Tuesday 30 November 2021

DIO BULDANA NEWS 30.11.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 219 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह • 4 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 220 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 219 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 30 तर रॅपिड टेस्टमधील 189 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 219 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : समर्थ नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती रूग्णालयातून 4 रूग्णांना सुट्टी मिळाली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 737196 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86964 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86964 आहे. आज रोजी 84 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 737196 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87646 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86964 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 07 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास दंडाची वसूली • कोविड प्रतीबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक • जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश लागू बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : कोविड 19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी वेळोवेळी निर्बंध लावण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांच्या आदेशांचे अधिक्रमण करून जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील कार्यांना कोविड 19 ची सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार काही शर्तींच्या अधीन राहून खुले करण्याबाबत निर्बंधासह प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे. त्यानुसार कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रूपये इतका दंड करण्यात येणार आहे. प्रत्येकाने कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे. राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) सेवा प्रदाते, परिवास्तुंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरुप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणार आहे. पात्र लाभार्थ्यांना संपुर्ण लसीकरण आवश्यक आहे. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे खेळाडू, अभिनेते, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, संपूर्ण लसीकरण केलेले असावे. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ (मेळावे) आदी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींव्दारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegramMahaGov UniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल, अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविण प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यवसायीकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांव्दारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील. चित्रपट गृह, नाटयगृह, मंगल कार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त /बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/ समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधिच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल. कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकुण लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल. अशा कोणत्याही संमेलानाची (मेळाव्याचे) निरिक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी तहसिलदार तथा इन्सीडंट कमांडर व मुख्याधिकारी नगर परिषद अथवा नगर पंचायत हे त्यांचे प्रतिनिधी पाठवतील आणि तेथे वर नमुद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड -19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, तहसिलदार व मुख्याधिकारी यांना कार्यक्रम पुर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल. संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस आलेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे. किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा, अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. तसेच 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे. कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहीजे. (रूमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असले.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (6 फुट अंतर) राखा. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/ डोळे/ तोंड यांना स्पर्श करणे टाळा. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जतुक करा. खोकतांना किंवा शिंकतांना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखादयाकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वत:चा हात नवे तर हाताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे. सार्वजनिक ठिकाणी थंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा व सुरक्षित अंतर राखा, कोणालाही शारिरीक स्पर्श न करता नमस्कार अथवा अभिवादन करा. या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यांदीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे. अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा रुपये 10 रूपये इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक आदींमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:च कोविड अनूरुप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीचे पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये 50,000 इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत, ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टॅक्सी, खाजगी वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनात, कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात अशा व्यक्तींना, 500 रुपये इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनिस किंवा वाहक यांना देखील 500 रूपये इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी, रूपये 10,000 इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल. कोविड अनुरुप वर्तणुकी संबंधीच्या वर नमुद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमुद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे, उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरुप वर्तनाचे नियम, धोरणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमुद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय , मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार असणार आहे. असे आदेशात नमूद आहे. ****** घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियान • 31 मार्च 2022 पर्यंत चालणार महा आवास अभियान • मंजूर 100 टक्के घरकुलास पहिल्या हप्त्याचे वितरण • प्रलंबित घरकुलांना प्राधान्याने पूर्ण करणार बुलडाणा,(जिमाका) दि.30 : सर्वांसाठी घरे 2022 या केंद्र शासनाच्या धोरणाचा राज्य शासनाने स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून विविध ग्रामीण गृह निर्माणच्या योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेता असून त्यासाठी 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत महा आवास अभियान- ग्रामीण राबविण्यात येत आहे. अभियानातंर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देणे. सन 2016-17 ते 2021-22 पर्यंत जिल्ह्यांना वितरीत करण्यात आलेल्या घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे. मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण करणे, घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, 100 टक्के मंजूर घरकुलास पहिल्या हप्त्याचे वितरण करणे, प्रलंबित घरकुले पुर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पुर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे, शासकीय योजनांशी कृती संगम करून लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. अभियानातंर्गत कोरोना संसर्ग सुरक्षा नियम पाळून विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरीय कार्यशाळेत ग्राम कृती गटाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर किंवा गावपातळीवर घरासाठी कर्ज घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बँक मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. महाआवास अभियान कालावधीत उत्कृष्ट कामासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हे प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट तालुके प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायय प्रथम तीन व सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल अशा प्रकारात प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट तालुके, ग्रामपंचायत, घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट बँक शाखा, शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट प्रथम तीन कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट क्लस्टर, ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट बँक शाखा प्रथम तीन, तालुकास्तर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट घरकूल, ग्रामपंचायत स्तरावर सर्वोत्कृष्ट घरकूल प्रथम तीन यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर पुरस्कार निवडीसाठी 100 गुणांचे निकष देण्यात आले असून सर्वोत्कृष्ट घरकूल, बहुमजली इमारत व गृहसंकुलासाठी 100 गुणांचे निकष आहेत, असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बुलडाणा यांनी कळविले आहे. अन्य योजनांशी कृतिसंगमातून हा लाभ मिळणार मनरेगामधून रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधून शौचालय, जल जीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी, राष्ट्रीय ग्रामीध जीवनोन्नती अभियानातून उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ********

Monday 29 November 2021

DIO BULDANA NEWS 29.11.2021

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 10 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 31 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 10 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 40 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 40 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपिड टेस्टमधील 27 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 40 अहवाल निगेटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 736977 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86960 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86960 आहे. आज रोजी 35 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736977 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87645 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86960 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 10 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ******* थकबाकीदार शेतकऱ्यांनी पाणीपट्टी रकमेचा भरणा करावा पाटबंधारे विभागाचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : पेनटाकळी ता. मेहकर या मोठ्या प्रकल्पातून दुधा, नांद्रा, कंबरखेड, सारंगपूर, अंत्री देशमुख व सोनाटी कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरून शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2021-22 करीता सिंचनासाठी पाणीपुरवठा केल्या जाणार आहे. तरी या बंधाऱ्यावरील सर्व सिंचन पाणीपट्टी थकबाकीदारांनी महासंघ किंवा शासकीय कार्यालयाकडे पाणीपट्टीची थकबाकी भरल्याशिवाय कुणीही मोटारपंप ठेवून पाण्याचा सिंचनाकरीता उपसा करू नये. अन्यथा मोटारपंप संस्था व पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग मेहकर यांचेमार्फत जप्तीची कार्यवही करण्यात येईल. तरी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी महासंघाकडे पाणीपट्टी रकमेचा भरणा करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांनी केले आहे. ******* मतदारांनी मतदार यादीतील नमूद पत्त्याचा पुरावा सादर करावा बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : बुलडाणा विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक 200, 201, 202 मधील मतदार संबंधीत यादी भागामध्ये राहत नसल्याबाबतच्या तक्रारी तहसिल कार्यालय, बुलडाणाकडे प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने तहसिल कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यात येवून सदर वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, बुलडाणा यांचे www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सागर घट्टे, योगेश परसे, मंगेश बिडवे, कुणाल गवई, तेजस सुर्यवंशी, रमेश धोंडीराम परसे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करून असे नमूद केले आहे, की सदर मतदर हे मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याने त्यांची मतदार म्हणून नोंदणी रद्द करण्यात यावी. सदर तक्रार अर्जानुसार उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी सदर प्रकरणात चौकशी करण्याचे सूचीत केले आहे. त्यानुसार अनुषंगिक कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. या यादीतील सर्व मतदारांना निवडणूक शाखेमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मतदार यादीतील नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा निवडणूक शाखा, तहसील कार्यालय, बुलडाणाकडे 6 डिसेंबर पर्यंत सादर करावा. सदर मतदार हे मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी यापूर्वीच कळविले आहे. असे असतांनाही संबंधित मतदार यांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. मात्र जे मतदार 6 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा रहीवासाचा पुरावा सादर करणार नाहीत त्यांची नावे वगळण्याचा प्रस्ताव मतदार नोंदणी अधिकारी, बुलडाणा यांचेकडे सादर करण्यात येईल, असे तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे. ***** जिल्ह्यात 15 लक्ष 17 हजार 562 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 15,17,562 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 72.10 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 1 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 43 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 8 आहे. जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे.

Friday 26 November 2021

DIO BULDANA NEWS 26.11.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 305 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

  • 1 रूग्णाला मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 306 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 305 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 140 तर रॅपिड टेस्टमधील 165 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 305 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : समर्थ नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती रूग्णालयातून  1 रूग्णाला सुट्टी मिळाली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 736592 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86957 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86957 आहे.  आज रोजी 44 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736592 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87645 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86957 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        **********

                                    अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचे गहू व तांदुळ वाहतूकीचे आदेश पारीत

* 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकरिता माहे डिसेंबर 2021 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे. धान्य वाटपाचे परिणाम गहू 21 किलो प्रती कार्ड, तांदुळ 14 किलो प्रति कार्ड असून वाटपाचा दर हा गहू 2 रूपये प्रतिकिलो व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो आहे.

  गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.  बुलडाणा : गहू 1465 क्विंटल व तांदूळ 976, चिखली गहू 656 व तांदुळ 437, अमडापूर गहू 223 व तांदूळ 149, दे.राजा गहू 581 व तांदूळ 387, मेहकर गहू 870 व तांदूळ 580, डोणगांव गहू 274 व तांदूळ 183, लोणार गहू 1387 व तांदूळ 924, सिं.राजा गहू 574 व तांदूळ 383, साखरखेर्डा गहू 318 व तांदूळ 212, मलकापूर गहू 949 व तांदूळ 633, मोताळा गहू 1194 व तांदूळ 795, नांदुरा गहू 1277 व तांदूळ 851, खामगांव गहू 1015 व तांदूळ 975, शेगांव गहू 648 व तांदूळ 432, जळगांव जामोद गहू 1060 व तांदूळ 705, संग्रामपूर गहू 1289 व तांदूळ 858 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 13 हजार 780 व तांदूळ 9 हजार 180 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी 72 वर्ष पूर्ण झाले आहे.

  जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी  नायब तहसिलदार श्री. बंगाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

Thursday 25 November 2021

DIO BULDANA NEWS 25.11.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 13 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 28 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 13 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 188 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 188 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 21 व रॅपिड टेस्टमधील 167 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 188 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 736287 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86956 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86956 आहे. आज रोजी 95 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736287 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87644 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86956 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        ******

                      राष्ट्रीय बीज निमगच्या दहा वर्षाआतील हरभरा बियाण्यांचे सुधारीत दर जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राज्य शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण हरभरा 10 वर्षाआतील वाणासाठी राष्ट्रीय बिज निगम,पुणे यांनी शेतकऱ्यांना 600 रूपये प्रति क्विंटल अतिरिक्त सूट दिली असून सदरहू वाणाचे वितरणासाठी अनुदानित दर रक्कम 5500 रूपये प्रति क्विंटल असल्याचे कळविले आहे. यापूर्वी सदरहू वाणाची रक्कम 8600 रु प्रति क्विंटल होती. त्यावर अनुदान 2500 रु प्रती क्विंटल होते व शेतकऱ्याला 6100 रु प्रती क्विंटल दराने बियाणे मिळत होते. परंतू आता राष्ट्रीय बिज निगम, पुणे यांनी प्रती क्विंटल 600 रु अतिरिक्त सूट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 5500 रू. प्रती क्विंटल प्रमाणे हरभरा बियाणे मिळणार असून  प्रति किलो 55 रु दराने 30 किलो ची बॅग 1650 रुपयामध्ये मिळणार आहे.

     सद्यस्थितीत जिल्ह्यात पाऊसमान चांगले झाले असल्याने हरभरा पिका खालील क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे. सर्व प्रमाणित

बियाणे वितरणासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहे. शेतकऱ्यांच्या 7/12 व नमुना 8 अ वरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणा अंतर्गत अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा राष्ट्रीय बिज निगम  (एन.एस.सी) वितरक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

                                                                        *********

शेतकरी लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे मासिक नियतन जाहीर

* 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांकरिता माहे डिसेंबर 2021 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे. धान्य वाटपाचे परिणाम गहू 4 किलो प्रती लाभार्थी, तांदुळ 1 किलो प्रति लाभार्थी असून वाटपाचा दर हा गहू 2 रूपये प्रतिकिलो व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो आहे.

  गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.  बुलडाणा : गहू 950 क्विंटल व तांदूळ 236, चिखली गहू 1283 व तांदुळ 321, अमडापूर गहू 464 व तांदूळ 116, दे.राजा गहू 907 व तांदूळ 227, मेहकर गहू 1170 व तांदूळ 293, डोणगांव गहू 481 व तांदूळ 120, लोणार गहू 1183 व तांदूळ 295, सिं.राजा गहू 1079 व तांदूळ 270, साखरखेर्डा गहू 480 व तांदूळ 120, मलकापूर गहू 911 व तांदूळ 228, मोताळा गहू 756 व तांदूळ 189, नांदुरा गहू 1223 व तांदूळ 306, खामगांव गहू 1147 व तांदूळ 287, शेगांव गहू 1059 व तांदूळ 265, जळगांव जामोद गहू 1023 व तांदूळ 256, संग्रामपूर गहू 764 व तांदूळ 191 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 14 हजार 880 व तांदूळ 3 हजार 720 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                *******

