5 जानेवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 01 : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींचे निरसन करण्यासाठी सोमवार दि. 5 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे.  

अर्जदारांनी अर्ज करतांना स्विकृतीचे निकष : अर्ज विहीत नमुन्यात केलेला असावा, तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाची असावी, चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमून्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहील, तालुका लोकशाही दिनानंतर 1 माहिन्यांने जिल्हाधिकारी लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन माहिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन माहिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल.

‘हे’ अर्ज स्विकारले जाणार नाहीत : न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल्स, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहीत नमून्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणांत पून्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसेल तर, वरील प्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्विकृत करता येऊ शकत नाहीत असे अर्ज सामान्य तक्रार या स्वरुपात संबंधित विभागांकडे आवश्यक कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हाळे यांनी दिली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या