बुलढाण्यात गुरुवारी(दि.22) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध
व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय
रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि. 22 जानेवारी 2026 रोजी औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, मलकापूर रोड, बुलढाणा येथे करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये सहयोग को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
व दास गॅस इक्विपमेंट या नामांकित उद्योजकांनी
त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत
उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळावा घेण्यात येणार
आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक
उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच
नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार
आहे.
दहावी, बारावी आयटीआय, पदविका(डिप्लोमा) तसेच कोणत्याही शाखेतील
पदवीधर उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्र व बायोडाटासह प्रत्यक्ष उपस्थित
राहणे आवश्यक आहेत. तरी बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारानी या संधीचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment