संत जयराम महाराज संस्थानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री, मृद व जलसंधारण मंत्र्यांचा सत्कार

 





बुलढाणा, (जिमाका) दि. 14 : मेहकर तालुक्यातील श्री संत जयराम महाराज संस्थान राजगड द्वारा आयोजित भव्य यात्रा महोत्सवाला आज केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या यात्रा महोत्सवाच्या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री यांनी संत जयराम महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच टेंबुरखेडा येथील यात्रा महोत्सवालाही भेट देवून त्यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी तहसीलदार, जलसंधारण अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या