Thursday 26 March 2020

कोरोना अलर्ट : 26.3.2020

कोरोना अलर्ट :
                              जिल्ह्यातील 64 नागरिक घरीच निरीक्षणाखाली
  • होम क्वारंटाईनच्या संख्येत तीन जणांची वाढ
बुलडाणा, दि. 26 :  कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील 64 नागरिक त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणात ठेवण्यात आलेले आहे. 
     घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये तीन नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 25 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या  भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 26 मार्च 2020 रोजी 3 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 64 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अजून रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जिल्हयात आतापर्यंत 84 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 02 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
***********
जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर
  • जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले रक्तदान
  • जिल्हाधिकाऱ्यांसह 34 नागरिकांनी दिले रक्त
बुलडाणा, दि. 26 :  कोरेाना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने रक्तदान शिबिर घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आज 26 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी रक्तदान करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले. या शिबिरात 34 नागरिकांनी रक्तदान केले.
      कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. या शिबिरात सहभाग घेवून रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी खरच समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद कार्यालयात 27 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेवून रक्तदान करावे, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                        *****
वाळू लिलावाचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध
बुलडाणा, दि. 26 :  बुलडाणा जिल्ह्याचा वाळू/रेती लिलावाचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल (DSR) तयार करण्यात आला आहे. सदर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तरी इच्छूकांनी सदर संकेतस्थळाला भेट देवून अहवालाचे अवलोकन करावे, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                

जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील


  • किराणा, दुध, भाजीपाला, फळे व धान्य दुकान, बेकरी यांचा समावेश
बुलडाणा, दि. 26 :  कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा त्यामध्ये किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दुध यांची दुकाने वगळता अन्य दुकाने संचारबंदी काळात बंद आहेत. मात्र यामध्ये जिवनावश्यक वस्तूंच्या दुकांनामधील गर्दी अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही. कोरोना आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे आवश्यक आहे.
     जिल्ह्यातील सर्व किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दूध यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तसेच त्याठिकाणी गर्दी होवू याबाबत दक्षता घ्यावी. फळांची व भाजीपाल्यांची दुकाने 100 मीटर अंतराने लावण्यात यावीत. दुकानदारांनी ग्राहकांसाठी प्रत्येक दुकानासमोर 1 मीटर अंतरावर ग्राहक उभे राहतील यादृष्टीने नियोजन करावे. तसेच  ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकारी  व नगरपरिषद क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी  आदेशाचे तंतोतंत पालन करावे व चुन्याने उभे राहण्याची जागा चिन्हांकित करावी, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशीत केले आहे.

