Thursday 25 August 2022

DIO BULDANA NEWS 25.08.2022

 

शेतकऱ्यांनी पिवळा मोझॅकची उपाययोजना करावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

  सोयाबीन पिकावर सोयबीन पिवळा मोझॅक रोगाचा  प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरवातीच्या अवस्थेत फक्त काही झाडांवरच हा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु नंतर मात्र पांढऱ्या माशीमुळे रोगाचा प्रसार होतो. संपूर्ण पिक सोयाबीन पिवळा मोझॅकला बळी पडू शकत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिवळा मोझॅकने ग्रस्त  झाडे तात्काळ उपटून घ्यावी आणि नष्ट करावी, एकरी १५ ते २० पिवळे  चिकट सापळे  लावावेत.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमीथोक्झाम १२.६० टक्के अधिक लँबडा सायहँलोथ्रोन ९.५० टक्के झेडसी @ २.५ मिली प्रती १० लिटर पाणी हे व्यापारी नाव अलीका किंवा बितासायफ्लूथ्रोन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के @ ७ मिली प्रती १० लिटर पाणी हे व्यापारी नाव सोलोमोन किटकनाशकाची तात्काळ फवारणी करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी कळविले आहे.

00000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

बुलडाणा, दि. 25 : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त यावर्षीही 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन, व्याख्यानमाला, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन, विविध खेळाचे प्रात्यक्षिक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हॉकी स्पर्धेसाठी सहकार विद्या मंदिर, बुलडाणा, स्पर्धा संयोजक सय्यद आबीद, फुटबॉल स्पर्धेसाठी एडेड हायस्कूल, बुलडाणा, राहुल औशालकर, सिकई-वुशू, स्वयंसिध्दा प्रात्यक्षिकासाठी अरविंद्र अंबुसकर, मैदानी खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे विजय वानखेडे, गणेश जाधव, समाधान टेकाळे, खो-खो स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा, सागर उबाळे, हॅण्डबॉल स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा मनोज श्रीवास, प्रणव काठोके, आर्चरी स्पर्धेसाठी तालुका क्रीडा संकुल, बुलडाणा, चंद्रकांत इलग, कबड्डी स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा, गोपालसिंग राजपूत, वसंतराव धोरण, बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुल, राज सोळंकी, मोहम्मद सुफीयान, व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रबोधन विद्यालय, रविंद्र गणेशे, फुटबॉल आणि खो-खो स्पर्धेसाठी श्री शिवाजी विद्यालयाचे क्रीडांगण संदीप पाटील आदी खेळाच्या प्रदर्शनीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच तालुकास्तरावर तालुका क्रीडा संकुल येथे विविध कार्यक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले आहे.

शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, क्लब, संघटना, प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी खेळाडूनी शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

अधिकृत एकविध खेळ संघटनेतर्फे आयोजित अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य आणि सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्राची छायांकित प्रत क्रीडा कार्यालयास दि. 28 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावी, तसेच दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा येथे उपस्थित राहावे. क्रीडादिनाच्या कार्यक्रमासाठी शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा येथे सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

शुक्रवार, बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 25 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र तपासणीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे हे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग, नेत्र दिव्यांग बोर्ड आणि प्रत्येक शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी पोळा आणि बुधवार, दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दोन्ही दिवसांचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

00000

 

Wednesday 24 August 2022

DIO BULDANA NEWS 24.08.2022

 

ज्ञानगंगा अभयारण्यात प्रतिबंधात्मक कलम लागू

बुलडाणा, दि. 24 : ज्ञानगंगा अभयारण्यातील अवैधरित्या प्रवेश रोखणे आणि वनातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अभयारण्य क्षेत्रात प्रतिबंधात्मक कलम लागू करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत लागू राहतील.

विभागीय  वनअधिकारी, वन्यजीवन विभाग अकोला यांनी ज्ञानगंगा अभारण्य हे पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याचे वैभव आहे. यामध्ये बुलडाणा आणि खामगाव वन्यजीव परिक्षेत्र समाविष्ट आहेत. खामगाव परिक्षेत्रामध्ये एकूण 12 बीट असून सदर परिक्षेत्राच्या सीमेला लागून मेंढपाळांची गावे आहेत. अभयारण्यामध्ये अवैधरित्या प्रवेश करुन मेंढीद्वारे किंवा कोणत्याही गुराद्वारे अवैध चराई करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वनकायदा 1927 नुसार दंडनीय अपराध आहे. सदर मेंढपाळ हे ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशिल क्षेत्रात अवैधरित्या प्रवेश करुन अवैध मेंढी चराई करतात.

अभयारण्यातील क्षेत्रात दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी कार्यरत असलेले वन कर्मचारी आणि इतर 21 कर्मचारी चिंचखेड बंड नियत क्षेत्रामध्ये सामुहिक जंगलगस्त करताना
त्याठिकाणी सुमारे 4 हजार मेढ्यांसह 25-30 मेंढपाळ अवैध चराई करीत असल्याचे आढळून आले. मेंढ्या व मेंढपाळ यांना अटकाव करुन 2 मेंढपाळांना ताब्यात घेण्यात आले. अटकाव केलेले मेंढपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. राज्य राखीव पोलीस गट क्र. 4 नागपूर यांचे चमूतील 2 कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करुन मेंढ्यासह पळून गेले.

या अभयारण्यात कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अभायारण्य क्षेत्रात दि. 16 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदशिल क्षेत्राचे संरक्षण करणे सोईचे होईल. यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील गेरु, बोथा, बोथा कवडगांव, बोथा, पिंपरचोच, कवडगांव, गिलोरी, तारापूर, गावामधील खामगाव वन्यजीव परिक्षेत्रामध्ये दि. 22 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रतिबंधात्मक कलम लागू केले आहे.

000000

शेतकऱ्यांनीखरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव  केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा राबविण्यात येत आहे.

पिकस्पर्धेतील जिल्ह्याकरिता खरीप हंगामातील स्पर्धेसाठी सोयाबीन, तूर आणि मका पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 10 आणि आदिवासी गटासाठी 5 शेतकरी राहिल.पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी प्रवेश शुल्कपिकनिहाय प्रत्येकी 300रुपये राहणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 31 ऑगस्ट 2022 आहे.पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणिअनूसुचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहे.

तालुका पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 5 हजार रूपये, दुसरे 3 हजार रूपये, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस असणार आहे.जिल्हा पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 10 हजार रूपये, दुसरे 7 हजार रूपये, तिसरे 5 हजार रूपये बक्षीस असणार आहे.विभाग पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 25 हजार रूपये, दुसरे 20 हजार रूपये, तिसरे 15 हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 50 हजार रूपये, दुसरे 40 हजार रूपये, तिसरे 30 हजार रूपये बक्षीस असणार आहे.

पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. सोयाबीन, तूर आणि मका या पिकासाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पूर्वी अर्ज सादर करून पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि उपसंचालक व्ही. आर. बेतीवार यांनी केले आहे.

00000

पिकविम्यासाठी शेतीच्या नुकसानीची माहिती 72 तासात द्यावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगाम 2022 मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळविण्यात यावी. तसेच आपल्या क्षेत्रातील विमा प्रतिनिधीची संपर्क करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान आणि या जोखीमेच्या बाबी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी शेत सर्वे नंबरनुसार बाधित पिक आणि बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त गट क्रमांकातील किंवा एकापेक्षा जास्त पिकाचे पीक विमा भरले असतानाही त्यांना एकच पावती मिळते. अशा वेळी क्रॉप इन्शुरन्स ॲप, टोल फ्री क्रमांक 18004195004 वर तक्रार दाखल करताना गट आणि पिकाकरिता गट आणि पिकानुसार तक्रार दाखल करावी.तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीकरिता स्वतंत्र तक्रार क्रमांकशेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.सदरील तक्रार क्रमांकजतन करुन ठेवावे.

भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा, तालुका प्रतिनिधी यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बुलडाणाजिल्हास्तरसाठी दिलीप उ. लहाने 9881017458, C/O प्रशांत तिमसे, मुठे ले-आऊट, डॉ. काटकर रुग्णालयासमोर, बुलडाणा, 443001, बुलडाणा तालुक्यासाठी अमोल द. गाडेकर,   9588411588,C/O प्रशांत तिमसे, मुठे ले-आऊट, डॉ. काटकर रुग्णालयासमोर, बुलडाणा,443001, चिखलीसाठीयोगेश दि. लहाने, 7775900453,भूदेवी कॉम्प्लेक्स, राऊतवाडी, बस स्टॉप, चिखली, 443201,मोताळासाठीमंगेश द.गाडेकर,9158357731,महाजनहॉस्पिटलच्यामागील बाजूला, नवीन मलकापूर रोड, सांगळद, मोताळा.443103,मलकापूरसाठीमनोहर सं.पाटील, 9098918031,   दुकानक्रमांक3, दिपक नगर, बुलढाणा रोड, मलकापूर 443101,मेहकरसाठी नंदकिशोर भा.जोगदंडे, 9309981345,प्रभाग क्रमांक 7, शिवाजी नगर, म्हाडा कॉलनी, संकल्प हॉस्पिटलजवळ, मेहकर, 443301,लोणारसाठी अमोल न.चव्हाण, 8390730020,तालुकाकृषी कार्यालय, लोणार, मेहकर रोड जवळ, लोणार, 443302,देऊळगाव राजासाठीश्रीकृष्णा ग.ढाकणे,8698491195, सिव्हिल कॉलनी, वार्ड क्र. 11, रेस्ट हाऊसजवळ, देऊळगाव राजा, 443204, सिंदखेड राजासाठी रवींद्र भा.गोरे, 9503186720, शिवालय बिल्डिंग, गायत्री हॉस्पिटलजवळ, मेहकर रोड, सिंदखेड राजा,  443203, खामगावसाठी         सुर्यकांत ग.चिंचोले, 8806677166, वामननगर, वामननगर चौक जवळ, खामगाव 444303,शेगावसाठी पवन ज्ञा. डीक्कर,  7887978715,दुकान क्रमांक ३, बस डेपोजवळ राजेश्वरी कॉलनी, श्याम निवास, शेगाव 443203, संग्रामपूरसाठी वैभव कि.गाळकर, 8806176215, दुकान क्रमांक २, बीएसएनएल कार्यालयासमोर, जय माता दी नगर, संग्रामपूर 443202,जळगाव जामोदसाठी        विशाल भ. मांटे, 8698522403, देशमुखवाडी, प्रभाकरनगर, नांदुरा रोड, जळगाव जामोद, 443402, नांदुरासाठीकुंदन शा.सोळंके, 9657253445, दुकान क्रमांक ६, बालाजी कॉम्प्लेक्स, हनुमान मंदिरासमोर, नांदुरा 443204 या विमा कंपनीच्या प्रतिनिधी आणि pikvima@aicofindia.comया ई-मेलवर संपर्क करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

जिल्हा ग्रंथालयात स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश उपलब्ध

बुलडाणा, दि. 24 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश खंड 1 व 2 विदर्भ विभाग खंड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.

सदर चरित्रकोशामध्ये विदर्भातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती वाचकांना तील स्वातंत्र्य सैनिकांची माहि‍द उपलब्ध झाली आहे. बुलडाणा जिल्हा ग्रंथालय येथे कार्यालयीन वेळेत सदर ग्रंथांचा वाचकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथपाल स. श. जाधव यांनी केले आहे.