 

                  रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 2 मोठे, 7 मध्यम व 46 ल.पा प्रकल्पांमध्ये 364.90 म्हणजे 95.06 टक्के उपयुक्त पाणी साठा उपलब्ध झालेला आहे. बिगर सिंचन आरक्षण बाष्पीभवन व इतर व्यय वगळून उर्वरित पाणी साठ्यावर रब्बी हंगाम 2021-22 चे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणीपट्टीची थकबाकी भरून पाणी मागणी अर्ज नमुना 7 मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत शाखा कार्यालयात सादर करावयाचे आहे.

  अर्जाचे कोरे नमुने शाखाधिकाारी कार्यालयात विना:शुल्क उपलब्ध आहे. मागणी अर्ज करणारे हे स्वत: शेतीचे मालक असले पाहिजे व अर्जावर मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे.  मागणी अर्जाची पुर्तता करण्याकरीता कालवा निरीक्षक अथवा बिट प्रमुख यांचे सहकार्य घ्यावे.  पाणी अर्जावर ओलीत कराची थकबाकी आहे अथवा नाही, याबाबत नोंद करणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा रब्बी हंगाम 31 मार्च 2022 पर्यंत राहील. प्रकल्पावरील पाणीसाठा व पिकनियोजनानुसार 3 किंवा 4 पाणी पाळ्या देण्यात येतील. 1 एप्रिल 2022 नंतर उन्हाळी हंगाम सुरू होईल. पिकांचे क्षेत्र व विहीरीवरील ओलीताचे क्षेत्र सुरू ठेवावे. नियमानुसार मोटेचा दांड व पाटचारी यामध्ये कमीत कमी 8 फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. अनधिकृत पाणी वापराकरीता दंडनिहाय आकारणी होईल. पाणी बंद केल्यास नुकसानी करीता कास्तकार स्वत: जबाबदार राहतील, असे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांनी कळविले आहे.

                                                                                *****

प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे मासिक नियतन जाहीर

* 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांकरिता माहे सप्टेंबर 2017 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि, टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे. धान्य वाटपाचे परिणाम गहू प्रती लाभार्थी 3 किलो व तांदूळ प्रति लाभार्थी 2 किलो आहे, तर गहूचा दर 2 रूपये प्रतिकिलो व तांदूळाचा दर 3 रूपये प्रतिकिलो आहे.

  गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा गहू 5060 क्विंटल व तांदूळ 3372, चिखली गहू 4297 व तांदुळ 2865, अमडापूर गहू 1397 व तांदूळ 931, दे.राजा गहू 2101 व तांदूळ 1401, मेहकर गहू 3746 व तांदूळ 2497, डोणगांव गहू 1326 व तांदूळ 884, लोणार गहू 2488 व तांदूळ 1659, सिं.राजा गहू 1679 व तांदूळ 1119, साखरखेर्डा गहू 1274 व तांदूळ 849, मलकापूर गहू 3037 व तांदूळ 2024, मोताळा गहू 2979 व तांदूळ 1986, नांदूरा गहू 3017 व तांदूळ 2012, खामगांव गहू 5501 व तांदूळ 3666, शेगांव गहू 2649 व तांदूळ 1766, जळगांव जामोद गहू 2766 व तांदूळ 1844, संग्रामपूर गहू 2573 व तांदूळ 1715 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 45 हजार 890 व तांदूळ 30 हजार 590 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

*******

 

Wednesday 24 November 2021

DIO BULDANA NEWS 24.11.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 194 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

  • 2 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 195 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 194 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 89 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 194 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : अंजनी बु 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती रूग्णालयातून 2 रूग्णांना सुट्टी मिळाली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 736099 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86955 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86955 आहे.  आज रोजी 42 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736099 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87644 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86955 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        **********


राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरूद्ध नोंदविले 82 गुन्हे

* 73 आरोपींना केली अटक

बुलडाणा,(जिमाका) दि. 24:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाई केली आहे.  विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 1 ते 23 नोव्हेंबर दरम्यान धडक मोहिमेत 82 गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच 73 वारस गुन्हे, 9 बेवारस गुन्हे नोंदवून 73 आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे 680 लीटर हातभट्टी, 10771 लिटर सडवा, 251 लीटर देशी दारू, 54 लिटर विदेशी दारू व 5 वाहनासह एकूण 17 लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    धडक मोहिमेदरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रांजणी शिवार ता. लोणार येथे  सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीच्या इंडिका कार क्रमांक एमएच 28 सी 4789 वर कारवाई करण्यात आली. यावेळी कारमध्ये 86 लिटर देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या.  ही कारवाई चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने केली. सदर कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक जी. व्ही पहाडे, जवान एस डी जाधव सहभागी होते. तसेच भरारी पथक बुलडाणाचे निरीक्षक आर. आर उरकुडे यांचे पथकाने एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल हातभट्टी वाहतूक करताना जप्त करण्यात आली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, जवान पी.ई चव्हाण, एन ए देशमुख, आर एस कुसळकर, अमोल तिवाने सहभागी होते.

     आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास  विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांनासुद्धा सदर विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.

*****

दिव्यांग व्यक्तींनी कृत्रिम अवयवासाठी नाव नोंदणी करावी

बुलडाणा,(जिमाका) दि. 24:  जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व आवश्यक सहाय्यक उपकरणे मोफत पुरविणेसाठी शिबिराचे आयोजन करावयाचे आहे. त्यानुसार आवश्यक त्या माहितीसह इच्छूकांनी  alimco. csc-services.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. या नोंदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक , नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. तरी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

                                                            *****

मोटार वाहन कायद्यातंर्गत राबविलेल्या विशेष मोहिमेत 5.55 लक्ष दंड वसूल

बुलडाणा,(जिमाका) दि. 24:  जिल्ह्यात पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या सुचनेनुसार सर्व पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने मोटार वाहन कायद्यातंर्गत 3 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविली. यामध्ये वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश आवाजाचे सायलेन्सर चालविणारे वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिटवर कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव श्रावण दत्त व बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात आली.  कारवाईदरम्यान फॅन्सी नंबर प्लेट जागीच उतरून बदलविण्यात आल्या. विना नंबरचे वाहने पोलीस स्टेशनला आणून जप्त करण्यात आली. मोहिमेत एकूण 10 हजार 84 केसेस करण्यात आल्या तर 15 लक्ष 79 हजार रूपये दंड लावण्यात आला. यापैकी 5 लक्ष 55 हजार 800 रूपये दंडाची वसूली करण्यात अली.  वाहनांवर करण्यात आलेल्या केसेस संदर्भात त्यांना प्राप्त एसएमएसनुसार तात्काळ सदरचा दंड जवळच्या वाहतूक अंमलदार यांचेकडे जावून भरणा करण्यात यावा. अथवा पाठविण्यात आलेल्या एसएमएसमध्ये ऑनलाईन पैसे भरण्या संदर्भात जी लिंक पुरविण्यात आलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून ऑनलाईन पैसे वाहन धारक भरू शकतो. तरी सर्व वाहन धारकांनी नियमांचे पालन करून पोलीसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

करण्यात आलेल्या केसेस व लावलेला दंड

फॅन्सी नंबर प्लेटसाठी 108 केसस व लावलेला दंड 1,08,000 रूपये, कर्कश हॉर्न व सायलेन्सर 10 केसेस व दंड 10 हजार, अवैध प्रवासी वाहतूकसाठी 54 केसेस, ट्रिपल सिटकरीता 735 केसेस व दंड 1,47,000 रूपये, विना लायसन्स वाहन चालविणे केसेस 3455 व दंड 6,91,000 रूपये, नो पार्किंग क्षेत्रात वाहन पार्क करणे केसेस 1519 व दंड 3,03,800 रूपये, विना सिटबेल्ट वाहन चालविणे केसेस 728 व दंड 1,45,600 रूपये, वाहनांचे कागदपत्रे जवळ न बाळगणे केसेस 233 व दंड 46600 रूपये, मोवाका अंतर्गत इतर केसेस 3242 व दंड 1,27,000 रूपये. अशाप्रकारे एकूण केसेस 10084 व लावलेला दंड 15,79,000 रूपये आहे.

                                                                                                ******

Tuesday 23 November 2021

DIO BULDANA NEWS 23.11.2021

 कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 27 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 276 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 276 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 60 व रॅपिड टेस्टमधील 216 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 276 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 735903 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86953 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86953 आहे. आज रोजी 45 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 735903 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87643 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86953 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        **********


राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका…

* 9 गुन्हे नोंदवून 7 आरोपींना अटक

* पहुरजिरा येथे ट्रकसह मुद्देमाल जप्त

बुलडाणा,(जिमाका) दि. 23:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्र, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात पुन्हा 22 नोव्हेंबर रोजी धडक मोहिम राबविण्यात आली.  उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, साठवण व निर्मिती वर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. 

    धडक मोहिमेदरम्यान सिं. लपाली, बोराखेडी, सारोळा ता. मोताळा, पहुरजिरा ता. शेगांव, शेलगांव आटोळ ता. चिखली, या ठिकाणी अवैध दारु धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली.  यामध्ये  एकुण 9 गुन्हे नोंदविण्यात आले, तर 7 वारसा नोंदवून गुन्हे 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.   सदर कारवाईमध्ये 71 लि. हातभट्टी दारु, 1550 लि. रसायन, 5.4 लि. देशी दारु, 7.5 लि. विदेशी दारु व एक वाहन जप्त करुन 11 .44 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. मोहिमेत शेगांवचे दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने दारूबंदी गुन्ह्याकामी खामगांव ते जलंब रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पहुरजिरा ता. शेगाव येथे सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक एमएच 11 सीएच 4882 जप्त करण्यात आला आहे. तसेच अशोक भिकाजी कोंडे रा. पहुरजिरा याकडून महाराष्ट्र राज्यातून प्रतिबंधीत असलेल्या गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेश मद्य साठ्याचा गोल्डन ॲस ब्ल्यु व्हिस्की या ब्रॅण्डच्या 750 मि.ली क्षमतेच्या एकूण 10 विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. बॉटल व एक चार चाकी वाहन जप्त करून आरोपीत इसमाविरूद्ध  महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत खामगांवचे दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, जवान अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, संजीव जाधव व सौ. शारदा घोगरे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एन. के. मावळे करीत आहे.    

आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास  विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांनासुद्धा सदर विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.

                                                            *****

जिल्ह्यात 14 लक्ष 38 हजार 76 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के  लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 22 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 14,38,76 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 68.32 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 5 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 43 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 4 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी  असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                ******

 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  • पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
  • http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.23: आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बुलडाणा व खामगांव येथे आहे. या वसतिगृहासाठी शैक्षणिक सत्र सन 2021-22 करीता अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यायातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे वसतिगृह कार्यालयात 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे.    

    विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे जुळणारे असावे. अर्ज भरताना आधारकार्ड अपडेट करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी बँक खाते किंवा मोबाईल क्रमांक बंद असल्यास अर्ज भरण्यापूर्वी सुरू करून घ्यावे. बँक खात्याची नोंद करताना स्वत:चेच बँक खातयाची नोंद करावी किंवा पालकाचे संयुक्तीक खाते असावे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी कागदपत्राची स्वच्छ प्रत संकेतस्थळावर अपलोड करावी. तसेच प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड प्रत, गुणपत्रिका, पासपोर्ट दोन फोटो आदी अर्जासोबत अपलोड करावे.  तरी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह, बुलडाणा व खामगांव यांनी केले आहे.

                                                                                                                ******

 

Sunday 21 November 2021

DIO BULDANA NEWS 21.11.2021

 



राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला अवैध दारू विक्री धंद्यावर ' दंडुका '

