॉझिटिव्ह

• 644 रूग्णांना मिळाली सुट्टी 

  बुलडाणा,(जिमाका) दि.26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4516 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3613 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 903 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 589 व रॅपीड टेस्टमधील 314 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 520 तर रॅपिड टेस्टमधील 3093 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3613 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 75, बुलडाणा तालुका : बोरखेड 1,  डोंगरखंडाळा 1, माळवंडी 1, सुंदरखेड 2, चांडोळ 4, धाड 2, डोमरूळ 1, नांद्राकोळी 1, अंबोडा 4, हतेडी बु 1, जांब 12, दहीद 1, शिरपूर 3, पळसखेड भट 1, वरवंड 9, बिरसिंगपूर 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : सारोळा 3, काबरखेड 1,पोफळी 1,  किन्होळा 1,  पुन्हई 1, चिंचपूर 6, कोथळी  5, मुर्ती 1, तालखेड 5,  पिंप्री गवळी 1, माकोडी 1, आव्हा 1, गुळभेली 1, केळापूर 1, तरोडा 2, धा. बढे 2, पान्हेरा 1, पिं. देवी 1,    सिं. राजा शहर : 13, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, गुंज 7, सावखेड तेजन 2, दुसरबीड 1, पि. उगले 1, कि. राजा 1, हिवरखेड 3, पळसखेड चक्का 1, पिं. लेंडी 1, वर्दडी 4, कंडारी 4, पिंपळखुटा 1,  सोयंदेव 1, दत्तापूर 1, धंदरवाडी 1, भोसा 1, राहेरी बु 3, सोनोशी 2, शेंदुर्जन 1, सवडत 1, बाळसमुद्र 4, भंडारी 1, सोनारा 1, हनवतखेड 1,     चिखली शहर :28,  चिखली तालुका : करणखेड 1, पिंपळखेड 1, उंद्री 1, करवंड 1, केळवद 1, अंत्री तेली 1,  कोळेगांव 1, भालगांव 1, टाकरखेड 2, पेनटाकळी 1, कोलारा 3, बोरगांव काकडे 1, कोनड 2, चांधई 1, रोहडा 1, शेलोडी 2, महीमळ 1, भानखेड 1, कवठळ 1, चंदनपूर 1,  खामगांव शहर : 120, खामगांव तालुका : राहुड 1, कंझारा 1,  खुटपुरी 2, रोहणा 1, हिंगणा उमरा 5, गारडगांव 3, लोखंडा 1, लाखनवाडा 1, जळका 1, ढोरपगांव 1, पिं. राजा 1, सज्जनपुरी 3, माक्ता 1, बोरी अडगांव 1, घारोड 1, कुंबेफळ 1, आडगांव 1, शेगांव शहर : 47, शेगांव तालुका : पहुरजिरा 2, मोरगांव 1, भोनगांव 1, चिंचोली 1, कनारखेड 1, जानोरी 2, जलंब 1, माटरगांव 1, लासुरा 1, नांदुरा शहर : 61, नांदुरा तालुका : तांदुळवाडी 1, टाकरखेड 4, वडनेर 14,  नायगांव 1, सावरगांव 1, चांदुर बिस्वा 4, शिरसोडी 2, पिंप्री अढाव 2, पिंपळखुटा धांडे 4, निमगांव 4, शेलगांव मुकूंद 1, बुर्टी 1, माळेगांव गोंड 1, तिकोडी 1, लोणारखेड 2, अवधा 1, खैरा 5,  मलकापूर शहर :49, मलकापूर तालुका : दसरखेड 17, भाडगणी 2, कुंड बु 2, वरखेड 1, वाकोडी 1, घिर्णी 3, जांबुळधाबा 2, उमाळी 9, दाताळा 3, खामखेड 1, वजीराबाद 1, वडोदा 2, दुधलगांव 1, नरवेल 2,  दे. राजा शहर :  32, दे. राजा तालुका : उमरद 4, उंबरखेड 1, सिनगांव जहा 6, खल्याळ गव्हाण 1, दे. मही 4,  डोईफोडेवाडी 1, टेंभुर्णी 1, कुंभारी 1, असोला 1, अंढेरा 5, निवडुंगा 1, पिंप्री आंधळे 1,  अकोलादेव 1, डोढ्रा 1, गारखेड 1, सावखेड भोई 2, पळसखेड देव 1, मेहकर शहर : 43,  मेहकर तालुका : शेलगांव 1,  वरूड 1,  हिवरा आश्रम 4, बऱ्हाई 1, दे. माळी 6, जानेफळ 2, बोरी 4, बोथा 3,  डोणगांव 3, जयताळा 1, कळमेश्वर 1, एकलासपूर 2, आंध्रुड 4, सावत्रा 2, उमरा देशमुख 2, भोसा 1, ब्रम्हपूरी 1, आरेगांव 1,  उकळी 8,  लोणार शहर : 7,  लोणार तालुका : देऊळगांव 3, पिंप्री 9, मांडवा 2,  बायखेड 1, शिवणी पिसा 1, बिबी 3, रायगांव 1, सरस्वती 1, सुलतानपूर 3, महार चिकना 2, चिखला 1,   जळगांव जामोद शहर :1 , जळगांव जामोद तालुका : जामोद 1, भेंडवळ 1, खेर्डा 1, उमापूर 1,   

   संग्रामपूर तालुका : वरवट 1, कवठळ 1, मोमीनाबाद 1, पातुर्डा 2, लोहारा 1, सोनाळा 2,खेर्डा 1, बावनबीर 1,  

परजिल्हा रिसोड जि वाशिम 1,  अंदूरा 1, वालसावंगी 1, नया अंदुरा 2, बाळापूर 1,  दानापूर जि. जालना 1,  जाफ्राबाद 1, वाशिम 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 903 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अमडापूर येथील 40 वर्षीय महिला, पिंपळखुटा ता. मलकापूर येथील 55 महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     जिल्ह्यात कोविड निदानासाठी 4092 नमुने घेण्यात आले आहे.  तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 644 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 200664 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 27480 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 27480 आहे. 

   आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 200664 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 34005 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 27480 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 6278 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 247 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

********

ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 83 उमेदवारांचा सहभाग

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यालयामार्फत 23 ते 25 मार्च 2021 कालावधीत पं. दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 83 उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करीत सहभाग नोंदविला. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात हिंदुस्थान युनीलीव्हर खामगांव, जम्बो मार्क टेड लिंक प्रा. लि. अकोला, वर्ल्डवाईड ऑईल मशिन प्रा. लि औरंगाबाद, रूचा इंजिनीयरींग प्रा. लि. औरंगाबाद या  कंपन्यांनी उमेदवारांच्या विविध  पदांसाठी सहभाग घेतला.  असे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे.

***********

ढासाळवाडी व हनवतखेड गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड व ढासाळवाडी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हनवतखेड येथील लोकसंख्या 397 असून ढासाळवाडी येथील 1130 आहे. टँकरद्वारे दररोज ढासाळवाडीला 50 हजार 600 लीटर्स, हनवतखेडला 12 हजार 320 लिटर पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

********

Wednesday 24 March 2021

DIO BULDANA NEWS 24.3.2021

 जिल्ह्यात 26 ठिकाणी क्षयरोगाच्या निदाणाकरीता थुंकी नमुन्यांची तपासणी

बुलडाणा, (जिमाका) दि.24 : जिल्ह्यामध्ये डिएससी मान्यताप्राप्त सुक्ष्मतादर्शक एकूण 26 केंद्रे आहेत. तेथे थुंकी नमुन्यांची तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करण्यात येते. प्रत्येक क्षयरोग पथकाला एक वैद्यकिय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहे. जिल्ह्यात  ङि एम. सी. साठी 1 वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, 6 शहरी भागासाठी 6 टि. बी. एच. व्हि.कार्यरत आहे. तसेच सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत 5 प्रयोगशाळा वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे.

       जिल्ह्यात एक जिल्हा क्षयरोग केंद्र आहे. तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकिय अधिकारी आदी कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून 130 खाजगी डॉक्टरांकडून 120 असे एकूण अंदाजे 250 नविन टि. बी. रुग्ण शोधुन उपचारावर ठेवले जातात. दरवर्षी अंदाजे एकुण 2700 ते 2900 टि.बी. रुग्ण शाधुन उपचारावर ठेवले जातात. तसेच जिल्ह्यामध्ये मार्च 2016 पासून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक सिबीनॅट मशिन उपलब्ध आहे. या मशिनद्वारे क्षयरोग तसेच एमडीआर  रुग्णांचे निदान सुध्दा करता येते.  थुंकीनमुने तसेच इतर अवयवाच्या टि. बीची सुध्दा तपासणी करता येते. केवळ 2 तासामध्ये निदान होते. जिल्ह्यातील शासकीय खाजगी डॉक्टर प्रयोगशाळा येथील संशयीत टि. बी. तसेच एमडीआर रुग्णांचे तपासणी मोफत करण्यात येते.

   सीबीएनऐऐटी तपासणी प्रामुख्याने लहान बालके, एच आय व्हि. बाधीत रुग्ण, छातीव्यतिरिक्त इतर अवयवाच्या टि. बी. निदानासाठी  करण्यात येते. तसेच एम डी आर संशयीत रुग्ण, खाजगी डॉक्टर प्रयोगशाळा मधील एमडीआर  टि बी संशयीत रुग्ण इत्यादी नमुन्यांसाठी सीबीएनऐऐटी  मशिनचा वापर करण्यात येतो. सन 2020 मध्ये एकूण 2850 रुग्णांची सी. बी. एन. ऐ ऐ टी वर तपासणी करण्यात आली.  त्यापैकी 1052 रुग्ण टिबी, 60 रुग्ण एमडीआर  टीबीचे आढळून आले.  क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत शासकीय यंत्रणा आरोग्य विभाग खाजगी वैद्यकिय व्यवसायिक समन्वय, सी. बी. एन. ऐ. ऐ.टी. मशिनद्वारे मोफत तपासणी, दैनंदिन उपचार पध्दतीवरील क्षयरोग तसेच एमडीआर टी. बी. वरील ओषधी, मोफत डीएसटी तपासणी करण्यात येते.  क्षयरूग्ण शोधून शासकीय यंत्रणेला कळविल्यास प्रत्येक क्षयरुग्ण 1000 रुपये डॉक्टरांना मिळतात. तसेच 500 रुपयाप्रमाणे प्रति महिन्याला सर्व क्षयरुग्णांसाठी पोषक आहारासाठी डॉटस प्रोव्हायडरसाठी मानधन देण्यात येते.

