महात्मा बसवेश्वर सामाजिक समता, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
महात्मा
बसवेश्वर सामाजिक समता, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे
आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : वीरशैव लिंगायत समाजाचा
सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक समाज
प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता पुरस्कार एक व्यक्ती व एक संस्था यांना देण्यात येतात.
यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर पुरस्कार हा विरशैव-लिंगायत
समाजाकरीता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया
कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक
प्रबोधनकार व साहित्यीक तसेच सामाजिक संस्था यांना सन 2025-26 या वर्षासाठी प्रदान
करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी पुरूष
वयोमर्यादा किमान 50 वर्ष तर महिला किमान 40 वर्ष असून सामाजिक संस्थेसाठी सदर क्षेत्रातील
किमान 10 वर्ष कार्य केलेले असल्याचा निकष आहे.
इच्छुक व्यक्ती आणि संस्था
यांनी 15 दिवसाच्या आत आपला प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,
बुलढाणा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक चिखली रोड
बुलढाणा येथे सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक
मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment