Monday 20 November 2023

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 20(जिमाका) : कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहीर केले आहे.  त्यानुसार जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग बुलडाणा कार्यालयाकडून दि.26 सप्टेंबर 2023 रोजीचे पत्रान्वये धानोरी.क्र.(10.22 हेक्टर), कनका बु. (4.055 हेक्टर), घारोड क्र.1 20.13 हेक्टर, भुमराळा पाझर तलाव 4.21 हेक्टर हे तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी ठेक्याने देण्यासाठी नव्याने हस्तांतरित झाले असून, हे तलाव सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांसाठी मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. या तलावांच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव मागणी अर्ज 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत.

शासन निर्णय अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका वाटप समितीचे मान्यतेने तलाव, जलाशय देण्याचे प्रस्तावित आहे. हे तलाव ठेका प्रक्रियेसाठी अटी-शर्तींची पुर्तता तलाव, जलाशयावर नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.

तलाव ठेका नमुना-1 तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव व अर्ज, संस्था ही भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था म्हणून नोंदणी झालेली असावी. नाहरकत प्रमाणपत्र/उपविधी प्रमाणपत्र/संस्था नोंदणी प्रमाणपत्र. संस्था बंद अवसायनात नसल्याबाबतचे सहकार विभागाचे प्रमाणपत्र. संस्था बंद अवसायनात नसल्याबाबतचे सहकार संस्था म्हणून नोंदणी झालेली असावी. नाहरकत प्रमाणपत्र/उपविधी प्रमाणपत्र/संस्था नोंदणी प्रमाणपत्र.  संस्था शासनाचे थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र.  आपले तीन वर्षाचे अद्यावत लेखापरीक्षण अहवाल सादर करणे, संस्थेच्या उपविधीनुसार संस्थेचे कार्यक्षेत्र नमुद असलेल्या उपविधी पृष्ठाची सत्यप्रत व 97 वी घटना दुरुस्तीची प्रत, प्रतिवर्ष मत्स्यबीज संचयन व मत्स्योत्पादन अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

No comments:

Post a Comment