*१९ व २० नोव्हेंबर रोजी राबविली विशेष मोहीम
*१६ गुन्हे नोंदवून १६ आरोपींना अटक
*उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण; हॉटेल मालकास अटक
बुलडाणा,(जिमाका) दि. २१:  राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सलग तिन दिवसांच्या शासकीय सुट्टीच्या अनुषंगाने अवैध दारु धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याकरीता संयुक्त मोहिम राबविण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त,नागपूरचे विभागीय उप-आयुक्त व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीकाऱ्यांनी या कार्यालयाचे आदेशाने दिनांक १९ व २० नोव्हेंबर असे दोन दिवस मोहीम राबविली.  उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, साठवण व निर्मिती वर आपला दंडुका उगारून कारवाई  केली आहे. 
त्यामध्ये गवळीपुरा चिखली, शेळगांव आटोळ ता.चिखली, बोराखेडी व वरुड शिवार ता.मोताळा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ता.खामगांव व देऊळगांव मही ता.दे. राजा या ठिकाणी अवैध दारु धंद्याविरुद्ध निरीक्षक चिखली व खामगांव कार्यक्षेत्रामध्ये संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यामध्ये  एकुण १६ गुन्हे नोंदवुन १६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.   सदर कारवाईमध्ये २१२ लि. हातभट्टी दारु, २६३४ लि. मोहा रसायन, ३०.३५ लि. देशी दारु, १.६२ लि. विदेशी दारु व एक वाहन जप्त करुन १ लक्ष ५१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 
   या कारवाई दरम्यान दे. मही ते दे. राजा या महामार्गावरील हॉटेल निर्सग ढाबा या ठिकाणी अवैध देशी दारु विक्री बाबत गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार  सदर ठिकाणी पथकाने दारुबंदी गुन्हे कामी छापा टाकुन अरुण तेजराव शिंगणे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा चे कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंदवित असतांना सदर हॉटेल/ढाबा मालक अमोल तेजराव शिंगने याने पथकातील अधीकारी व कर्मचारी यांच्याशी दारुच्या नशेमध्ये वाद घातला.   शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच लाथा बुक्यांनी, लोखंडी पाईपने कर्मचाऱ्यांना मारहाण करुन दारुची बॉटल फोडुन पथकातील कर्मचारी विशालसिंग पाटील यास जखमी केले व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला.
  त्यामुळे सदर घटनेची फिर्याद प्रकाश विरभद्र मुंगडे यांनी देऊळगांव राजा पोलीस स्टेशनला देऊन देऊळगांव राजा पोलिसांनी आरोपीत इसम अमोल तेजराव शिंगणे यास भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३, ३३२,५०४,५०६ नुसार अटक केली. त्यानंतर  देऊळगांव राजा न्यायालय येथे हजर केले असता त्यास न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवाना केले आहे. शासकीय कामकाज करतांना सरकारी कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर ढाब्यावर या पूर्वी देखील उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी गुन्हे कामी गुन्हे नोंदविले असुन विभाग लवकरच त्याचेवर फौ.प्र.सं.चे कलम ९३ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे.
  महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८६ प्रमाणे कोणत्याही जागेचा वापर दारुचा गुत्ता म्हणुन चालवीने हा अपराध आहे. सदर विभाग हा अतिशय तोकडया मनुष्यबळावर पुर्ण जिल्हयात कागकाज करीत आहे.  त्यामध्ये
कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे जिवघेणा हल्ला होणे हा चिंतेचा विषय आहे. आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास  विभागाचे टोल फ्री नंबर १८००८३३३३३ वर किंवा व्हॉट्अॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. सदर कार्यवाहीत निरीक्षक जी.आर.गांवडे, आर.आर.उरकुडे, दुय्यम निरीक्षक एन.के.मावळे, आर.के.फुसे,  पी.व्हि.मुंगडे,  एस.डी.चव्हाण, वार.रा.बरडे व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व जवान तसेच जवान-नि-वाहनचालक यांनी सहभाग घेतला होता, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे. 

Thursday 18 November 2021

DIO BULDANA NEWS 18.11.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 257 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 260 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 257 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 77 तर रॅपिड टेस्टमधील 180 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 257 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : सुंदरखेड 1, आनंद नगर 1, शेगांव शहर : व्यंकटेश नगर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 734944 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86945 आहे.  आज रोजी 91 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 734944 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87636 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 17 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    *****

                                रेशीम कोषाच्या दराने घेतली स्वर्णीम भरारी…

  • 706 रूपये प्रति क्विंटलचा भाव

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उन्नत होण्यासाठी शेतीला पर्यायी जोडधंदा पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी आर्थिक संपन्न होईल. यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी शासन दरवर्षी महारेशीम अभियान राबविते. सध्या रेशीम कोषाचे दरही दरवर्षीपेक्षा जास्त असून सोन्यासारखे भाव रेशीम कोषाला मिळत आहे. रेशीम कोषाच्या दराने स्वर्णीम भरारी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची कास धरावी.