000000000

माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

*अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

कल्याणकारी निधी नियमांतर्गत दरवर्षी दहावी आणि बारावी उत्तीर्ण पाल्यांसाठी, पदवी पदव्युत्तर आणि आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएसकरिता विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक शिक्षण मंडळातील पहिल्या 5 पाल्यांना एक रकमी 10 हजार रूपये पुरस्कार, पदवी, पदव्युत्तर विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण पाल्यास एकरकमी 10 हजार रूपये विशेष गौरव पुरस्कार, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत आणि ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना 25 हजार रूपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे जमा करावेत. विशेष गौरव पुरस्काराची प्रकरणे कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

00000000

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विशेष गौरव पुरस्कार

बुलडाणा, दि. 24 : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीयस्तरासाठी 10 हजार रूपये, आंतरराष्ट्रीयस्तरासाठी 25 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाकडून दिला जातो.

निकषास पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे जमा करावेत. विशेष गौरव पुरस्काराची प्रकरणे कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी इच्छुक पात्रता असलेल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

0000000

एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार

बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्या पाल्यांसाठी एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या पाल्याकरीता एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्‍या निवडीसाठी ओळखपत्र, एसएससी, एचएससी बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, गुणपत्रिकेची छायांकित प्रत आणि वैयक्तिक अर्जासह दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

0000000

कृषि विभागाच्या रोजंदारी मजुरांची

अंतरीम ज्येष्ठता सुची प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 24 : कृषि विभागाच्या जिल्ह्यातील सर्व फळरोपवाटीका, तालुका बिज गुणन केंद्र, कृषि चिकीत्सालय येथील रोजंदारी मजुरांची अंतारीम ज्येष्ठता सुची जिल्हास्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्येष्ठता यादी फळरोपवाटीका, तालुका बिज गुणन केंद्र, कृषि चिकीत्सालयांना पाठविण्यात आली आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात लावण्यात आली आहे. या अंतिम ज्येष्ठता सुचीबाबत कामाचा तपशिल, जन्म‍ दिनांक, शैक्षणिक पात्रता तसेच यादीत नाव नसल्याबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी 10 दिवसाच्या आत लेखी पुराव्यासह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. विहीत कालावधीत आक्षेप नोंदविले नसल्यास त्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी कळविले आहे.

00000

सामाजिक ऐक्य पंधरवडानिमित्त सद्‌भावना शपथ

*सद्‌भावना शर्यतीत उत्साहाने सहभाग

            बुलडाणा, दि. 24 : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरु युवा केंद्राच्या वतीने दि. 20 ऑगस्ट ते दि. 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यानिमित्ताने बुधवार, दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल बुलडाणा येथे सद्‌भावना शपथ आणि सद्‌भावना शर्यत पार पडली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्ट रोजी सद्‌भावना दिवस साजरा करण्यात येतो. तसेच दि. 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2022 दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बद्रीनाथ जायभाये, डॉ. जी. बी. राजपूत, डॉ. दिलीप कुळकर्णी यांनी सद्‌भावना शर्यतीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, धनंजय चाफेकर, रविंद्र गणेशे, विजय वानखेडे, शैलेश खेडकर, राजेश टारपे, महेंदसिंग ठाकूर, अनुप सोनोने, नितीन भिसे, विनोद गायकवाड, श्रीकृष्ण कुवारे, रविंद्र बोबडे, विठ्ठल इंगळे, मदनलाल कुमावत, सदाशिव गद्दलकर, निलेश रेखे, लक्ष्मण नागपूरे, बंडू राऊत, शेख समीर, विनायक चोपडे, हर्षल काळवाघे, दिपक जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास डुडवा, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.

0000000

Tuesday 23 August 2022

DIO BULDANA NEWS 23.08.2022

 

पीएम किसानच्या लाभासाठी केवायसी करावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा बारावा हप्ता सप्टेंबर महिन्यात देय आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत बँक खात्याची केवायसी करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचे आतापर्यंत अकरा हप्ते शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. तसेच बारावा हप्ता सप्टेबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ३ लाख ९१ हजार ५१० आधार प्रमाणिकरण झालेले पात्र लाभार्थी असुन यातील २ लाख  ४९ हजार १६ लाभार्थ्यांच ई-केवायसी झाले आहे. उर्वरित १ लाख ४२ हजार ४९४ केवायसी बाकी आहे. पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत केवायसी पुर्ण करावी. केवायसी पुर्ण केले नसलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता देय होणार नाही.

केवायसी ही आधार प्रमाणिकरण झालेल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरुन करता येईल. तसेच सीएससी सेंटर, ई-महासेवा केंद्र येथूनही आधार प्रमाणिकरण करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सं. ग. डाबरे यांनी कळविले आहे.

000000

महारेन प्रणालीवर दैनंदिन पावसाचा अहवाल

*पावसाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध

बुलडाणा, दि. 23 : राज्यात महावेध प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागीदारीतून बांधा-मालक व्हा-चालवा तत्वावर महारेन प्रणाली अंमलात आणली गेली आहे. या प्रणालीवर पावसाचा दैनंदिन आणि प्रागतिक अहवाल पहावयास मिळणार आहे. या प्रकल्पाच्‍या अंमलबजावणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेट यांची सेवा पुरवठादार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.  प्रकल्पातंर्गत प्रत्येक महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

पर्जन्यमानाच्या आकडेवारीसाठी महारेन आणि महावेध या दोन स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित ठेवण्याऐवजी महावेध प्रणालीमधील पर्जन्यविषयक आकडेवारी महारेन संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते. महावेध प्रकल्पातील पर्जन्यमानाची आकडेवारी दररोज लिंकद्वारे महारेन संकेतस्थळावर प्रकाशित होते.

महावेध ही प्रणाली स्कायमेट वेदर सर्व्हिसेसने विकसित केली आहे. त्यामधील एक वर्षापूर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर महारेन ही प्रणाली सार्वजनिक संकेतस्थळावर maharain.maharashtra.gov.in असून त्यावर दैनंदिन व प्रागतिक  पर्जन्यमानाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येते.

महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रिक देखभालीसाठी दि. ६ जुलै २०२२ पासून सदरचे संकेतस्थळ दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आले. शेतकऱ्यांना दैनंदिन पर्जन्यमान पाहण्याकरीता थेट महावेध संकेतस्थळाच्या लिंकद्वारे महारेन संकेतस्थळावर दैंनदिन आणि प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी प्रकाशित करून उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संकेतस्थळ दुरूस्तीसाठी बंद असतानाही दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली.

सद्यस्थितीत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात येवून पर्जन्यमानाचे महसूल मंडळनिहाय दैनंदिन आणि प्रागतिक अद्यावत अहवाल दि.२२ ऑगस्ट २०२२ पासून  प्रकाशित करण्यात येत आहे.

00000

औरंगाबाद मनपा स्मार्ट सिटी योजनेत माजी सैनिकांसाठी पद भरती

बुलडाणा, दि. 23 : औरंगाबाद मनपा स्मार्ट सिटी योजनेत माजी सैनिकांसाठी पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी २० माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेणार आहे. ही निवड प्रक्रिया दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबविली जाणार आहे.

पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी सदर वेळेस डिस्चार्ज बुकची कॉपी, आर्मी व सिविल हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स, आर्मी गुंजूएशन सटीफीकेट या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, लागणार आहे. तसेच पात्रता ट्रेड : सैन्य दलातील ट्रेड DSV(Spl Veh)/AM-50/Dvr/Dvr (MT)/DMT/Dvr, Gnr/Dvr(AFT) यापैकी असावा. शैक्षणिक अर्हता दहावी किंवा बारावी पास आणि आर्मी ग्रॅज्युएट, वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSV BUS (TRV- PSV-Bus) धारकास प्राधान्य देण्यात येणार आहे.

निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडी, नियुक्तीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत तयार करावा लागेल. सैन्य दलात हेवी व्हेईकल ड्रायव्हिंगचा किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मेडीकल कॅटेगिरी SHAPE-1 तसेच वयोमर्यादा अधिकतम ४८ वर्षे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, 41, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दूरध्वनी : ०२४०-२३७०३१३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

Monday 22 August 2022

DIO BULDANA NEWS 22.08.2022

 

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित

*दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतदान

*आचार संहिता लागू राहणार

बुलडाणा, दि. 22 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कालावधीत आचार संहिता लागू राहणार आहे.

घोषित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. तहसिलदार यांनी दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्दी करावयाची आहे. दि. 24 ऑगस्ट 2022 ते दि. 1 सप्टेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशन पत्रे मागविणे आणि सादर करता येतील. नामनिर्देशन पत्र छाननी दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत करण्यात येतील. दि. 06 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. याचे दिवशी निवडणूक चिन्ह नेमून तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी 3 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.

आवश्यक असल्यास दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दिनांक 22 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.

या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी कळविले आहे.

0000000

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात यावर्षी दि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गणेशोत्सवासाठी जाहिरनामा घोषित करण्यात आला आहे. यानुसार गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्हयातील सर्व शहर, गाव, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्या हेतूने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी, अगर मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 याप्रमाणे विविध निर्बंध घालण्यात आले आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत दोन्ही दिवस धरुन श्री गणपती स्थापनेप्रित्यर्थ अगर विर्सजनाप्रित्यर्थ मेळावे किंवा पालख्या किंवा  वाद्यांसह मिरवणूक काढावयाची झाल्यास, अगर नाच-गाणे किंवा कुस्त्यांचे सामने करावयाचे असल्यास त्या व्यक्तीने संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखी परवानगीशिवाय सदर कालावधीत कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांना हे परवाने पाहिजे असतील त्यांनी अशी मिरवणूक काढावयाच्या 36 तास अगोदर लेखी अर्जाद्वारे संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराकडे विहित माहिती भरुन देणे गरजेचे आहे. मुख्य आयोजकाचे पूर्ण नाव व पत्ता, ज्या कारणासाठी परवाना पाहिजे ते कारण, मेळावा अगर मिरवणुकीचे वर्णन आणि मंडळाचे नाव, कोण कोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारीख आणि वेळ, ज्या रस्त्याने मिरवणूक अगर मेळावा जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारीख व वेळ, मिरवणूक चालक आणि सदस्यांचे पूर्ण नाव व पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणुकीतील किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे, असे अर्जावर लिहून देणे आवश्ययक आहे.

मिरवणुकीत वापरायचे वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून तपासून घेतल्याचे प्रमाणपत्र, अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे, असे अर्जावर लिहून द्यावे लागणार आहे. अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळावा सार्वजनिक जागेतून नेताना संबंधित व्यक्ती जवळ बाळगणे गरजेचे आहे. दंडाधिकारी अगर पोलिस अंमलदार यांनी तो  पहावयास मागितल्यास त्यांना दाखवला जावा. श्री गणपती विर्सजनाचे दिवशी मिरवणूक अगर मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात नमूद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुसऱ्या रस्त्याने त्यांना जावू दिले जाणार नाही व वहीवाट अगर इतर सबब ऐकली जाणार नाही. मिरवणुकीमुळे इतर मिरवणुकीस अगर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे. अडथळा झाला तर त्याबद्दल तो मुख्य आयोजक जबाबदार धरला जाईल.

मिरवणूक विर्सजन वेळेच्या आत केले पाहिजे. कोणत्याही प्रसंगी मिरवणूक अथवा मेळावा यांनी प्रेतयात्रेला अग्रक्रम दिला पाहिजे. व्यक्ती, प्रेत अगर त्यांच्या प्रतिमा यांचे सर्वाजनिक  जागेत प्रदर्शन करण्यास मनाई आहे. उत्सवाच्या काळात सभ्यता अगर नितीमत्तेचे बिघाड होईल किंवा कायद्याविषयी तिरस्कार निर्माण होईल किंवा निरनिराळ्या जमातीतील शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य किंवा गैरवर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे तंटे, बखेडे निर्माण होतील अगर निरनिराळ्या भागात किंवा जमातीत संघर्ष निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, भाषण, जाहिरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