Tuesday 24 March 2020

कोरोना अलर्ट : 24.3.2020



जिल्ह्यातील 9 डाकघर वगळता अन्य उपडाकघर व शाखा डाकघर बंद
·        31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
बुलडाणा, दि.24 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बुलडाणा विभागातील केवळ 9 डाक कार्यालय सुरू राहणार आहे. अन्य इतर सर्व उपडाकघर व शाखा डाकघर 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार आहेत, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन अधिक्षक डाकघर, बुलडाणा यांनी केले आहे.
   या सुरू असलेल्या नऊ डाकघर कार्यालयांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. या संपर्क क्रमांकावर ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेसाठी संपर्क करावा. सुरू असलेली नऊ डाकघरे संपर्क क्रमांकांसह पुढील प्रमाणे : बुलडाणा प्रधन डाकघर संपर्क क्रमांक 07262-242508, खामगांव प्रधान डाकघर संपर्क क्रमांक 07263- 252106, चिखली डाकघर संपर्क क्रमांक 07264-242061, देऊळगांव राजा डाकघर संपर्क क्रमांक 07261-232001, जळगांव जामोद डाकघर संपर्क क्रमांक 07266-221422, मलकापूर डाकघर संपर्क क्रमांक 07267-222001, मेहकर डाकघर संपर्क क्रमांक 07268-224522, नांदुरा डाकघर संपर्क क्रमांक 07265-221030, शेगांव डाकघर संपर्क क्रमांक 07265-252062 तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
                                                            ******* 
कोरोना अलर्ट :
जिल्ह्यातील एका संशयीत व्यक्तीचा अहवाल ‘निगेटीव्ह’
·        परदेशातून आलेले 57 नागरिक ‘होम क्वारंटाईन’
बुलडाणा, दि. 24 :  कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. बुलडाणा येथील कक्षामध्ये दाखल दोन संशयीत व्यक्तीपैंकी एकाचा नागपूर येथील प्रयोगशाळेतून आलेला अहवाल निगेटीव्ह आला आहे.
     घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये एका नागरिकाची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 23 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 56 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 24 मार्च 2020 रोजी 1 नवीन नागरिकाला त्याच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 57 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दाखल नागरिकाचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या संशयीताच्या रिपोर्ट निगेटीव्ह आला असून अन्य एकाचा नमुना नागपूरला पाठविलेला आहे.  जिल्हयात आतापर्यंत 77 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
                                                                        ************
जिल्ह्यातील अत्यावश्यक वगळता सर्व उद्योग व कारखाने 31 मार्चपर्यंत बंद
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·        गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 24 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांव्यतिरिक्त  अन्य सर्व उद्योग व कारखाने आजपासून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशातून औषधे निर्माण करणाऱ्या तसेच वैद्यकीय सेवेकरीता साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय, सॅनीटायझर, साबण, जंतूनाशक हॅन्डवाश तयार करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय, कृषि उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, दालमील, ऑईलमिल, कारखाने, उद्योग व व्यवसाय आणि अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कारखाने, उद्योग व्यवसाय यांना वगळण्यात आले आहे.  
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी टाळण्याच्या उद्देशाने  उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                        ******
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी
उपलब्ध मनुष्यबळाची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत
·        जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचे आदेश
·        आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना अधिकार
बुलडाणा, दि. 24 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळाची सेवा अधिग्रहीत करता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील डॉक्टर्स, व्यक्ती/ समुह, संस्था / प्राधिकरणे आदीमधील उपलब्ध असलेली सेवा, साधनसामुग्री, अधिकारी / कर्मचारी, उपलब्ध मनुष्यबळ यांची सेवा कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे.   
    उपरोक्त नमूद सेवा अधिग्रहीत केलेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशीत केल्यास तातडीने उपस्थित व्हावे व अनुपालन करण्यात यावे. तसा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील विविध कलमान्वये शिक्षा प्रस्तावित करण्यात येवून भारतीय दंडसंहीता 1860 मधील कलम 188 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये कळविले आहे.
*********

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी..!

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी..!
·        आदेश 31 मार्चपर्यंत लागू
·        जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद
·        आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये
·        जिल्ह्याच्या सर्व सीमा सील
बुलडाणा, दि.24 : राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नागरी भागासह ग्रामीण भागात महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 23 मार्च 2020 च्या आदेशान्वये संचारबंदी 31 मार्च 2020 पर्यंत लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात यापूर्वीच  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यात 31 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी काढले आहेत.
    नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.  किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने 100  टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असणारे हातावर शिक्का असणारे व्यक्ती यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने अफवा, अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतिक्रीया व्हॉट्सॲप, ट्विटर व फेसबुक आदी कोणत्याही पद्धतीने प्रसारीत करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी स्वत: नियमांचे पालन करावे. कुणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिला आहे.
  आदेश लागू नसणाऱ्यांबाबत आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. तथापी सेवा देताना 2 व्यक्तींपेक्षा अधिक संख्या नसावी. तसेच ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील आणि कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तींमध्ये किमान 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद आहे.
या आदेशानुसार ही असणार मनाई
·        या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
·        जिल्ह्याच्या सर्व सीमा अत्यावश्यक सेवा व वस्तुंशिवाय इतर सर्व बाबींसाठी बंदीस्त करण्यात येत आहे.
·        सर्व सार्वजनिक वाहतुक सेवा, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, टॅक्सी, ऑटो रिक्षा आदी बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तुकरीता टॅक्सी व ऑटो रिक्षा यांना केवळ एकच व्यक्तीला परवानगी असणार आहे.
·        सर्व खाजगी दुचाकी, तिन चाकी, चार चाकी वाहनांना जिल्ह्यामध्ये परिभ्रमणास बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तु , वैद्यकीय सेवांकरीता चालकाशिवाय केवळ एका व्यक्तीला परवानगी असणार आहे.
·        सर्व खाजगी बसेस यांचे परिभ्रमणास संपूर्णत: बंदी असणार आहे.
·        सर्व मंदीर, मस्जीद, दर्गे, चर्च, गुरूद्वारा आदी धार्मिक स्थळे बंद करण्यात येत आहे.
हा आदेश यांना लागू होणार नाही
·        शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना यातील अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी.
·         शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, धान्य दुकाने, भाजीपाला व फळे विक्रेते, बेकरी, औषधालय, दवाखाने, औषधालय, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण, अंडी, मांस, मासे, शेती उत्पादाची वाहतुक व तत्सम ठिकाणे.
·         प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये.
·         पोस्ट ऑफीसेस, कुरीअर सेवा, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, जि.प व न.प चे पिण्याचे पाणी पुरवठा, सफाई व अग्नीशमन कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी, तसेच सर्व प्रकारचे होम डिलीवरी करणारे कर्मचारी (भोजनाचे डब्बे, ऑनलाईन शॉपींग कंपन्याची डिलीवरी करणारे कर्मचारी)
·         जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक आदी वाहने) या वाहनांसोबत बोर्ड/ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
·         शासकीय / निमसरकारी/ सरकारी कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.
·        सर्व हॉटेल्स/ लॉज यांना तेथे वास्तव असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक ती खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनवुन देण्यास परवानगी राहील.
·        कोव्हीड -19 ला रोखण्याकरीता पुर्वपरवानगीने अत्यावश्यक वस्तु व सेवा पुरवठा करणाऱ्या खाजगी संस्था.

Monday 23 March 2020

जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णाला हाताळण्याची ‘मॉक ड्रील’


·        मॉक ड्रील असल्याने कुणीही अफवा पसरवू नये
·        जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांचे आवाहन
बुलडाणा, दि.23 : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात 20 मिनीटांची ‘मॉक ड्रील’(प्रात्याक्षिक) 22 मार्च 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता घेण्यात आली.  प्रात्याक्षिकात कोरोनाग्रस्त  रूग्णाला रूग्णालयातील आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात आणून त्यावर उपचार सुरू करण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. रूग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात आली. अशी ती मॉक ड्रील आहे.  
   ही केवळ मॉक ड्रील असून अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन किती सज्ज आहे, हे तपासण्यासाठी  मॉक ड्रील घेण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरली आहे. तरी ही केवळ आरोग्य प्रशासनाच्या तयारीचा भाग म्हणून घेण्यात आलेले प्रात्याक्षिक आहे. कुणीही मॉक ड्रीलमधून रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरवू नये. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवू शकते. या प्रात्याक्षिकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनीही सहभाग घेतला. तसेच डॉ. वासेकर व त्यांची चमू या प्रात्याक्षिकात सहभागी झाली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले आहे.  
                                                           ***********
                        दिव्यांग तपासणीचे 25 मार्च रोजी होणारे शिबिर रद्द
बुलडाणा, दि.23 : जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. चौथ्या बुधवारला 25 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे त्या दिवशीचे अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण/मतिमंद, कान, नाक घसा संबंधीत दिव्यांग तपासणीबाबतचे शिबिर रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील सदर अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण/ मतिमंद, व कान-नाक-घसा संबधित दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
                                                       *********
कोरोना अलर्ट :
जिल्ह्यात परदेशातून आलेले 56 नागरिक ‘होम क्वारंटाईन’
·        बुलडाणा आयसोलेशन कक्षातील संशयतीच्या रिपोर्टची प्रतीक्षा
बुलडाणा, दि. 23 :  कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.  त्यामध्ये एका नागरिकाची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 22 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 55 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 23 मार्च 2020 रोजी 1 नवीन नागरिकाला त्याच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 56 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या नागरिकाचा स्वॅब व रक्त नमुने नागपूर प्रयोगशाळेत  तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या संशयीताच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.  जिल्हयात आतापर्यंत 73 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
***********
नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर
·        मेहकर तालुक्यातील 3, सिंदखेड राजा तालुक्यातील 3 गावांचा समावेश
बुलडाणा, दि‍.23 - जि‍ल्हा परिषद  बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2019-2020 मध्ये समाविष्ट असलेल्या मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यातील काही गावांसाठी  नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील उकळी, सावत्रा व मोहखेड या  गावामध्ये पाणी टंचाई नि‍वाणार्थ  नळ योजना विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहेया उपाययोजनेची अंदाजपत्रकीय कि‍मत अनुक्रमे 6 लक्ष 30 हजार 180, 7 लक्ष 17 हजार 390 रूपये, 1 लक्ष 3 हजार 490 रूपये आहे. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी टाका, दत्तापूर व हिवरखेड पूर्णा येथे नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. या कामांची अंदाजपत्रकीय किंमत अनुक्रमे 3 लाख 89 हजार 440, 1 लक्ष 25 हजार 710 व 2 लक्ष 44 हजार 940 इतकी आहे.
   मंजूर नळ योजना विशेष दुरूस्ती ही किमान खर्चाची असल्याबाबत तसेच सदर मंजूर कामे वेळीच पूर्ण होऊन प्रत्यक्ष चालु टंचाई कालावधीत सदर योजनेतून लाभार्थ्यांना पाणी उपलब्ध होऊ शकेल, याची खात्री कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा व संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उप विभागीय अभियंता / अधिकारी यांनी केलयानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल.  या कामांमुळे सदर गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
                                                                                  ******
जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन
बुलडाणा, दि. 23 :-   शहिद भगतसिंह, शहिद सुखदेव, शहिद राजगुरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज 23 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पुरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सुध्दा शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
                                                                        ****
3 Attachments

Sunday 22 March 2020

जिल्ह्यात घरीच निरीक्षणाखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या आठने वाढली


कोरोना अलर्ट :