   सन 2025 पर्यत क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी प्रत्येक स्तरावर सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. मिलींद पांडूरंग जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000000

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आजपासून आयोजन

  • उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे
  • 25 मार्चपर्यंत चालणार मेळावे

बुलडाणा,(जिमाका)दि.24 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 23 मार्च ते 25 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या www.rojgar. mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.

          या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

    रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 3809 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 855 पॉझिटिव्ह

•       497 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी  अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 855 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 523 व रॅपीड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 859 तर रॅपिड टेस्टमधील 2950 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3809 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 85, बुलडाणा तालुका  : सागवन 2, मढ 1,  येळगांव 2, रायपूर 5,  सुंदरखेड 6, डोंगरखंडाळा 2,  देऊळघाट 1, बिरसिंगपूर 2, रूईखेड 1, दत्तपूर 7, पाडळी 1,   धाड 4, अजिसपूर 3, पांगरी 1, जांब 1, शिरपूर 2, अटकळ 1, कोलवड 3,   चिखली शहर :79, चिखली तालुका : मेरा बु 1,  साखळी 1,ढासाळा 4, बोरगांव 1, भोरसा भोरसी 1, भागापूर 1, अमडापूर 9, कोलारा 3, मालगणी 1,  सावरगांव डुकरे 2, हिवरा नाईक 1, पेठ 1, कवठळ 2, उंद्री 2, मलगी 1, टाकरखेड हेलगा 4,  अमोना 1, शेलूद 2, वरूड 1, चंदनपूर 3, गोद्री 1,  खोर 2, मुंगसरी 1, वळती 1,  भोगावती 1,  इसोली 1,  भालगांव 3,  येवता 2, मंगरूळ 1,  किन्ही सवडत 1, शेलगांव आटोळ 1, कारखेड 1,   दिवठाणा 1,  वैरागड 1,  दे. घुबे 2, करवंड 1,  अंचरवाडी 3, उत्रादा 1, बरटाळा 1, एकलारा 1, किन्होळा 2, खामगांव शहर : 87,  खामगांव तालुका : गोंधनपूर 1, टेंभुर्णा 1, बोथा 1, गारडगांव 1, संभापूर 3, कुंड 3,  चिंचपूर 1, निमकवळा 1, आवार 11, लाखनवाडा 4, गणेशपूर 1,  पिं. राजा 6, हिवरा खु 1, भालेगांव 4, राहुड 1,   पळशी 1,  संग्रामपूर शहर : 6, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 11, सोनाळा 16, हिंगणा 2, निवाणा 3, पिंगळी 1, काटेल 1,  वानखेड 7, टुनकी 3, वरवट 2, पिंप्री 5, चौंढी 1, पेसोडा 1, बावनबीर 1,  वरवट खंडेराव 1,  जळगांव जामोद शहर : 8, जळगांव जामोद तालुका : धानोरा 1,  आसलगांव 1, भोंडेगाव 1,

     दे. राजा शहर :6 , दे. राजा तालुका : खल्याळ गव्हाण 3, डोईफोडेवाडी 3, सिनगांव जहा 2, तुळजापूर 1,निमखेड 2, मेहुणा राजा 1, शिवणी आरमाळ 1, ब्रम्हपूरी 1, सरंबा 1,दिग्रस 2, दे. मही 7, वाकी बु 2, बायगांव 2,  खैरव 1, पिंप्री आंधळे 1,  सुरा 1,   अंढेरा 1, नांदुरा शहर : 4,   नांदुरा तालुका : हिंगणे गव्हाड 1, जवळा बाजार 1, मलकापूर शहर : 115,  मलकापूर तालुका : भालेगांव 1, मोरखेड 1,  घिर्णी 4, दुधलगांव 1, दाताळा 3,  लासुरा 1,  शिराढोण 3, उमाळी 12, नरवेल 2,    हरसोडा 3, वाघुड 1,  विवरा 2, लोणवडी 1,   भाडगणी 1, दसरखेड 6, मेहकर शहर : 36, मेहकर तालुका : नागझरी 1, अंजनी बु 1,  हिवरा आश्रम 2, कळमेश्वर 3,  वडगांव माळी 1, मोताळा शहर : 14, मोताळा तालुका : लोणघाट 2, महाळुंगी 15, आव्हा 1,  कुऱ्हा 1, निपाणा 4, दाभाडी 1,  कोथळी 2, चिंचपूर 1, महाल पिंप्री 1, धा. बढे 1, बोराखेडी 1,  खरबडी 2, वरूड 2, पिं. देवी 1, धामणगांव 1, सिं. राजा शहर : 8,  सिं. राजा तालुका : शेंदुर्जन 1, साखरखेर्डा 4, रताळी 1, दुसरबीड 2,  लोणार तालुका : बिबी 4, देऊळगांव 3, शिवणी 1, बोराखेडी 12, शारा 3, पांग्रा काटे 1, तांबोळा 1, टिटवी 4, सुलतानपूर 1,  लोणार शहर : 3, शेगांव शहर : 15, शेगांव तालुका : चिंचोली 3,  जानोरी 1,   मूळ पत्ता जाळीचा देव 4, औरंगाबाद 1, धावडा ता. सिल्लोड 2, कळमेश्वर नागपूर 1,  भोकरदन 1, आडगांव ता. पातूर 1, पोखरी ता. भोकरदन 1,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 855 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 497 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 192835 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 26034 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 26034 आहे. 

   आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 192835 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 32329 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 32329 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 6055 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 240 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

********

--

Tuesday 23 March 2021

DIO BULDANA NEWS 23.3.2021

 27 व 28 मार्च सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : सन 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट दि. 31 मार्च 2021 पर्यत साध्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कातील अधिभारामध्ये दिलेली सुट 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात येत असल्याने नोंदणी कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करीता पक्षकारांची जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यालयामध्ये कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयामध्ये पक्षकारांची गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवार दि. 27 व रविवार दि. 28 मार्च 2021 रोजी दस्त नोंदणी करीता सुरु ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग – 1 उमेश के. शिंदे तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000000

पात्र असलेल्या सामायिक खातेदारांनी एका बँक खात्याचे संमतीपत्र द्यावे

  • ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार, महा चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई
  • सामायिक खात्यांमुळे काही शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : बुलडाणा तालुक्यामध्ये माहे ऑक्टोंबर, नोव्हेबर 2019 मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यात आले होते. त्यामधील काही सामायिक क्षेत्राचे खातेक्रमांक अप्राप्त आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम तहसिल कार्यालयात प्रलंबित आहे.

     सामायिक खातेदारांनी एकाच बँक खात्याचे लेखी संमतीपत्र देण्यासंदर्भात दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर आवाहनही करण्यात आले होते. तसेच यापुर्वी अनुदानही वितरित करण्यात आलेले आहे. मात्र अजुनही काही खोतेदारांचे खातेक्रमांक प्राप्त न झाल्यामुळे त्यांना अनुदान वितरित करता आलेले नाही. तसेच सामायिक खातेदारांमधील आपसी वादामुळेसुध्दा बरेच अनुदान वितरित करावयाचे बाकी आहे. यापुर्वी वृत्तपत्रामध्ये जाहिरनाम्याद्वारे प्रसिध्दी करण्यात आलेली होती. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपले खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे जमा केलेले नाही.  त्यांनी दि. 30 मार्च 2021 पर्यत खाते जमा करावे, तसेच सामायिक खाते असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपले अनुदान कोणत्या एका खातेदाराच्या नावे जमा करावयाचे आहे. त्याचे लेखी स्वरुपात समतीपत्र संबंधित तलाठी यांच्याकडे दि. 30 मार्च 2021 पुर्वी देण्यात यावे. त्यानंतर दि. 30 मार्च 2021 पर्यत प्राप्त खातेदारांना अनुदान वितरित करण्यात येईल. तदनंतर शिल्लक अनुदान शासनास परत करण्यात येईल, याची दखल घ्यावी, असे तहसिलदार बुलडाणा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000000

                         



बुलडाणा पाटबंधारे विभागात जलजागृती सप्ताहाचा समारोप

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्ताने 22 मार्च रोजी जिल्ह्यात 16 मार्चपासून सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप बुलडाणा पाटबंधारे विभागाचे सहा. अभियंता तुषार मेतकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून बुलडाणा पाटबंधारे मंडळ कार्यालयात पार पडला. यावर्षी कोविड साथरोगामुळे सप्ताहात कार्यक्रमांचे आयोजन संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करून करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.  

     सन 2021-2022 मध्ये 10 टक्के सिंचनात वाढ होण्याचे दृष्टीने राजयातील आगामी काळातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर नागरिक तसेच औद्योगिक संस्थांनी करावा, असे आवाहन सहा. अधिक्षक अभियंता तुषार मेतकर यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्यात विविध विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताहात राबविण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. देशात कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रसार लक्षात घेता, कोरोना विषाणू बाबत शासनाने जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम न घेण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादीत स्वरूपात करण्यात आले. समारोपीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल खानझोडे, अंकुश गावीत, एस.एस पाचघरे, भरत राऊत, करण उमाळे, शत्रुघ्न धोरण, प्रदीप पवार आदींनी प्रयत्न केले. संचलन व आभार प्रदर्शन अनिल खानझोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

********

जिल्हाधिकारी कार्यालयात

शहिद दिनानिमित्त अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : शहिद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार संजय बंगाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.

**********

चिंचखेडनाथ व इसालवाडी  गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : मोताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ व इसालवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. चिंचखेडनाथ येथील लोकसंख्या 868 असून इसालवाडी येथील 692 आहे. टँकरद्वारे दररोज 24 हजार 990 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे.

********

अवैध शिधापत्रिका तपासणी शोध मोहिम; शिधापत्रिकांची तपासणी सुरू

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरीता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपुर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहिम 30 एप्रिल 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे संबंधीत रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरून दिलेले अर्ज स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह तलाठी अथवा संबंधीत शासकीय कर्मचाऱ्यांनी पोच द्यावी. शिधापत्रिकाधारकांनी राहत असलेल्या भागातील रहिवासी पुरावा द्यावा, त्यामध्ये भाडेपावती, निवास स्थानाच्या मालकीबद्दलचा पुरवा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वीजेचे देयक, दूरध्वनी देयक, चालक परवाना, अन्य कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदीपैकी एका पुराव्याचा समावेश असावा.

