Wednesday 30 September 2020

DIO BULDANA NEWS 30.9.2020

 


अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला आढावा
  • एनडीआरएफमधून 50 टक्केपेक्षा जास्त बाधीत क्षेत्राला मदत मिळवून द्यावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 :  जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.  त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन 29 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे,  रिलायन्स पिक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक एस आर कोडीयातर, क्लस्टर हेड वाय व्ही अवघडे, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दिलीप लहाने आदी उपस्थित होते.  अतिवृष्टीबाधीत भागातील खरीप पिकांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ मदतीबाबत संबंधीत यंत्रणांची आढावा बैठक घेतली.

   पालकमंत्री पुढे म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात एनडीआरएफ मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त पीकाचे नुकसान असल्यास जीरायत शेतीसाठी प्रती हेक्टरी 6800 व बागायती शेतीसाठी 13500 रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. त्याचप्रमाणे फळपिकांकरीता प्रती हेक्टरी 18000 रूपयांची आर्थिक मदत निकषानुसार देण्यात येते. जिल्ह्यात कृषी विभागाच्या सर्वेनुसार अतिवृष्टीमुळे 38 हजार 68 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना 25 कोटी 95 लक्ष रूपयांची आर्थिक मदत मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. या मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  खरीप पिकांसाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत पीक विमा कंपनी तसेच कृषि विभागाचे कार्यालयाला कळविले आहे, अशा शेतकऱ्यांचा तात्काळ सर्वे करून पंचनामे पूर्ण करावे.  त्यांना संबंधीत पिक विमा कंपनीने विम्यापोटी देण्यात येणारी आर्थिक परतावा 100 टक्के द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.  

  पिक कर्ज वाटपाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, प्रत्येक बँकेने त्यांचेकडील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत लाभ झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करावे. सर्व बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाएवढे पात्र शेतकरी उपलब्ध नसल्याचे बँकांनी आढावा सभेमध्ये सांगितले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या मात्र कर्जवाटप होऊ न शकलेल्या पात्र सभासदांची बँक / शाखा निहाय जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयास पाठविली आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधीत व्यापारी / ग्रामीण बँकांनी त्यांचे कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करावे व नियमित अहवाल सादर करावा.  याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     

*******

 

 

कृषी विभागातर्फे सोयाबीनच्या उभ्या पिकातील शेंगामधील

बियाण्याची उगवण समस्या व उपायबाबत कृषी सल्ला

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी शेतकऱ्याकरीता शेतातील सोयाबीन पैदासवार, सोयाबीनच्या उभ्या पिकातील शेंगामधील बियाण्याची उगवण समस्या व उपायबाबत कृषी सल्ला खालीलप्रमाणे दिला आहे.

   अमरावती विभागातील सोयाबीनची पेरणी खरीप हंगाम 2020 मध्ये साधारणता 15 ते 30 जुन दरम्यान झालेली आहे. हे पीक सध्या शारिरीक पक्वतेच्या (शेंगा भरलेल्या) अवस्थेत आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कमी सुर्यप्रकाश व पाऊस सुरु असल्यामुळे दिवसाचे तापाण 20 ते 25 डिग्री सेल्सिअस आहे. व आर्द्रता 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.

शारिरीक पक्वतेनंतर शेंगा वाळण्यासाठी व बियाण्यामधील ओलावा कमी होण्यासाठी तापमाण 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असावे लागते. या काळात आर्द्रता 50 टक्क्यापेक्षा कमी असावी लागते. तसेच प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. परंतु सद्या परिस्थिती मध्ये ही साखळी विस्कळीत झालेली असल्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनच्या उभ्या पिकातील शेंगामधील बियाण्याची उगवण झालेली आहे. हे शारिरीक व्यंग असून सतत पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झाले आहे.

उपाय शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करावा व शेतामध्ये हवा खेळती ठेवावी, पाऊस थांबताच सोयाबीन

    पिकाची काढणी करुन काडाचे छोटे छोटे ढीग करुन प्रखर सुर्यप्रकाशामध्ये शेतातच वाळवावे त्यानंतर प्रादृर्भाव, उगवण झालेल्या शेंगा बाजुला काढुन मळणी करावी, असे तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे

कळविले आहे.

                                                                                    ***********

जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 30:  सन 2020-21 या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण 1419 गावांमध्ये नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांच्यावर जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.  

