Thursday 30 November 2023

मतदान नवीन मतदार नोंदणीवर विशेष भर द्या - विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय

 


·

         सहायक निवडणूक अ‍धिकारी यांच्याकडून घेतला कामाचा आढावा


·         एकही नवीन मतदार नोंदणीपासून सुटू नये

·         विशेष शिबिराच्या माध्यमातून नोंदणी वाढविण्याचे दिले निर्देश

·          मतदार नाव नोंदणी प्रक्रियेस गती द्या

बुलडाणा,दि.30(जिमाका): आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, सध्या भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या विशेष मोहिमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवीन मतदारांकडून फॉर्म क्रमांक 6 भरून घेत त्यांची नावनोंदणी करून घेण्यावर भर देण्याचे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय मतदार यादी पुनरीक्षणाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

            जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, सहाय्यक आयुक्त तथा समन्वय अधिकारी (भूसुधार) श्यामकांत मस्के, अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरात, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, समाधान गायकवाड, मनोज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

            विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांची अमरावती विभागाच्या मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच बुलडाणा जिल्हा भेट आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी आज ही भेट देत जिल्ह्यातील मोहिमेचा आढावा घेतला.

आगामी काळात जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम विशेष मोहीम स्वरुपात राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवक आणि युवतींची मतदार यादीत नोंदणी करून घेण्यासाठी प्रयत्नरत राहण्यास सांगून विभागीय आयुक्त डॉ. पांण्डेय म्हणाल्या की, यंत्रणेने मतदारांची नावनोंदणी करताना  मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी जेणेकरून जिल्‌ह्यातील एकही मतदार नावनोंदणी मोहिमेतून सुटणार नाही, असे त्यांनी सांगितले.

            नवयुवक युवतींची मतदार यादीत नोंदणी करून घेण्यासाठी प्रशिक्षित केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून सहायक निवडणूक अधिकारी यांनीही यामध्ये विशेष लक्ष घालून नावनोंदणी वाढविण्यावर भर द्यावा. जिल्हा निवडणूक यंत्रणेने घरोघरी जावून सर्व्हे करावा, शाळा महाविद्यालयांमध्ये, आठवडी बाजार येथे केंद्रप्रमुखांना पाठवून मतदार वाढविण्यावर विशेष भर देताना त्यांना उद्दिष्ट‍ देण्याचे निर्देशही डॉ. पांण्डेय यांनी दिले.

दोन दिवसांमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र प्रमुख आणि सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश देत मलकापूर आणि खामगाव तालुक्यांवर विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना सांगितले. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षित नवमतदारांची नोंदणी झाली नसल्यामुळे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. पांण्डेय यांनी पुनरीक्षणाच्या या कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांनी अधिक वेगाने ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले.

            बुलडाणा विधानसभा मतदारसंघात नवीन मतदार यादी नोंदणी समाधानकारक झाल्याबद्दल त्यांचे अनुभव आणि पद्धती, त्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनतीबाबत उपस्थित इतर अधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना केल्या.

जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणी करण्याबाबत माध्यमांमधून सातत्याने जनजागृती करण्यात येत असून, प्रशासन पातळीवर शाळा-महाविद्यालयांमध्ये, आठवडी बाजार, महिला बचत गटांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. तसेच दर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक आयोजित करून त्यांच्याकडून काही सूचना आल्या असल्यास त्यावर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले. याशिवाय महाविद्यालयीन वसतीगृहात राहणाऱ्या मुलीकडून महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा त्यांचा वसतीगृहाचा राहण्याचा पुरावा ग्राह्य धरून त्यांचीही मतदार यादीत नाव नोंदणी करत असल्याबाबत त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणी कमी झाली आहे, त्यांची कारणे शोधून त्यावर अधिक जबाबदारीने काम करण्यात येईल, असे सांगून तहसीलदार, केंद्रप्रमुखांनी अधिक गतीने मतदारयादी अद्यावत करण्यात येतील, असे सांगितले.  मतदारनोंदणी करताना केंद्र प्रमुख स्तरावर दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत फॉर्म क्रमांक 6 पडून राहता कामा नयेत, असे सांगून त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा उपनिवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील नवीन मतदार यादी पुनरिक्षणाबाबत उपस्थितांना माहिती दिली.

*****



मतदान केंद्रांची डॉ. निधी पांण्डेय यांच्याकडून पाहणी



 बुलडाणा, दि. 30 (जिमाका):दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली.


            जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधा
र) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. पांण्डेय यांनी श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 182, 183 आणि 184ची पाहणी करत केंद्रप्रमुखांकडून मतदार यादी पुनरीक्षण आणि नवीन मतदार नावनोंदणी, वगळणी, मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत चर्चा केली. तसेच जिजामाता महाविद्यालय येथील मतदान केंद्रांचीही पाहणी करत पुनम अवसरमोल यांच्याकडून मतदार यादी पुनरीक्षणाबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली तसेच मतदार यादीत नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. पांण्डेय यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून ही पहिलीच बुलडाणा जिल्हा भेट असून, त्या अनुषंगाने त्या अजून दोन भेटी देणार आहेत. 

*****

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मदत घ्या - मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय

 

बुलडाणा, दि.30(जिमाका): दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मतदार नोंदणीमध्ये मदत घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दि
ले. श्रीमती डॉ. पांण्डेय या मतदार यादी निरीक्षक म्हणून त्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.  

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व विविध पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात विशेष शिबिरांमधून नव मतदारांची जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग नावनोंदणी करत आहेत. सोबतच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची या कामी मदत घेऊन नवमतदारांची नावनोंदणी वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ही मतदार नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करताना मतदान केंद्रप्रमुखांनी घरोघरी जावून एकही नवमतदार नावनोंदणी करण्यापासून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश डॉ. पांण्डेय यांनी दिले.

            विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी यावेळी दुबार नोंदणी झालेली नावे वगळणी करणे, बोगस मतदारांची नावे शोधणे, मृत मतदारांची नावे यादीतून कमी करणे, आठवडी बाजाराच्या दिवशी नावनोंदणी करण्यासाठी केंद्र स्थापन करणे, नगरपालिका, मोठी खेडी, घन लोकसंख्या असलेली ठिकाणे शोधून तेथील सुटलेली मतदारांची नोंदणी करून घेण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच नव मतदारांकडून फॉर्म क्रमांक 6 भरून घेत नावनोंदणी करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

*****

दत्तक विधान प्रक्रिया समजून घ्या – जिल्हा बाल संरक्षण अ‍धिकारी

 बुलडाणा, दि. 30(जिमाका): बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. सदर दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नीची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडू शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो. बाळ दत्तक घेणेसाठी बालकाचे वय 2 वर्षाच्या आत असावे. भावी दत्तक माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 85 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असावी.

 बालकाचे वय 2 वर्ष ते 4 वर्षापर्यंतचे बालक, भावी दत्तक माता पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 90 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असावी. बालक 4 ते 8 वर्षापर्यंतचा असल्यास माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 100 वर्षे असावी. एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 50 वर्ष, असावी. तर बालकाचे वय 8 ते 18 वर्षापर्यंतचे बालक-भावी दत्तक माता पित्याची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 110 वर्षे असावी. एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 55 वर्षे असावी. दत्तक विधानासाठी अर्ज दत्तक विधानमार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी, माता-पिता यांनी ऑनलाईन पोर्टल https://cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा तसेच दत्तक विधानाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सुवर्ण नगर, बस स्टँड मागे, बुलडाणा येथे भेट देता येईल.

******

शासकीय मुलींचे वसतीगृहात दूध पुरवठ्यासाठी दरपत्रक आमंत्रित

बुलडाणा, दि. 30(जिमाका):  समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने, नवीन) बुलडाणा वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना दररोज प्रती विद्यार्थिनी 200 मिली साखरयुक्त दूध पुरवठा करण्याकरिता स्थानिक पातळीवरून निवेदिता मागविण्यात येत आहेत.

तरी इच्छुक उमेदवारांनी शासन नियमांच्या अधिन राहून दि. 1 ते 6 डिसेंबर 2023 पर्यंत बंद पाकीटात वसतीगृहाच्या कार्यालयात या निवेदिता सादर कराव्यात असे आवाहन, शासकीय मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षक यांनी केले आहे.

