Thursday 26 November 2020

DIO BULDANA NEWS 26.11.2020

 

 जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

  • 7 डिसेंबर रोजी तालुकास्तरावर, तर 10 डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर आयोजन

  बुलडाणा,(जिमाका) दि.26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.

  तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे. 

********

कोरोना अलर्ट : प्राप्त 1413 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 43 पॉझिटिव्ह

       18 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1456 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1413 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 36 व रॅपीड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1299 तर रॅपिड टेस्टमधील 114 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1413 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 4, दे.राजा तालुका : गांगलगांव 1, उमरखेड 1,  मोताळा शहर : 2, बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : माळविहीर 1, कोलवड 1,  सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, सावखेड तेजन 1, खामगांव तालुका : पाळा 1, राहुड 2, अंत्रज 1, खामगांव शहर : 5, चिखली शहर : 8, जळगांव जामोद तालुका : मडाखेड 1, आसलगांव 1,  जळगांव जामोद शहर : 4, मलकापूर तालुका : बेलाड 1,  मूळ पत्ता रामदास पेठ, अकोला 1    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 18 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा :  अपंग विद्यालय 8, दे. राजा : 3, नांदुरा : 1, लोणार : 5.   

     तसेच आजपर्यंत 70773 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10511 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10511 आहे. 

  तसेच 3923 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 70773 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10974 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10511 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 329 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

******


जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

बुलडाणा, दि. 26 : भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी 71 वर्ष पूर्ण झाले आहे.

  जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी  जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

Wednesday 25 November 2020

DIO BULDANA NEWS 25.11.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1783 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह

•       53 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1801 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1783 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1651 तर रॅपिड टेस्टमधील 132 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1783 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, चिखली तालुका : मेरा खु 1, दहीगांव 1,  सावखेड बु 1, धोत्रा भणगोजी 1,  चिखली शहर : 2, खामगांव तालुका : घाणेगांव 1, खामगांव शहर : 2, सिं. राजा शहर : 1, दे. राजा शहर : 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 53 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 1, अपंग विद्यालय 11, चिखली : 18, शेगांव : 2, मेहकर : 4, मोताळा : 1,  लोणार : 1, खामगांव : 3,  दे. राजा : 9, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 2,   

     तसेच आजपर्यंत 69360 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10493 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10493 आहे. 

  तसेच 4392 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 69360 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10931 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10493 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 304 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

******

युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाचे अर्थसहाय्य

  • बार्टीतर्फे पूर्व तयारी व प्रशिक्षणासाठी 50 हजाराचे अर्थसहाय्य
  • 8 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे

             बुलडाणा,(जिमाका) दि.25: या वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करीत आहेत, अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एक रकमी 50 हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संसथा अर्थात बार्टीमार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत. त्यांनी बार्टीच्या www.barti.in या संकेतस्थळावर भेट देवून पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे  जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

               डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व प्रशिक्षणाकरिता दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्वपरक्षा 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली व परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोबर रोजी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी भा. ऊ खरे यांनी कळविले आहे.

*********


शासकीय मुलांचे बालगृहातील अमजद खान राजा खान

नामक बालकाच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा

  • शासकीय मुलांचे बालगृह अधिक्षकांचे आवाहन

   बुलडाणा,(जिमाका) दि.25: शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, बुलडाणा या संस्थेत अमजद खान राजा खान नामक बालक 12 डिसेंबर 2015 पासून बाल कल्याण समितीच्या आदेशाने दाखल आहे. बालकाचे काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बालकाच्या आई- वडीलांनी किंवा नातेवाईकांनी पुढील पाच दिवसाच्या आत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, हाजी मलंग दर्ग्याच्या पाठीमागे, चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच 9960338000 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. अन्यथा बाल कल्याण समिती, बुलडाणा काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पुर्नवसनासाठी योग्य ती कार्यवाही करणार आहे, असे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह / बालगृह अधिक्षक यांनी कळविले आहे.

                                                                        **********  

      गुजरात, गोवा, राजस्थान व दिल्ली येथून जिल्ह्यात येणाऱ्यांना कोविड निगेटीव्ह रिपोर्ट अनिवार्य

   बुलडाणा,(जिमाका) दि.25: राज्य शासनाच्या 23 नोव्हेंबर 2020 च्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात गुजरात, राजस्थान, गोवा व दिल्ली राज्यातून विमान, रेल्वे व रस्ता मार्गाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातही या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी आरटी पीसीआर कोविड चाचणी केल्याचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.  रेल्वेद्वारे या राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या 96 तासांच्या आत आरटी पीसीआर करीता नमुने घेणे आवश्यक आहे.

    ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चा निगेटीव्ह कोविड रिपोर्ट नसेल, अशा प्रवाशांची स्क्रिनींग करून तापमान मोजण्यात यावे, याबाबतची जबाबदारी रेल्वे विभागाची असणार आहे. लक्षणे नसलेल्या प्रवाशांनी घरी जाण्याची मुभा असणार आहे. लक्षणे असलेल्या प्रवाशांचे विलगीकरण करून त्यांचे अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास अशा प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहणार आहे. रेल्वे व रस्ता मार्गाने येणारे जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा बाधीत आढळून आल्यास अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा खर्च प्रवाशांकडून वसूल करण्यात येणार आहे.