         दिलेला पुरावा हा एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. शिधापत्रिकेची तपासणी करताना यंत्रणेने एका कुटूंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.  अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबधित तहसिलदार अथवा तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा. एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटूंबामध्ये देताना, दोन्हीही शिधापत्रिका बीपीएल अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती,  स्थलांतरीत व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. तरी लाभार्थ्यांनी अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला प्रतिसाद देवून आपली शिधापत्रिकेची खात्री करून घ्यावी.  या मोहिमेतंर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणात रास्तभाव दुकानांकडील कोटा कमी करण्यात यावा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

*********

तांबुळवाडी व सैलानी नगर  गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  चिखली तालुक्यातील तांबुळवाडी व सैलानी नगर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. तांबुळवाडी येथील लोकसंख्या 3500 असून सैलानी नगर येथील 200 आहे. टँकरद्वारे दररोज 75 हजार 700 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी,  बुलडाणा यांनी कळविले आहे.

Friday 19 March 2021

DIO BULDANA NEWS 19.3.2021,1

 


पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : जिल्ह्यातील शहीद जवान सतिष सुरेश पेहरे रा. अमोना पो. शेलगांव आटोळ ता. चिखली हे पुर्व लद्दाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे 14 जुलै 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती जया सतिष पेहरे, वीरमाता श्रीमती अलका सुरेश पेहरे यांना 20 लक्ष रूपये, वरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना 20 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला.   

*****

दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी भोवली ; दोन आरोपी ताब्यात

  • खामगांव वनपरिक्षेत्रातील घटना

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : खामगांव वनपरिक्षेत्रात 15 मार्च 2021 रोजी मिळालेल्या माहितीनुसार वरखेड फाटा येथे दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या तस्करी प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग यांना मिळालेल्या माहितीनुसार वरखेड फाटा येथे आरोपी शेख इरफान शेख बाबु रा. अहमदाबाद ह. मु वरखेड, दुसरा आरोपी शेख नासीर शेख गफुर रा. वरखेड यांच्याजवळ मांडुळ प्रजातीचा साप असून चहा- नाश्ताच्या हॉटेलवर बसलेले होते. त्यानुसार 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान त्यांच्याजवळील थैलीमध्ये 1.500 किलोग्रॅम वजनाचा साप, लांबी अंदाजे 95 से. मी, गोलाई 4 से. मी असल्याचे नमूद केले. सदर घटनेचा पंचनामा नोंदविण्यात आला.

   सदर घटनेनंतर आरोपीस ताब्यात घेवून त्याचे वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगांव यांचेकडे आरोपी व जप्त मांडूळ सापासह वर्ग करण्यात आले. प्रकरण वनविभागास प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने सदर आरोपीकामी ताब्यात घेवून तपास सुरू केला. आरोपीस तपास कामी ताब्यात घेवून 15 मार्च रोजी सायंकाळी शहर पोलीस स्टेशन, खामगांव येथे कोठडीत ठेवण्यात आले. पुढील तपास कामी आरोपी शेख इरफान शेख बाबु रा. अहमदाबाद ह. मु वरखेड, शेख नासीर शेख गफुर रा. वरखेड यांचेविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार वनअपराध क्र 760/17 दि. 15.3.2021 कायम करण्यात आला. या आरोपीस न्यायदंडाधिकारी, खामगांव यांचे न्यायालयात हरज करून वनकोठडी मंजूर करण्यात आली. पुढील तपास उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सहायक वनसरंक्षक श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगांव व त्यांचे अधिनस्थ सहकारी करीत आहे. वनयजीव तक्रारी बाबत माहिती असल्यास वनविभागास कळविण्याबाबतचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

DIO BULDANA NEWS 19.3.2021


 

सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर कमीतकमी दरात विकावे

 - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे  

  • मेडीकल स्टोअर्सवरील फार्मासिस्ट, कर्मचारी यांचे लसीकरण करावे

बुलडाणा, (जिमाका) दि 19 : कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शन आता जिल्ह्यामध्ये 1110 रु ते 1400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिली आहे.

    रेमेडेसिवीर औषधांच्या दर, उपलब्धतेबाबत जिल्हा केमीस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन समवेत बैठकीचे आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,  केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव गजानन शिंदे, अमरावती विभागाचे राम ऐलानी आदी उपस्थित होते.

    गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन घ्यावी लागत आहे. परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसीविर इंजेक्शनची खरेदी किंमत कमी झालेली असतांनादेखील एमआरपी दराने हे इंजेक्शन विकून एकप्रकारे ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याची बाब अन्न औषध प्रशासन मंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निर्दशनास आली. त्यांनी हे दर कमी कसे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर खरेदी किमतीवर फक्त 10 टक्केच मार्जिन घेऊन त्याची ग्राहकांना विक्री करावी असे आवाहन केले.

