Wednesday 23 November 2022

DIO BULDANA NEWS 23.11.2022

 मागासवर्गीय विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे लागणार आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 2 हजार 67, इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे 7 हजार 423 अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित, तसेच योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची कार्यवाही करावी.

कार्यशाळा घेऊन याबाबतची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

माजी सैनिक, सशस्त्र सेना ध्वज दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा आणि सशस्त्र सेना ध्वज दिनाचे आयोजन दि. 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. सैनिक सभा मंडप येथे हा कार्यक्रम होणार आहे.

जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, माजी सैनिक, विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, पिता, अवलंबित, जिल्हा सैनिक मंडळ आणि जिल्हा पोलिस संरक्षण समिती सदस्य, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा पदधिकारी, शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, पदधिकारी यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते वीरपत्नी, वीरमाता, पिता, शैक्षणिक क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारप्राप्त, तसेच ध्वजदिन वर्ष २०२१ चे उत्कृष्ट कार्य करणारे कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी माजी सैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात महारेशीम अभियानास सुरवात

* 15 डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार अभियान

बुलडाणादि. 23 : जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येणार आहे. महारेशीम अभियान 2023 मध्ये तुती, टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनूसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत वन्य निवासी वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषीमाफी योजना सन 2008 नुसार अल्प भुधारक, सिमांत शेतकरी, क्षेत्र मर्यादा प्रति लाभार्थी 1 एकर शेती असणार शेतकरी निवडण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजूरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनासाठी 682 दिवस, किटक संगोपन गृहसाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवस मजुरी देण्यात येते.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी (पोकरा) अंतर्गत तुती रोपवाटिका, लागवड किटक संगोपन गृह आणि संगोपन साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. यात लाभार्थी निवडीताना इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमिन असावी, लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगासाठी कुटुंबामध्ये किमान एक व्यक्ती तुती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असलेले अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या घटकासाठी पात्र आहे.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेत तुती रोपे तयार करणे, तुती लागवड विकास कार्यक्रमाकरीता सहाय्य, दर्जेदार कोष उत्पादनासाठी, किटक संगोपन साहित्य पुरवठा सहाय्य आधुनिक माउंटेज सहित, किटक संगोपनगृह बांधणीसाठी प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येते.

जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगवाढीसाठी वाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बारमाही सिंचनाची सोय व लागत खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, भोंडे हॉस्पिटल समोर, मुठ्ठे ले आऊट, धाड रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी सु. प्र. फडके यांनी केले आहे.

00000


Tuesday 22 November 2022

DIO BULDANA NEWS 22.11.2022

 








जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा थाटात

बुलडाणा, दि. 22 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे 14, 17, 19 वर्षाआतील मुलांची जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा सोमवारी, दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.

या स्पर्धेत 14 वर्षे मुलांचे 5 संघ, 17 वर्षे मुलांचे 10 संघ, तर 19 वर्षे मुलांचे 7 अशा 22 संघानी सहभाग नोंदविला. आमदार संजय गायकवाड यांनी स्पर्धेचे उद्धघाटन केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, श्री. उबरहंडे, जीवन उबरहंडे, शेनफडराव घुबे आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड यांनी जिल्हा क्रीडा संकुलात सिन्थेटीक ट्रॅक, इनडोअर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल तथा इतर क्रीडा सुविधा निर्मितीकरीता निधी मंजूर केला आहे. भविष्यात क्रीडा सुविधा निर्मितीकरीता निधी देण्यात येणार आहे. तसेच जानेवारीमध्ये 10 खेळांची पर्वणी आयोजित करुन लाखो रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहेत.

