Wednesday 28 June 2023

DIO BULDANA NEWS 28.06.2023

 परिवहन विभागाचे तालुका शिबीर जाहिर

बुलडाणा, दि. 28 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै ते डिसेंबर 2023 दरम्यान तालुका स्तरावर घेण्यात येणारे शिबीर जाहिर केले आहे. त्यानुसार आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिन्यातून एक किंवा दोन वेळा शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

जुलै महिन्यात जळगाव जामोद 5 जुलै, शेगाव 7 आणि 28 जुलै, मेहकर 10 आणि 31 जुलै, खामगाव 12 आणि 26 जुलै, चिखली 17 जुलै, देऊळगाव राजा 19 जुलै, लोणार 20 जुलै, नांदुरा 21 जुलै, मलकापूर 13 आणि 27 जुलै, सिंदखेड राजा 24 जुलै रोजी घेण्यात येतील.

ऑगस्ट महिन्यात जळगाव जामोद 4 ऑगस्ट, शेगाव 7 आणि 28 ऑगस्ट, मेहकर 9 आणि 31 ऑगस्ट, खामगाव 11 आणि 25 ऑगस्ट, चिखली 17 ऑगस्ट, देऊळगाव राजा 18 ऑगस्ट, लोणार 21 ऑगस्ट, नांदुरा 23 ऑगस्ट, मलकापूर 14 आणि 29 ऑगस्ट, सिंदखेड राजा 24 ऑगस्ट रोजी घेण्यात येतील.

 

सप्टेंबर महिन्यात जळगाव जामोद 4 सप्टेंबर, शेगाव 5 आणि 21 सप्टेंबर, मेहकर 7 आणि 27 सप्टेंबर, खामगाव 8 आणि 25 सप्टेंबर, चिखली 12 सप्टेंबर, देऊळगाव राजा 14 सप्टेंबर, लोणार 15 सप्टेंबर, नांदुरा 18 सप्टेंबर, मलकापूर 11 आणि 29 सप्टेंबर, सिंदखेड राजा 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येतील.

ऑक्टोबर महिन्यात जळगाव जामोद 6 ऑक्टोबर, शेगाव 9 आणि 27 ऑक्टोबर, मेहकर 10 आणि 31 ऑक्टोबर, खामगाव 12 आणि 26 ऑक्टोबर, चिखली 16 ऑक्टोबर, देऊळगाव राजा 17 ऑक्टोबर, लोणार 19 ऑक्टोबर, नांदुरा 20 ऑक्टोबर, मलकापूर 13 आणि 30 ऑक्टोबर, सिंदखेड राजा 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात येतील.

नोव्हेंबर महिन्यात जळगाव जामोद 6 नोव्हेंबर, शेगाव 7 आणि 28 नोव्हेंबर, मेहकर 8 आणि 30 नोव्हेंबर, खामगाव 10 आणि 24 नोव्हेंबर, चिखली 16 नोव्हेंबर, देऊळगाव राजा 17 नोव्हेंबर, लोणार 20 नोव्हेंबर, नांदुरा 22 नोव्हेंबर, मलकापूर 9 आणि 29 नोव्हेंबर, सिंदखेड राजा 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येतील.

डिसेंबर महिन्यात जळगाव जामोद 4 डिसेंबर, शेगाव 6 आणि 27 डिसेंबर, मेहकर 8 आणि 29 डिसेंबर, खामगाव 11 आणि 26 डिसेंबर, चिखली 13 डिसेंबर, देऊळगाव राजा 15 डिसेंबर, लोणार 18 डिसेंबर, नांदुरा 19 डिसेंबर, मलकापूर 12 आणि 28 डिसेंबर, सिंदखेड राजा 21 डिसेंबर रोजी घेण्यात येतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कळविले आहे.

00000

ग्रामीण रुग्णांना आभाचा आधार

*जिल्ह्यात १ लाख ८३ हजार नोंदणी

बुलडाणा, दि. 28 : सरकारी रुग्णालयात केस पेपर, उपचारासाठी लागणाऱ्या रांगेतून आता जिल्ह्यातील रुग्णांची सुटका झाली आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जिल्हा रुग्णालयात आभा हेल्थ अॅपवर नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा वेळ आणि त्रास कमी झाला असून आतापर्यंत १ लाख ८३ हजार रुग्णांनी नोंदणी केली आहे.