000000

 

DIO BULDANA NEWS 19.08.2022

 जिल्ह्यात कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडाचे आयोजन

*तालुकास्तरावर एक दिवसीय कार्यशाळा

बुलडाणा, दि. 19 : जिल्ह्यात कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पंधरवाडा दि. 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान नियोजित केला आहे. यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय एक दिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र, धाड रोड, चिखली येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मोताळा येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, मलकापूर येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, खामगाव येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी सभागृह, शेगाव येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह, नांदुरा येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, जळगाव जामोद येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह, संग्रामपूर येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, मेहकर येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय, लोणार येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ पंचायत समिती सभागृह, देऊळगावराजा येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ पंचायत समिती सभागृह, सिंदखेड राजा दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह याप्रमाणे कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

केंद्र सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यात सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिकीकरण करुन सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्याला या पाच वर्षात ६७४ वैयक्तिक उद्योगांचे सक्षमीकरण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. तसेच गट लाभार्थ्यांचे स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्था, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारवयाचे आहेत.

वैयक्तिक सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सहाय्य घटकांतर्गत सद्या अस्तित्‍वात असणारे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगास विस्तारीकरण आणि स्तरवृद्धीसाठी आणि नविन उद्योगास नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांमध्ये वैयक्तिक मालकी प्रोप्रायटर, भागीदारीसोबतच शेतकरी उत्पादक संस्था, बिगर सरकारी संस्था, सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि प्रायव्हेट लिमीटेड कंपनी यांचाही समावेश केला आहे. बँक कर्जाशी निगडीत भांडवली खर्चापोटी ३५ टक्के अनुदान देय राहणार आहे. यासाठी कमाल अनुदान मर्यादा १० लाख रुपये आहे.

एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक, पात्र आणि सक्षम वैयक्तिक लाभार्थी आणि गट यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रासह जिल्हा संसाधन व्यक्ती, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करून सविस्तर प्रकल्प अहवाल बँकेकडे मंजुरीसाठी सादर करावे. यात नवउद्योजक तरुण, महिला शेतकरी, कृषी प्रक्रिया करणारे उद्योजकां सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वि. रा. बेतीवार यांनी केले आहे. 

Thursday 18 August 2022

DIO BULDANA NEWS 18.08.2022

 




जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिनाची शपथ

बुलडाणा, दि. 18 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी सद्भावना दिवसानिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांना सद्‌भावनेची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी उपस्थितांना सद्‌भावनेची शपथ दिली. यावेळी यावेळी तहसिलदार शामला खोत, अश्विनी जाधव, नाझर संजय वानखेडे उपस्थित होते. उपस्थितांना सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याची शपथ देण्यात आली.

00000

अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खासगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था, अपंग शाळा व नगर परिषद शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या निर्णयानुसार कागदपत्रांची पूर्तता करुन परिपूर्ण अर्ज, प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावेत करावे लागणार आहे. याबाबत काही शाळांना माहिती होऊ शकली नाही. त्यामुळे वेळेत प्रस्ताव सादर करु शकले नसल्याबाबत संस्थांनी कळविले आहे. अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्याच्या प्रस्तावांची तारीख वाढवून देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शाळा, संस्थांनी केली आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सु. च. लाड यांनी केले आहे. 

000000

बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची बालगृहास भेट

बुलडाणा, दि. 18 : राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर यांनी येथील शासकीय मुलांचे बालगृह आणि निरीक्षणगृह येथे भेट दिली.