जिल्ह्यात घरीच निरीक्षणाखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या आठने वाढली
·        आतापर्यंत एकूण 55 नागरिक निरीक्षणाखाली
·        बुलडाणा आयसोलेशन कक्षात एक संशयीत दाखल
बुलडाणा, दि. 21 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम लागू केला आहे. तसेच आपत्कालीन कायदाही लागू करण्यात आला आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.  त्यामध्ये आठ नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 21 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 47 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 22 मार्च 2020 रोजी 8 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 55 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या नागरिकाचा स्वॅब व रक्त नमुने नागपूर प्रयोगशाळेत  तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.  जिल्हयात आतापर्यंत 72 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
                                                                                    ***********
कोरोनाशी लढाई…. एकजुटीने लढूया…!
·        जनता कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद
·        शहरी भागासाह ग्रामीण भागात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पाळला बंद
बुलडाणा, दि. 21 :  जिवघेण्या कोरोना आजाराने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. हे संकट आपल्या देशातही हळूहळू पाय पसरू लागले आहे. या संकटाचा धैर्याने व एकजुटीने सामना करण्यासाठी आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही 100 टक्के जनता कर्फ्यु पाळण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांनीही आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवत स्वयंस्फुर्तीने पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावरून कोरोनाशी लढाई आपण एकजुटीने लढतोय.. याचा प्रत्यय आला.
    आज 22 मार्च रोजी सकाळपासूनच जनता कर्फ्युमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला. बुलडाणा शहरात वर्दळीचे जयस्तंभ, संगम, कारंजा, एसबीआय चौक, बसस्थानक परिसर, बाजार लाईन निर्मनुष्य होते. खामगांव, मलकापूर, मेहकर, दे.राजा, सिं.राजा, लोणार, नांदुरा, शेगांव, जळगांव जामोद, संग्रामपूर व मोताळा शहरातही शुकशुकाट होता. चिखली शहरात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे स्वत: फिरून बंदमध्ये सहभागी नागरिकांचे अभिनंदन करीत होते व आवाहन करीत होते.  
   ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूरांनीही आपले कामे बंद ठेवली. कुणीही शेतात गेले नाही. सर्वांनी या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग देण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतमजूर महिलांनीसुद्धा कामाला जायला नकार दिला. कामगारांनीही घरीच राहून या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने, व्यवसाय बंद ठेवून संचारबंदी पाळली.  सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग दिल्यामुळे 100 टक्के जनता संचारबंदी यशस्वी झाली. पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून ते स्वत:, त्यांचे नातेवाईक यांची सुरक्षीतता होईल, असे आवाहन चिखली शहरात दौऱ्याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले. या बंदच्या यशस्वीतेमुळे कोरोनाशी लढाई लढण्यास जनता सज्ज झाली असल्याचे निदर्शनास आले.
                                                                        *****
सेवानिवृत्तीधारकांच्या अडचणी दुरध्वनीवरच सोडविण्यात येतील
·        सेवानिवृत्तीधारकांनी कोषागार कार्यालयात येण्याची गरज नाही
·        जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 22 :  जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तीवेतनधारकांनी सध्या पसरत चाललेल्या कोव्हिड -19 आजाराचा धोका लक्षात घेता, निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या शंका व अडचणी यांच्या संदर्भात कोषागार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नाही.  त्यांनी आपल्या शंका व अडचणी यांच्या संदर्भात अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्या दूरध्वनी क्र ०७२६२ - २४५५१५ व भ्रमणध्वनी क्रमांक- 9822897805 या क्रमांकावर किंवा ई-मेल - to.buldhana @ zillamahakosh या ई-मेल आय डी वर संपर्क साधावा. कृपया प्रत्यक्ष वैयक्तिक भेटी टाळून दूरध्वनी आणि ई-मेल संपर्काचा सुरक्षित पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
                                                                                    ******
  

DIO NEWS BULDANA 22.3.2020,1


जिल्ह्यातील सर्व बार, मद्य विक्री  31 मार्चपर्यंत बंद
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·        गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 22 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बार व रेस्टॉरंट, देशी दारू किरकोळ विक्री, विदेशी दारू विक्री, बार, क्लब आजपासून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमी संपर्क यायला पाहिजे. त्यानुसार सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता सर्व बार, मद्यविक्री  बंद करण्यात आली आहे.
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे.   साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी टाळण्याच्या उद्देशाने  उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                        +++++
जिल्ह्यातील सर्व  पानटपरी व तंबाखूजन्य पदार्थ विक्री दुकाने 31 मार्चपर्यंत बंद
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·        गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 22 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापना तसेच ज्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ, पाने, मावा, सुगंधी सुपारी व तत्सम खाण्याचे, चघळण्याचे पदार्थ विक्री होतात अशा सर्व पानटपरी व दुकाने आजपासून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बंदमधून अत्यावश्यक किराणा सामान, दुध, भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय, पेट्रोल पंप यांना वगळण्यात आले आहे.  
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे.   साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी टाळण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                     **********************
                                                           

Friday 20 March 2020

‘कोरोना’चे संकट सर्व मिळून पिटाळून लावूया - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे


·        22 मार्च रोजीच्या ‘जनता कर्फ्यु’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे
·        मोर्चे, आंदोलने करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार
·        सॅनीटायझर, मास्कची साठेबाजी करू नये
·        लग्न समारंभ पुढे ढकलावे, नागरिकांनी सहकार्य करावे
बुलडाणा, दि. 19 : देश सध्या कोरोना विषाणूशी लढाई लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. हे कोरोनाचे संकट सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देत पिटाळून लावायचे आहे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.
   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, सर्व नागरिकांनी येत्या रविवार, 22 मार्च 2020 रोजी या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे. जनतेनी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत हा जनता कर्फ्यु राहणार आहे. नागरिकांनी स्वत:हून घरातच थांबावे. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे.  यादिवशी सायंकाळी नागरिकांनी घराबाहेर येवून कोरोना विषाणू लढाईत उतरलेल्या डॉक्टर्स, नर्सेसचा आत्मबळ वाढविण्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करावे. भविष्यात गरज पडल्यास शासकीय रूग्णालयांसोबत खाजगी रूग्णालयांमध्येही आरक्षण ठेवण्यात येणार आहे. याबाबत आएमए या संघटनेची नुकतीच बैठक घेण्यात आली असून सर्व डॉक्टर्संनी सहमती दर्शविली आहे.
   ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोना विषाणूबाबत काय करावे ? व काय करू नये? यासंदर्भात फलक प्रत्येक खाजगी रूग्णालयाबाहेर व औषध दुकानाबाहेर लावण्यात यावेत. सॅनीटायझर व मास्कचा निश्चितच बाजारात तुटवडा आहे. अशा परिस्थितीत उत्पादक कंपन्यांशी बोलणे झाले आहे. त्यांना 24 तास उत्पादन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सॅनीटायझरपेक्षा साबणाने स्वच्छ हात धुवावे, मास्कऐवजी स्वच्छ रूमाल वापरला तरी चालेल. रूमाल धुवून पुन्हा वापरता येतो. स्त्री रूग्णालयात व्हेंटीलेटर, ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याठिकाणी विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. शहरातील मंगल कार्यालये, केमीस्ट भवन यांनाही विलगीकरण कक्ष म्हणून आवश्यकतेनुसार वापरण्यात येणार आहे.
   सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, कुणीही सोशल मिडीयावर खात्री केल्याशिवाय पोस्ट व्हायरल करू नये. सायबर सेलने अशा व्हॉट्सॲप संदेशावर लक्ष ठेवून तपासणी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी. केंद्र शासनाने मास्क व सॅनीटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे कुणीही या वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी व बनावटीकरण करू नये. असे आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कुठे अशी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास दुकानांवर धाडी टाकण्यात येतील. कोरोना संदर्भात अत्यावश्यक खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यकता पडल्यास निधी देण्यात येईल.
   लग्न समारंभ पुढे ढकलण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, जास्त गर्दीच्या ठिकाणी जावू नका. कारण नसताना प्रवासही टाळावा. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुढे गरज पडल्यास पानठेले, पाणीपुरी दुकानेसुद्धा बंद करावी लागतील. या काळात कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये. या माध्यमातून जमाव जमविल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
                                                पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना
पुणे, मुंबई येथून जिल्ह्यात शेकडो नागरिक परत येत आहेत. या परतलेल्या नागरिकांची जिल्ह्यात एन्ट्री पाँईंटला तपासणी करण्यात यावी. लक्झरी, एसटी बसेस यांना याबाबत सुचीत करावे. तपासणी झाल्यानंतरच सदर बस पुढे सोडण्यात यावीत. जेणेकरून संशयीत असल्यास तिथेच कळेल व पुढील धोका टळेल, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.
                                                                                    ******
खाजगी रूग्णालयांनी विलगीकरण कक्षासाठी आरक्षण ठेवावे