सरकारी रुग्णालयात केसपेपर काढणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी लांब रांगा लागलेल्या असतात. अनेकवेळा ठराविक वेळेनंतर केसपेपर मिळत नाही. यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे श्रम वाया जातात. काही रुग्णांना रांगेतच त्रास जाणवू लागतो. या सर्वांतून सुटका होण्यासाठी आभा ॲपच्या नोंदणीनंतर आभा हेल्थ कार्डचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी आभा कार्ड मोफत काढून देण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरीकांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत लिंक असल्याची खात्री करून आधार कार्ड घेऊन कोणत्याही आरोग्य संस्थेत जाऊन आभा कार्ड काढावे लागणार आहे.

'आभा हेल्थ कार्ड' नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच असून नागरिकांनी त्यांचे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आभा कार्ड काढून घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्डसोबत रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतील. कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे.

आभा हेल्थ कार्डचा उपयोग

आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर आहे. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. ज्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाणार आहे. हे कार्ड आधार कार्डसारखेच आहे. यावर १४ अंकी क्रमांकाचा वापर करून रुग्णाची सर्व मेडिकल नोंदी डॉक्टरांना मिळणार आहे. रुग्णाच्या आजारावर झालेला उपचार, कधी व कोणत्या दवाखान्यात झाला, कोणत्या तपासण्या केल्या, कोणती औषधे दिली, आरोग्याच्या समस्या, रुग्ण आरोग्यविषयक कोणत्या योजनेशी जोडला गेलाय, ही माहिती कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे.

आरोग्याचा तपशील

आभा डिजिटल कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रूग्णालयात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन सोबत नेण्याची गरज नाही. तुमच्याकडे जुन्या चाचणीचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.

ग्रामीण भागातील नागरिकांना आभा प कसे वापरावे याची माहिती नाही, त्यासाठी 'स्कॅन अॅण्ड शेअर' मोहिम राबवली आहे. यास जिल्हा रुग्णालयात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर उपजिल्हा आरोग्य केंद्र प्राथमिक केंद्रातही आभा ॲपच्या वापर होणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना माहिती

रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तींना आभा ॲपद्वारे कशी नोंदणी करायची याची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोड स्कॅन केल्यानंतर आभा हेल्थचे अॅप मोबाईलवर डाऊनलोड होते. त्यात मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी टाकल्यावर नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर १४ आकडी आभा क्रमांक येतो. हा क्रमांक केसपेपर खिडकीवर दाखवल्यानंतर आजाराविषयी माहिती भरून घेतली जाते. अवघ्या काही मिनिटात टोकन क्रमांक मोबाईलवर येतो. टोकन क्रमांक टाकल्यावर क्षणात केसपेपर प्रिंट होऊन रुग्णांना मिळतो, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

000000

Tuesday 27 June 2023

DIO BULDANA NEWS 27.06.2023

 परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : राज्य शासनाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना  परदेशात  पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यायेते. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

    विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. दि. 30 जून 2023 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला  येथे सादर करावे लागणार आहे. अर्ज करण्यारिता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

00000



नेहरू युवा केंद्रात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

बुलडाणा, दि. 27 : नेहरू युवा केंद्रामध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, सहाय्यक धनंजय चाफेकर, विलास सोनोने पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन

*स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सुब्रतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या वतीने 2023-24 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप, सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. दि. 13 ते 15 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूकरीता सबज्युनिअर 14 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी मुले वयोगटात दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघानी नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 10 जुलैपर्यंत करणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूकडे जन्माचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूची वैद्यकीय तपासणी होणार असू यात कही खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा 14 वर्षाआतील मुले सबज्‍युनिअर स्पर्धा दि. 13 जुलै 2023, 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर स्पर्धा दि. 14 ते 15 जुलै 2023, 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर स्पर्धा दि. 14 ते 15 जुलै 2023 घेण्यात येणार आहे.

प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पाठवावे लागणार आहे. 14 वर्षाआतील खेळाडूकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करणे आणि subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 27 : येत्या खरीप हंगामासाठी पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि बँकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यासाठी त्यांनी 30 जूनपूर्वी पिककर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक डॉ. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. डॉ. तुम्मोड यांनी, यावर्षी पिककर्ज वाटपाची गती संथ आहे. एक हजार 470 कोटी रूपयांचे उद्दीष्ट असले तरी आतापर्यंत 604 कोटी वाटप करण्यात आलेले आहे. यात कर्ज नुतनीकरणात अर्ज येत असल्यास येत्या 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पिककर्ज नुतनीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावे.