स्पर्धेमध्ये 14 वर्षाआतील मुलांच्या गटातून रामरक्षा इंग्लिश स्कुल, पाडळी ता. बुलडाणा विजयी, तर विवेकानंद विद्या मंदिर, हिवरा आश्रम, ता. मेहकर या संघाने उपविजेते पद पटकाविले. 17 वर्षाआतील मुलांच्या गटात विजयी संघ प्रबोधन विद्यालय, बुलडाणा, तर उपविजयी आदर्श विद्यालय, चिखली संघ. 19 वर्षाआतील मुलांच्या गटात विजयी संघ जानकीदेवी विद्यालय, देऊळगांव धनगर, ता. चिखली, द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यामंदिर, हिवरा आश्रम, ता. मेहकर या संघाने पटकाविला.

स्पर्धेमध्ये वैभव जाधव, स्वप्नील पैठणे, दिपक पवार, मंगेश एकडे, ओम पडोळ, आदित्य भालेराव, रोहण, धनंजय चव्हाण यांनी पंचाधिकारी म्हणून काम पाहिले. कार्यालयीन कामकाज रविंद्र गणेशे, तर निवड चाचणी समिती सदस्य म्हणून दिनेश गर्गे यांनी कामकाज पाहिले. क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे आदींनी पुढाकार घेतला.

00000

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात 279 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासाठी दि. 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 3 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे निवडणूक घोषित झालेल्या तहसिल परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 3 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येत आहे. तसेच दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी संगणक प्रणालीतून नामनिर्देशनाची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. यासाठी तहसिल परिसरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

0000

दिव्यांगांसाठी आवश्यक सहायक साहित्याचे वाटप

* बुधवार, गुरूवारी तपासणी शिबिर

       बुलडाणा, दि. 22 : जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाकय साहित्य साधने वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2022 आणि गुरूवार, दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांगांचे सर्वांगिण शारीरिक पुनर्वसन होण्यासाठी सर्व प्रकारचे सहायक साहित्य साधने व्हील चेअर, कर्णयंत्र, कुबड्या, वॉकर, अंधकाठी, कॅलीपर आदी उपलब्ध होणार आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर तपासणी शिबिर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, बसस्थानकामागे, महिला व बाल कल्याण विभागाच्याखाली, डॉ. जोशी हॉस्पीटलजवळ, बुलडाणा येथे सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी मोबाईल क्रमांक 9422120391, 9370633361, 9822229265 हे आहेत. तपासणी शिबिरात येताना दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, उत्पन्नाचा दाखल्याची 2 छायांकित प्रत दोन प्रतीत, तसेच दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अपंग पुर्नवसन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Monday 21 November 2022

DIO BULDANA NEWS 21.11.2022

 


वैध देशी मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्कचा छापा

*दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

        बुलडाणा, दि. 21 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावखेड  भोई, ता. देऊळगावराजा येथे अवैध देशी मद्य विक्री करणाऱ्या एकावर शनिवारी, दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी कारवाई केली. यात एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंद करून एका वाहनासह दोन लाख 3 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चिखली येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आणि दुय्यम ‍निरीक्षक यांच्या पथकाने सावखेड  भोई, ता. देऊळगावराजा येथे एक वारस गुन्हा नोंदवून कारवाई केली. यात एक आरोपी प्रवीण वसंता  हांडे, रा. देऊळगाव राजा याच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. कारवाईत एक  इंडिका कार क्रमांक एमएच 42  एच 4427 आणि जालना जिल्ह्यातील 138.6 लिटर देशी मद्यासह एकुण 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत निरीक्षक जी. आर. गावंडे, दुय्यम निरीक्षक आर. ई. सोनुने, एस. डी. चव्हाण यांच्यासह एस. डी. जाधव, श्री. निकाळजे, श्री. अवचार यांनी सहभाग घेतला.

          राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 जानेवारी 2022 ते दि. 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत एकुण 1 हजार 137 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 1 हजार 42 वारस गुन्ह्यासह 1 हजार 83 आरोपी आणि 74 वाहनासह एकुण 1 कोटी 41 लाख 12 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये 77 गुन्हे नोंदवून 73 वारस गुन्ह्यासह 8 वाहने जप्त करण्यात आली आहे. यात 77 आरोपीसह 10 लाख 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी करून सेवन करावे. वैध मद्य ‍विक्री करणाऱ्या ढाबामालक आणि त्याठिकाणी अवैध मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. ढाबा मालकाला 40 हजार रूपये आणि मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

आतापर्यंत हॉटेल विघ्नहर्ता भानखेड शिवार, हॉटेल रायबा ढाबा खांडवी, ता. जळगाव जामोद, तसेच हॉटेल साईराज आसलगाव, ता. जळगाव जामोद, हॉटेल गारवा ढाबा, वरवंड, ता. जि. बुलडाणा, हॉटेल विराट ढाबा, बोराखेडी, ता. मोताळा, हॉटेल काकाजी ढाबा, पेठ, ता. चिखली, हॉटेल सत्यम ढाबा, नवघरे शिवार, ता. चिखली, हॉटेल न्यू मुंबई स्वाद ढाबा, नांदुरा, ता. नांदुरा, हॉटेल भारत, भाजी मंडी, लोणार, हॉटेल श्रीयोग, मेहकर फाटा, ता. चिखली, हॉटेल सुरज धाबा, मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा, हॉटेल राजधानी, लोणार, हॉटेल अन्नदाता, मेहकर, हॉटेल पुर्णामाय ढाबा, मानेगाव शिवार, ता. जळगाव जामोद या ढाब्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉटॲप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना परवाना असणे आवश्यक आहे. तसेच ढाबा मालकांनी आपल्या जागेचा वापर अवैध मद्यसेवनासाठी दिल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

000000 








जिल्हास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 18 ते 19 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तर शालेय 14, 17, 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या बुद्धीबळ स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या.

बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनी खेळाडू वृत्ती बाळगून आणि कौशल्यपणाला लावून खेळ खेळावा. खेळाडूंनी उच्च पातळीचा खेळ दाखवून देशाचे, राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन श्री. खंडारे यांनी केले.

या स्पर्धेत जिल्ह्यातून 180 खेळाडू उपस्थित होते. जिल्हास्तर मुले 14, 17, 19 वर्षे वयोगटाच्या स्पर्धा पार पडल्या. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर उपस्थित होते. अनिल इंगळे सूत्रसंचालन करून आभार मानले. स्पर्धेसाठी मुख्य पंच अमोल इंगळे, प्रसाद पत्की, विष्णू राजगुरु आणि विश्वजीत लहाने, आर्बिटर पंचाधिकारी म्हणून गोपाल जाधव यांनी कामगिरी पार पाडली.

सदर स्पर्धेकरीता वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत, ओम राऊत यांनी पुढाकार घेतला.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 14 वर्षे मुले इशांत संदीप घट्टे (बुलडाणा) प्रथम, देवेश सुभाषसिंग चव्हाण (खामगाव) द्वितीय, सोहम सुरेश चव्हाण (मेहकर) तृतीय, राज रामचंद्र पवार (चिखली) चतुर्थ, अश्वजित प्रमोद वानखडे (खामगाव) पाचवा क्रमांक पटकाविला. 17 वर्षे मुले लेख राजेश गोयनका (मलकापूर) प्रथम, आर्यन किशोर मलेकर (बुलडाणा) द्वितीय, अचल अजय जैन (खामगाव) तृतीय, आदित्यनारायण मोहन भादुपोता (मेहकर) चतुर्थ, आयुष गजानन कवडकार (शेगाव) पाचवा क्रमांक पटकाविला. 19 वर्षे मुले यश अजय वाघ (मलकापूर) प्रथम, विनित नितीन तोलंबे (बुलडाणा) द्वितीय, कार्तिक अजय चिपडे (बुलडाणा) तृतीय, गणेश रमेश तेलकर (नांदुरा) चतुर्थ, देवेश दयानंद कुबडे (शेगाव) पाचवा क्रमांक पटकाविला.

00000




जिल्हास्तर शालेय वूशू क्रीडा स्पर्धा संपन्न

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बुलडाणा जिल्हा वूशू असोसिएशनच्या वतीने दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुलामुलींच्या वूशू स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात आल्या.

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना 5 टक्के आरक्षणाची माहिती देण्यात आली. स्पर्धेसाठी वूशू संघटनेचे पदाधिकारी आणि पंच म्हणून अरविंद अंबुसकर, अनिल अंबुसकर, रोशनी अंबुसकर, नियती अंबुसकर, श्वेता अंबुसकर, क्रीडा शिक्षक विशाल सपकाळ उपस्थित होते.

राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. सदर स्पर्धेकरीता वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत यांनी पुढाकार घेतला.

00000

DIO BULDANA NEWS 19.11.2022




 जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती, राष्ट्रीय एकात्मता साजरा

बुलडाणा, दि. १९ : जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.  
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. गिते यांनी उपस्थितांना एकात्मता दिवसाची प्रतिज्ञा दिली. जयंती कार्यक्रमाला नायब तहसीलदार संजय बंगाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
०००००

Friday 18 November 2022

DIO BULDANA NEWS 18.11.2022

 






शालेय फुटबॉल स्पर्धेत अल्पसंख्याक शाळांचा सहभागात वाढ

-जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव

बुलडाणा, दि. 18 : कोरोनाच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमधील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अल्पसंख्याक शाळांचा सहभाग वाढला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने दि. 16 व 17 नोव्हेंबर 2022 दरम्यान जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, तालुका क्रीडा अधिकारी बी. के. घटाळे, तालुका क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव एन. आर. वानखेडे, फुटबॉल पंच शेख अहेमद शेख सुलेमान, फव्वाद अहमद, राहुल औशलकर, डॉ. राजपूत, डॉ. अनिस उपस्थित होते.

स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघ सहभागी झाले. उद्घाटनीय सामना सहकार विद्या मंदिर, बुलडाणा व सेंट अन्स इं‍ग्लिश स्कुल, खामगाव यांच्यात झाला. 14 वर्षाआतील अंजूमन हायस्कूल, खामगाव विरुद्ध यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर यांच्यात होऊन, अंजूमन हायस्कूल खामगाव या अल्पसंख्याक शाळेने विजय संपादन केला. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस क्रीडा प्रभारी नसिम मिर्झा, रविंद्र गणेशे, दिलीप हिवाळे, हेड कॉन्स्टेबल नरेश रेड्डी आदी उपस्थित होते.

स्पर्धेत 14 वर्षे मुलेमध्ये अंजुमन हायस्कुल, खामगाव विजयी, उपविजयी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल, देऊळगाव राजा, 17 वर्षे मुलेमध्ये सहकार विद्या मंदिर, बुलडाणा विजयी, उपविजयी यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, 19 वर्षे मुलेमध्ये सहकार विद्या मंदिर, बुलडाणा  विजयी, उपविजयी यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, 14 वर्षे मुलीमध्ये प्रबोधन विद्यालय, बुलडाणा विजयी, उपविजयी यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, 17 वर्षे मुलीमध्ये राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई ता. चिखली विजयी, उपविजयी शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा, 19 वर्षे मुलीमध्ये राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई ता. चिखली संघ विजयी ठरले आहे.

स्पर्धेला पंच म्हणून फव्वाद अहेमद, शेख मोहसीन शेख महेमूद, शेख वाजीद, विजय चव्हाण, जावेद, दिपशिखा हिवाळे, साक्षी हिवाळे, शकील अहमद यांनी काम पाहिले.  अनिल इंगळे यांनी सुत्रसंचालन केले. स्पर्धेकरीता वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत यांनी पुढाकार घेतला.

00000

जात वैधता प्रमाणपत्रासाठी मोहिमेत सहभागी व्हावे

* जात पडताळणी समितीचे आवाहन

            बुलडाणा, दि. 18 : जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम 'मंडणगड पॅटर्न' करीता पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जात पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा, निवडणूक व इतर संविधानिक लाभ आरक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करुन घेताना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे विहित कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी, पालकांकडून विहित कालमर्यादेत समितीकडे अर्ज सादर केले नसल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळी विद्यार्थी आणि पालकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणीना सामोरे जावे लागते. विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यासाठी 'मंडणगड पॅटर्न' ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

अकरावी आणि बारावीतील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबत सन २०२२-२०२३ या सत्रामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे अर्ज भरावे. त्यासोबत १५-ए फॉर्मवर प्राचार्यांनी स्वाक्षरी घेऊन, बोनाफाईड प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वडील, आजोबा, पणजोबा यांचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम उतारा प्रत, वडील आजोबा, पणजोबा अशिक्षित असल्यास त्याबाबतचे शपथपत्र, त्यानंतर वडील, आजोबा, पणजोबाचे रक्तनाते संबंधातील पुराव्यासह सादर करावी. तसेच जन्म, मृत्यू नोंदवही उतारा प्रत, आजोबा, पणजोबा यांची जात नमुद आहे, जसे ग्राम नोंदवही कोतवाल बुक नक्कलची प्रत, राष्ट्रीयत्व नोंदवही मानीव दिनांकापूर्वीचे जात नोंद असलेले रहिवासी पुरावे सादर करुन परिपूर्ण अर्ज महाविद्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

00000




जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 18 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा बॉक्सिंग एकविध खेळ संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने दि. 16 आणि 17 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात पडल्या.

यात दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी 14, 17, 19 वर्षाआतील मुलांच्या, तर दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी 14, 17, 19 वर्षाआतील मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून बॉक्सर मुलांचा सहभाग लाभला. दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील मुलींनी सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हा बॉक्सिंग एकविध खेळ संघटनेचे सचिव राज सोलंकी यांनी मुख्य पंच, तर संकेत धामंदे, सुशीलकुमार झणके, मोहम्मद सुफीयान, राहुल गिते, कुणाल जुंबळ, सुमित खंडारे, निशांत आराख, संकेत सरोदे, डॉ. तृप्ती काटेकर, तेजस्विनी पाखरे, आरती खंडागळे, प्रेरणा मधाडे, दिपाली सुरवाडे, निकिता सोनुने, जयश्री शेटे यांनी सहायक म्हणून कामकाज पाहिले.

वैद्यकीय पथकातील सामान्य रूग्णालयाच्या डॉ. साक्षी पडगीलवार, डॉ. कल्याणी आकाशे यांनी प्राथमिक वैद्यकीय उपचाराचे कर्तव्य पार पाडले. बॉक्सिंग स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा पार पडल्या.

00000

Thursday 17 November 2022

DIO BULDANA NEWS 17.11.2022

 

राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांचा दौरा

बुलडाणा, दि. 17 : राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

डॉ. जोशी यांच्या दौऱ्यानुसार शनिवार, दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता जळगाव जामोद येथे आगमन होईल. त्यानंतर ते स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. रात्री 8 वाजता जळगाव जामोद येथून जळगावकडे प्रयाण करतील.

00000

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा दौरा

बुलडाणा, दि. 17 : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

श्री. बघेल यांच्या दौऱ्यानुसार शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2.50 वाजता शेगाव येथे आगमन होईल. त्यानंतर ते दुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंत भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 4.35 वाजता हेलीकॉप्टरने अकोलाकडे प्रयाण करतील.

00000

फिट इंडिया मोहिमेच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 17 : फिट इंडिया मोहिम सन 2019 पासन सुरु करण्यात आली आहे.  शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ, शारिरिक तंदरुस्तीबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय खेळ प्राधीकरण, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयमार्फत फीट इंडिया मोहिमेंतर्गत राष्ट्रीयस्तरावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दि. 22 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने 3 कोटी 25 लाख रक्कमेची प्रश्नमंजुषा स्पर्धा स्टार स्पोर्टस् वाहिनीवर थेट प्रक्षेपित होणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी fitindia.nta.ac.in या साईटला भेट द्यावी. सदर मोहिमेसाठी भारतीय खेळ प्राधिकरणमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. याबाबतीत भारतीय खेळ प्राधीकरणाचे सहाय्यक संचालक सचिन घयाळ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच काही अडचणी येत असल्यास अधिक माहितीकरीता भारतीय खेळ प्राधीकरण कॉल सेंटर नंबर 18002025155, 18002585255, एनटीए हेल्प डेस्क : 011-69227700 किंवा fitindia@nta.ac.in वर ईमेल करता येईल.

