बुलढाण्यात चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

 

 * 15 ते 17 जानेवारीदरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम

बुलढाणा, (जिमाका) दि. 9 :  महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय व स्वयंसेवी बाल विकास संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार व उन्मार्गी बालकांसाठी चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 15 ते 17 जानेवारी 2026  या कालावधीत शरद कला महाविद्यालय, हाजी मलंग दर्ग्याजवळ, चिखली रोड, बुलढाणा येथे होणार आहे.

महोत्सवाच्या माध्यमातून बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यात बंधुभाव, सांघिक भावना व आत्मविश्वास निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. महोत्सवात विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध बाल विकास संस्थांमधील बालके या स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहेत. सदर महोत्सवाला जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांतील व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या