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पिककर्ज नुतनीकरण केल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या व्यास सवलत योजनेचा लाभ मिळतो. तसेच 30 जूनपूर्वी कर्ज नुतनीकरण केल्यास तीन लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य व्याजदर लागत असल्याने 10 टक्के वाढीव कर्ज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने पिककर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन केले.

यात आर्थिक वर्ष 2022-23 चा प्रगती अहवाल अग्रणी जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी सादर केला. मागील वर्षीचा जिल्ह्याचा पत आराखडा चार हजार 350 कोटी रूपयांचा होता. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी सात हजार 667 कोटी रूपयांचा पतपुरवठा केला आहे. उद्दीष्टापेक्षा 177 टक्के कर्ज वाटप जिल्ह्यात करण्यात आले आहे. यात प्राथमिकता प्राप्त क्षेत्रामध्ये चार हजार 95 कोटी रूपयांचे उद्दीष्ट असून पाच हजार 86 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कृषि क्षेत्रामध्ये दोन हजार 700 कोटी उद्दीष्टाच्या तीन हजार 657 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. हेडाऊ यांनी दिली.

00000

चिंचखेड नाथ इसलवाडीला टँकर मंजू

*मोताळा तालुक्यातील 1 गावाचा समावेश

बुलडाणा, दि‍. 27 : जिल्ह्यातील काही तालुक्यातील चिंचखेड नाथ इसलवाडी येथे सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून दरडोई दरदिवशी 20 लिटर्स आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मोताळा तालुक्यातील चिंचखेड नाथ इसलवाडी या 1 हजार 760 लोकसंख्या आणि 682शूधन असलेल्या गावासाठी 55 हजार 660 लिटर टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत मिळणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे.

000000

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि‍. 27 : बुलडाणा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक सत्र 2023-24 करीता अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थिनींकरीता अकरावी आणि पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरिता वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थिनींनी swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरुन हार्डकॉपी, विहित शैक्षणिक कागपदत्रे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, राऊत मंगल कार्यालय, सर्क्यूलर रोड, जिजामाता महाविद्यालयाजवळ, बुलडाणा येथे वसतिगृह कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे.

वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांचे आधार कार्डशी संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे निर्वाह, भोजन, स्टेशनरी ड्रेसकोड, शैक्षणिक सहल आदी भत्ते देण्यात येतात. विद्यार्थिनींनी अर्जामध्ये स्वत:चा किंवा पालकांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खाते, तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा, ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना ते धार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतंत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झालेला नसावा, त्याची खात्री करुन घ्यावी. विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्जामध्ये बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करुन घ्यावी. प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, दहावीची गुणपत्रिका, मेडीकल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईजचे फोटो दी अचूकपणे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे, असे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.

0000000

Monday 26 June 2023

DIO BULDANA NEWS 26.06.2023

 



जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन

बुलडाणा, दि. २६ : छत्रपती राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अधीक्षक प्रिया सुळे, नाझर गजानन मोतेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

00000

समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

बुलडाणा, दि. २६ : राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा परिषद, समाज कल्याण यांच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे रॅली, तसेच समता दिंडी काढण्यात आली. तसेच नशामुक्तीबाबत चित्र प्रदर्शन उभारण्यात आले. रॅली आणि समता दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी समता दिंडीस हिरवी झेंडी दाखविली. रॅलीची सुरवात जिल्हा परिषद कार्यालय येथून करण्यात आली. दिंडीचा समारोप सहाय्यक आयुक्त कार्यालयात करण्यात आला. तसेच जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी डॉ. अनिता राठोड होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशिष पवार, समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, प्राचार्य सुरेश साबळे, श्री. गायकवाड उपस्थित होते.

डॉ. अनिता राठोड यांनी प्रास्ताविकातून छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरु असलेल्या योजनांची माहिती दिली. श्री. साबळे यांची छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, कृषि विषयक कार्याचा उल्लेख केला, समाजाला तारण्यासाठी शाहू महाराजांच्या विचाराची समाजाला गरज आहे. छत्रपती शाहू महाराजाचे शासन म्हणजे लोककल्याणकारी प्रशासन होते. त्याचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या घटनेच्या माध्यमातून समाजामध्ये रोवला आहे. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराने आपल्या जीवनाची दिशा ठरवावी, असे महत्त्व विषद केले.

समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला समाजभूषण पुरस्कारप्राप्त मानकरी आणि नागरिक उपस्थित होते. तालुका समन्वयक सतिश बाहेकर सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, नर्सिग कॉलेजचे विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, शासकीय वसतिगृह गृहपाल आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

00000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बीज भांडवल योजना

बुलडाणादि. 26 :  जिल्ह्यातील मातंग समाजाच्या अर्जदारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरीता आणि समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे करिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यात मातंग समाजाच्या 12 पोटजातीतील नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

या आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेंतर्गत 50 हजार एक रुपये ते सात लाखापर्यंत जिल्ह्याला 30 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 45 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के, तसेच बॅंकेचा कर्जाचा सहभाग 50 टक्के आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रकमेवर 4 टक्के व्याज दर आकारण्यात येतो. बॅकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचे व्याजदर असतो. अनुदान योजनेंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज प्रस्ताव बॅकेला पाठविण्यात येतो. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये आहे. उर्वरित कर्ज बॅंकेचे राहणार आहे. सदर योजनेचे 50 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. योजेनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाजाचा असावा आणि त्यातील 12 पोटजातीतील असावा, वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावी. सोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल आदी आवश्यक कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत कर्ज प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

000000‍

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

*15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणादि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मातंग समाजातील तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्याकरिता शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन फोटो, आधार कार्ड आदी कागदपत्रासह दि. 15 जुलै 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

00000000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलडाणादि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयाला सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे 40 उद्दिष्ट  आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थेट कर्ज योजनेंतर्गत 1 लाखामध्ये महामंडळाचे अनुदान रक्कम 10 हजार रूपये आणि 5 टक्के लाभार्थी सहभाग हा 5 हजार रुपये आहे. उर्वरीत 85 हजार महामंडळाचे कर्ज राहणार आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत. कर्जाचे अर्ज दि. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत दिले जातील. यातील पूर्ण असलेले अर्ज स्विकारले जातील. कर्ज प्रकरणासाठी इच्छुक अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहुन दाखल करावेत. त्रयस्त किंवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायाबाबत जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल, ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 असावा, अर्जदाराचे आधारकार्ड बँकेच्या खात्याशी जोडल्याचे तपशील जोडावा.

थेट कर्ज योजनेंतर्गत प्राप्त अर्जाची लाभार्थी निवड समितीची मान्यता घेवून पात्र अर्जदाराची उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठ्याद्वारे निवड करण्यात येईल. निवड झालेल्‍या अर्जदाराची वैधानिक दस्तऐवज याची पुर्तता झाल्यानंतर कर्जाचे वितरण करण्यात येईल. योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत कर्ज प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एस. गाभणे यांनी केले आहे.

00000






पोलिस दलाडून अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त मोटारसायकल रॅली

बुलडाणादि. 26 : अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त बुलडाणा जिल्हा पोलिस दलातर्फे सामाजिक जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, पोलिस अधीक्षक सुनील कडासनेअपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामणीउपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघजिल्हा शल्य चिकित्सक भुसारीडॉ. लता भोसलेशिक्षणाधिकारी मुकुंद प्रकाश, श्री. अकाळपोलिस उपअधीक्षक गृह गिरीश ताथोडस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडेप्रल्हाद काटकरवाहतूक शाखेचे श्री. महाजनकृषी विभागाच्या संजीवनी कनखर उपस्थित होते.

रॅलीची सुरवात पोलिस अधीक्षक कार्यालयातून करण्यात आली. रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. सदर रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, पोलिस अधीक्षक सुनील कडासनेअपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी रॅलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.

ही रॅली पोलिस अधीक्षक कार्यालयामधून निघून कुंभार गल्लीमेन मार्केट लाईनजनता चौककारंजा चौकभोंडे सरकार चौकतहसिल चौकएकता नगर चौकचिंचोले चौकधाड नाकाबस स्टॅण्डजयस्तंभ चौकमधून पोलिस अधीक्षक कार्यालय येथे समाप्त करण्यात आली. सदर रॅलीमध्ये अंमली पदार्थ सेवनाच्या विरोधी बॅनर व बोर्ड लावून रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

00000

पिकास शिफारशीनुसार रासायनिक खते द्यावीत

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : खरीप हंगाम 2023मध्ये जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खताची उपलब्धता आहे. त्यामुळे रासायनिक खताची टंचाई होणार नाही. शेतकऱ्यांनी विशिष्ट खताचा आग्रह करू नये, असे आवाहन कृषि विभागतर्फे करण्यात आले आहे.

पिकास शिफारशीनुसार रासायनिक खते देण्यासाठी विविध पर्याय व लागणारा खर्च पिकनिहाय खालिलप्रमाणे आहे. तसेच योग्य प्रमाणात खताची मात्रा देण्याकरिता कृषिक ॲपचा उपयोग करावा.