     जिल्ह्यात सन 2022-23 या वर्षात तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीसाठी महा रेशीम अभियान 2022 राबविण्यात येत आहे. हे रेशीम अभियान 25 नोव्हेंबर पर्यंत आहे.  त्यानुसार ज्या इच्छुक शेतकऱ्यांना जून 22 मध्ये तुती लागवड  करिता  स्थानीक ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा अंतर्गत कृती आराखड्यात मध्ये नाव दिलेले आहेत. त्यांनी व जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान 22 मध्ये सर्व आवश्यक कागद पत्रांसहित व प्रति एकर 500 रुपये शुल्क भरून नाव नोंदणी करावी. ही नाव नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय, बुलडाणा यांचेकडे  करणे सुरू झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन रेशीम विकास अधिकारी एन बी बावगे यांनी केले आहे. सध्या शेतकऱ्यांना इतर पिकात अतिवृष्टी, दुष्काळाचे होणारे धोके लक्षात घेता जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये मनरेगा अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर तुती लागवड करीता कृती आराखडा मध्ये 1327 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा रेशीम कार्यालयाकडे 235 शेतकऱ्यांनीच 500 रूपये प्रति एकर शुल्क भरून व सर्व कागदपत्रे सादर केले आहे.

  मनरेगातून तुती लागवड करून शेतकऱ्यांनी रेशीम कोषाला स्वर्णीम दर प्राप्त करून घ्यावा. मनरेगा अंतर्गत रेशीम शेतीसाठी अनुदान देण्यात येते. तरी शेतकऱ्यांनी 25 नोव्हेंबर पर्यंत सर्व कागदपत्रांसह जिल्हा रेशीम कार्यालय, बुलडाणा येथे नाव नोंदणी करावी.

                                                मनरेगा अंतर्गत रेशीम शेतीच्या अकुशल व कुशल मजुरीसाठी मिळणारी रक्कम

प्रथम वर्षासाठी 282 दिवसांकरीता 203 रूपये दरानुसार 57 हजार 246 रूपये, द्वितीय वर्षाला 200 दिवसांसाठी 203 रूपये मजुरी दराप्रमाणे 40 हजार 600 रूपये व तृतीय वर्षाला 200 दिवसांसाठी 203 रूपये दरानुसार 40 हजार 600 रूपये. अशा प्रकारे एकूण 682 दिवसांकरीता 1 लक्ष 38 हजार 446 रूपये अनुदान मिळते. तसेच कुशलसाठी प्रथम वर्षाला शेणखत, तुती रोपे, चंद्रीका-100 प्लास्टीक ट्रे 10, नायलॉन जाळी 4, गटूर स्प्रे पंप 1,औषध 4 लीटर करीता 41 हजार 160 रूपये, द्वितीय वर्षाला जैविक खते / पोषक औषधी निर्जंतुकीकरण पावडरसाठी 10 हजार 285 रूपये  व तृतीय वर्षाला जैविक खते, निर्जंतुकीकरण पावडर करीता 10 हजार 285 रूपये असे एकूण 61 हजार 730 रूपये अनुदान मिळते. तसेच मनरेगा अंतर्गत मजुरीचा खर्च संबंधित मजुराला पोस्ट / बँक खात्यामार्फत तहसिलदारांकडून देण्यात येईल. तसेच सामुग्रीचे प्रदान संबंधित लाभधारकांनी लागवड केल्यानंतर NEFT द्वारे तहसिलदारांमार्फत करण्यात येईल, असे जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने कळविले आहे.

                                                                        ******

        बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदांची कामे प्राप्त

· 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव येथे कंत्राटी पद्धतीचे 2 सफाईगार पद असून ते रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था वरील काम करण्यास इच्छूक असल्यास 30 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.

   सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                                                ******

 

Wednesday 17 November 2021

DIO BULDANA NEWS 17.11.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 336 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 04 पॉझिटिव्ह

  • 2 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 340 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 336 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 04 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 110 तर रॅपिड टेस्टमधील 226 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 336 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : रामनगर 1, इतापे ले आऊट 1, डॉ. संचेती हॉस्पीटल जवळ 2  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 04 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचाराअंती 02 रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 734687 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86945 आहे.  आज रोजी 75 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 734687 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87633 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    *****

गुरूनानक जयंतीदिनी दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असून येणाऱ्या शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी गुरूनानक जयंती आहे. जयंती निमित्ताने शासकीय सुट्टी असल्यामुळे 19.11.2021 रोजी तिसऱ्या शुक्रवारी जिल्हा रूग्णालयातील मनोरूग्ण / मतिमंद व कान, नाक, घसा संबधित दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील सदर दिव्यांग तपासणीस येवू नये, आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

                                                                        *******

जिल्ह्यात 13 लक्ष 35 हजार 250 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के  लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 16 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 13,35,250 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 63.44 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 11 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 38 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 3 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.