   तालुकानिहाय नजर अंदाज पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे : बुलडाणा तालुका : एकूण 98 गावांची  पैसेवारी 74, चिखली तालुका :  एकूण 144 गावांची पैसेवारी 71, दे. राजा तालुका :  64 गावांची पैसेवारी 68, मेहकर तालुका : 161 एकूण गावांची पैसेवारी 72, लोणार तालुका : एकूण 91 गावांची पैसेवारी 62, सिं. राजा तालुका : एकूण 114 गावांमध्ये पैसेवारी 64, मलकापूर तालुका :  एकूण 73 गावांची पैसेवारी  64, मोताळा तालुका : एकूण 120 गावांची पैसेवारी  71, नांदुरा तालुका : एकूण 112 गावांची पैसेवारी 71, खामगांव तालुका : एकूण 145 गावांची पैसेवारी 69, शेगांव तालुका : एकूण 73 गावांची 65, जळगांव जामोद तालुका : एकूण 119 गावांची पैसेवारी 62 आणि संग्रामपूर तालुका : एकूण 105 गावांची पैसेवारी 70 आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

कर्जमाफी योजनेत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्डची प्रत जमा करावी

  • स्टेट बँक ऑफ इंडियाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. यादीमध्ये नाव असलेल्या मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी  संबंधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आपले आधार कार्डची प्रत जमा करावी. जर यादीमधील व्यक्ती मयत झाली असल्यास, मयताचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे आधार आणि बचत खाते क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संबंधीत शाखेत जमा करावी. आधार प्रमाणीकरण बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर आधार कार्ड व पासबुक घेवून जात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तरी त्वरित आधार कार्डची प्रत जमा करावी. अन्यथा कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहील्यास ती जबाबदारी बँकेची राहणार नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने कळविले आहे.

                                                                        **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 514 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 188 पॉझिटिव्ह

• 157 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 702 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 514 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 188 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 172 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 277 तर रॅपिड टेस्टमधील 237 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 534 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली शहर : 7, चिखली तालुका : धोत्रा 8, धोडप 1, सावखेड नजीक 4, काटोडा 1,   बुलडाणा शहर : 28, बुलडाणा तालुका : दहीद 1,   लोणार शहर : 7, लोणार तालुका : वडगांव 3, तांबोळा 4, वेणी 1, राजणी 1, वढव 1, सावरगांव मुंढे 2, देऊळगांव कंकाळ 1, बिबी 5,   सुलतानपूर 2, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : निमगांव 1, तरवाडी 2, जळगांव जामोद शहर : 1, सिं. राजा तालुका : गुंज 9, वारोडी 1, पिंपळगांव ठोसर 2, मलकापूर पांग्रा 1,  दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : अंढेरा 3, रोहणा 2, वाकी 2, मलकापूर तालुका : दुधलगांव 1, नरवेल 1, मलकापूर शहर : 12, मोताळा तालुका : कालखेडा 1, रिधोरा 2, खेडी 1,  मोताळा शहर : 2, मेहकर तालुका : पिं. माळी 1, मोळामोळी 4, जानेफळ 4, मेहकर शहर : 3, खामगांव शहर : 23, खामगांव तालुका : खोलखेड 1, मांडका 1, निमकवळा 1, गवंढळा 1, शेगांव तालुका : पहुरजिरा 4 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 188 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 57 वर्षीय पुरूष, पळशी खु ता. खामगांव येथील 68 वर्षीय पुरूष, हिंगणा कारेगांव ता. खामगांव येथील 78 वर्षीय पुरूष, डोणगांव ता. मेहकर येथील 35 वर्षीय पुरूष, आदर्श कॉलनी दे .राजा येथील 66 वर्षीय महिला व गणपती नगर, मलकापूर येथील 90 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 157 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  लोणार : 7, मोताळा : 7, दे. राजा : 6, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 42, नांदुरा : 13, खामगांव : 22, चिखली : 23, मलकापूर : 9, सिं. राजा : 7, शेगांव : 18, मेहकर : 3.    

   तसेच आजपर्यंत 30300 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5977 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5977 आहे.  