पिक :  सोयाबीन

खत शिफारस प्रति हेक्टर

N

P

K

S

30

60

30

30

अ.क्र.

आवश्यक मात्रा किलो ग्रॅम व किंमत

शिफारशीनुसार रासायनिक खते वापर करण्यासाठीचे पर्याय

एकुण खर्च

युरिया

डाय अमोनियम (DAP)

10:26:26

12:32:16

15:15:15

18:18:10

सिंगल सुपर फॉस्फेट

म्युरेट ऑफ पोटॅश

गंधक

1

किलो ग्रॅम

40

-

115

-

-

-

187.5

-

-

 

किंमत

236

-

3381

-

-

-

2138

-

-

5755

2

किलो ग्रॅम

16.3

-

 

187.5

-

-

-

-

20

 

किंमत

96

-

-

5512

-

-

-

-

900

6508

3

किलो ग्रॅम

65

-

-

-

-

-

375

50

-

 

किंमत

384

-

-

-

-

-

4275

1700

 

6359

4

किलो ग्रॅम

14.34

130.4

-

-

-

-

-

50

20

 

किंमत

85

3521

-

-

-

-

-

1700

900

6206

5

किलो ग्रॅम

-

-

-

-

200

-

187.5

-

-

 

किंमत

-

-

-

-

5880

-

2137

-

-

8017

6

किलो ग्रॅम

-

-

-

-

-

166

187.5

22.33

-

 

किंमत

-

-

-

-

-

4316

2137

759

 

7212

 

पिक :  कपाशी

खत शिफारस प्रति हेक्टर

N

P

K

120

60

60

अ.क्र.

आवश्यक मात्रा किलो ग्रॅम व किंमत

शिफारशीप्रमाणे रासायनिक खते

एकुण खर्च

युरिया

20.20.00

10:26:26

12:32:16

15:15:15

18:18:10

सिंगल सुपर फॉस्फेट

म्युरेट ऑफ पोटॅश

गंधक

1

किलो ग्रॅम

210

-

231

-

-

-

-

-

-

 

किंमत

1223

-

6791

-

-

-

-

-

-

8014

2

किलो ग्रॅम

211.57

-

 

187.5

-

-

-

50.1

-

 

किंमत

1250

-

-

5512

-

-

-

1703

-

8465

3

किलो ग्रॅम

260.4

-

-

-

-

-

375

100.2

-

 

किंमत

1539

-

-

-

-

-

4275

3407

 

9221

4

किलो ग्रॅम

173.6

-

-

-

270

-

120

30

-

 

किंमत

1026

-

-

-

7938

-

1368

1020

-

11352

5

किलो ग्रॅम

173.6

200

-

-

-

-

120

100

-

 

किंमत

1026

5600

-

-

-

-

1368

3400

-

11394

6

किलो ग्रॅम

173.6

-

-

-

-

222

125

63.12

-

 

किंमत

1026

-

-

-

-

5772

1425

2146

 

10369

 

 

पिक :  मुग / उडीद

खत शिफारस प्रति हेक्टर

N

P

K

20

40

20

अ.क्र.

आवश्यक मात्रा किलो ग्रॅम व किंमत

शिफारशीप्रमाणे रासायनिक खते

एकुण खर्च

युरिया

20.20.00

10:26:26

12:32:16

15:15:15

18:18:10

सिंगल सुपर फॉस्फेट

म्युरेट ऑफ पोटॅश

गंधक

1

किलो ग्रॅम

26.69

-

77

-

-

-

125

-

-

 

किंमत

158

-

2264

-

-

-

1425

-

-

3847

2

किलो ग्रॅम

43.4

-

 

-

-

-

250

33.4

-

 

किंमत

256

-

-

-

-

-

2850

1136

-

4242

3

किलो ग्रॅम

10.85

-

-

125

-

-

-

-

-

 

किंमत

64

-

-

3675

-

-

-

-

 

3739

4

किलो ग्रॅम

-

-

-

-

133

-

125

-

-

 

किंमत

-

-

-

-

3910

-

1425

-

-

5335

5

किलो ग्रॅम

-

100

-

-

-

-

125

25

-

 

किंमत

-

2800

-

-

-

-

1425

850

-

5075

6

किलो ग्रॅम

-

-

-

-

-

111

125

14.86

-

 

किंमत

-

-

-

-

-

2886

1425

505

 

4816

पिकास शिफारशीनुसार खर्चाचे किंमत रासायनिक खते देण्यासाठी विविध पर्याय व लागणारा खर्च वरीलप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

00000