    तसेच रस्ता मार्गाने या राज्यांमधून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची जिल्हा हद्दीवर स्क्रिनींग करून तापमान मोजण्यात येणार आहे. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश दिल्या जाणार असून लक्षणे असलेल्या प्रवाशांसाठी माघारी जाण्याचा पर्याय असणार आहे. लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास अशा प्रवाशांना जिल्ह्यात प्रवास करण्याची मुभा असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहीता  1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 मधील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                                                **********

Tuesday 24 November 2020

DIO BULDANA NEWS 24.11.2020

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 775 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह

       52 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 820 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 775 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 646 तर रॅपिड टेस्टमधील 129 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 775 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 6, चिखली तालुका : भोकरवडी 1, धोडप 1, मेरा बु 2, चिखली शहर : 1, नांदुरा तालुका : माळेगांव गोंड 3, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 2, जळगांव जामोद शहर : 3,  बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, कोलवड 2,  दे. राजा शहर : 1,  दे. राजा तालुका : अंभोरा 1, नागणगांव 1, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, मेंडगांव 1, सावखेड तेजन 1,  लोणार तालुका : अंजनी खु 2, चिंचोली सांगळे 1, चोरपांग्रा 1, किनगांव जट्टू 1, हिरडव 1,  लोणार शहर : 1, शेगांव शहर : 1, मेहकर तालुका : नायगांव दत्तापूर 1, मूळ पत्ता कारंजा लाड जि. वाशिम 1, जाहरलाल नगर, अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 52 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 8, दे. राजा : 2, बुलडाणा : 2, अपंग विद्यालय 4, नांदुरा : 6, लोणार : 1, खामगांव : 10, मोताळा : 9, शेगांव : 2, मेहकर : 2, जळगांव जामोद : 6.  

     तसेच आजपर्यंत 67577 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10440 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10440 आहे. 

  तसेच 5241 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 67577 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10913 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10440 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 339 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

******

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना युपीएससी तयारीसाठी आर्थिक सहाय्य

  • दरमहा 12 हजार विद्यावेतन व 14 हजार पुस्तक खरेदीसाठी मिळणार

  बुलडाणा,(जिमाका) दि.24: केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना यावर्षी सुरु करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत युपीएससी परीक्षेच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 12 हजार रुपये विद्यावेतन व 14 हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.

    या योजनेअंतर्गत युपीएससी पुर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या 25 अशा अनुसूचित जमातीमधील एकूण 50 उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन 2020-21 पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करुन थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा,  या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे  योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, अशा विश्वास आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे.   इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावरुन अर्ज करता येणार आहे,  असे सहा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                ********

 

 

Monday 23 November 2020

DIO BULDANA NEWS 23.11.2020

 खडकपूर्णा प्रकल्पातून पहिल्या पाळीसाठी आज पाणी सोडणार

•       लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज सादर करावे

  बुलडाणा,(जिमाका) दि.23 : यावर्षी खडकपूर्णा प्रकल्प ता. दे. राजा मध्ये 100 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता पाणी पाळी देण्याचे नियोजन आहे. खडकपूर्णा धरणाचे बुडीत क्षेत्रालगतचे लाभक्षेत्र, खडकपूर्णा नदीपात्रातील डाव्या व उजव्या तिरावरील लाभक्षेत्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचा उपसा करून व नदी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना, डाव्या व उजव्या मुख्य कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मालकी हक्काची शेती थेट विमोचकाखाली व कालव्यावरून उपसाद्वारे पिकविता येणार आहे. विधान परिषद निवडणूकीची आचार संहीता असल्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होवू शकली नाही. तरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या सूचनेनुसार  पाण्याची एक पाळी 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देण्यासाठी कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार खडकपूर्णा प्रकल्पातील पहिल्या पाळीसाठी 25 नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार आहे.

  तरी लाभधारक शेतकरी, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष तथा संबंधीतांनी त्यांचे पाणी मागणी अर्ज नमुना 7 मध्ये सात बारासह संबंधीत पाणी वापर संस्था यांच्याकडे करावे. पाणी वापर संस्थेचे अध्यक्षांनी सदरची पाणी मागणी अर्ज संबंधीत उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प यांचेकडे द्यावेत. पाणीपट्टी शासकीय नियमानुसार व जलसंपदा विभागाचे प्रचलीत दराने आकारण्यात येणार आहे. ज्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था हस्तांतरीत झालेल्या नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधीत उपविभागात अर्ज करावे.

   उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 1 जोड कालवा, लघुकालवा क्रमांक 1 ते 7 चे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 वरील जोड कालवा तसेच थेट लघुकालवा क्रमांक 1 व 2 वाकी वितरीका व त्यावरील लघुकालवा क्रमांक 1 ते 5 चे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 3 वरील जोड कालवा व  शाखा कालवा कि.मी 1 ते 11 व त्यावरील लघुकालवा क्रमांक 1 ते 6 व अंत्यवितरीका आणि त्यावरील लघु कालवे यांचे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 4 वरील कोनड, येवता व गांगलगाव  वितरीकेचे लाभक्षेत्र (उपसाद्वारे), उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 4 वरील मुय कालवा व त्यावरील लघुकालवा क्रमांक 1 व 4, रोहडा लघु कालवा क्रमांक 1 ते 5, भरोसा व मुरादपूर लघु कालव्याचे लाभक्षेत्र या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा कालवे उपविभाग क्र. 2 चिखली येथे अर्ज करावे. 

   तसेच दगडवाडी उपसा सिंचन योजना मुख्य कालवा व डाव्या मुख कालव्यावरील अमोना अंत्य लघु कालवावरील लाभक्षेत्र या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, पेनटाकळी प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र 4 चिखली येथे अर्ज करावेत. डाव्या मुख्य कालव्यावरील नारायणखेड उपसा सिंचन योजना वरील लाभक्षेत्र, उजव्या मुख्य कालव्यावरील निमगांव वायाळ उपसा सिंचन योजनेवरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प पुनर्वसन उपविभाग क्र. 4 दे. मही येथे अर्ज सादर करावेत. खडकपूर्णा जलाशयाच्या डाव्या व उजव्या तिरावरील लाभक्षेत्र उपसा सिंचन योजना टप्पा क्र 4 वरील  कोलारा वितरीकेवरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग दे. मही येथे अर्ज सादर करावेत असे कार्यकारी अभियंता प्र. पु संत यांनी कळविले आहे.

******

 

 


गुलाबी बोंडअळीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवावे

-    जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • बोंड अळी उपाय योजना नियंत्रण बैठक

  बुलडाणा,(जिमाका) दि.23: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बोंड अळी प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे.  कृ‍षि विभाग विविध उपाय योजनांच्या माध्यमातून बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी सदर उपाय योजनांचा प्रभावी वापर करीत बोंड अळीवर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बोंड अळी नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये आदी उपस्थित होते.

     यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी सादरीकरण केले.  ते म्हणाले, बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी फवारणी करावी. दिवसा फवाणी ही प्रभावी ठरत नाही. तसेच पेस्टीसाईड हे गॅस श्रेणीतील वापरावे. बोंड अळी नियंत्रणासाठी कामगंध व प्रकाश सापळे लावण्यात यावेत. जिनींग परीसरातही किमान 20 ते 25 कामगंध सापळे लावावेत. जेणेकरून नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होवून मरण पावतील.  बोंड  अळी नियंत्रण जनजागृती करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

   यामध्ये शेती शाळा घेण्यात येणार असून ग्राम स्तरावरील कृषि यंत्रणेमार्फत जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना सायंकाळी फवारणीचे प्रात्याक्षिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 174 गावांमध्ये बोंड अळीमुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. तसेच आर्थिक नुकसानीची पातळी सर्वात जास्त नोव्हेंबर महिन्यात 133 गावांनी ओलांडली.  तसेच जिल्ह्यात 31 जिनींग मील मध्ये एकूण 145 कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. तसेच 633219 शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे बोंडअळी उपाय योजनांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी कृषि विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिनींग मील मालक, शेतकरी आदी उपस्थित होते.

********

                      कोरोना अलर्ट : प्राप्त 1474 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 33 पॉझिटिव्ह

•       125 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.23: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1507 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1474 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1438 तर रॅपिड टेस्टमधील 36 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1474 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 4,  बुलडाणा शहर : 2,  नांदुरा शहर : नांदुरा तालुका: बेलोरा 1, तांदुळवाडी 4,  मोताळा शहर: 1, सिंदखेड राजा तालुका: दुसरबीड 1,  दे. राजा तालुका: असोला जहागीर 5,  मलकापूर शहर : 3,  बुलडाणा तालुका : सागवण 1, पिं सराई 1, मेहकर तालुका: जानेफळ 1, डोणगाव 4, चिखली तालुका: इसोली 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 125 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 24, शेगांव : 5,  बुलडाणा : 3, अपंग विद्यालय 7,  खामगांव : 1, नांदुरा :6,  सिं. राजा : 11, मोताळा  : 5, मलकापूर :3, संग्रामपुर : 2, दे. राजा : 1, मेहकर :7, लोणार : 8, जळगांव जामोद : 34.

     तसेच आजपर्यंत 66802 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10388 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10388 आहे. 

  तसेच 5197 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 66802 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10868 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10388 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 346 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

******

Sunday 22 November 2020

DIO BULDANA NEWS 22.11.2020

 मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी छायाचित्र उपलब्ध करून द्यावे

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदार सादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, मात्र छायाचित्र उपलब्ध नाही, अशा  मतदारांनी आपले छायाचित्र आपल्या मतदार यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे उपलब्ध करून द्यावे.       

     विहीत मुदतीत छायाचित्र उपलब्ध करून न दिल्यास मतदान नोंदणी अधिनियम 1960 मधील प्रचलीत तरतुदींनुसार संबंधीत मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी मतदारांचे नाव मतदार यादीमधून कमी करण्याची कार्यवाही करणार आहेत. तरी मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या छायाचित्रे नसलेल्या मतदारांनी त्यांची छायाचित्रे  त्यांच्या मतदार यादी भागांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे यांनी केले आहे.

**********

मतदार यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करून घ्यावी

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत नाव नोंदवावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदार सादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याबाबत मतदारांनी खात्री करून घ्यावी.     

     प्रारूप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आली नाही तसेच दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पूर्ण होईल, अशा मतदारांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत मतदार नोंदणी करून घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे यांनी केले आहे.

*************

       प्रतिबंधीत क्षेत्र वगळून जिल्ह्यात 9 वी ते 12 वी पर्यंतच्या आजपासून शाळा सुरू

पालकांची लेखी संमती आवश्यक

शाळेत कोरोना संसर्ग सुरक्षा सुविधा असाव्यात

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राकरीता इयत्ता 9 ते 12 वी चे सर्व शासकीय, खाजगी शाळांचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून पालकांची लेखी संमती घ्यावी. संमती घेवूनच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन करायचे आहे.

    विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. या कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. ज्या कर्मचाऱ्यांची चाचणी सकारात्मक असेल, त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणीत केल्यानंतरच शाळेत उपस्थित रहावे. पुर्ण उपस्थिती बाबातची पारितोषिके शाळा व्यवस्थापन समितीने बंद करावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पुर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून आहे. परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व तत्सम कार्यक्रम तसेच शाळेत गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी राहील. शिक्षकांनी पालकांच्या बैठका ऑनलाईन घ्याव्यात.

 शाळेत हात धुण्याची व्यवस्था, थर्मो मीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक, साबण व पाण्याची सुविधा सुनिश्चित करावी. शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण केलेले असावे. ज्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर सुरू आहे, त्या शाळा किंवा वसतिगृह स्थानिक प्रशासनाने स्थलांतरीत करण्याची कारवाई करावी. संपूर्ण शाळा, वसतिगृह निर्जंतुकीकरण करावे. त्यानंतरच शाळा किंवा वसतिगृह सुरू करावे. मात्र सदर शाळा किंवा वसतिगृहातील को‍विड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर दुसरीकडे हलविणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परीसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी. वर्गखोली किंवा स्टाफ रूममधील बैठक व्यवस्थेत सोशल डिसटसिंगच्या नियमांचे पालन करावे. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. शाळेत दर्शनी भागावर कोविड संसर्ग जनजागृती करणारे, सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर आदींचे फलक लावावे.

    थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शारिरीक अंतराच्या खुणा, चिन्हे यांची शाळा परीसरात आखणी करावी. शारिरीक अंतर राखण्यसाठी येण्या व जाण्याचे स्वतंत्र मार्गांच्या बाणाच्या खुणा असाव्यात. उच्च धोक्याचे पातळीमध्ये असलेले वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध उपचार घेत आहेत. त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात येवू नये.  सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता, आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलमांनुसार शिक्षेस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.


***********

                        जिल्ह्यातील 5900 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले

जिल्ह्यात 9 ते 12 शिकविणारे व कर्मचारी 6050

कमी वेळेत व्यवस्थित नियोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : जिल्ह्यातील 98 टक्के  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी सादर करण्यात आले आहे. इयत्ता 9 ते 12 वी च्या मुलांच्या  शाळा सुरु करण्याचे शासनाचे आदेश असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यात 9 वी  ते 12 वी ला शिकविणारे शिक्षक व शाळेत काम करणारे  शिक्षकेतर कर्मचारी ह्यांची एकूण  संख्या 6050 आहे. 

 जिल्ह्यात अत्यंत  कमी वेळेत  व्यवस्थित नियोजन करुन  जिल्हाभरात तीन दिवसात  18   ते 20  नोव्हेंबर दरम्यान 5900 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने गोळा करुन प्रयोगशाळेला पाठवले गेले.   ह्याच वेळी नियमीत चाचणी मधील इतर लोकांचेही 1500 नमुने गोळा केले गेले व तेही प्रयोशाळेमध्ये पाठवले गेले. हे तीन चार दिवस तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ह्यांनी उत्कृष्ट काम केले. तसेच जिल्हाभरातील शिक्षकांनीही त्यांना तितकाच चांगला प्रतिसाद  दिला. यासाठी जिल्हास्तरावरुन प्रत्येक तालुक्याला नियोजन करुन देण्यात आले.तालुक्यातील शाळा त्या त्या पीएचसीला, ग्रामीण रुग्णालयाला नेमुन देण्यात आली. त्यातही तारीख व वेळ निश्चित करुन दिल्याने  कुठेही गर्दी वा गोंधळ झाला नाही. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने हे नमुने गोळा झाले.  बुलडाणा येथील स्वॅब नमुने  तपासणी  प्रयोशाळेची क्षमता ही दिवसाकाठी 1200 च्या आसपास असल्याने ह्या प्रयोशाळेवर सद्यस्थितीत एकदम लोड आलेला आहे. तरीही तेथील डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग हा अतिरिक्त वेळेतही नमुन्यांची तपासणीचे काम करत असुन नियमित क्षमतेपेक्षा जास्त अहवाल तयार  करत आहे. आतापर्यंत 3500 अहवाल तयार झाले आहेत.

  सकारात्मक आलेल्या शिक्षकांची संख्या खुपच कमी आहे ही समाधानाची बाब आहे. सकारातम्क शिक्षकांना शाळेत न जाता उपचार घ्यावे लागतील. नंतर पुढे विहित कालावधी गेल्यानंतर  वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्यांना शाळेत रुजु होता येईल. ज्या शिक्षकांचे अहवाल नकारात्मक येतील ते मात्र सोमवारी शाळेत हजर होतील. असे असले तरीही सोमवार पर्यंत 100% शाळांचे  अहवाल  मिळणे शक्य नसल्याने सर्व शाळा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी सुरु होणार नाहीत. जेथे अशा अडचणी आहेत तेथे शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबतही निर्देश मिळालेले आहेत. म्हणून ज्या शाळांच्या शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले त्या सोमवारी उघडतील. तसेच ज्या शाळांमधील शिक्षकांचे  अहवाल प्राप्त होणार नाहीत, त्यांना शासनाच्या निर्देशानुसार शाळेत जाण्यास परवानगी नसल्याने  त्या शाळा एक किंवा दोन दिवस उशीरा उघडतील.  शासनाने अत्यंत सुस्पष्ट अशा सविस्तर मार्गदर्शक सुचना 10 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकात नमुद केलेल्या असुन  सदर परिपत्रकातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी  यांनीही जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा सविस्तर आदेश काढलेला आहे. त्यामुळे एकंदरीत  ह्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश शाळा उघडतील व सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करतील व विद्यार्थ्यांचे भविष्य पुनश्च एकदा घडायला सुरुवात होईल ह्यात शंका नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.