  आज रोजी 900 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 30300 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7185 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5977 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1114 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 94 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 


Tuesday 29 September 2020

DIO BULDANA NEWS 29.9.2020


 जल जिवन आराखड्यातील कामे दर्जेदार करावीत

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • जल जिवन मिशनची आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासनाने प्रत्येक गाव, वाडी व वस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी जल जिवन मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक घराला दरडोई दररोज 55 लीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या मिशनमध्ये नवीन नळयोजना प्रस्तावीत कराव्यात. मिशनमधील आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

  स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात  जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते. तसेच सभागृहात  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घोडे, उपविभागीय अभियंता एस आर वारे, पी एल लोखंडे आदी उपस्थित होते.

  या आराखड्यातंर्गत समाविष्ट गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याची कामे करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री महणाले, गावांमधील योजनांची पुनरावृत्ती टाळावीत. योजनेसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत बघावा. पाण्याअभावी काही दिवसानंतर योजना बंद पडतात. परिणामी शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे अंतर जास्त असले, तरी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत घ्यावा. प्रादेशिक योजनांवर जास्तीत जास्त भर द्यावा. गावाचा समोवश करताना तेथील गरज, लोकप्रतिनिधींची मागणी आदींचा विचार करावा. आराखडा अंतिम करून विहीत कालावधीत शासनास सादर करावा. याप्रसंगी तालुकानिहाय नवीन नळयोजना, प्रादेशीक नळयोजना, स्वतंत्र पाणी पुरवचठा योजना, क्षमतावृद्धी करण्यात येणाऱ्या योजना आदींचा आढावा घेण्यात आला.

                                                                                                *********  


  ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ जाणीव जागृती मोहिमेची

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सुरूवात

  • वाहनाला स्टीकर लावून स्वत:पासून सुरू केली जनजागृती  

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत कोविडपासून बचावासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी मास्क नाही, प्रवेश नाही संदेश असणारा स्टीकर प्रकाशित करण्यात आले आहे. सदर स्टीकर आपल्या वाहनाला लावून राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जनजागृती सुरूपात स्वत:पासून केली आहे.

   कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टसिंग या त्रिसुत्रींचा उपयोग करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले आहे.  कोविडच्या काळात सतत विविध माध्यमातून शासन जनजागृती करीत आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम त्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कोविडची जनजागृती करण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: पासून सुरूवात करीत नागरिकांनी स्वत:चे व  कुटूंबाचे रक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

                                                                                                *******

 

मागासवर्गीय शेतकरी, महिलांना 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेसफेड योजनेअंतर्गत सन 2020-21 या वित्तिय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकरी तसेच मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एचपी विद्युत मोटार पंप देण्यात येणार आहे.  मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशीन आणि 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांकरीता मिनी पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी, महिला व दिव्यांग लाभार्थ्यानी अर्ज दि. 23 आक्टोबर 2020 पर्यत संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे सादर करावे.

   सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ मागासवर्गीय शेतकऱ्यांनी, महिलांनी अपंग लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई विजय राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

0000000

कौशल्य विकास कार्यालयात अण्णासाहेब पाटील जयंती साजरी

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : स्थानिक जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय येथे अण्णासाहेब पाटील यांची 87 वी जयंती 25 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे, कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यालयातील श्री. खोडे, श्रीमती वाकोडे,सिद्धेश खेडेकर, सचिन पवार, गणेश गावंडे व महामंडळाच्या योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

   महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 653 बँक कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून 553 लाभार्थ्यांना 3.33 कोटी एवढा व्याज परतावा देण्यात आला आहे. तसेच 4 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 40 लक्ष रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

                                                                                ********

कोरोना अलर्ट : प्राप्त 334 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 143 पॉझिटिव्ह

• 153 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 477 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 143 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 133 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 224 तर रॅपिड टेस्टमधील 110 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 334 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : बोरजवळा 9, गवंढळा 1, घाटपुरी 1,  जनुना 1, शिरसगांव 1,  शेगांव शहर : 18, शेगांव तालुका : जवळा 2, सवर्णा 2, मोताळा तालुका : जहांगीरपूर 2, घुस्सर 5,  पिंपळपाटी 1, आव्हा 1,   मोताळा शहर : 4, नांदुरा शहर : 12, नांदुरा तालुका : माटोडा 1, मलकापूर शहर : 7, मलकापूर तालुका : देवधाबा 1, चिखली शहर : 12, चिखली तालुका : पेठ 1, करतवाडी 1, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, वरवट बकाल 2, लोणार तालुका : पांग्रा डोळे 17, वढव 1,  लोणार शहर : 4, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 6, ताडशिवणी 1, तडेगांव 1, दे. राजा शहर : 1, बुलडाणा शहर : 3,  जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, मूळ पत्ता फर्दापूर ता. सोयगांव जि. औरंगाबाद 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 143 रूग्ण आढळले आहे.त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 45 वर्षीय पुरूष व मूळ पत्ता फर्दापूर ता. सोयगांव जि. औरंगाबाद येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा बुलडाणा स्त्री रूग्णालयात मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 153 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  शेगांव : 19, खामगांव : 44, मलकापूर : 1 , नांदुरा : 15, दे. राजा : 27, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 35, चिखली : 8, लोणार : 3, मेहकर : 1.   

