मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा; जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ग्रंथप्रदर्शन व काव्यवाचन
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : मराठी भाषेचा
प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय
कार्यालयात ग्रंथप्रदर्शन व काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्रंथप्रदर्शनाचे
उद्घाटन ज्येष्ठ कवी व साहित्यिक सर्जेराव चव्हाण तसेच कवयित्री वैशाली तायडे यांच्या
हस्ते करण्यात आले. मराठी साहित्याचे वाचन वाढवूनच मराठी भाषा पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे
पोहोचवता येईल, असे मत सर्जेराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठी भाषेचा
प्रचार व प्रसार होण्यासाठी प्रमाणभाषेसह मराठी बोलीभाषांचा दैनंदिन जीवनात वापर करणे
आवश्यक असल्याचे मत कवयित्री वैशाली तायडे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आशयघन
व दर्जेदार मराठी कवितांचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळविली.
या कार्यक्रमास
वाचक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच मराठी भाषेवर प्रेम करणारे ग्रंथप्रेमी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय मऱ्हे यांनी तर आभार प्रदर्शन
अजय सिरसाट यांनी केले.
ग्रंथप्रदर्शनी
दि. 28 जानेवारी 2026 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार
तसेच वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथालयाचे सभासद
व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000



Comments
Post a Comment