जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला प्रारंभ Ø जिल्हा न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्या हस्ते उद्घाटन

 



बुलढाणा, (जिमाका) दि. 15 : महिला व बाल विकास विभागांमार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकिय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, निराश्रीत, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दि. १५ ते १७ जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन शासकीय मुलांचे बालगृह/निरीक्षणगृह, शरद महाविद्यालय परिसर चिखली रोड, बुलढाणा येथे करण्यात आले आहे.

या बाल महोत्सवामध्ये अनाथ, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी विविध क्रीडा तसेच सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील, बाल न्याय मंडळच्या अध्यक्ष शितल बजाज, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे,  सदस्य आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनाप्रसंगी प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी अध्यक्षीय भाषणात महोत्सवाचे कौतुक करून बालकांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे नितीन पाटील यांनी बालकांना दिलेल्या मंचाचा सुवर्ण संधी म्हणून लाभ घेवून आनंद द्विगुणीत करावा तसेच जिंकू किंवा हरू याचा विचार न करता सहभाग महत्त्वाचा आहे, हे बालकांना पटवून दिले.

या महोत्सवाच्या प्रास्ताविकामध्ये बाल महोत्सवाचा उद्देश, बालकांतील सुप्त गुणांना क्रीडा, बौद्धीक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये आदर, प्रेम निर्माण होऊन मुलांमधील कला गुणांना वाव मिळेल तसेच आत्मविश्वास व सांघीक भावना विकसित होण्यास मदत होणार असून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा  असल्याचे तसेच पुस्तकांसोबत बाहेरील बालकांच्या जगाचे महत्व याची जाणीव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी करून दिली आणि सदर बाल महोत्सवाकरीता अविरत मेहनत घेवून कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता सतत सक्रीय असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानून कौतुक केले.

कार्यक्रमाचे संचालन परिवीक्षा अधिकारी सरिता जाधव, शिक्षक केशव घुगे यांनी केले, तर आभार कनिष्ठ संरक्षण अधिकारी वसू यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या