    त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत औषधी दुकानदारांनी देखील जिल्ह्यामध्ये 1110 ते 1400 रुपयापर्यंत रेमडेसीविर इंजेक्शन ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दर्शविली असून आता जिल्ह्यात 1110 ते 1400 रुपायापर्यंतच रेमडेसीविर इंजेक्शन मिळणार आहे. तसेच लवकरच सदर कंपनीशी चर्चा करून सर्व विक्रेत्यांना एकाच दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णांना हे इंजेक्शन फक्त 1110 रुपयात मिळणार असून एकप्रकारे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

*****************

कोरोना अलर्ट : प्राप्त 4703 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 732 पॉझिटिव्ह

•       387 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5435 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4703 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 732 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 432 व रॅपीड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 637 तर रॅपिड टेस्टमधील 3765 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4402 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 92, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, नांद्राकोळी 1, दहीद 1, धाड 4, कुंबेफळ 1,  घाटनांद्रा 1,  चांडोळ 1,  सुंदरखेड 3, कुलमखेड 1,  डोंगरखंडाळा 2,  सागवन 4, शिरपूर 1, बिरसिंगपूर 3, पोखरी 1, डोमरूळ 1,  कोलवड 4, मलकापूर शहर : 13, मलकापूर तालुका : दसरखेड 4, लासुरा 2, सावळी 1, उमाळी 1,  नरवेल 1, पिंपळखुटा 5, निंबारी 3,  लोणवडी 1, देवधाबा 2,  वाघुड 3, बहापुरा 1,  चिखली शहर : 63,  चिखली तालुका : ढासाळवाडी 1, पेठ 1, मेरा 2, खासगांव 1, केळवद 1,  खैरव 1, पेनटाकळी 1, सावरगांव 1,  सवणा 2,  मोहाडी 1, मोहोज 1, अमडापूर 2, मंगरूळ नवघरे 1,  पळसखेड 1, हातणी 2, वैरागड 1,  रानअंत्री 1, सोनेवाडी 2, येवता 7,   गांगलगांव 1, शेलूद 1, इसोली  2, उंद्री 2, मोताळा शहर : 23,  मोताळा तालुका : तालखेड 1, शिरवा 1, शेलापूर 1, कोथळी 1, डिडोळा 1,  लिहा बु 3, रोहीणखेड 1, गुळभेली 2, परडा 7, खरबडी 1,  बोराखेडी 1,  किन्होळा 1, घुस्सर 1, आव्हा 1, कुऱ्हा 1, पिं. देवी 3, सारोहा 1,  पिंपळपाटी 1,  जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आडोळ 3, मानेगांव 5,  गोळेगांव खु 2, आसलगांव 8,  दे. राजा शहर : 7,  दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, पाडळी शिंदे 2, अंढेरा 1, सिनगांव जहा 1, असोला जहा 1,  सुरा 1,  दे. मही 7, दिग्रस 1, गिरोली 1,  सिं. राजा शहर : 2,   सिं. राजा तालुका : बाळसमुद्र 1, शिंदी 1, वरूडी 1,   साखरखेर्डा 2, दत्तपूर 5, आडगांव राजा 2, सावरगांव माळी 2,   शिवणी टाका 1, देवखेड 2, हिवरखेड 1, उमरद 1, कि. राजा 1,  शेंदुर्जन 1, गुंज 1,  संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : सोनाळा 2, टाकळेश्वर 1, वरवट खंडेराव 1,  बावनबीर 4, पातुर्डा 3,  वानखेड 3, वरवट 4, उकडगांव 2,  शेगांव शहर : 46, शेगांव तालुका : गौलखेड 1,  लोहारा 2, लासुरा 1,  गायगांव 1, माटरगांव 1, जवळा 2, जानोरी 1, काटोडा 1,   खामगांव शहर : 92, खामगांव तालुका : किन्ही महादेव 1, पिं. राजा 1, जनुना 2,  निमकवळा 1, पिंप्री कोरडे 1,   हिंगणा कारेगांव 1,  सुटाळा 6, मेहकर तालुका : डोणगांव 1, जानेफळ 2, सांगवी 1,  वर्दडी वैराळ 3, हिवरा आश्रम 11, रत्नापूर 5, बाभुळखेड 2, उकळी 5, कळमेश्वर 2, जयताळा 3, महागांव 1, ब्रम्हपूरी 1, दे. माळी 6, अंत्री देशमुख 1,   मेहकर शहर : 21,  नांदुरा शहर : 4, नांदुरा तालुका : काटी 1,  शिरसोळी 1, हिंगणा 2, शेंबा 3,  खैरा 2, टाकरखेड 3, टाकळी वतपाळ 2, चांदुर बिस्वा 3, वडनेर 1, धानोरा 4, लोणार तालुका : तांबोळा 1, मोप 1, गांधारी 1, धायफळ 1, महारचिकना 1, पिंपळनेर 1, बिबी 1,  असोला 1, सुलतानपूर 2,  पळसखेड 2, देऊळगांव 2, बिबखेड 1, मांडवा 1, बोरखेडी 5, देऊळगांव वायसा 14, खळेगांव 6,  लोणार शहर : 20,    मूळ पत्ता पारध जि जालना 1, तुळजा खु जि. अकोला 1, खोगी ता. पातुर 1,  फर्दापूर जि. जळगांव 1, यावल जि जळगांव 1, जालना 1,  रिसोड जि वाशिम 1, वालसावंगी जि. जालना 1, जाफ्राबाद जि जालना 1,  सोनखेड जि.जालना 1, अमरावती 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 732 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान संजसय नगर, दे. राजा येथील 50 वर्षीय महिला, बुलडाणा  येथील 75 वर्षीय पुरूष, जानेफळ ता. मेहकर येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 387 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग 34, मुलींचे वसतीगृह 46, कोविड हॉस्पीटल 9,  खामगांव : 14,  शेगाव : 96, दे. राजा : 41, मेहकर : 27, मलकापूर : 38,  लोणार : 7, मोताळा : 26, जळगांव जामोद : 3, सिं. राजा : 7, चिखली : 39,

     तसेच आजपर्यंत 177154 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 23503 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23503 आहे. 

  तसेच 4202 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 177154 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 28537 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 23503 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 4802 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 232 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****

महाडीबीटी पोर्टल योजनाः अर्ज एक, योजना अनेक..!

• जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषि योजनांचा लाभही एकाच अर्जाद्वारे

• महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांची अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनाया सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टल योजना ही अर्ज एक व योजना अनेक असलेली आहे. या दोन्ही योजनांमध्ये नविन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, शेततळे अस्तरीकरण, इलेक्ट्रीक मोटार पंप, ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच याबाबींकरीता सुद्धा महाडीबीटीवर अर्ज करता येणार आहे.

     महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/  संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

   सदर कामासाठी जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेता येणार आहे. तसेच तांत्रिक अडचण असल्यास  helpdeskdbtfarmer@gmail.com या ई मेलवर किंवा 020-25511479 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कृषि विकास धिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.

*****

जळगांव जामोद – पुणे बसमध्ये बनावट पास जप्त

  • वाहकाने केली कारवाई

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगांव जामोद आगाराच्या जळगांव जामोद – पुणे बसमध्ये वाहकाच्या चाणाक्षतेने राज्य परिवहन कर्मचाऱ्याची बनावट पास जप्त करण्यात आली.  वाहक योगेश दत्तात्रय किवंडे बिल्ला क्रमांक 83056 हे 6 फेब्रुवारी 2021 रोजी बस पुणे ते जळगांव जामोद फेरीवर कर्तव्य बजावित होते. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून सदर बस दु 3 वाजता जळगांव जामोदकडे निघाली.

   प्रवाशांना तिकिटे देत असताना एजाज पठाण यांनी रा. प कर्मचाऱ्याची मोफत प्रवास सवलत पास दाखविली. सदर पास बनावट असल्याची शंका वाहकाला आली असता त्यांनी हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये बस थांबवून सदर पास व पासधारक प्रवाशाला पोलीसांच्या ताब्यात दिले. औरंगाबाद आगार क्रमांक 2 येथेस सदर पासची तपासणी केली असता ती पास बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनला वाहकाने तक्रार दिली. वाहक योगेश किवंडे यांच्या चतुराईने रा. प महामंडळाच्या अशा बनावट पास बनविल्या जात असल्याचा खुलासा झाला. आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविले. या कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी वाहकाचा सत्कार केला.

*******

Thursday 18 March 2021

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती
























" सातपुडा, अजिंठा रांगांनी सजले । 
निसर्गसौंदर्य अलौकिक हो लाभले ।। 
म्हणतात याला विदर्भाचे प्रवेशद्वार । 
लोणार सरोवर निसर्गाचा अद्वितीय आविष्कार ।। 
जन्मभूमी ही स्वराज्यजननी जिजाऊंची ।
भूमी ही पावन इतिहासाची साक्षीदार ।।
'विदर्भाची पंढरी' शेगाव नगरीला मान ।
पूर्णा, पैनगंगेने लाभले सुपीकतेचे वरदान ।।
बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती । 
बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती ।।" 

बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातूनच यावे लागते म्हणून बुलडाणा जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' देखील म्हंटल्या जाते. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. चिखली-मेहकर, देऊळगाव राजा- चिखली- खामगाव, बुलढाणा-खामगाव, बुलढाणा-मलकापूर ई. राज्य मार्गामुळे जिल्ह्यातील दळणवळण सुविधा चांगली विकसित झालेली आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्‍या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत. 
• बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे. 
• कसे याल? रस्त्याने: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.राष्ट्रीय महामार्ग 6 बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांमधून जातो. 
• रेल्वेद्वारे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मलकापूर येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर आहे. मलकपूर, शेगाव, नांदुरा रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येतात. तसेच जिल्हा मुख्यालयापासून भुसावळ (१०१ कि.मी) आणि अकोला(१०२ कि.मी) हे सर्वात जवळचे रेल्वे जंक्शन आहे. 
• हवाई मार्गा द्वारे सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 150 किमी अंतरावर आहे.तसेच नागपूर येथील विमानतळ जिल्हा मुख्यालयापासून 350 किमी अंतरावर आहे.
• अजिंठा लेणी: स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध असलेली लेणी बुलढाणा जिल्हासीमेपासून अगदी जवळ आहे. अजिंठा लेणी ह्या इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. बुलढाणा शहरापासून ५९ कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरली आहेत. 

जिल्ह्यातील महत्वाची व पर्यटन स्थळे: 

लोणार सरोवर:  लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्‍या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.
• ज्ञानगंगा अभयारण्य: ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे. 

• अंबाबरवा अभयारण्य:अंबाबरवा नावाचे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सुमारे १२७ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वत रांगामध्ये, मध्यप्रदेश व मेळघाटच्या सीमावर्ती भागात असलेले अंबाबरवा अभयारण्य नैसर्गिक वैविध्यपूर्ण संपत्तीचे वरदान असून हे अभयारण्य जिल्ह्य़ातील प्रमुख वन पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. 