******

Wednesday 29 November 2023

सैलानीबाबा यात्रेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील


·         यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक

·         यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना

·         मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश

बुलडाणा, दि. 29 ‍(जिमाका):जिल्ह्यात 15 मार्च 2024 पासून पिंपळगाव सराई परिसरात सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून, त्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि नियोजनानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृह येथे आयोजित यात्रेच्या पूर्वतयारीचा समन्वय समितीतील सदस्यांचा त्यांनी आज आढावा घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात यात्रा महोत्सव राहणार असून, त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, दर्गा ट्रस्ट आणि पिंपळगाव सराई ग्रामपंचायत यांची संयुक्त पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज आढावा बैठक घेतली.

 अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) समाधान वाघ, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) राहुल जाधव, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एस. एस. गुडधे, पिंपळगाव सराईच्या सरपंच श्रीमती रुपाली तरमले, अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद जाधव, सैलानी ट्रस्टचे सचिव ॲङ संतोष वानखेडे उपअभियंता व्ही. आर. काकर, गटविकास अधिकारी श्रीमती सरीता पवार, सहायक गटविकास अधिकारी एस.डी. तायडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उस्मान शेख, नगररचना विभागाचे सहायक संचालक  एस. एस. वेरुळकर, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत, वनपाल एस. ए. आंबेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   

  सैलानी बाबा यात्रेमध्ये नारळाची होळी, संदल मिरवणूक आणि फातेखानी अशा तीन टप्प्यात चालणारी असून, या कालावधीत जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत आणि ट्रस्ट यांची समन्वय समिती स्थापन करून जबाबदारीचे सूक्ष्म नियोजन करावे. या नियोजनानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात, यात्रा काळात यंत्रणांनी दक्ष राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

 यात्रा परिसरात महिला यात्रेकरुंसाठी पुरेशा प्रमाणात फिरते स्वच्छता गृह उपलब्ध करून द्यावेत. त्यामध्ये मुबलक पाणीपुरवठा करावा. तसेच ती स्वच्छ ठेवावीत. यात्रा कालावधीमध्ये महावितरण विभागाने अखंडीत वीजपुरवठा करण्यावर विशेष भर देत, भारनियमन राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच जनावरे कत्तलखाना व्यवस्थापन, वाहन तळांची योग्य व्यवस्था करणे, ध्वनीक्षेपकांवरून येथील सुविधांची यात्रेकरूंना माहिती देत राहणे, रस्त्यांची स्वच्छता, गर्दीचे योग्य व्यवस्थापन, नियोजन करणे, त्यासाठी सर्व समन्वय समितीमध्ये सहभागी असलेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करणे, दर्गा परिसरात आवश्यक तिथे सीसीटीव्ही लावून गर्दीवर देखरेख ठेवणे, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या योग्य समन्वयातून रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.

 तसेच या दरम्यान येणाऱ्या सर्व वाहनांची संख्या, यात्रेकरुंची संख्या, आणि मुक्कामी राहणारांच्या संख्येची शक्य झाल्यास माहिती मिळवावी. वाहनतळ व्यवस्था, ड्रोनच्या सहाय्याने गर्दीवर लक्ष ठेवणे यासह गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावर वाहने उभी राहता कामा नयेत, जेणेकरून जिल्हा प्रशासनाला मदत होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

             पाणीपुरवठा विभागाने टँकरच्या सहाय्याने मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करावा तो करताना ब्लिचिंग पावडर वापरण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. यात्रा कालावधीमध्ये सर्व परिसराचा नकाशा तयार करून विभागानुसार जबाबदारीचे वाटप करावे. पुरेसा प्रकाश देणारे पथदिवे, अग्निशामक यंत्रणा, वीज वितरण विभागाने स्टॉल्सच्या ठिकाणी लावण्यात येणारी वीज उपकरणे यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण तपासणी करावी, जेणेकरून यात्रा कालावधीमध्ये अनुचित घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले.

  तसेच यात्रा कालावधीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने अडचणी आल्यास तज्ज्ञ डॉक्टरासह आरोग्य पथक, सर्व वैद्कीय यंत्रणा, अत्यावश्यक सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका तयार ठेवावी यासह परिसरातील भक्त निवास, मंगल कार्यालये, शाळा या तात्पुरत्या ताब्यात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी समन्वय करणाऱ्या जिल्हा यंत्रणेला दिले.

*****

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा अन् 35 टक्के अनुदान मिळवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा, दि. 29 ‍(जिमाका): प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत उन्नयन योजना ही संघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने सुरू केली आहे. या योजनेत 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि नाशवंत शेतीमाल उद्योगासाठी 10 लाखांच्या मर्यादेत 35 टक्क्यांपर्यंत अनुदान कृषी विभागाद्वारे दिले जात आहे. या योजनेद्वारे शेतकरी विकास साधणार आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊन 10 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत 35 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, असे आवाहन जिल्हा‍धिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

असंघटित अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये खूप अडचणी आहेत. ज्यामध्ये संबंधित उद्योजक बाहेरून कर्ज घेण्यास पात्र नाहीत, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च व मानांकनाचा अभाव असतो. त्यामुळे सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये संत्रा, डाळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामार्फत अर्ज करता येणार आहेत.

 

 

यामध्ये केंद्राचा 60 टक्के तर राज्याचा 40 टक्के हिस्सा राहणार आहे. ही योजना 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी राबविली जाणार आहे. तांत्रिक ज्ञान, कौशल्याधारित प्रशिक्षण व इतर पायाभूत सुविधा देऊन असंघटित क्षेत्रात सूक्ष्म उद्योजकांची क्षमता बांधणी करणे, अस्तित्वातील उद्योगाच्या पतमर्यादा वाढविणे, सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व अस्तित्वातील सूक्ष्म उद्योगांची पतमर्यादा वाढविणे, एफपीओ, बचतगट सहकारी संस्था यांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

अशी आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

 

केंद्र शासनाने आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत ही योजना सुरू केली आहे. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास प्रकल्प खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत अनुदान कृषी विभागाद्वारा दिले जाते. या योजनेमध्ये 10 लाखांपर्यंत अनुदान देय आहे. योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा आहे.

 

योजनेसाठी हे अर्ज करू शकतात

 

योजनेसाठी शेतकरी उत्पादक संस्था, बचतगट, सहकारी संस्था व वैयक्तिक लाभार्थी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी कृषी विभागाकडे सन 2023-24 करिता 859 अर्ज ऑनलाइन सादर झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

 

ही लागतात कागदपत्रे

 

यामध्ये शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण आवश्यक आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, इलेक्ट्रिक बिल, मशिनचे कोटेशन, जागेचा आठ अ, जागा भाड्याने असल्यास करारनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

या योजनेंतर्गत सन 2023-24 करिता 437 उद्योग सुरू योजनेसाठी ऑनलाइन प्रणालीवर 859 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 158 प्रकरणांत कर्ज मंजूर झाले व 50 उद्योग सुरू झाले आहेत. 150 लाभार्थ्यांना 15 कोटी 41 लाख 80 हजार 280 रुपयाचे कर्ज मिळाले आहे तर 103 लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात 12 कोटी 70 लाख 56 हजार 646 रुपयाचे अनुदान जमा झाले आहे.

 

तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संस्था, बचतगट, सहकारी संस्था व वैयक्तिक लाभार्थी यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 *****

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी व्हा

 

बुलडाणा, दि.29 (जिमाका) : कोणत्याही बँकेत बचत खाते असलेल्या खातेधारकाचे वय 18 ते 70 दरम्यान आहे, अशा नागरिकाने बचत खाते असलेल्या बँक शाखेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये त्यांची नोंदणी झाली आहे, याची खात्री करून घ्यावी व त्यानुसार आपल्या पासबूक मध्ये त्यांची एंट्री करून घ्यावी. जर नोंदणी झाली नसेल तर त्यांनी ती तत्काळ करून घ्यावी. या योजनेअंतर्गत 20 रुपये वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाख रुपयांचा अपघाती विमा कवर होते जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर दोन लाख रुपये वारसास मिळतात व कायमचे अपंगत्व आल्यास एक लाखाचा विमा मिळतो, तरी जिल्ह्यातील सर्व बँक खाते असलेल्या नागरिकांना याची पडताळणी करून घेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.

