सोमवारी (19 जानेवारी) जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
बुलढाणा, (जिमाका) दि. 13 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शासन निर्णयानुसार
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतो. त्याअनुषंगाने जानेवारी महिन्याचा
महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी
यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे. तरी पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.
महिला लोकशाही दिनात
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज
द्विप्रतीत सादर करावेत. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. लोकशाही
दिनामध्ये महिलांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज,
न्यायप्रविष्ट, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले निवेदन
स्वीकारले जाणार नाही. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने
शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, पीडित महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment