जड वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु
बुलढाणा,
(जिमाका) दि. 15 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत
जड वाहनांसाठी पसंती क्रमांकाकरिता MH28 CF ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार
आहे. ही मालिका दि. 19 जानेवारी 2026 पासून सुरु होणार असून, 0001 ते 9999
पर्यंतचे क्रमांक वाहनधारकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
पसंती
क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या जड वाहनधारकांनी नियमांनुसार अधिकृत प्रक्रियेद्वारे अर्ज
सादर करावा. या सेवेअंतर्गत निश्चित शुल्क आकारण्यात येणार असून, पसंती
क्रमांकांचे वाटप शासनाने विहित केलेल्या पद्धतीने करण्यात येईल. इच्छूक
वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
रघुवीर सिंग बिलावर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment