तक्रारी निकाली काढून नागरिकांना न्याय द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 




* जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 8 तक्रारी दाखल

     बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम असून जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये  नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात. या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रारी निकाली काढून नागरीकांना न्याय द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. 

             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन 5 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे विभागप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये एकूण 8 तक्रारी प्राप्त झाल्या असून सामान्य तक्रारींमध्ये समाविष्ट करण्यात आल्यात. या लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या