सांगवी टेकाळे येथे सिकलसेल आजाराबाबत जनजागृती
बुलढाणा,
(जिमाका) दि. 23 :आयुष्मान आरोग्य मंदिर, डिग्रस बु.
अंतर्गत ग्राम सांगवी टेकाळे येथे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी “अरुणोदय” सिकलसेल अॅनिमिया
विशेष अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या
अभियानाअंतर्गत आरोग्य पथकाने घरोघरी गृहभेटी देऊन सिकलसेल अॅनिमिया आजाराची लवकर
ओळख, तपासणीचे महत्त्व तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत ग्रामस्थांना
सविस्तर माहिती दिली.
अभियानादरम्यान
नागरिकांना तपासणीसाठी प्रोत्साहित करून सिकलसेल आजारासंदर्भातील गैरसमज दूर
करण्यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये आजाराविषयी योग्य माहिती
पोहोचून आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली.
यावेळी
जिल्हा परिषद शाळा, सांगवी टेकाळे येथील विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत
सहविद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराबाबत माहिती व समुपदेशन केले. विद्यार्थ्यांच्या
या उपक्रमशील सहभागामुळे जनजागृतीला अधिक बळ मिळाले. कार्यक्रमास समुदाय आरोग्य
अधिकारी गजानन शिंगणे, आरोग्यसेविका संगिता पहाड़, आरोग्यसेवक अंकुश डोके, आशा
स्वयंसेविका झोटे तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या विशेष
अभियानामुळे ग्रामस्थांमध्ये सिकलसेल अॅनिमिया आजाराबाबत जागरूकता वाढली असून,
पुढील तपासणी, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आहे.
00000
Comments
Post a Comment