संस्था नोंदणीची कोरी प्रमाणपत्रे चोरीस; गैरवापर टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. 02: सार्वजनिक
न्यास नोंदणी कार्यालय बुलढाणा विभाग बुलढाणा येथे दि. 29 डिसेंबर 2025 रोजी संस्था
नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत देण्यात येणाऱ्या संस्था नोंदणी प्रमाणपत्रांपैकी अनुक्रमांक
121998 ते 122000 ही कोरी प्रमाणपत्रे चोरीस गेली आहेत. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस
स्टेशन येथे चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संस्था
नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत देण्यात येणारी वरील अनुक्रमांकांची प्रमाणपत्रे वापरून
शासकीय किंवा निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. त्यामुळे संबंधित सर्व कार्यालये, बँका व संस्थांनी दक्षता घ्यावी. सदर अनुक्रमांकांची
प्रमाणपत्रे कुणाच्या वापरात आढळून आल्यास, त्यांची तात्काळ उलट तपासणी सार्वजनिक न्यास
नोंदणी कार्यालय, बुलढाणा येथे करून घ्यावी किंवा तसे निदर्शनास आल्यास या कार्यालयाच्या
निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे
केले आहे.
000000
Comments
Post a Comment