*****

रब्बी हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन

 

•         शेतकऱ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

         राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य स्पर्धा 

बुलडाणा, दि.29 (जिमाका) : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश असून, रब्बी हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादकता वाढवत आहेत. अशा शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

 

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम दिनांक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी 300 व आदिवासींसाठी 150 रुपये राहील. स्पर्धेत भाग घेण्याचसाठी  शेतकऱ्याकडे स्वरतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसणारा असावा. शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागा होता येईल. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याची स्वतःच्या शेतावर किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग पीक लागवड आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बँक खाते चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

 

तालुकास्तरीय पहिले 5 हजार रुपये, द्वितीय तीन आणि तृतीय दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले असून, जिल्हास्तरीय प्रथम 10, द्वितीय 7 आणि तिसरे पाच हजार रुपये तर राज्य पातळीवर प्रथम 50, द्वितीय 40 आणि तृतीय बक्षीस हे 30 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

*****

जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबर रोजी

 

बुलडाणा, दि. 29(जिमाका): सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हा लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी (सोमवार) दुपारी 1 वाजता लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.  

त्याबाबत अर्जदारांना लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास, तालुका स्तरावरील लोकशाही दिनात सदर तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त अहवालानुसार समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल आणि टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत अर्ज पाठविणे आवश्यक राहील तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावी अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

*****

Tuesday 28 November 2023

बुलडाणा येथे कुक्कुट आणि पशुपालन प्रशिक्षण

                      बुलडाणा, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगव्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी बुलडाणा येथे कुक्कट पालन व पशुपालनात शेळी, गा आणि म्हशीपालनाच्या प्रशिक्षणाचे आयोजन दि ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग सुरू करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्दे असल्यामुळे या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कट आणि गा, म्हशी पालनाचे तंत्र आणि प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरू करण्यासाछर संपूर्ण सहकार्य त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच शासकीय योजनांची माहिती या कालावधीत देण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवार हा किमान 5वी उत्तीर्ण असावा. तो 18 ते 50 वर्षादरम्यान असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र दिले जाईल, तरी प्रशिक्षण नोंदणीसाठी 6 डिसेंबर 2023  पर्यंत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, मो. न.  8275093201, 9011578854 संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय  अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.  

*****

थेट कर्ज योजने अंतर्गत लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड

बुलडाणा, दि. 28 (जिमाका): साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट योजने अंतर्गत जिल्हा कार्यालयास 40 एकूण लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले होते. शासन निर्णयानुसार पात्र कर्ज मागणी अर्जामध्ये 129 पात्र पुरुषांच्या अर्जापैकी 20 पुरुष अर्जदाराची निवड करण्यात आली, 49 पात्र महिलांच्या अर्जापैकी 20 महिला अर्जदाराची निवड करण्यात आली. लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार चिठ्ठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात निवड करण्यात आली. सदर बैठकीला लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांच्यासह महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे उपस्थित होते. सदर बैठकीला जिल्ह्यातील अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते सर्व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

 


गुटखा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

बुलडाणा, दि. 28 (जिमाका):नांदुरा येथे जळगाव जमोद रोडवरील विशाल जैन यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सोळंके व गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदिप सुर्यवंशी, अजाबराव घेवंदे, नमुना सहायक आशिष देशमुख यांच्या पथकाने छापा मारुन 1 लक्ष 62 हजार 800 रुपये किंमतीचा पानमसाला व सुंगधीत तंबाखूचा साठा जप्त केला.

राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, सुपारी व तत्सम तंबाखुजन्य पदार्थांविरुद्ध प्रतिबंध घालण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा अत्राम तसेच अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत अन्नपदार्थ विक्रीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम 188,273 व 328 तसेच अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम 59 नुसार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या प्रकरणीमध्ये दसरखेड, टोलनाका, मलकापूर, गाडी क्र. एमएच 21, बीएच 15 गाडीची तापडीया रा. रिसोड, जि. वाशिम या दोषीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन, दसरखेड, येथे भा.दं.वि. कलम 188, 273 व 328, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 59 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कारवाईत अमरावती विभागाचे सह आयुक्त (अन्न) ग.सु. परळीकर व सहायक आयुक्त स.द. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