   तसेच आजपर्यंत 29786 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5820 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5820  आहे.  

  आज रोजी 984 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 29786 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6997 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5820 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1089 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 88  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा आज शेवटचा दिवस

·        उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डाचा लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका)दि.29 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत करण्यात आले आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर हा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या  www.rojgar.mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.

        या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.

एन. एम., जी. एन. एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन ऑनलाईन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*****

सीईटी परीक्षेकरीता एसटी सोडणार विशेष बसेस

  • विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

     बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : राज्यात 1 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सीईटी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बसणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 30 सप्टेंबर व 10 ऑक्टोंबर या तारखेस विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने कोविड संसर्ग सुरक्षेसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. संपर्कासाठी आगारांचे क्रमांक पुढीलप्रमाणे बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173.   

 

वृध्द कलावंतानी मानधनासाठी अर्ज सादर करावे ; 10 ऑक्टोंबर अंतिम मुदत

     बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यातील सर्व संबंधित वृध्द कलावंताना शासन निर्णय दि. 7 फेब्रुवारी 2014 च्या अनुसरुन सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृध्द कलांवतांनी लाभ मिळण्यासाठी आपल्या तालुक्याच्या संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यानी आपले परिपुर्ण अर्ज दि. 20 आक्टोबर 2020 पर्यत कार्यालयीन वेळेत संबंधित पंचायत समिती यांचेकडे सादर करावे.

   यापुर्वी योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अर्जातील नमुद अटींची पुर्तता करणाऱ्या आवश्यक त्या मुळ कागदपत्रांच्या छाननी अंतीचा पुरावा कागदपत्रांसह सादर केलेले फक्त वैध आणि योग्य अर्जच स्विकारले जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतीत असलेले अटी व शर्ती वाचुनच अर्ज करावे. मुदतीनंतर येणारे अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृध्द कलांवतांनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन जिल्हा वृध्द कलावंत मानधन सतिीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

खुल्या मिठाई विक्रीवर ‘बेस्ट बिफोर’ तारीख अनिवार्य

  • 1 ऑक्टोंबर पासून नियम लागू

     बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : स्वीटमार्ट व रेस्टॉरेंट मध्ये विविध प्रकारची मिठाई तयार करून विक्री करण्यात येत असते. ही मिठाई तयार करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दुध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर करण्यात येत असतो. त्यामुळे काही कालावधी नंतर त्याचा दर्जा कमी होतो. परिणामी सदर मिठाई किती दिवसापर्यंत खाण्यायोग्य आहे हे ग्राहकांना कळू शकत नाही. मात्र पॅकिंग मिठाईवर उत्पादनाची तारिख व खाण्यायोग्य तारीख नमूद असते. ती खुल्या स्वरूपात विक्री होणाऱ्या मिठाईवर नमूद नसते. तरी 1 ऑक्टोंबर पासून खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या ट्रे किंवा कंटेनरवर ‘बेस्ट बिफोर’ किंवा खाण्यास योग्य तारीख टाकणे अनिवार्य आहे. हा नियम लागू करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे प्राधीकरण, नवी दिल्ली यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजी याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अन्न व्यावसायिक स्वेच्छेने उत्पादनाची तारिख अर्थात डेट ऑफ मॅन्युफॅक्चरींग मिठाई ठेवलेल्या ट्रे, कंटेनरवर टाकू शकतात. तरी जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट, रेस्टॉरेंट व इतर मिठाई विक्रेत्यांनी विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात येणाऱ्या मिठाईच्या ट्रे, कंटेनरवर बेस्ट बिफोर तारीख टाकावी. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध होईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त (अन्न) स.द केदारे यांनी कळविले आहे.

