मेहकर तालुक्यात 19 हजार 616 घरकुलांना मंजुरी; 5 हजार 827 घरकुल पूर्ण तर 13 हजार 700 प्रगतीत

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 05 :  जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये विविध आवास योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत विविध आवास योजनेंतर्गत19 हजार 616 घरकुले मंजूर असून त्यापैकी 5 हजार 827 घरकुले पुर्ण झालेले आहेत. उर्वरित 13 हजार 700 घरकुल प्रगतीत आहे.

 प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत टप्पा–1 मध्ये 2 हजार 784 व टप्पा-2 मध्ये 11 हजार 277 अशी एकूण 14 हजार 061 घरकुले मंजूर असून त्यापैकी 2 हजार 945 घरकुले पुर्ण झाले असून 11 हजार  116 घरकुले सध्या प्रगतीपथावर आहेत.

रमाई आवास योजनेअंतर्गत 2 हजार 487 घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 1 हजार 597  घरकुले पूर्ण झाली आहेत व 890 घरकुले प्रगतीत आहेत. शबरी आवास योजनेअंतर्गत 1 हजार 012 घरकुलांचे उद्दिष्ट असून 395 घरकुले पूर्ण झाली आहेत. 598 घरकुले बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत. पारधी आवास योजनेमध्ये 32 उद्दिष्टांपैकी 31 घरकुले पूर्ण झाली असून 1 घरकुल प्रगतीत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 61 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. अशा प्रकारे मेहकर तालुक्यात विविध आवास योजनांअंतर्गत एकूण 19 हजार 616 घरकुले मंजूर असून त्यापैकी 5 हजार 827 घरकुले पूर्ण झाली आहेत, तर 13 हजार 700 घरकुले प्रगतीत आहेत.

मेहकर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीनुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांच्याशी समन्वय साधून पुढील हप्त्याची मागणी विहित नमुन्यात नेमून दिलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अथवा घरकुल कक्षाकडे सादर करावी. यामुळे घरकुलाचे फोटो आवास योजनेच्या संकेतस्थळावर वेळेत अपलोड होऊन हप्त्याचे वितरण विनाविलंब होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, घरकुल योजनेच्या अनुषंगाने कोणीही लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी केल्यास, संबंधितांनी तात्काळ लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सादर करावी, असे स्पष्ट आवाहन गट विकास अधिकारी, पंचायत समिती मेहकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या