*****


 

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करा - सहायक आयुक्त प्रवीण खंडारे

 बुलडाणा, दि.28(जिमाका): राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाद्वारे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेतून नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून  तरुणांना रोजगार प्रदान करण्याचे काम शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

              कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशाप्रमाणे  दोन दिवसीय   मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून विविध  क्षेत्रातील किमान 100 कंपन्या या  महारोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळाची गरज असेलल्या कंपनी, उदयोजक आस्थापनांनी महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी  होऊन  रिक्तपदांबाबतची  माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन  नोंदवावी. त्यामुळे आवश्यक असणा-या मनुष्यबळाची  मागणी तातडीने पूर्ण होण्यास मदत होईल, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी केले आहे. 

नोकरी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन  नोंदणी करावी व मेळाव्यात स्वखर्चाने प्रत्यक्षपणे सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

******


 

 

भारतीय‌ संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 


बुलडाणा, दि.२६ (जिमाका): भारतीय संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांना शपथ देत उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

यावेळी तहसीलदार श्रीमती माया माने, नायब तहसीलदार संजय बंगाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, रवी लहाने इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव संविधान दिवसाची शपथ दिली.

*****

 

‘विकसित भारत संकल्प यात्रे'त ड्रोनच्या सहाय्याने नँनो युरीया फवारणी

 


 बुलडाणा, दि. २६ (जिमाका):  जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु झाली असून, या यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांविषयी माहिती देण्यात येत आहे.

 
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सतर्फे नुकतेच बुलढाणा तालुक्यातील साखळी आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथे नॅनो युरियाचे ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक देण्यात आले. जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ चे नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

 यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनाविषयी सादर माहिती देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कृषी विषयक योजना, तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी विषयक तंत्रज्ञानाबाबत ( PM-PRANAM, नॅनो युरीया व ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर)ची माहिती देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ होईल. तसेच रथ यात्रेमध्ये ड्रोनद्वारे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक विजय बावीस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

*****

मतदार यादी निरीक्षक म्हणून डॉ. निधी पांडे यांचा जिल्हा दौरा

 

बुलडाणा, दि. २५ (जिमाका): दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यास तीन भेटी देणार असून, गुरुवार (दि.३०) रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौ-यावर येत प्रथम भेट देणार आहेत.

 

या भेटीच्या अनुषंगाने दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवार (दि.३०) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये राजकीय पक्षांसोबत बैठक घेतील.

 मतदार यादी निरीक्षक डॉ. पांडे बुलढाणा जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांनाही भेटी देणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

*****

 

Friday 24 November 2023

मंजूर निधीनुसार सर्व विकास कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

  

बुलडाणा, दि. 24 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर तरतुदीनुसार आतापर्यंत झालेल्या खर्चाचे प्रमाण कमी आहे. अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यताही अद्यापपर्यंत झालेल्या ना
हीत, ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून कामांना चालना द्यावी.  नियोजित विकासकामांसाठीचा मंजूर निधीनुसार सर्व विकास कामे  31 मार्चपूर्वी करा, असे आदेश राज्याचे सहकारमंत्री तथा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे दिले.

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, सर्वश्री आमदार धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, डॉ. संजय कुटे आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा वार्षि‍क योजनेच्या सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदिवासी उपाययोजनेतील सन 2022-23 अंतर्गत 500कोटी रुपयांच्या 31 मार्च 2023 अखेर पुनर्विनियोजनानंतर झालेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देण्यात आली. तसेच यंदाच्या जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत ऑक्टोबर 2023 अखेर जिल्हा वार्षिक सर्वसाधारणमधून 370 कोटी, विशेष घटक योजना 100 आणि आदिवासी उपयोजनेचा 14.67 कोटीचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये अनुक्रमे 175.98 कोटी, 11.13 कोटी आणि 5.17 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश श्री. वळसे पाटील यांनी दिले.