Sunday 27 September 2020

DIO BULDANA NEWS 27.9.2020

 माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम कोरोना विरूद्ध निर्णायक ठरेल

                                                                                   - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

*जिल्हयाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 27:  सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा, मनुष्यबळ यावर कोरोनाविरुद्ध लढा द्यावयाचा आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधेवर ताण येणार नाही, यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा आढावा  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी  दि. 26 सप्टेंबर रोजी व्हीसी द्वारे घेतला आहे.

     यावेळी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून  पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे, जिल्हाधिकरी एस राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ घोलप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे, जिल्हा परिषद उप मुख्याधिकारी राजेश लोखंडे, अति जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ राजेंद्र सांगळे, न प मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी मुख्यमंत्री महोदयांना जिल्ह्यातील मोहिमेची विस्तृत माहिती दिली. तर यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे म्हणाले,  या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून स्थानिक लोकप्रतिनिधी यात आपला सहभाग नोंदवत आहे. या मोहिमे अंतर्गत आम्ही नो मास्क नो एंट्री, नो मास्क नो जर्नी हे उपक्रम राबविणार असून स्थानिक लोक कलावंताच्या माध्यमातून देखील याची जनजागृती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुरु केलेले हे अभियान अतिशय चांगले असून निश्चितच याचा फायदा सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

     यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन नंतर आता तरुण पिढी कामासाठी घराबाहेर पडत आहे. त्यामुळे आता जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. लस केव्हा येणार हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आतातरी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे व हात नियमित धुणे हि त्रिसूत्रीच यावरील उपाय आहे. उपचारांपेक्षा त्यापासून दूर राहणे हे केव्हाही चांगले आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेचा आरोग्याचा डाटा तयार होत आहे. यामाध्यमातून राज्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरावर नियंत्रण मिळवता येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

  या मोहिमेत आशा  वर्कर चांगल्या पद्धतीने काम करत असून त्यांना आपण दररोज १५० रु मानधन देत आहोत. जर हे मानधन आपण ३०० रु केले तर निश्चितच आशा वर्कर यापेक्षाही चांगलं काम करून हे अभियान यशस्वी करतील अशी मागणी ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली.

************"""""****

Friday 25 September 2020

DIO BULDANA NEWS 25.9.2020

 

                                      पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                               ***""""****

                             कोरोना अलर्ट : प्राप्त 695 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 151 पॉझिटिव्ह

• 121 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 846 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 695 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 151 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 142 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 536 तर रॅपिड टेस्टमधील 159 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 695 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगाव शहर: 29, शेगाव तालुका : पहूर जिरा 2, पळशी खुर्द 1, जवळा 1, सिं. राजा शहर : 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : अंबाशी 1 दे. राजा शहर: 1, जळगाव जामोद शहर: 5, जळगाव जामोद तालुका : गाडेगाव 2, बुलडाणा शहर: 9, बुलडाणा तालुका: मासरुळ 1, मलकापूर तालुका: भाडगणी 1, दाताळा 1, मलकापूर शहर: 7, मोताला तालुका : धा. बढे 1, लोणार तालुका : भुमराळा 3, सावरगाव 1, सुलतानपूर 2, मांडवा 6, दहिफळ 2, हनवत खेड 1, लोणार शहर: 11, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 5, गुंज 1, खेडी 5, पान्हेरा 1, पिंपळपाटी 1, खामगाव शहर : 10, खामगाव तालुका : विहिगाव 1, शिरसगाव निळे 3, मांडका 1, अटाळी 2, पिंपळगाव राजा 1, गरडगाव 1, नांदुरा शहर :17, नांदुरा तालुका : वडनेर 2, मालेगांव गोंड 1, मेहकर तालुका : देऊळगाव साकर्षा 4, मूळ पत्ता धोपटेश्र्वर ता. बदनापूर जि. जालना 2, करमाळा जि. उस्मानाबाद 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 151 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान नांदुरा येथील 50 वर्षीय व साखर खेरडा ता. सिंदखेड राजा येथील 52 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

      तसेच आज 121 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : खामगांव : 16, शेगांव : 12, मलकापूर : 11, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 23, चिखली : 5, दे. राजा : 18, लोणार : 3, सिंदखेड राजा: 6, मोताला: 2, मेहकर :25.

   तसेच आजपर्यंत 28448 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5304 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5304 आहे.  

