Thursday 30 April 2020

DIO BULDANA NEWS 30.4.2020


कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!
·        लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन
·        शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी
·        मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस
बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.
   बुलडाणा जिल्ह्यात  27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत  तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून 85.46 क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी 72 पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली.  लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते आज 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 100 तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी 27 मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.
  लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी  झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.
असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज 30 एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : 2.20 क्विंटल, कोराडी ता. मेहकर :  2.53, धनवटपूर ता. मेहकर :  2.77, धानोरी ता. चिखली  :  1.10, लव्हाळा ता. मेहकर : 0.80 क्विं, नळगंगा ता. मोताळा : 12 , दहीद ता. बुलडाणा : 1, पलढग ता. मोताळा : 1.50, व्याघ्रा ता. मोताळा : 1,  धामणगांव बढे ता. मोताळा :  4, पिंप्री गवळी ता. खामगांव : 3.59, गारडगांव ता. खामगांव : 3.50, कंडारी  ता. नांदुरा : 4.50, लांजुड ता. खामगांव : 3.63, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : 3, येळगांव ता. बुलडाणा : 10, धामणगांव देशमुख  ता. मोताळा : 3, गंधारी ता. लोणार : 1.17, शिवणी जाट ता. लोणार : 0.70, पिंपळनेर ता. लोणार 2.50, झरी ता. बुलडाणा : 3.50, टाकळी ता. खामगांव : 4.90, बोरजवळा ता. खामगांव : 4.10, ब्राम्हणवाडा ता. चिखली : 3, किन्ही मोहदरी ता. चिखली : 1, राजुरा ता. जळगांव जामोद :  3 आणि खळेगांव ता. लोणार : 1.65 क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे.  अशाप्रकारे एकूण 85.64 क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.
                                                                              ******* 

कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 21 रिपोर्ट ‘निगेटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात आज 30 एप्रिल रोजी 21 रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व 21 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी 17  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 आहे, तर सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 76 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 403 प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
            *****
  
 

Wednesday 29 April 2020

DIO BULDANA NEWS 29.4.2020

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत माहे मे 2020 चे नियतनातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू 20 किलो प्रतिकार्ड, तांदुळ प्रतिकार्ड 15 किलो व साखर 1 किलो प्रतिकार्ड परिमाण राहणार आहे. तसेच प्रतिकिलो गहू दर 2, तांदुळ 3 व साखर 20 रूपये किलो असणार आहे.
   त्याचप्रमाणे प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदुळ प्रतिव्यक्ती 2 किलो परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो 2 रूपये व तांदुळ 3 रूपये किलो असणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत समाविष्ट न होणारे एपिएल (केशरी) शिधापत्रिका शेतकरी असलेल्या लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 4 किलो व तांदुळ प्रतिव्यक्ती 1 किलो परिमाण आहे. दर गहू प्रतिकिलो 2 रूपये व तांदुळ 3 रूपये किलो राहणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न होणाऱ्या शिधापत्रिकाधारक शेतकरी  लाभार्थ्यांसाठी  गहू 3 किलो प्रतिव्यक्ती व तांदुळ 2 किलो प्रतिव्यक्ती मिळणार आहे. याचा दर गहू 8 रूपये प्रतिकिलो व तांदुळ 12 रूपये प्रतिकिलो असणार आहे.
   प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटूंब योजनेतील प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपल्या लाभाच्या योजनेचा प्रकारानुसर धान्याची उचल करावी व दर द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे यांनी केले आहे.
***
जिल्ह्यातील दस्तऐवज नोंदणीचे कामास प्रारंभ
·        दुय्यम निबंधक कार्यालयात येताना नागरिकांनी शारिरीक अंतर ठेवावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज नोंदणीचे कामकाज 20 मार्च पासून बंद करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विशेष दक्षता घेवून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज नोंदणीचे कामास 20 एप्रिल पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
  दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशद्वारावर ठेवलेल्या हॅन्डवाशने हात स्वच्छ धुवावे. दस्तऐवजावर सही करताना प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे पेन सोबत आणावे. एकच पेन वापरू नये. कार्यालयात येताना नोंदणी करावयाच्या दस्तऐवजा व्यतिरिक्त बॅग, पर्स आदी आत आणता येणार नाही. दस्त नोंदणी करताना येतांना अगोदर, दुय्यम निबंधक यांचेकडून दस्त नोंदणीचा दिनांक व वेळ निश्चित करून घेणे आवश्यक आहे. आरक्षीत केलेल्या वेळेवरच दस्त ऐवजाची नोंदणी करण्यात येईल. आरक्षीत वेळेच्या आधी कार्यालयात येवून गर्दी करता येणार आहे. आपले काम झाल्यानंतर कार्यालयात थांबता येणार नाही.
   कार्यालयात दुय्यम निबंधक यांनी आखून दिलेल्या कार्यालयीन शिस्तीचे व शारिरीक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. लिव्ह अँड लायसन दस्ताची फिजीकल नोंदणी  जुलै 2020 अखेरपर्यंत बंद करण्यात येत आहे. याकरिता नागरिकांना ई- रजीस्ट्रेशन पर्याय उपलब्ध आहे. नोटीस ऑफ इन्टिमेशनचे फिजीकल फायलींग 20 मे पासून जुलै 2020 अखेरपर्यंत थांबविण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळून जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जुन 2020 अखेरपर्यंत मृत्यूपत्र, वाटणीपत्र, हक्कसोड पत्र, नात्यातील बक्षीसपत्र, चुक दुरूस्ती पत्र या दस्तांची नोंदणी थांबविण्यात येत आहे. तसेच कार्यालयात कलम 57 अन्वये शोध थांबविण्यात येत आहे. दस्ताची किंवा सुचीची प्रमाणीत प्रत व मुल्यांकन अहवाल यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार नाही. अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन सेवेचा वापर करावा.
   तरी नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी  दुय्यम निबंधक कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांनी केले आहे.
                                                                            **********  

कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 16 रिपोर्ट ‘निगेटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात आज 29 एप्रिल रोजी 16 रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व 16 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी 17  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 आहे, तर सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 47 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 373 आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                            ******

Tuesday 28 April 2020

दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!


दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!
·        मलकापूर व बुलडाणा येथील रूग्ण
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना या शब्दाने संपूर्ण जगाला छळले आहे. त्यामध्ये आपला देश, राज्य व जिल्हाही अपवाद नाही. कोरोना विषाणूच्या थैमानाने जग मेटाकुटीस आले आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातून कोरोनाच्या या हल्लकल्लोळात काही सुखद वृत्तही येत आहे. आज 28 एप्रिल रोजी आणखी दोन रूग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. कोरोनातून बरे झाल्याने मलकापूर व बुलडाणा येथील रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.       
     जिल्ह्यात एकूण 24 कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे. यामध्ये बुलडाणा 9, चिखली 3, दे.राजा 2, सिं. राजा 1, मलकापूर 4, शेगांव 3 व चितोडा ता. खामगांव येथे 2 रूग्ण होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 24 रूग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत 15 रूग्णांना बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये आज दोन रूग्णांची भर पडली असून ही संख्या 17 झाली आहे. सध्या कोविड रूग्णालयात 6 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
   प्रशासनाने कंटेन्टमेंट झोन, लॉकडाऊन पुर्णपणे बंदी, विहीत कालावधीत जिवनावश्यक वस्तुंचे दुकान उघडण्यास परवानगी आदी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मर्यादीत राही आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज दोन रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सिंदखेड राजा येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
    या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
    त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 17  झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 24 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच , 23 एप्रिल रोजी 3, 27 एप्रिल रोजी एक आणि आज 28 एप्रिल रोजी दोन रूग्ण बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. अशाप्रकारे 17 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. आता 6 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
   सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                              ********

