जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वनपट्ट्यांचे वाटप
बुलढाणा, (जिमाका) दि.
01: जळगाव जामोद तालुक्यातील
मौजे भिंगारा येथील मंजूर झालेल्या ३१ वैयक्तिक वनपट्ट्यांचे वाटप बुधवारी जिल्हाधिकारी
कार्यालयात पार पडले. हे वनपट्टे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते संबंधित
वनपट्टाधारक लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड,
उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, प्रा. संजय खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी व लाभार्थी
उपस्थित होते.
वनहक्क कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना
हक्काचे वनपट्टे प्राप्त झाल्याने त्यांच्या उपजीविकेला बळ मिळणार असल्याचे मत यावेळी
उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
0000


Comments
Post a Comment