    आज रोजी 1054 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 28448 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6419 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5304 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1032 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 83 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Wednesday 23 September 2020

DIO BULDANA CORONA ALERT 23.9.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 455 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 64 पॉझिटिव्ह

• 87 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 519 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 455 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 341 तर रॅपिड टेस्टमधील 114 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 455 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 10, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, बोरजवळा 1,  गारडगांव 1, घाटपुरी 2, नांदुरा शहर : 9, नांदुरा तालुका :येरळी 2, खुमगांव 1, निमगांव 1, भुईशिंगा 1, माळेगांव गोंड 1,  जळगांव जामोद शहर : 2, चिखली शहर: 2, चिखली तालुका : खंडाळा 1, मेरा खु 1,  मेहकर शहर : 1, बुलडाणा शहर : 3,  मलकापूर तालुका : दाताळा 1, भानगुरा 1, अनुराबाद 1, दे.राजा: 2, मलकापूर शहर : 9, शेगांव तालुका : आडसूळ 3, सवर्णा 1,   शेगांव शहर : 6, संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 64 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 87 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : भुईशिंगा 1, दे. राजा शहर : 2, सिं. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : पिंपळगांव 1, दे. मही 4, गारगुंडी 5,  बुलडाणा शहर : 15, बुलडाणा तालुका : कोलवड 1, साखळी 1,  मेहकर तालुका : डोणगांव 1, पिंप्री माळी 1, शेलगांव दे. 1, उकळी 1, कल्याणा 1,  मोताळा तालुका : धा. बढे 2, माळेगांव 1,  मलकापूर शहर : 14, लोणार शहर : 1, लोणार तालुका : जांभूळ 1, शेगांव शहर : 15, शेगांव तालुका : जानोरी 1, जवळा बु 2, माटरगांव 2, चिखली तालुका : दुधलगांव 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 3, झाडेगांव 1, जामोद 1,  जळगांव जामोद शहर : 2,  मूळ पत्ता चावरा बाजार जि अकोला 1.        

   तसेच आजपर्यंत 27500 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4987 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4987 आहे.  

  आज रोजी 1169 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 27500 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6144 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4987 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1081 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 76  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Tuesday 22 September 2020

DIO BULDANA NEWS 22.9.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 554 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 129 पॉझिटिव्ह

  • 176 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 554 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 115 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 421 तर रॅपिड टेस्टमधील 133 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 554 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 16, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, आंबेटाकळी 3,   नांदुरा तालुका : बेलोरा 1, येरळी 1, जळगांव जामोद शहर : 4, मोताळा तालुका : कोथळी 1, लोणार तालुका: वडगांव 1,चिखली शहर : 8,चिखली तालुका : मेरा खु 1, ब्रम्हपूरी 7, हिमळ 1, शिंदी हराळी 1, अंबाशी 2, पेठ 1, बुलडाणा शहर : 17, मलकापूर तालुका : धरणगांव 1, दाताळा 2, मलकापूर शहर : 12, शेगांव शहर : 2,सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 3, सावखेड नजीक 2, तडेगांव 1, जळगांव जामोद तालुका : गाडेगांव 1, दे. राजा शहर : 6, मेहकर तालुका :हिवरा आश्रम 1, दे. राजा तालुका : गिरोली 1, दे. धनगर 1, निमखेड 1, दे. मही 2, धोत्रा 1, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, धाड 2, देऊळघट 1, मेहकर शहर : 7, नांदुरा शहर : 13, मूळ पत्ता रिसोड जि वाशिम 1, परतवाडा जि. अमरावती 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान 58 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 176 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 49, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 17, अपंग महाविद्यालय 2, शेगांव : 15, दे. राजा : 27, चिखली : 20, मेहकर : 5, मलकापूर : 5, लोणार : 4, संग्रामपूर : 1, जळगांव जामोद : 10, नांदुरा : 8,सिं. राजा : 13.

   तसेच आजपर्यंत 27045 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4900 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4900 आहे. 

  आज रोजी 1202 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 27045 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6080 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4900 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1104 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 76 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे ऑनलाईन आयोजन

  • उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डाचा लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका)दि.22 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकासरोजगार उद्योजता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत करण्यात आले आहे.  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे.

        या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुषमहिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावीबारावीपदवीनर्सिग पदविका, (ए.

एन. एम.जी. एन. एस.) आय. टी. आय. पासपदव्युत्तर पुरुषमहिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन ऑनलाईन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुषमहिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकासरोजगारउद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावाअसे आवाहन सहाय्यक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

******

आयटीआय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीआधी ऑनलाईन दुरूस्ती करण्याची संधी

बुलडाणा,(जिमाका)दि.22 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळण्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये अर्ज केलेल्या मात्र अर्ज करतांना झालेल्या चुकामुळे पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश नाकारलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रवेश फेरीच्या पुर्वी अर्जात ऑनलाईन दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येत आहे. ही सुविधा दि. 20 सप्टेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यत संचालनालया कडून देण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले लॉगीनमध्ये admission activity – Grievances redressal / edit application form मध्ये जावून अर्जात दुरुस्ती करावी अथवा माहितीसाठी जवळच्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत किंवा हेल्पलाईनवर संपर्क करावाअसे आवाहन ऑद्योगीक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य पी. के. खुळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                ****************

Monday 21 September 2020

DIO BULDANA NEWS 21.9.2020

जिल्ह्यात मुसळधार…!

  • सरासरी 29.1 मि.मी पावसाची नोंद
  • सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी, 69.6 मि.मी पाऊस
  • दोन तालुक्यांनी पर्जन्यमानाची गाठली शंभरी

बुलडाणा, (जिमाका) दि.21 :  गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून आले आहे. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पीकांचे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने शेतात पाणी थांबल्यामुळे कापूस पीकावरही विपरीत परीणाम होत आहे. जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त 69.6 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून ही अतिवृष्टी आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 29.1 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मलकापूर तालुक्यात 103.58 टक्के व सिंदखेड राजा तालुक्यात 102 टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यांनी पावसाची शंभरी गाठली पाच तालुके नव्वदीच्या पार आहे.

  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची

बुलडाणा : 27.6 मि.मी (805.6), चिखली : 20.1 (772), दे.राजा : 20.2 (658.6), सिं. राजा : 69.6 (817.9), लोणार : 33.2 (598.2), मेहकर : 42.2 (713.8), खामगांव :28.5 (553.9), शेगांव : 18.1 (550.8), मलकापूर : 20.5 (731), नांदुरा : 27.1  (710), मोताळा : 11.7 (447.4), संग्रामपूर : 55.3 (758.3), जळगांव जामोद : 4.8 (612)

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8729.5 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 671.5 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 447.4 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 62.80 आहे.

                                                                                जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

    जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 56.44 दलघमी (81.42), पेनटाकळी :58.92 दलघमी (98.25), खडकपूर्णा :86.43 दलघमी (92.54), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.75), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 7.89 दलघमी (100) व उतावळी : 19.79 दलघमी (100). 

*****

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावे

- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

बुलडाणा, (जिमाका)  दि. 21: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्ह्यातील महसूल, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी  दिले आहे.

  नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, कृषी व महसूल यंत्रणेने गाव पातळीवरील आपली यंत्रणा सजग करावी.  प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये. त्याचप्रमाणे शेड नेट नुकसान, विहीर खचने, शेत खरडून जाणे, नाल्याचे पाणी शेतात घुसने आदी नुकसानीचा सुद्धा पंचनामा करावा. पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची कार्यवाही करावी. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात, कृषी सहायक यांना नुकसानीची माहिती द्यावी. पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी दिले आहे.

 विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीची माहिती संबधित कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 378.9 मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाची सरासरी 29.1 मिमी. आहे. सर्वात जास्त सिंदखेड राजा तालुक्यात 69.6 मिमी पावसाची नोंद झाली असून ही अतिवृष्टी आहे.

****

तीन लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो !

  • नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
  • खडकपूर्णा, पेनटाकळी प्रकल्पांतून विसर्ग सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.21 : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे.  आज 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील दोन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्यामध्ये सिं. राजा तालुक्यातील तांदुळवाडी व खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी, जनुना या प्रकल्पांचा समावेश आहे.

  खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 वक्रद्वारे 30 से.मी ने उघडण्यात आली असून खडकपूर्णा नदीपात्रात 22 हजार 550 क्युसेक (638 क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पेनटाकळी प्रकल्पाची 9 वक्रद्वारे 30 से. मी उघडून नदीपात्रात 10016 क्युसेक (283.65 क्युमेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. मस या मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून 60 से.मी उंचीवरून 84.22 क्युमेक प्रति सेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदी पात्राशेजारील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

   तांदूळवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने 100 टक्के भरल्यामुळे तांदुळवाडी – महारखेड, हनवतखेड, सावखेड तेजन ता. सिं. राजा या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरला आहे. त्यामुळे पिंप्री गवळी, कोलोरी ता. खामगांव व शेगांव तालुक्यातील जवळा बु, वरूड, गव्हाण या गावांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी दिला आहे.

