जिल्ह्यातील 5 लाख विद्यार्थी करणार देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन. Ø प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम, 2467 शाळांचा सहभाग

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये  राष्ट्रीय भावना, शिस्त, आरोग्य जागृती आणि देशभक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनी आहे त्यानुसार  शुभमुहूर्तावर देशभक्ती गीतांवर आधारित कवायतीचे संचलन करण्याचा उपक्रम राबवण्याबाबतचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले असून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या 2467 शाळांमधील पाच लाख विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी कवायत आणि संचलन करणार आहेत.

 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत संचलन होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे कवायत संचलन केले होते. त्याच धर्तीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पुन्हा राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्र प्रथम ही भावना रुजावी आणि त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  प्रत्येक शाळेत ही कवायत होणार असून तालुक्याच्या ठिकाणी एक तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना संबंधित गावातील व शाळेतील सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शालेय भौतिक सुविधा विकसन समिती व गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.

            तालुकास्तरीय कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मैदानावर सजावट करण्यात येणार आहे.

जिल्ह्याचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदान बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम वाढीस लागावे, राष्ट्र प्रथम ही भावना निर्माण व्हावी, शालेय शिस्त, आरोग्य, राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागावी म्हणून हा कार्यक्रम अत्यंत न भूतो न भविष्यती अशा प्रकारे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी ग्रामस्थांनी शिक्षण प्रेमी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन बुलढाणा जिल्हा प्रशासनामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केलेले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या