अमृतच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना
बुलढाणा, (जिमाका) दि. 13 : आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या माध्यमातून
मोफत स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत
लाभार्थ्यांना वैयक्तीक व्याज परतावा, रोजगारक्षम व स्वयंरोजगारासाठी आधुनिक प्रशिक्षण
मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
प्रशिक्षणांचा
मुख्य उद्देश लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे सामाजिक व आर्थिक स्थान उंचावणे
आहे. ज्यांना आजवर कोणत्याही शासकीय अनुदान, महामंडळ किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळालेला
नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अमृतच्या माध्यमातून लाभ
दिल्या जाणार आहे.
योजनेंतर्गत
प्रशिक्षणे : अॅडव्हान्स ब्युटी पार्लर व फॅशन डिझायनिंग, अमृत सूर्य मित्र, आयात-निर्यात,
बेकरी, अन्न व फळ प्रक्रिया, गृह उद्योग, इव्हेंट व्यवस्थापन, मसाले उत्पादन, फोटोशॉप
व ग्राफिक डिझायनिंग, मोबाइल रिपेअरिंग, दुग्धजन्य उत्पादने उत्पादन प्रशिक्षण, असे
विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षणे दिली जाणार आहेत.
ही
योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असून राजपूत, ठाकूर, ब्राह्मण,
मारवाडी, गुजराती, कोमटी, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंत्स, कम्मा, नायर, नायडू, एय्यंगार,
पाटीदार, बंगाली पटेल, येलमार, त्यागी, राजपुरोहित, सेनगुंनधर इत्यादी समाजातील पात्र
नागरिकांचा समावेश आहे. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
व स्वतःचा रोजगार उभारून स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात
आले आहे.
अधिक
माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी (8308998922) अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट
नं. 305, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालय समोर, बुलढाणा येथे
संपर्क साधावा.
Comments
Post a Comment