कोरोना अलर्ट : जिल्हयात आजपर्यंत 357 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी 17  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 झाली असून सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत.  रूग्णालयात सध्या 6 रूग्णांवर उपचार सुरू आहेत . तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 19 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 357 आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                            ******
हनवतखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर गावची लोकसंख्या 397 आहे. या टँकरद्वारे गावाला दररोज 13 हजार 820 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                                             *******
कक्कुट पक्षाच्या मांसातून कोरोना विषाणूचा संसर्ग नाही
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : समाज माध्यमांमध्ये कुक्कुट पक्षापासून मानवात नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्या बाबतची अशास्त्रीय माहिती पसरविली जात होती. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त, नवी दिल्ली यांनी कुक्कुट पक्षांपासून नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याबाबत स्पष्ट केले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी देखील त्यांचे सेवन पुर्णपणे सुरक्षित असल्याबाबत प्रसिद्धी पत्रक निर्गमित केलेले आहे. कुक्कुट मांस व अंडी प्रथिनांचे उत्तम व स्वस्त स्त्रोत असून कुक्कुट उत्पादने मानवी आहारात वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षित आहेत. कुक्कुट मांस व अंडी यांच्या सेवनामुळे नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही, असे उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी कोविड -19 जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            *******

Monday 27 April 2020

CORONA ALERT NEWS 27.4.2020


‘साहब… आपने हमारी बहोत खिदमत की..’!
·        रूग्णालयातून सुट्टी झालेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या भावना
·        आज एकाला दिली सुटी
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना बाधीत होने के बाद हमे यहा लाया गया…  यहा पे हमारी अच्छी खिदमद की गई..अल्लाह की दुआँसे आज सब ठिक हुआ.. यहॉ के डॉक्टर्स, स्टाफ ने हमारी बहोत खिदमद की.. डॉक्टर साहब ने भी हमे हमारा बहोत ख्याल रखा.. पुरा मुल्क इस बिमारी से मुक्त हो जायगा.. अशा भावना कोरोनातून वाचलेल्या व आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या.   

     जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची  भर पडली आहे. आज सिंदखेड राजा येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण 15 रूग्ण बरे झालेले आहे.
   प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सिंदखेड राजा येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
    या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

    त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 15 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच , 23 एप्रिल रोजी 3 आणि आज 27 एप्रिल रोजी एका रूग्णाला बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. अशाप्रकारे 15 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. आता 5 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
   सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                              ****
दिव्यांग तपासणी शिबिर महिन्यातील प्रत्येक बुधवारी सुरू राहणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा व सामान्य रूग्णालय, खामगांव येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे 1, 8 व 15 एप्रिल  2020 चे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले होते. तरी यापुढे जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान-नाक-घसा संबंधित तसेच सामान्य रूग्णालय, खामगांव येथील अस्थिव्यंग व नेत्र संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर महिन्यातील प्रत्येक बुधवारी नियमितपणे सुरू राहणार आहे. याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
                                                              ******                                                                                  पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर गावची लोकसंख्या 625 आहे. या टँकरद्वारे गावाला दररोज 13 हजार 500 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिलहाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                                            *******
कोविड -19 मुकाबल्यासाठी 346 खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अंतर्गत अधिसूचना निर्गमीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची संख्या अपूरी पडत असल्यामुळे जिल्ह्यातील 346 खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टर्स) यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांनी 21 एप्रिल 2020 पासून पुढील आदेशापर्यंत सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत.
   या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये बुलडाणा येथील 133, चिखली येथील 36, मलकापूर येथील 32,  नांदुरा येथील 11, जळगांव जामोद येथील 8, लोणार येथील 5, सिंदखेड राजा येथील 3, दे. राजा येथील 7, शेगांव येथील 11 आणि खामगांव येथील तब्बल 96 डॉक्टरांचा समावेश आहे.
  या डॉक्टरांना जेथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी पाचारण केले जाईल. तेव्हा न चुकता तेथे हजर व्हावे लागणार आहे. तसेच त्यांची वैद्यकीय सेवा विनाविलंब द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे या डॉक्टरांनी त्यांची रूग्णालये सुरळीत सुरू ठेवावी आणि कोणत्याही नॉन कोविड रूग्णास उपचार करण्यास नकार देवू नये.  सेवा अधिग्रहीत केलेल्या  डॉक्टरांनी कोविड – 19 या आजाराकरीता सेवा उपलब्ध करून न  दिल्यास त्यांचे विरूद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची नोंदणी रद्द करण्याकरिता इंडियन मेडीकल कॉन्सील तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष सुमन चंद्रा यांनी कळविले आहे.
                                                                                 *****
मासेमारी व मासळी विक्री अत्यावश्यक सेवा
·        परवानगीसाठी अर्ज करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. लॉक डाऊन कालावधीत मत्स्यव्यवसाय विभागाचे अत्यावश्यक सेवा म्हणून समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मासेमारी व मासळी विक्री यांना विविध सुविधांचा लाभ देण्यासाठी विभागामार्फत कोविड – 19 ई- पास संगणक कार्य प्रणाली विक्षीप्ती करण्यात आलेली आहे. मत्स्यव्यवसायाचे सर्व कृती करण्यास तातडीची सेवा म्हणून शासनाने समावेश केल्याचे जिल्हाधिकारी यांनी 11 एप्रिल 2020 रोजी मान्यता दिलेली आहे. मासेमारी करणे, मासळीस खाद्य टाकणे, वाहतूक करणे, पॅकिंग करणे, विक्री करणे आदी तातडीचे कामांचे कारणास्तव परवानगीसाठी bulfish@rediffmail.com या ई मेल आयडीवर अर्ज करावेत. अर्ज करताना नाव व पत्ता, आधार कार्ड क्रमांक व छायांकित प्रत, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सभासद असल्यास नाव व संस्थेचा पत्ता, सभासद क्रमांक, परवाना कालावधी, वाहतूक असल्यास कुठून कुठपर्यंत, मासेमारीमधील कृती, मासळी वाहतूकीचे वाहन क्रमांक व चालकाचे नाव व पत्ता या माहितीचा उल्लेख असलेला अर्ज अनिवार्य आहे, असे सहाय्यक आयुक्त स इ नायकवडी यांनी कळविले आहे.
*****

जिल्हाधिकारी  कार्यालयात
महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात 26 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.                                                                                                                                                                           ******
                    कोरोना अलर्ट :
                                आज प्राप्त 20 रिपोर्टपैकी 17 अहवाल निगेटीव्ह; 3 पॉझीटीव्ह  '
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात आज 20 रिपोर्ट प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले आहे. यामध्ये 20 रिपोर्ट निगेटीव्ह असून 3 रिपोर्ट पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले तिनही रूग्ण मुळचे कामठी जि. नागपूर येथील आहेत. त्यांचे वय 63, 62 व 75 वर्ष आहे. आज रोजी जिल्ह्यातील 10 नमुने प्रतीक्षेत आहे. आज कोविड रूग्णालयातून एका कोरोनाबाधीत रूग्णाला डिस्जार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या 15 झाली आहेत. आज तीन रूग्ण बाधीत आल्याने उपचार सुरू असलेली रूग्ण संख्या 8 झाली आहे.
     जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या 24 झाली असून त्यापैकी एक रूग्ण मृत आहे. तसेच 23 रूग्णांपैकी 15 रूग्णांना बरे झालयाने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रूग्णालयात सध्या 8 रूग्णांवर उपचार सुरू आहेत  आजपर्यंत एकूण प्राप्त निगेटिव्ह अहवाल 357 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                                                    *******
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन कार्यक्रम साधेपणाने
बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने शासनाने 15 एप्रिल 2020 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे.
  मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वाजता केवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पालकमंत्री, जिलहाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित राहणार आहे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये, कवायतीचे आयोजनही करण्यात येवू नये, अशा शासनाने सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे 2020 रोजी सकाळी 8 वाजता पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपरोक्त मान्यवर वगळता कुणीही या कार्यक्रमास  उपस्थित राहू नये. तसेच जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ घेवू नये, असे  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी  पुरी यांनी कळविले आहे.

