Monday 31 October 2022

DIO BULDANA NEWS 31.10.2022




 सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हानिवडणूक अधिकारी गौरी सावंत, तहसीलदार शामला खोत, प्रिया सुळे, पुष्पा डाबेराव, नायब तहलिदार संजय बंगाळे, श्री. नाईक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

00000











राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकता दौड संपन्न

बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र आणि जिजामाता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस-एकता दौड आज दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात पार पडली. 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147व्या जयंतीनिमित्ताने नागरिक, युवकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धींगत होण्यासाठी एकता दौडचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार रुपेश खंडारे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, वीज मंडळाचे उपअभियंता बद्रीनाथ जायभाये, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महासैनिक प्रशिक्षण केंद्राचे कमांडर. सुहास देशमुख, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी एकतेची शपथ दिली. त्यानंतर एकता दौडची सुरुवात करून जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत चिखली तालुका क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, महासैनिकी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी, जिजामाता महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे धनुर्विद्याचे खेळाडू, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र मैदानी, कबड्डी, विविध शाळेतील विद्यार्थी, सुर्योदय योगा ग्रुप, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभाग, खेळाडू, विविध एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी,  नागरिकांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला.

रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रभाकर वारे, प्रा. डॉ. डी. जे. कांदे, प्रा. पवन ठाकरे, प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, प्रा. नंदूकुमार गायकवाड, प्रा. गजेंद्रसिंह राजपूत, प्राचार्य संजीवनी शेळके, नायब तहसिंलदार श्री. डब्बे, श्रीमती जानोरकर, संदिप पाटील, विनोद शिरखंडे, वासुदेव तायडे, मन्जीतसिंग राजपूत, जीवन उबरहंडे, ईश्वर वाघ, ॲड. सुमित सरदार, विजय वानखेडे, समाधान टेकाळे, राजेश डिडोळकर, विठ्ठल इंगळे, निलेश शिंदे, अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर, राजेश शेळके उपस्थित होते.

क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, विजय बोदडे, विनोद गायकवाड, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, भीमराव पवार, नेहरु युवा केंद्राचे सहाय्यक धनंजय चाफेकर, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अजय सपकाळ यांनी पुढाकार घेतला.

00000

निवृत्तीवेतनधारकांनी बँकेतील यादीवर स्वाक्षरी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : निवृत्तीवेतनधारकांनी ह्यातीसाठी बॅकेतील यादीवर स्वाक्षरी करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे सर्व निवृतीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांचे माहे नोव्हेंबरमध्ये ह्यातीचे दाखले बँकेत सादर करण्यात येतात. त्यानुसार ह्यात प्रमाणपत्राची संगणकीकृत यादी कोषागारातून बँकेत पाठविण्यात आली आहे. सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ह्यात असल्याचे प्रमाणपत्र दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत संबंधित बँकेत जाऊन यादीमध्ये स्वाक्षरी करावी, तसेच स्वाक्षरी सोबत पॅन क्रमांक नमूद करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

00000

बेरोजगार युवकांनी बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : मुख्यमंत्री रोजगार ‍ निर्मिती  कार्यक्रमामध्ये बेरोजगार युवक, युवतींनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी कर्ज प्रकरणाबाबत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. या योजनेस ‍जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोर्टलवर दाखल होणाऱ्या कर्ज प्रकरणांना विविध बँकांच्या माध्यमातून मंजुरी मिळत आहे.