नॅशनल विनर शाळेकरीता 25 ाख रूपये, विद्यार्थ्यांकरीता 2 ाख 50 रूपये, नॅशनल फर्स्ट रनर अप शाळेकरिता 15 ाख रूपये, विद्यार्थ्यांकरीता 1 लाख 50 हजार रुपये, नॅशनल सेकंड रनर अप शाळेकरीता 10 ाख रुपये, विद्यार्थ्यांकरीता 1 ाख रुपये, स्टेट चॅम्पीनशिप, स्टेट विनर शाळेकरीता 2 लाख 50 हजार रुपये व विद्यार्थ्यांकरीता 25 हजार रूपये, स्टेट फर्स्ट रनर अप, शाळेकरीता 1 लाख, विद्यार्थ्यांकरीता 10 हजार रुपये, स्टेट सेकंड रनर अप, शाळेकरीता 50 हजार रुपये, विद्यार्थ्यांकरीता 5 हजार रूपये,  तसेच NTA Qualifiers after Preliminary Round शाळेकरिता 15 हजार रुपये विद्यार्थ्यांकरीता 2 हजार रूपये, असे एकुण बक्षीसांची रक्कम 3 कोटी 25 लाख रूपये केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन प्रवेश नोंदवावा. नोंदणीचा अहवाल दि. 22 नोव्हेंबर 2022 पुर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी केले आहे.

00000

घरचे सोयाबीन बियाणे मोहि

कापणीपश्चात बियाणे साठवणुकीची काळजी घ्याव

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यावर्षीच्या खरीपमध्ये व्यापक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे मोहिराबविण्यात आली. सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीपश्चात सोयाबीनच्या बियाण्यांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

यावर्षी खरीप हंगमात सोयाबीन काढणीवेळी पावसामुळे सोयाबीन  बियाणे उत्पादन व गुणवत्‍तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप २०२३ मध्ये सावर्जनिक, खाजगी क्षेत्रामार्फत बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध होणाऱ्या प्रमाणित सोयाबीन बियाण्याचे प्रमाण कमी असणार आहे. त्यासाठी उत्पादित सोयाबीन बियाणेची योग्य पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक आहे. जेणेकरून सदर बियाणे खरीप २०२३ करीता पेरणीसाठी उपलब्ध होईल. त्यासाठी स्थानिक पातळीवर  शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनची कापणीनंतर बियाणे साठवणूक आणि  काळजीबाबत जागृती आवश्यक आहे.

सद्यस्थितीत खरीप २०२३ करीता बिजोत्पादनासाठी उत्पादित होणाऱ्या सोयाबीन बियाण्याची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी पश्चात काळजी घ्याव. यासाठी सोयाबीन बियाणे वाळवताना त्याचा  मोठा ढीग करू ये. बियाणे पातळ थरावर वाळवावे. ज्यामुळे बियाण्यामध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यामुळे बियाण्याच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. बियाणे मळणी केल्यानंतर थेट पोत्यामध्ये भरू नये. तत्पूर्वी दोन ते तीन  दिवस ताडपत्रीवर किंवा स्वच्छ खळे तयार करून सावलीमध्ये वाळवावे. यादरम्यान  बियाण्यावर हात फिरवून फेरपालट करावी. बियाणे वाळल्यानंतर बियाणे चाळणीद्वारे गाळणी करून बियाण्यात काडीकचरा आणि मातीचे खडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूटच्या बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये  साधारणपणे ६० किलोपर्यत बियाणे साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवणूक करण्यात येऊ नये. जेणेकरून बियाण्याची वाहतूक करताना हाताळणी योग्यप्रकारे होऊन बियाण्यास इजा होणार नाही. बियाणे घरी साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्याची थप्पी ७ पोत्यापेक्षा उंच जाणार नाही, याची दक्षता  घ्यावी. तसेच  बियाणे  साठवणूक दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करू नये. बियाणे साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते अंथरून त्यावर बियाण्याची साठवण करावी.