                                                आतापर्यंत 100 टक्के भरलेले लघुपाटबंधारे प्रकल्प

जिल्ह्यात एकूण 81 लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. यावर्षी असलेल्या संततधार पावसामुळे आतापर्यंत 64 प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले आहे. 100 टक्के भरलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे : शेकापूर, पांग्री केसापूर, झरी, दहीद, मातला, पळसखेड भट, बोधेगांव, करडी, मासरूळ ता. बुलडाणा, अंचरवाडी 2, पिंपळगांव चिलम, अंचरवाडी 1, मेंढगांव,  सावखेड भोई, शिवणी आरमाळ, अंढेरा  ता. दे. राजा, मांडवा, तांदुळवाडी, केशव शिवणी, जागदरी, पिंपरखेड, विद्रुपा, गारखेड  ता. सिं. राजा,  ढोरपगांव, हिवरखेड 1, हिवरखेड 3, टाकळी, पिंप्री गवळी, निमखेड, गणेशपूर, रायधर, जनुना ता. खामगांव, चोरपांग्रा, पिंपळनेर, खंडाळा, तांबोळा, दे. कुंडपाळ, गुंधा, गांधारी, शिवणी जाट, टिटवी, हिरडव  ता. लोणार, चिखली, फत्तेपूर, पाटोदा, कटवडा, कव्हळा, तेल्हारा, ब्राह्मणवाडा, मिसाळवाडी, हराळखेड ता. चिखली, पिं. नाथ ता. मोताळा, कंडारी ता. नांदुरा, घनवटपूर, सावंगी माळी 1, पळशी, कळपविहीर, पांगरखेड, कळमेश्वर  ता. मेहकर, गोराडा, राजुरा ता. जळगांव जामोद, धा. बढे ता. मोताळा,    

********

                                     कोरोना अलर्ट : प्राप्त 434 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 103 पॉझिटिव्ह

• 81 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 434 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 103 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 86 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 297 तर रॅपिड टेस्टमधील 137 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 434 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 30, खामगांव तालुका : अटाळी 3, शिर्ला नेमाने 1,  नांदुरा तालुका : निमगांव 1, जळगांव जामोद शहर : 11, मोताळा शहर : 1,  मोताळा तालुका : खेडी 4, लोणार तालुका : सावरगांव मुंढे 1, मांडवा 2, किन्ही 2, चिखली शहर: 5, चिखली तालुका : मेरा खु 2, रायपूर 1, अमोना 1,   बुलडाणा शहर : 14,  मलकापूर तालुका : वाघोळा 2, झोडगा 1, वडजी 1,  मलकापूर शहर : 3, संग्रामपूर शहर : 1, शेगांव तालुका : झाडेगांव 1, कन्हारखेड 1, आडसूळ 3,   शेगांव शहर : 8, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मोहाडी 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 103 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जुना जालना रोड, दे. राजा येथील 76 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 81 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 18, बुलडाणा तालुका : सागवण 1, खुपगांव 1, मेाहखेड 1, मासरूळ 1,दुधा 1,  चांडोळ 1, डोमरूळ 1,   मोताळा तालुका : आव्हा 1, टाकळी 1, टाकरखेड 1, माकोडी 1,  नांदुरा तालुका : निमगांव 1, वडनेर 1,  नांदुरा शहर : 10, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : गारगुंडी 4, दे. मही 1,  सावरगांव जहागीर 1, लोणार तालुका : जांभूळ 1, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : कुंड 1,  खामगांव शहर : 2, चिखली तालुका : खंडाळा 1, शिरपूर 1, दुधलगांव 2,  चिखली शहर : 3, मेहकर तालुका : सावत्रा 2, हिवरा गार्डी 4, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 7, पळशी घाट 1, मडाखेड 1,  जळगांव जामोद शहर : 3.    

   तसेच आजपर्यंत 26419 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4726 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4726 आहे.  

  आज रोजी 1579 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 26419 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5951 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4726 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1150 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 75 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******