अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत ब्रम्हपुरी(वाडी) येथे जनजागृती
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात अरुणोदय विशेष सिकलसेल तपासणी मोहीम
दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबवली जात आहे. मोहिमेंतर्गत ब्रम्हपुरी
(वाडी) येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराची लक्षणे, प्रतिबंध व उपचाराबाबत
मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्होळा (ता. बुलढाणा)
अंतर्गत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा
विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल तसेच जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक सुजीत हिवाळे,
विजय जाधव यांनी अभियानातील विविध उपक्रमांची पाहणी केली. ही पाहणी जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी उपकेंद्र केळवद येथे भेट देऊन मोहिमेच्या
प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच ब्रम्हपुरी (वाडी) येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना
सिकलसेल आजाराची लक्षणे, प्रतिबंध व उपचाराबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
गावामध्ये सुरू असलेल्या सिकलसेल गृहभेटी व सर्वेक्षणादरम्यान संबंधित कुटुंबांना भेट
देऊन माहिती देण्यात आली व विचारपूस करण्यात आली.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक दीपक पाटील, आरोग्य
सेवक कुलदीप सावळे, आरोग्य सेविका वैशाली मगर, आशा स्वयंसेविका अर्चना अंबोरे, मदतनीस
वेदिका मोरे व अंगणवाडी सेविका लिला जाधव उपस्थित होते. अरुणोदय अभियानांतर्गत सिकलसेल तपासणी, जनजागृती
व समुपदेशन या उपक्रमांमुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आरोग्य विभागामार्फत
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
00000
Comments
Post a Comment