ऑनलाईन पोर्टलवर युवक, युवतींनी कर्जप्रस्ताव सादर केले आहेत, त्यांनी पोर्टलवर अपलोड केलेले मुळ कागदपत्र, तसेच ज्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु करणार आहे, त्या जागेचा उतारा, भाड्याची जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, मशिनरी, फर्निचर व इतर वस्तूंसाठी लागणारे दोन-तीन प्रकारचे तुलनात्मक कोटेशन्स, वीज जोडणी सुविधा उपलब्ध असल्याबाबत अलीकडील वीज बील भरल्याची पावती, पाणीपुरवठा सुविधा, आवश्यकतेप्रमाणे परवाने आदी कागदोपत्रासह अर्ज केलेल्या बँक शाखेत तातडीने संपर्क साधावा. बँक अधिकारी आवश्यक कागदोपत्राची छाननी करुन कर्जमंजुरीसाठी त्वरीत निर्णय घेतील. याबाबत सूचना अध्यक्ष जिल्हास्तरीय कार्यबल समिती मुरोनिक तथा जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय कार्यबल समिती सभेत अंमलबजावणी यंत्रणा व सर्व बँक अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळविले आहे.

00000

भ्रष्टाचार विरोधात दक्षता जनजागृती सप्ताह

बुलडाणा, दि. 31 : केंद्रीय दक्षता आयोग प्रतिवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतो. त्यानुसार राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्‍यात आला आहे. सप्ताह कालावधीत विविध माध्यमाद्वारे भ्रष्टाचार विरोधातील कारवाईबाबत नागरिकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचार विरोधात महसूल, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, विद्युत महामंडळ, व्यवसाय विभाग, आयकर, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक, दुय्यम उपनिबंधक, कोषागार, सहकारी पतसंस्था, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे, सर्व लोकसेवक व खाजगी व्यक्ती यांच्या विरूद्ध तक्रार करता येते.

भ्रष्टाचाराच्या मार्गाने अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकांनी बेहिशेबी संपत्ती जमविण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. जनतेमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या 07262-242548, मोबाईल क्रमांक 8888768218, 8668627737 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागोच पोलिस उपअधिक्षक संजय चौधरी यांनी केले आहे.

00000

Friday 28 October 2022

DIO BULDANA NEWS 28.10.2022

 नेहरु युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कार्यक्रम

बुलडाणा, दि. 28 : नेहरु युवा केंद्रातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिवस  म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांवतीने आणि ग्राम प्रशासनस्थानिक युवा मंडळाच्या सहकार्याने दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी रन फॉर युनिटी - एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात युवक-युवतीसामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकारीनेहरु युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

000000

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे दि. 15 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातून अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या महोत्सवा राज्यस्तरीय आदिवासी पारंपारिक हस्तकला प्रदर्शन व विक्रीपारंपारिक खाद्य महोत्सवपारंपारिक नृत्य स्पर्धा आणि लघुपटमाहितीपट दी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी बांधव व बचतगटानी मंगळवार, दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज करावा, तसेच उपक्रमासंबंधीत अधिक माहिती व आवेदन अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमहसूल भवनन्य राधाकिसन प्लॉटअग्रसेन भवनअकोला येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

आदिवासी बांधव व आदिवासी बचतगटानी आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी व्हावेअसे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

000000

सोमवारी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने एकता दौडचे आयोजन जिल्हा प्रशासनजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व नेहरु युवा केंद्राच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे करण्यात आले आहे.

यावेळी एकतेची शपथ घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थीराष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थीविविध क्रीडा संघटनेचे खेळाडू, पदाधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थीसामाजिक कार्यकर्ते शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारीमहाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

00000

पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने दि. १ नोव्हेबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदारयाद्यांचा नोंदणी कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. यात पात्र होणाऱ्या पदवीधर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यालय प्रमुखांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. १ नोव्हेबर २०२२ रोजी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन ३ वर्षे पूर्ण झालेल्या पदवीधारकांना मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनीस्त कार्यालयातील अर्हता प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांना पदवीधर नोंदणी नमुना १८ परिपूर्ण भरून आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयातील संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातील अर्हता प्राप्त अधिकारी, कर्मचारी पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

000000

Sunday 23 October 2022

DIO BULDANA NEWS 23.10.2022

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी ऑनलाईन अर्ज करावे

*जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2022-23 या वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

गतिमानता अभियान दि. 20 ऑगस्टपासन राज्यात सर्वस्तरावर राबविण्यात येत आहे. सदर अभियानासाठी दि. 16 ऑक्टोबर 2022 पासन ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात ये आहेत. या योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेसाठी pragatiabhiyan.maharashatra.gov.in पोर्टल विकसित करण्यात आले आहे. स्पर्धेकरिता सर्व स्तरावर अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 16 ते 31 ऑक्टोबर 2022 आहे. दि. 3 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार परिशिष्ट मध्ये दिलेल्या निर्देशानुसार विहित कालावधीत ऑनलाईन द्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

खो-खो खेळ प्रकारात 12 वजी 15 खेळाडूंचा समावेश

बुलडाणा, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार खो-खो या खेळ प्रकारामध्ये सन 2022-23 या वर्षात संघाची खेळाडू संख्या 12 वरुन 15 इतकी करण्यात आलेली आहे. 

जिल्हा अधिकारी कार्यालयजिल्हा क्रीडा परिषद तसेच एकविध खेळांच्या विविध संघटनांद्वारे तालुकाजिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हास्तर स्पर्धेचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे.

खो-खो या खेळातील खेळाडूंच्या संख्या वाढीबाबतची नोंद संबंधित शाळाखेळाची संघटना यांनी नोंद घेऊन प्रवेश अर्ज कार्यालयात नोंदवित असताना प्रवेश अर्जामध्ये 15 खेळाडूंचा समावेश करावा.  तसेच याची नोंद ऑनलाईन प्रवेश अर्जामध्ये नव्याने घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

Friday 21 October 2022

DIO BULDANA NEWS 21.10.2022

 आधारभूत किंमतीत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

* दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 21 : हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे हमी दरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणी दि. 21 ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता या नोंदणीसाठी दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यात शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी संस्थेत स्वत: हजर राहून छायाचित्र काढणे बंधनकारक आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगाम २०२२-२३ चा सातबारा उतारा, पिकपेरा, स्पष्ट खाते क्रमांक दिसणारे बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देण्यात येऊ नये, आधारकार्ड, ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. बँक खाते सुरु असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी आणि बाजरी नोंदणीसाठी १४ केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र - साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित, चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा, केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, नांदुरा, केंद्र - वाडी, या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वतः नोंदणी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

000000

मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

* १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांक

बुलडाणा, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमानुसार दि. नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान केद्रांवर प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रारुप मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदारयादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाहीत, तसेच दि. १ जानेवारी २०२३ रोजी ज्या मतदाराचे वय १८ वर्ष पर्ण होईल, अशा मतदारांनी दि.   नोव्हेंबर २०२३ ते ०८  डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

00000

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसानीची

सूचना पिक विमा कंपनीस द्यावी

*नुकसानीची माहिती देण्यासाठी ऑफलाइनचीही सुविधा

बुलडाणा, दि. 21 : राज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची माहिती क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषि विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, बँकेत विमा जमा केला त्या बँक शाखेत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना आपल्या संबंधित विमा कंपनीस द्यावी.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टलवर सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे पीक नुकसानीच्या सूचना देण्यासाठी सध्या अडचणी येत असल्याने ऑफलाइन पद्धतीने कंपनींना पिक नुकसानीच्या सुचना देण्यासाठी सर्व कंपनींमार्फत सूचना अर्ज छापील प्रती कंपनमार्फत क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर अर्जाद्वारे कंपनी आणि क्षेत्रीय कृषि कार्यालयांकडे शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत.

शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत संबंधित विमा कंपनीला ऑफलाइन पद्धतीने सूचना द्यावी, असे आवाहन कृषि उपसंचालक अरुण कांबळे यांनी केले आहे.

00000

शनिवार, रविवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

बुलडाणा, दि. 21 : नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, दि. 22 ऑक्टोबर आणि रविवार, दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे.