**************

Friday 20 November 2020

DIO BULDANA NEWS 20.11.2020

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनाळा यात्रा रद्द

  • मंदीराच्या आतील कार्यक्रमांना 10 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी

  बुलडाणा,(जिमाका) दि.20: सोनाळा ता. संग्रामपूर येथे दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला संत सोनाजी महाराज यांची यात्रा आयोजित करण्यात येते.  या यात्रा महोत्सवात पालखी महोत्सव, संत सोनाजी महाराज यांचा रथ उत्सव, दहीहंडी कार्यक्रम, महाप्रसाद, विविध वस्तुंची दुकाने, आनंद मेळा आदी कार्यक्रमांचा समावेश असतो. कार्तिक पौर्णिमेला विविध गावांमधून येणाऱ्या पालख्या रात्री 8 वाजेसुमारास सोनाजी महाराज यांचे मंदीरात प्रवेश करतात. रात्री 11 वाजता सोनाजी महाराज यांची रथ मिरवणूक गावामधून काढण्यात येते. मात्र सद्यस्थितीत सोनाळा, टुनकी व बावनबीर या गावांमध्ये कोविड 19 संसर्गग्रस्त रूग्ण आहेत. वेगवेगळ्या गावांमधून 1 लाख लोकांची गर्दी यात्रेनिमित्ताने जमल्यास कोविड आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 4 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु नये यादृष्टीने 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत सोनाळा ता. संग्रामपूर येथील संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने मंदीराच्या आतील कार्यक्रमांना जास्तीत जास्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी  दिली आहे. मात्र यात्रेदरम्यान पालखी महोत्सव, रथ उत्सव, दहीहंडी, महाप्रसाद, आनंद मेळावा व मोठ्या  प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी  दिलेली नाही.

  मंदीराच्या आत जास्तीत जास्त 10 भाविक उपस्थित राहतील, त्या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तींची थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. मंदीराचा परीसर वारंवार निर्जंतुकीकरण करावा. पुजारी व संस्थानचे कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. मंदीर परीसरात हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. शासनाच्या निर्देशांचे पालन कारावे. मंदीर परीसरात सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 1140 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 36 पॉझिटिव्ह

•       40 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.20: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1176 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1140 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 885 तर रॅपिड टेस्टमधील 255 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1140 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 3, सिं. राजा शहर : 2,  बुलडाणा शहर : 2,  नांदुरा शहर : 1,  दे. राजा शहर : 3, मोताळा शहर: 2,  जळगांव जामोद शहर : 4, लोणार शहर : 1,  मलकापूर शहर : 2, शेगांव शहर : 5, जळगांव जामोद तालुका: आसलगाव 1, भेंडवळ 1, खेर्डा बु. 1, नांदुरा तालुका: माळेगाव गोंड 3, मेहकर शहर: 1, मेहकर तालुका: भोसा 1, कळमेश्वर 1, चायगांव 1, मूळ पत्ता वाटेगाव जि. अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 36 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अपंग  विद्यालय, बुलडाणा येथे शेलापूर ता. मोताळा येथील 63 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 40 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  मलकापूर : 3, चिखली : 2, शेगांव : 4,  बुलडाणा : 1, खामगांव : 5, नांदुरा :4, मेहकर : 1, सिं. राजा : 6, जळगांव जामोद : 8, दे. राजा : 6.

     तसेच आजपर्यंत 63030 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10148 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10148 आहे. 

  तसेच 5127 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 63030 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10698 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10148 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 416 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

***

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावे

  • पाटबंधारे विभागाचे आवाहन
  • रब्बी हंगाम 2020-21

  बुलडाणा,(जिमाका) दि.20: जिल्ह्यात सिंचन व्यवसथापनाकरीता 417.34 दलघमी म्हणजे 93.62 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. बिगर सिंचन आरक्षण, बाष्पीभवन व इतर व्यय वगळून उर्वरित पाणी साठ्यावर रब्बी हंगाम 2020-21 चे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर व काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2020 पूर्वी सिंचन शाखा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.  

  शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणीपट्टीची थकबाकी भरून अर्ज शाखा कार्यालयास द्यावे. अर्ज नमुना 7 मध्ये असावयास पाहिजे, अर्जाचे कोरे नमुने शाखाधिकारी कार्यालयास मोफत उपलब्ध आहेत. मागणी अर्ज करणारा स्वत: शेतीचा मालक असावा. मुळ अगर वहीदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जाबरोबर मालकाचे संमतीपत्र जोडावे. पाणी अर्जावर मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे. मागणी अर्जाची पुर्तता करण्याकरीता कालवा निरीक्षक / बिट प्रमुख यांचे सहकार्य घ्यावे. पुर्ण स्वरूपात भरलेला अर्ज दाखल करावा. पाणी पुरवठा रब्बी हंगाम 31 मार्च 2021 पर्यंत राहणार असून 1 एप्रिल 2021 नंतर उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे.  

    बिनअर्ज बिगरपाळी पाणी घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. मंजूर अर्जात नोंदविलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त ओलीत केल्यास जास्तीच्या दराने आकारणी होईल. अनधिकृत पाणी वापराकरीता दंडनिहाय आकारणी होईल. पाणी बंद केल्यास नुकसानी करीता शेतकरी स्वतऱ्‍ जबाबदार राहतील. पाण्याची मागणी मित्र पिकांसाठी करू नये. मिश्र पिकांवर जास्त दर असलेल्या पिकाची आकरणी होईल. शेतातील पाटचाऱ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दुरूस्त करून पाणी पुरवठ्याच्या स्थितीत ठेवाव्यात. पेरणीच्या वेळा पाण्याच्या पाळीप्रमाणे साधाव्यात. जेणेकरून प्रत्येक पाळीमध्ये ठराविक दिवसांनी पाणी मिळेल. रात्र पाळीत दिलेल्या वेळात ओलीत करावे. पाण्याचा नास करू नये अन्यथा उचित कारवाई करण्यात येईल.

    पिकांचे क्षेत्र व विहीरीवरील ओलीताचे क्षेत्र सुरू ठेवावे. नियमानुसार मोटेचा दांड व पाटचारी यामध्ये कमीत कमी 8 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे शेतात पाणी पोहोचू शकेल याची खात्री करावी. त्यानुसार मागणीचे क्षेत्र नोंदवावे, अन्यथा यासंबधीची कोणतीही तक्रार ऐकल्या जाणार नाही. मागणी क्षेत्र मंजूर झाल्यानंतर मंजुरीचे क्षेत्रात पाणी देण्यात येईल. जर शेतकऱ्यांनी मंजुरीपेक्षा कमी क्षेत्रात पाणी घेतले तर मंजुर असलेल्या क्षेत्रावर पोकळ आकारणी होऊ शकते. कारण मंजूर क्षेत्रासाठी पाणी सोडण्यात येते. याबाबत  कास्तकारांनी नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी प्रगटनाद्वारे कळविले आहे.

                                                            **********

 

Thursday 19 November 2020

DIO BULDANA NEWS 19.11.2020

 शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

  • मतदान प्रक्रिया जाणून घेण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूकीचा कार्यकम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत पात्र शिक्षक मतदारांनी मतदान करताना काळजी घ्यावी. मतदानाची प्रक्रिया  जाणून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भिकाजी घुगे यांनी केले आहे.

शिक्षक मतदारांनी असे करावे मतदान

केवळ आणि कवेळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेनच मत नोंदवावे. इतर कोणताही  पेन, पेन्सिल, बॉलपेनचा  वापरू नये. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे.  निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 आदीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावा समोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.  पसंतीक्रम केवळ 1, 2, 3 अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते  एक, दोन व तीन अशा शब्दांमध्ये नोंदविण्यात येवू नयेत. पसंतीक्रम नोंदवितांना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात जसे I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1, 2, 3 या स्वरूपात नोंदवावे. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवतांना टिकमार्क बरोबरची खुण किंवा क्रॉसमार्क अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

                                                                        ******

 

 


शिक्षक मतदार संघ निवडणूकीत कोविड संसर्ग सुरक्षा उपायांचा अवलंब करावा

-         विभागीय आयुक्त पियुष सिंग

·        पोलींग एजंटची कोविड तपासणी आवश्यक

·        पोलींग बुथवरील कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दोन दिवस आधी कोविड चाचणी करावी

·        प्रचार सभांना परवानगी नाही

 बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून, दि.  3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीला कोविड साथरोगाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कोविड संसर्ग सुरक्षा उपाय योजनांचा अवलंब करून निवडणूक यशस्वीरित्या पार पाडावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी दिल्या आहेत.

     विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे उपस्थित होते. 

            निवडणूकीसाठी आदर्श आचार संहीतेचे पालन करण्याचे सूचीत करीत विभागीय आयुक्त श्री. सिंग म्हणाले, मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने आपली चमू ठेवावी. प्रत्येक मतदाराचे तापमान व ऑक्सीजन स्तर तपासण्यात यावे.  याठिकाणी लक्षणे असलेले रूग्ण आढळून आल्यास त्यांना विलगीकरण करावे. तसेच कोविड बाधीत मतदार, विलगीकरणात असलेले मतदारांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी पोलींग एजंट नेमताना त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी. ही चाचणी मतदानाच्या दोन ते तीन दिवस आधी करावी. पोलींग एजंट हा शासकीय, निमशासकीय कर्मचारी नसावा, कुठल्या संस्थेचा पदाधिकारी नसावा. तो अमरावती शिक्षक मतदार संघातील रहीवासी असायला पाहिजे.  कोविडची बाधा नसलेले एजंटच नेमावे. मतदारांमध्ये सोशल डिस्टसिंग राहील, याबाबत व्यवस्था करावी.  तसेच पोलींग बुथवर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा कोविड चाचणी करावी. मतदान केंद्राबाहेर कोविड जनजागृती, मतदान कसे करावे याबाबत फ्लेक्स लावण्यात यावेत. मतदान झाल्यानंतर मतदान कक्ष निर्जंतुकीकरण करून घ्यावेत.