• राजूर घाट: शहराला लागून असलेल्या बुलढाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. बुलढाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलढाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. 

• गजानन महाराज समाधीस्थळ आणि आनंदसागर : शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आणि समाधीस्थळ आहे. इसवी सन १९०८ साली गजानन महाराज यांनी शेगाव येथे समाधी घेतली. आज विश्वभरातून भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. येथील संस्थानाचे दैनंदिन नियोजन हे एक आदर्श उदाहरण आहे. शेगाव येथील आनंदसागर हा प्रसिद्ध सुंदर बगीचा आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा बगीचा खास करून उभारण्यात आला आहे. विवेकानंद ध्यान केंद्र, मध्यभागी असलेला तलाव, मत्सालय हे येथील विशेष आकर्षण आहेत. 

• सिंदखेड राजा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे. जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. येथील चांदणी तलाव विशेष प्रसिद्ध आहे. 

• मैलगड किल्ला: बुलडाणा जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत, त्यापैकी मैलगड किल्ला हा विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श या किल्ल्याला लाभला असून, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनासाठी हा किल्ला उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. उचंच उंच हिरव्यागार डोंगरावर वसलेल्या या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगर-दऱ्या पार कराव्या लागतात.  

• नांदुरा : येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे. • देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिराला भक्तगणांमध्ये विशेष महत्त्व आहे. • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. • मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोत्सव काळात मोठी गर्दी असते. 

• सुलतानपुर : येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे. 

• उंद्री : या गावापासुन 15 कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे. • अमडापुर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवी मंदिर.

• मर्दडी देवी: बुलढाणा तालुक्यात बुलढाणा ते औरंगाबाद रस्त्यावर धाड गावाजवळ मर्दडी देवी चे संस्थान डोंगरामध्ये वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणुन मर्दडी माताची ख्याती आहे. येथे नवरात्री मध्ये नऊ दिवस यात्रा असते. 

• गिरडा: अजिंठा पर्वत रागांमध्ये अध्यात्मिक पातळीवर नावाजलेला अन् निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमुळे गिरडा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी मार्गावर गिरडा हे गाव आहे. प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे. पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला. त्यातून पाच झरे निर्माण झाले. तेच पाणी गोमुखातून आजपर्यंत अव्याहतपणे बाहेर पडते, अशी अख्यायीका सांगितली जाते. पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्‍त्व लक्षात घेत अध्यात्मिक केंद्राला पर्यटनाची जोड मिळाल्यामुळे आता या परिसरात सहलींचे आयोजनही केले जाते. 

• सैलानी बाबा दर्गा : आराध्यदैवत हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा दर्गा देवस्थान पिंपळगांव येथील धार्मिक स्थळ हे हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. मार्च महिन्यातील सैलानी (ऊरुस) यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड,आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातुन लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. याबरोबरच मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर मंदिर संस्थान, खामगाव तालुक्यातील गारडगाव, संग्रामपूर तालुक्यातील साडी इको-टुरिजम पार्क हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत., 

बुलढाणा जिल्ह्यातील धरणे :

• जिगाव प्रकल्प: बुलडाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी महत्वाकांक्षी असा जिगाव साकारला जात आहे. जिगांव प्रकल्प तापी खोऱ्यातील पूर्णा नदीवर असून, या प्रकल्पाला सन १९९६ मध्ये प्रथम शासकीय मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत मान्यता २००५ मध्ये मिळाली. सांडव्यासह धरणाची लांबी ८२४० मीटर आहे. या प्रकल्पात द्वारयुक्त जलोत्सारणी असून १५ बाय १२ मीटरचे १६ वक्रद्वारे आहेत. प्रकल्पाच्या संकल्पित एकुण जलसाठा ७३६.५०९ दलघमी तर पाणी वापर ५४८.२३ दलघमी आहे. १२ उपसा सिंचन योजनच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील २८७ गावातील ८४२४० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.  

• खडकपूर्णा धरण: देऊळगावराजा परिसरातील खडकपूर्णा नदीवर जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा संत चोखा सागर प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे,  हे देउळगावमही या गावाजवळ असलेले पूर्णा नदीवरचे धरण आहे. हे देउळगावराजा ते चिखली रस्त्यावर लागते. हा एक सिंचन प्रकल्प आहे. 

• येळगाव धरण : येळगाव धरण हे पैनगंगा नदीवर असून, बुलढाणा शहराजवळ येळगाव गावी असलेले हे धरण संपूर्ण बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करते. 

• पेनटाकळी धरण: पेनटाकळी धरण हे पैनगंगा नदीवरील मेहकर तालुक्यातील एक मोठे धरण असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चिखली, मेहकर सह अनेक गावे येतात. 

• नळगंगा धरण: नळगंगा धरण हे नळगंगा नदीवरील मोताळा तालुक्यातील मोठे धरण आहे. हा एक सिंचन प्रकल्प असून, या जलाशयाची क्षमता ७६.५५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. याशिवाय जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा व गोराडा धरण देखील जिल्ह्यातील महत्वाची प्रमुख धरणे आहेत.अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलढाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याची देण असल्यामुळे तसेच थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलढाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आज रोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना खुणवत असते.