दिवाळी सणानिमित्त नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन वाहनांना पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा, तसेच महसूल जमा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दोन दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे, असे बुलडाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000




नॅशनल गेम्समध्ये पदकप्राप्त खेळाडूंचा

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

बुलडाणा, दि. 21 : गुजरात येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत आर्चरीमध्ये सुवर्ण पटकाविणाऱ्या मोनाली जाधव आणि कास्यपदक पटकविणाऱ्या प्रथमेश जावकार यांचा जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड म्हणाले, खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे, शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल. खेळाडूंना नाविण्यपुर्ण योजनेतून साहित्य देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना फलश्रृती पुस्तिका देण्यात आली.

समाज कल्याण उपायुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार उपस्थित होते. आर्चरी खेळाची आधुनिक रेंज बुलढाणा येथील तालुका क्रीडा संकुलात तयार करण्यात आली आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

पदकप्राप्त खेळाडू मोनाली जाधव आणि प्रथमेश जावकार यांना महाराष्ट्र शासनाकडून अनुक्रमे 5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये देवून गौरविण्यात येणार आहे. यापुर्वी देखील मोनाली जाधव व प्रथमेश जावकार यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

00000

बुधवारचे दिव्यांग शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 21 : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरु आहे. मात्र बुधवार, दि. 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी बलिप्रतिपदानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे, अस्थीव्यंग, नेत्र संबंधित दिव्यांग तपासणी बाबतचे शिबीर रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे दिव्यांग तपासणीस नागरिकांनी येऊ नये, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

000000000000

शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्यांची उचल करावी

* हरबरा, ज्वारी, गहू बियाणांचे दर जाहीर

बुलडाणा, दि. 21 : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अतंर्गत हरबरा, ज्वारी, गहू या पिकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील शेतकऱ्यांनी दि. 29 ऑक्टोबर 2022  पर्यंत बियाणांची उचल करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर हरभरा 10 वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण. ज्वारी 10 वर्षाआतील आणि 10 वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरण, तसेच कृषि उन्नती योजनेंतर्गत बियाणे, लागवड साहित्यामध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात हरबरा, गहू पिकाचे 10 वर्षाआतील आणि 10 वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे उचल करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लॉटरीसाठी पात्र आहेत, त्यांना परमिट दिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी सदर परमिटद्वारे दि. 29 ऑक्टोबर 2022  पर्यंत अनुदानावरील हरभरा, ज्वारी व गहू याची उचल करावी. यानंतर दि. 29 ऑक्टोबर 2022 नंतर सदरचे परमिट बाद होणार आहे. त्यानंतर परमिटधारक ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित प्रमाणित बियाणे वितरणाचे बियाणे मिळणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहणार असून कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही.

कृषि उन्नती योजनेंतर्गत दि. 30 ऑक्टोबर 2022 पासून बियाणे व लागवड साहित्य ग्रामबिजोत्पादनामध्ये हरबरा, गहू 10 वर्षावरील प्रती शेतकरी 1 एकर क्षेत्राकरिता, तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा, ज्वारी, 10 वर्षाआतील व 10 वर्षावरील अनुदानावरील सर्व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, महाबीज वितरक, एनएससी वितरक, कृभको वितरक यांच्याशी संपर्क साधावा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्य हरभरा 10 वर्षातील वाण असल्यास 45 रुपये प्रती किलो,  तृणधान्य ज्वारीसाठी  10 वर्षातील वाणास 30 रुपये प्रति किलो व 10 वर्षावरील वाण असल्यास 37 रु प्रती किलो, ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमात हरभरा 10 वर्षाआतील वाणास 45 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील जॅकी वाणास 50 रुपये प्रती किलो, दिग्विजय विजय वाणाकरीता 51 रूपये प्रती किलो, गहू पिकाकरिता 10 वर्षाआतील वाण 25 जॅकी प्रति किलो व 10 वर्षावरील वाणास 27 रुपये प्रति किलो याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अनुदानित दर राहणार आहे.

                                                0000000