   ते पुढे म्हणाले, या निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सभांना परवानगी नाही. सभेसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज आल्यास त्यांना परवानगी देवू नये. आचार संहीता भंगाच्या तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हील चेअर व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

                                                            ********************

शाळांमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरची दुसरीकडे व्यवस्था करावी

-          विभागीय आयुक्त पियुष सिंग

·        कोविड संसर्ग परिस्थिती आढावा बैठक

    बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : राज्य शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होत आहे. तरी शाळांमध्ये अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अशा शाळांमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरची तातडीने दुसरीकडे व्यवस्था करावी. अशा शाळा निर्जंतुकीकरण करूनच सुरू कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिले.

     जिल्ह्यातील कोविड संसर्ग परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे उपस्थित होते.

   ते पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर कोविड साथरोगाची दुसरी लाट आली आहे. अनेक देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुसरी लाट आल्यास उपाय योजनांचा आढावा घेत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार व्हेटीलेटर बेड, ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन पुरवठा, औषधांचा पुरवठा आदी पुरक व्यवस्था करण्यात यावी. यंत्रणांनी यासाठी सतर्क रहावे. पहिल्या लाटेतील अत्युच्च रूग्णसंख्येसाठी असलेली व्यवस्था व दुसऱ्या लाटेत अत्युच्च ठरण्याची शक्यता असलेली रूग्ण संख्या याबाबत तुलनात्मक बाबी तपासून यंत्रणा सज्ज ठेवावी.  

    क्षय रूग्ण, एचआयव्ही रूग्ण आदींची कोविड चाचणी करून घ्यावी. तसेच सारी आजाराच्या रूग्णांचीसुद्धा कोविडची चाचणी करावी. खाजगी डॉक्टरांना समन्वयातून त्यांच्याकडे सारीचे रूग्ण आल्यास त्यांची नोंदणी संबंधीत डॉक्टारांकडून आरोग्य यंत्रणकेडे करून घ्यावी. दुर्धर आजार असणारे रूग्णांची प्राधान्याने कोविड चाचणी करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त यांनी दिल्या. यावेळी प्रयोगशाळा अहवाल तपासणी, तपासणी किट, औषधे आदींवर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

*********

 

 

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 531 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह

•       31 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.19: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 585 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 531 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 41 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 309 तर रॅपिड टेस्टमधील 222 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 531 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : पिं. राजा 1, हिंगणा 1, लाखनवाडा 1,  खामगांव शहर : 2, सिं. राजा शहर : 4, चिखली शहर : 8, चिखली तालुका : भोकर 1, बोरगांव काकडे 1, मोताळा तालुका : माकोडी 1, तिघ्रा 1, कोल्ही गवळी 1, मोताळा शहर : 2,  बुलडाणा शहर : 2,  नांदुरा शहर : 2, दे. राजा तालुका : जुमडा 2, दे. राजा शहर : 1, जळगांव जामोद शहर : 2, लोणार तालुका : चिंचोली सांगळे 3, किनगांव जट्टू 1,  लोणार शहर : 2,  सिं. राजा तालुका : जळपिंपळगांव 4,  महारखेड 1, दुसरबीड 1, मलकापूर तालुका : धरणगांव 2, मलकापूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : करमोडा 1, शेगांव शहर : 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे बाळसमुद्र ता. सि.राजा येथील 74 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 31 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  मलकापूर : 1, चिखली : 12, मोताळा : 1, शेगांव : 2,  बुलडाणा : स्त्री रूग्णालय 3, अपंग विद्यालय 7, संग्रामपूर : 1, खामगांव : 1, नांदुरा : 1, मेहकर : 1, सिं. राजा : 1,

     तसेच आजपर्यंत 61890 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10104 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10104 आहे. 

  तसेच 2900 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 61890 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10662 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10104 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 425 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 133 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****



शिक्षक मतदारसंघ निवडणूक केंद्राची विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केली पाहणी

  बुलडाणा,(जिमाका) दि.19: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 14 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात मतदान केंद्र देण्यात आले आहे. त्यापैकी बुलडाणा तहसिल कार्यालयातील मतदान केंद्राची आज 19 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधांची माहिती घेतली. तसेच व्यवस्थेबद्दल चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार राहुल खंडारे आदी उपस्थित होते.

*********

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

  बुलडाणा,(जिमाका) दि.19: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली. यावेळी सहा. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ, तहसिलदार, आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. 


--

Wednesday 18 November 2020

DIO BULDANA NEWS 18.11.2020

इयत्ता 10 व 12 वी परीक्षांचे आयोजन

  • इयत्ता 10 वीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
  • इयत्ता 12 वी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर कालावधीत

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 :  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12) परिक्षा दि. 20 नोव्हेंबर  ते 10 डिसेंबर 2020 पर्यत आणि शालांत प्रमाणपत्र  (इयत्ता 10) ची परिक्षा दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिक्षे दरम्यान भरारी पथके पेपरच्या दिवशी  अधिनस्त कार्यक्षेत्रात परिक्षा केंद्रावर आकस्मिक भेटी देणार आहे.  परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथके प्राधान्य देणार असून परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कारवाई करावी, असे  निर्देश अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती  तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

