सुधारीत बातमी सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
बुलढाणा, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,
गाऱ्हाणी व अडचणींचे निरसन करण्यासाठी सोमवार दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1
वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे.
अर्जदारांनी अर्ज करतांना स्विकृतीचे निकष
: अर्ज विहित नमुन्यात केलेला असावा, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी,
चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमून्यात 15 दिवस आधी 2
प्रतीत पाठविणे आवश्यक राहील, तालुका लोकशाही दिनानंतर एका माहिन्यांने जिल्हाधिकारी
लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन माहिन्यांनी विभागीय
आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही
दिनात अर्ज सादर करता येईल.
‘हे’ अर्ज स्विकारले जाणार नाहीत : न्याय
प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल्स, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहीत नमून्यात नसणारे
व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात
येणार आहे अशा प्रकरणांत पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तीक
स्वरुपाची नसेल तर, वरील प्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्विकृत करता येऊ शकत नाहीत
असे अर्ज सामान्य तक्रार या स्वरुपात संबंधित विभागांकडे आवश्यक कारवाईसाठी पाठविण्यात
येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी दिली आहे.
महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने फेब्रुवारी
महिन्याचा महिला लोकशाही दिन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे.
००००
Comments
Post a Comment