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन ठिकाणी आयसोलेशन कक्ष कार्यान्वीत आहेत. तसेच स्त्री रूग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. मात्र भविष्यात आवश्यकता पडल्यास खाजगी रूग्णालयांनी त्यांचे बेड विलगीकरणसाठी आरक्षीत ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आयएमए (इंडियन मेडीकल असोसिएशन) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, आयएएमचे अध्यक्ष डॉ एस.एस राजपूत, केमीस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे राज्याचे सचिव अनिल नावंदर, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नाहर, मेडीकल रिप्रेसेन्टेटीव्ह संघटनेचे अध्यक्ष श्री. मगर, औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके आदी उपस्थित होते.
   यावेळी जिल्ह्यातील कोरोना विषयी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला. मास्क, सॅनीटायझर साठा, पुरवठा, मागणी याबाबत आढावा घेत सुचना दिल्या. सोशल मिडीयावरील अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
                                                                                                *****
स्त्री रूग्णालयातील विलगीकरण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या रूग्णालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी आज 20 मार्च 2020 रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत उपस्थित होते.
   यावेळी पालकमंत्री यांनी इमारतीमधील सुविधांची माहिती घेतली. विलगीकरण कक्षासाठी आवश्यक असलेल्या व्हेटीलेटर, ऑक्सीजन सुविधा लावण्यासंदर्भात संबंधीतांना सुचना दिल्या. इमारतीमधील नर्सींग स्टाफ, डॉक्टर्स, स्वच्छता, पाण्याची सुविधा आदींची माहितीही त्यांनी घेतली. इमारतीमधील विलगीकरण कक्ष सुसज्ज असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी  दिली.  याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    *******
जलजागृती सप्ताहादरम्यान जलप्रतिज्ञा, हस्तपत्रके वितरण
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादीत स्वरूपात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या गर्दी न जमविण्याच्या आदेशाचे पालन करून छोटेखानी स्वरूपात जलजागृती सप्ताहात कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात खडकपूर्णा कालवे उपविभाग क्रमांक 2, चिखली येथे जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
  तहसिल कार्यालय दे.राजा येथे जलजागृती सप्ताहानिमित्ताने कर्मचाऱ्यांना तहसिलदार सारिका भगत यांनी जलप्रतिज्ञा दिली. खडकपूर्णा प्रकल्प विभाग कार्यालयात जलप्रतिज्ञा घेण्यात आली. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर, व्याघ्र नाला कालवा विभाग मलकापूर, कार्यकारी अभियंता जिगांव प्रकल्प पुनर्वसन विभा खामगांव येथेही कर्मचाऱ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.
   त्याचप्रमाणे साखरखेर्डा येथे वाहनांवर जलजागृतीचे स्टीकर चिपकविण्यात आले. शेगांव शहरातील जगदंबा चौक, रेल्वे स्थानक, बस स्टँण्ड परीसर, अग्रसेन चौक आदी ठिकाणी जलजागृतीचे हस्तपत्रकांचे वितरण करण्यात येवून जलजागृती करण्यात आली. मलकापूर बस स्थानकावही जलजागृतीचे हस्तपत्रक प्रवाशांमध्ये वितरीत करण्यात आले. जलप्रतिज्ञेवेळी पाटबंधारे विभागाचे संबंधित कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                            ***********
कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाल न्याय मंडळाची बैठक पुढे ढकलली
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा न्यायालय बुलडाणा यांच्या परिपत्रक व निर्देशांनुसार 21 मार्च 2020 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे आयोजित बाल न्याय मंडळाची फिरती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार सदर तात्पुरती / फिरत्या बैठकीचे आयोजन 21 मार्च रोजी लोणार येथे करण्यात आले होते, असे प्रमुख दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ******
कोरोना अलर्ट :
 जिल्ह्यात विदेशातून आलेले 46 नागरिक घरीच निरीक्षणाखाली
बुलडाणा, दि. 19 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात तीन आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवले आहेत. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.  त्यानुसार काल दि. 19 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 42 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरी क्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 20 मार्च 2020 रोजी 4 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 46 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
     जिल्ह्यात सध्या कुणीच संशयीत आयसोलेशन कक्षात दाखल नाही. कुणीच संशयीत नसल्यामुळे नागपूरला प्रयोग शाळेत रिपोर्ट पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे.
                                                                                    *****