Saturday 25 April 2020

DIO BULDANA NEWS 25.4.2020



पवित्र रमजान महिन्यातही एकत्र येवून नमाज अदा करू नये
-         जिल्हाधिकारी
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. रमजान महिन्यात मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्यस्थिती विचारात घेता मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्य व जीवनाच्या हिताचे आहे. त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येवून नमाज अदा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुमन चंद्रा यांनी केले आहे.
   कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सुचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यातही कटाक्षाने करावे. कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठन, तराविह व इफ्तारसाठी एकत्र येवू नये, घराच्या अथवा इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येवू नये, मोकळ्या मैदानावर एकत्र येवून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येवू नये, कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यात मज्जाव करण्यात आलेला आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तराविह व इफ्तार आदी धार्मिक कार्य पार पाडावे.
   आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005 चे कलम 33 व साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 आणि राज्य शासनाची अधिसूचना 17 एप्रिलनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील सर्व मस्जिदमध्ये एकत्रित येवून नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. या सुचनांचे काटेकोर पालन करावे. पालन न केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 अन्वये व आपत्ती व्यवस्थपना अधिनीयमातंर्गत दंडास पात्र असणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                                    *********
अन्न पदार्थ व औषधी विक्री करताना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे
                                                                               - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सर्व सामान्य जनतेला त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही, तसेच ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून त्यांना खरेदी करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. अन्न पदार्थ व औषध विक्री करताना सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी  केले.
  नागपूर येथे लॉकडाऊनच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील अन्न पदार्थ उत्पादक, बेबीफड उत्पादक, पॅक फुड उत्पादक व वितरक, नमकीन उत्पादक यांच्या बैठकीचे सोशल डिस्टीसिंगचे पालन करीत 24 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं. भा पवार, सह आयुक्त(औषधे) पी. एन शेंडे, सहाय्यक आयुक्त अ. प्र देशपांडे, सहाय्यक आयुक्त पी.एम बल्लाळ, हल्दीराम, अजित बेकरी, दाल मिल असोसिएशन, किराणा असोसिएशन, नागपूर जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन व व्हीडीएमए चे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
   नागरिकांना दर्जेदार व योग्य भावात अन्न पदार्थ उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, रस्त्यावरील विक्री होणाऱ्या मास्कच्या बाबत योग्य ती कारवाई करण्याचत येईल. वापरलेल्या मास्कच्या विल्हेवाटीबाबत मनपा आयुक्त यांना कळविण्यात येईल.  यावेळी मंत्री महोदयांनी आयुर्वेदीक, ॲलोपॅथीक औषधांच्या निर्मिती व विक्रीबाबत विचारणा केली. यावेळी अन्न वऔषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
                                                                                    **********   
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राची इमारत तात्पुरते कारागृहासाठी अधिग्रहीत
 बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  जिल्हा कारागृह अधिक्षक यांच्या पत्रानुसार बुलडाणा कारागृहात दररोज दाखल होणाऱ्या नवीन बंद्याचा प्रवेश कोविड 19 रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आवश्यक आहे. शहरातील इतर शासकीय अथवा अशासकीय इमारतीस तात्पुरते कारागृह घोषित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमान्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलडाणा यांच्या अधिनस्त असलेले ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र , पोलीस मुख्यालयाचे मागे, सिंहगड बिल्डींग, बुलडाणा या इमारतीस तात्पुरते कारागृहासाठी पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत केली आहे.
   या इमारतीस सुरक्षेसाठी 24 तास पोलीस बंदोबस्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पुरवावा. तसेच दैनंदिन कामकाजासाठी एक तुरूंगाधिकारी व एक रक्षक/ लिपीक  यांची नियुक्ती अधिक्षक, बुलडाणा जिल्हा कारागृह यांनी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                                    ********8
  

GOOD NEWS DIO BULDANA 25.4.2020


आनंदवार्ता : बुलडाणा जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’!
·        चिखली, दे.राजा व मलकापूर येथील रूग्ण झाले बरे
·        टाळ्यांच्या निनादात रुग्णांना सोडले घरी
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रूग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. कोरोनाला मर्यादेत ठेवण्यात प्रशासन विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे आता चवथे यशस्वी पाऊल पडले आहे.  ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल इाल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
     जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज चिखली येथील एक,  दे.राजा येथील एक आणि मलकापूर येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 14 रूग्ण बरे झालेले आहे.
     प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे अग्रेसर आहे.  आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोना बाधीत रूग्णांनी आपण कोरोनामुक्त्‍ झाल्याबद्दल प्रशासनाने आभार मानेल. खरच.. आमच्यासाठी सर्व प्रशासनाने खूप मेहनत घेतली, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
   कोरोना निगेटीव्ह रूग्णांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच, 23 एप्रिल रोजी तीन व आज 25 एप्रिल रोजी पुन्हा 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 6 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
   कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.                                                                                                                                                          
*************