बियाण्याचे पोते सिलिंग करण्यापूर्वी बियाण्याची प्रत चांगली असल्याची खात्री करून घ्यावी. प्रत्येक पोते तपासणी करून ज्या पोत्यामध्ये काडीकचरा, दगडमाती, काळपट व ओलसर बियाणे आढळून आल्यास त्या पोत्याचे सिलिंग करू नये. बीजोत्पादनासाठी उत्पादित केलेले प्रमाणित व पायाभूत बियाणे पूर्णपणे उत्पादकांचे शेतावर मळणी झाल्यानतर व वाळविल्यानंतर गुणवत्तापूर्ण बियाण्याची गोदामामध्ये साठवणक करावी. शेतकऱ्यांना स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबीनची ३ वेळा उगवणक्षमता चाचणी करूनच पेरणी करावी.

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे साठवणुकीदरम्यान बियाणे साठवणूक करण्यात येत असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी गळणार नाही, याची खात्री करूनच बियाण्याची साठवण करावी. तसेच अवकाळी येणाऱ्या वादळी पावसापासून बियाणे खराब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बियाणे व खते यांची एकाच ठिकाणी साठवणूक करू नये. साठवणुकीच्या ठिकाणी सोयाबीन बियाणे थप्पीची उंची ७ फुटपेक्षा जास्त ठेवू नये. प्रत्येक बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी  पेरणीपूर्वी उगवणक्षमता चाचणी करावी. सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे  त्याची कमीत कमी हाताळणी करवी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी कळविले आहे.

0000

अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा

*बचतगटांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3 लाख 50 हजार रुपयांच्या मर्यादेत 9 ते 18 अश्‍वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची कल्टिवेटर, रोटॅव्हेटर, ट्रेलर ही उपसाधने पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनामध्ये वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्याबाबत सुधारणा करण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3.50 लाख रूपयांच्या मर्यादेत 90 टक्के शासन अनुदान आणि 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गट हिस्सा याप्रमाणे 9 ते 18 अश्‍वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान 9 ते 18 अश्‍वशक्तीपेक्षा जास्त अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची किंमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरीक्त जादाची रक्कम बचत गटांनी स्वत: खर्च करावी लागणार आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3.50 लाख रुपये राहिल. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच 3.15 लाख रुपये शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचतगटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजे  35 हजार रूपये इतका असेल.

सदर योजनेंतर्गत लाभार्थी बचतगटाची निवड झाल्यानंतर बचतगटाने निर्धारीत केलेल्या प्रमाणकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करावी लागणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातरजमा करुन लाभार्थी बचतगटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता बचतगटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचतगटांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचतगटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

          शासनाच्या निर्णयानुसार 9 ते 18 अश्‍वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3 लाख 50 हजार ठरविण्यात आली आहे. सदर रक्कमेपैकी अनुदानाची रक्कम कमाल किंमतीच्या 90 टक्के म्हणजेच 3 लाख 15 हजार रूपये राहि. भारत सरकारने निर्धारीत केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टिट्यट यांनी टेस्ट करुन जाहिर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असाव.

या योजनेतील लाभार्थ्यांचे निकष ठरविण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य व अध्यक्ष हे राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचतगटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसहाय्यतबचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहिल. स्वयंसहाय्यता बचतगटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्व हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांनी या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्‍वशक्तीपेक्षा जादा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचतगटाने स्वत: खर्च करावी लागणार आहे.