               परिक्षेदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास संबंधिताविरुध्द महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीस ॲक्ट युनिव्हरसिटी बोर्ड ॲण्ड ऑदर एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम 8 आणि भा.द.वि. चे. कलम 34(217) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  येणार आहे. परिक्षा केंद्रापासून 100 मिटर परिसरात एकही अनधिकृत व्यक्ती आढळून येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. केंद्र परिसरात परिक्षा सुरु होण्यापुर्वी 1 तास आधी पासून परिक्षा संपेपर्यत कलम 144 लागू करण्यात आला आहे. परिक्षा केंद्राचे 100 मिटर परिसरातील कॉम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर, परिक्षा सुरु होण्यापुर्वी 1 तास आधी पासून परिक्षा संपेपर्यत बंद ठेवण्यात यावे. परिक्षा प्रक्रियेमध्ये कोविड-19 विषाणू प्रादुर्भावामुळे   आवश्यक आरोग्य विषयक सुचनांचे पालन होणे बंधनकारक असेल. प्रत्येक वर्गखोल्यामध्ये फक्त 12 किंवा 13 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एक आड एक बाकावर करण्यात यावी. विद्यार्थ्यासाठी सॅनिटायझर, पिण्याचे पाण्याची व्यवस्था परिक्षा कक्षात जाणेपुर्वी विद्यार्थ्याना हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी अन्य आरोग्य केंद्र यांनी परिक्षा दरम्यान कोविड-19 मुळे परिक्षा केंद्र संचालकांकडून मागितलेल्या सहकार्या बद्दल आवश्यकता सर्व मदत तात्काळ पुरविण्यात यावी.             

         तसेच प्रत्येक केंद्रावर नेमुन दिलेल्या पेपरचे दिवशी बैठे पथक स्थापित करुन दररोज परिक्षचा अहवाल घेण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यानी मोबाईल, ईलेक्ट्रिक साहित्य परिक्षा केंद्रावर आणू नये व परिक्षेला वेळेपुर्वी  परिक्षाकेंद्र स्थळी उपस्थित राहावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेसाठी 575 विद्यार्थी प्रविष्ठ असून परिक्षा केंद्र संख्या 6 आहे. तसेच  माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता 10 वी) साठी  प्रविष्ठा विद्यार्थी 410 आहे व  परिक्षा केंद्र संख्या 6 आहे.

भरारी पथकांची संख्या 6 आहे.   शिक्षणधिकारी (माध्यमिक), शिक्षणधिकारी (प्राथमिक),  शिक्षणाधिकारी (निरंतर),  उपशिक्षणधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथक,  विशेष भरारी पथक (प्राचार्य, जेष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ) आदींचा भरारी पथकात समावेश आहे.

      तसेच इयत्ता 12 वी परीक्षेसाठी  एडेड क. म. वि.बुलडाणा, जिजामाता क. म. वि. सिदखेड राजा, जी. एस. आर्ट, कॉमर्स  ॲण्ड सायन्स कॉलेज खामगांव, इनियतीया उर्दु ज्युनिअर कॉलेज नांदुरा, नुतन ज्युनिअर कॉलेज मलकापुर, एस. के. कोल्हटकर महाविद्यालय जळगांव जामोद आदी परीक्षा केंद्र आहेत. तसेच इयत्ता 10 वी परीक्षेसाठी  भारत विद्यालय बुलडाणा, सावित्रिबाई फुले कन्या शाळा सिंदखेड राजा, जे. व्ही. मेहता नवयुग हायस्कुल खामगांव, सी. एस. कोठारी हायस्कुल, नांदुरा, न्यु इरा हायस्कुल, जळगांव जामोद परीक्षा केंद्र आहेत.

000000

जिल्हा परीषदेच्या अनुकंपाधारक उमेदवारांची यादी प्रसिद्ध

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : अनुकंपाधारक उमेदवारांकरीता शासन निर्णय दि. 21 सप्टेंबर 2017 मधील तरतुदी नुसार अनुकंपाधारक उमेदवारांचे प्राप्त झालेल्या अर्जाची सन 2020 ची सुधारित तात्पुरती जेष्टता यादी जिल्हा परिषद बुलडाणा संकेतस्थळ  www.zpbuldhana.maharashtra.gov.in  वर प्रसिध्द करण्यात आली आहे.अनुकंपाधारक उमेदवारांचे प्राप्त अर्जाचे तात्पुरत्या यादीवर दि. 2 डिसेंबर 2020 पर्यत लेखी आक्षेप मागविण्यात येत आहे. त्यानुसार अनुकंपाधारक उमेदवारांनी त्यांचे लेखी आक्षेप पुराव्याच्या कागदपत्रांसह dyceogzpbudana@gmail.com या ई- मेल आयडीवर किंवा कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून मुदतीत सादर करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

--

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 548 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 49 पॉझिटिव्ह*

*42 रूग्णांना मिळाली सुट्टी*

बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 597 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 548 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 49 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 441 तर रॅपिड टेस्टमधील 107 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 548 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : भंडारी 2, हिंगणा 1, गणेशपूर 1, नांदुरा तालुका : माळेगांव 1, अंबोडा 9, खुमगांव 1,  बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : माळविहीर 1,  शेगांव तालुका : माटरगांव 1, तिंत्रव 1,  चिखली शहर : 7, चिखली तालुका : मेरा बु 1, दे. राजा शहर : 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, सिं. राजा तालुका : जळ पिंपळगांव 2,   मोताळा तालुका : शेलापूर 1,  थड 1, अंत्री 1,  मेहकर तालुका : जानेफळ 2, खळेगांव 1, मेहकर शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 49 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा :  अपंग विद्यालय 9, दे. राजा : 1, सिंदखेड राजा : 1, मोताळा : 1, मेहकर : 9, चिखली : 14, खामगांव : 1, शेगांव : 5, मलकापूर : 1,  

   तसेच आजपर्यंत 61359 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10073 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10073 आहे. 

  आज रोजी 499 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 61359 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10608 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10073 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 403 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 132 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.