यावेळी श्री. सेंगर यांनी जिल्ह्यातील बालकांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली यंत्रणा बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, सदस्य, महिला आणि बाल अपराध प्रतिबंध कक्षातील पोलिस अधिकारी, चाईल्ड लाईन, सखी वन स्टॉप सेंटर, दत्तक विधान संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी, तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी आणि इतर संबंधित कार्यालये यांचा आढावा घेतला. बालगृहातील बालकांच्या सेवांचा आढावा घेत बालकांना कायमस्वरूपी पालकत्व देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बाल कल्याण समितीच्या तपासणी नियमित भेटी जिल्ह्यातील बालकांच्या संस्थांना देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.

                                                          0000000



बुलढाणा जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचे आगमन

बुलडाणा, दि. 18 : राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या हस्ते यात्रेस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, गटविकास अधिकारी सारिका पवार, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. बचाटे,  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश खुळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. पाटील, कौशल्य विकास व रोजगार अधिकारी प्रमोद खोडे उपस्थित होते. तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाहनाद्वारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 

यात्रेच्या पुढील टप्पात प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबत माहिती, स्थानिक उद्योजक आणि  तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळणार आहेत. प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम दहा कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान, तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येतील. याबाबत अधिक माहिती आणि  सहभागासाठी msins.in किंवा mahastartupyatra.in या वेबसाईटवर भेट द्यावी.

जिल्ह्यातील इच्छुक नवउद्योजकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचे नंदू मेहत्रे मो. क्र. 9975704117, शफीउल्ला सय्यद मो. क्र. 7620378924 आणि गोपाल चव्हाण मो. क्र. 8108868403 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000000

 

DIO BULDANA NEWS 17.08.2022

 




समूह राष्ट्रगीत गायनास विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद

* जिल्ह्यातही एकाच वेळी झाले राष्ट्रगीत गायन

बुलडाणा, दि. 17: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बुलडाणा येथील जिजामाता प्रेक्षागार आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी आज समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

समूह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि नगरपालिका यांच्यावतीने करण्यात आले. या उपक्रमात शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवित हजारो विद्यार्थ्यांनी समूह राष्ट्रगीत गायन केले.

समूह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.

बुलडाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथे आज सकाळी 11 वाजता  राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिस बॅण्डसह हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहात एक ताल, एका सुरात राष्ट्रगीताचे समूह गायन केले.

आमदार श्री. गायकवाड यांनी राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी जिल्हावासियांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हरघर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल आभार मानले.

अतिशय नियोजनबद्ध असे या समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

00000


Monday 15 August 2022

DIO BULDANA NEWS 15.08.2022

 







जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

*जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

*उपस्थितांना तंबाखू मुक्तची शपथ

बुलडाणा, दि. 15 : जिल्‍ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक श्री. गजभिये यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.

जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी, यावर्षीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने विशेष महत्व आहे, असे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती ऋण व्यक्त करुन अभिवादन केले. विविधतेचे प्रतिबिंब जिल्ह्यात उमटले आहे, असे सांगून मातृतिर्थ सिंदखेड राजा, लोणार सरोवर, शेगाव, मेहुणा राजा यासोबत ज्ञानगंगा सारख्या वन पर्यटनामुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे.  या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार करून उत्कृष्ट पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. पर्यटनामुळे रोजगारात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने बुलडाणा, नांदुरा आणि मलकापूर येथील हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीसाठी वकृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नागरिकांनी घरावर राष्ट्रध्वज उभारावा, यासाठी दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियान राबविण्यात आले. यास नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या उपक्रमांबरोबर स्वराज्य महोत्सवही यशस्वी झाला आहे.

समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम बुधवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक 11 वाजता होणार आहे. जिजामाता प्रेक्षागार येथे शालेय विद्यार्थी यांनी एकत्र जमायचे आहे, तर नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावयाचे आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देश आणि राज्याच्या प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प करावा, गेल्या कठिण काळात नागरिकांनी संयम बाळगल्याबद्दल प्रशंसा करून समस्येवर धैर्याने मात करण्याचे आवाहन केले. धैर्य आणि चिकाटीने देशाला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

00000