यासाठी इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचतगटांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करावे. अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, त्रिशरण चौक, बुलडाणा येथे सादर करावेत. सोबत बचतगट नोंदणीबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, बचतगटामधील मुळ सदस्यांची यादी, घटना व नियमावली प्रत, बचतगटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र जोडावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

00000

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत बुलडाणा जिल्हा अव्वल

बुलडाणा, दि. 17 : स्थानिक, स्वदेशी, गावरान, रानमेवा, वनउपज, सेंद्रिय, पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्रपुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही योजना कृषि विभागातर्फे राबविली जात आहे. या योजनेत बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल ठरला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उत्तम पर्याय आहे. पोटभर अन्नाबरोबरच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांची मागणी वाढली आहे.  नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तर वृद्धीसाठी योजनेतून दिली जात असून संबंधित जिल्ह्याच्या एक जिल्हा एक उत्पादनाचीआधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थसहाय्य देण्यात येत आहे. वैयक्तिक सुक्ष्म अन्नप्रक्रीया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के, कमाल 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मूल्य साखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के, कमाल ३ कोटी अर्थ सहाय्य देय आहे.

या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत मंजूर प्रकरणांमध्ये राज्याने पहिले स्थान पटकाविले आहे. माहे ऑक्टोबर २०२२ अखेरीस वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत राज्यात २ हजारपेक्षा जास्त अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले आहेत. देशात २ हजाराचा टप्पा पार करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य ठरले आहे.

सदर योजनेंतर्गत जिल्ह्यात 773 अर्ज प्राप्त झाले असून यातील 63 प्रस्तावांना कर्ज मंजूर होऊन प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. तसेच 233 प्रस्ताव कर्ज मंजुरीसाठी बँकांकडे पाठविण्यात आले आहे.

यात उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था तसेच गट लाभार्थीं मध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यतागट, सहकारी, शासकीय संस्था यांनी कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे, ते बँकेकडे सादर करणे, विविध नोंदणीसाठी कृषि विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत हाताळणी सहाय्य केले जात आहे.

एका लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल. योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी pmfme.mofpi.gov.in आणि krishi.maharashtra.gov.in तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुकांनी ग्रामीण भागासाठी nrlm.gov.in या संकेतस्थळावरील एनआरएलएम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी nulm.gov.in या संकेतस्थळावरील एनयूएलएम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी कृषि कार्यालये, बॅंक, पीएमएफएमई योजनेतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान

*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपूर वाया जाऊ नये, तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा, यासाठी 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या आकारमाननिहाय अनुदान देण्यात येणार आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी 15x15x3 मीटरसाठी 28 हजार 275 रूपये, 20x15x3 मीटरसाठी 31 हजार 598 रूपये, 20x20x3 मीटरसाठी 41 हजार 218 रूपये, 25x20x3 मीटरसाठी 49 हजार 671 रूपये, 25x25x3 मीटरसाठी 58 हजार 700 रूपये, 30x25x3 मीटर साठी 67 हजार 728 रूपये, 30x30x3 मीटरसाठी 75 हजार रूपये कमाल अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यानी शेततळे अस्तरीकरणासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या माहितीसाठी जवळच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेतून अनुदान

*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेस राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यात 3.25 मीटर उंचीचे शेटनेट गृह उभारण्यासाठी 475 रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे 1 हजार चौरस मीटर साठी 4 लाख 75 हजार रूपये खर्च येणार आहे. यासाठी 2 लाख 37 हजार 500 रूपये अनुदान देण्यात येणार आहे. एक हजार चौरस मीटरच्या प्लास्टिक टनेल साठी 60 रूपये प्रती चौरस मीटरप्रमाणे 60 हजार खर्च येणार आहे. यासाठी 30 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सात हजार 600 रुपयांच्या पावर नॅपसॅक स्प्रेअरसाठी तीन हजार 800 रूपये अनुदान देण्यात येणार आहे. प्लास्टिक क्रेटससाठी 200 रुपयांप्रमाणे 62 क्रेटससाठी 12 हजार 400 रूपये खर्च  येणार आहे. यासाठी 6 हजार 200 रूपये अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यानी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका या घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या माहितीसाठी जवळच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

00000