 लोणार आणि सिंदखेडराजा येथील विकास आराखड्यातील कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच चारा, पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी नियोजित आराखड्याला मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा. आडगावराजा, मेहकर येथील कंचनी महाल व इतर महत्त्वाच्या स्थळांबाबत नियोजित संवर्धनकामांना चालना देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, जिल्हा वार्षिक योजनेची वित्तीय मर्यादा 359 कोटी आहे. जिल्हा यंत्रणांची 1031.62 कोटी ररुपये असून, प्रस्तावित वाढीव आराखडा हा 600 कोटी रुपयांचा जिल्हा यंत्रणांनी तयार केला असल्याचे पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी सांगितले. सन 2023-24 मंजूर नियतव्यय 370 कोटीच्या तुलनेत 230 कोटींची वाढीव मागणी करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

            जिल्हा वार्षिक योजनेत 359 कोटीच्या वित्तीय मर्यादेत तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखड्यात नियोजनाकरिता एकूण 5 टक्के म्हणजे 17.40 कोटी आणि पाच योजनांसाठी 52 कोटी असे एकूण 69.42 कोटी निधी राखीव ठेवण्यात आला असून, उर्वरित 341.56 कोटी निधीपैकी गाभा क्षेत्रासाठी (2/3) व बिगर गाभा क्षेत्रासाठी (1/3) निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

            प्रस्तावित सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत वित्तीय मर्यादा 359 कोटी आणि प्रस्तावित वाढीव 600 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तसेच प्रस्तावित सन 2024-25 साठी विशेष घटक योजनेअंतर्गंत 100 कोटी आणि आदिवासी उपयोजना अंतर्गत 14.67 कोटी रुपयांचा राज्य नियोजन आढावा बैठकीत सादर करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम आराखडा तयार होईल, असेही पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.  

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करा - सहायक आयुक्त प्रवीण खंडारे

 बुलडाणा, दि.24(जिमाका): राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाद्वारे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेतून नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून  तरुणांना रोजगार प्रदान करण्याचे काम शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

              कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशाप्रमाणे हा दोन  दिवसीय   मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून विविध  क्षेत्रातील किमान 100 कंपन्या या  महारोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील  ज्या कंपनी, उदयोजक, आस्थापनाकडे कुशल मनुष्यबळाची गरज असेल अशा सर्व आस्थापनांनी सदर महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी  होऊन  रिक्तपदांबाबतची  माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन  नोंदवावी. त्यामुळे आवश्यक असणा-या मनुष्यबळाची  मागणी तातडीने पूर्ण होण्यास मदत होईल, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी केले आहे. 

नोकरी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन  नोंदणी करावी व मेळाव्यात स्वखर्चाने प्रत्यक्षपणे सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

******

Thursday 23 November 2023

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगाने पूर्ण करा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या 22 टक्के कमी झाला असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाची कामे संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.

 पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणीनिश्चिती व दुष्काळ व्यवस्थापनाची आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

 या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, सर्वश्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित होते.

 जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनाबाबत संबंधित यंत्रणांनी दक्ष राहून उपलब्ध पाण्याचा वारंवार आढावा घेऊन आवश्यकता असल्यास टँकरचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री श्री. वळसे –पाटील यांनी आज येथे दिले. पिण्यासाठी पाणीसाठा आरक्षित असून, पुढील सहा महिन्यांपर्यंत हे पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असले तरी अनधिकृत पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होतो. तो रोखण्यासाठी योग्य कारवाई करावी, असे आदेश त्यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.  

जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन योजनांची कामे वाळूमुळे मागे पडली असून, ती कामे वेगाने पूर्ण करावीत. वाळूअभावी पाण्याच्या टाकीची कामे थांबता कामा नयेत, असे सांगून ते म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाचे मोठे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत. ही कामे करून घेण्याची मुख्यत उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याच्या पाण्यासाठी जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यापर्यंत वर्ग करावेत. त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होणार नाही. याशिवाय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जल जीवन मिशनची कामे पूर्ण करताना पाणीटंचाई काळात देयके भरली नसली त्यांची वीजजोडणी न कापण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आगामी काळातील पशुधनाच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यासाठी चाऱ्याची आवश्यकता आणि उपलब्धता यांचे योग्य नियोजन करण्यास सांगून यंदा चारा छावण्या उघडल्या जाण्याची शक्यता नाही, त्यामुळे चारा उपलब्ध होण्याचया दृष्टिकोनातून ज्या-ज्या उपाययोजना करणे शक्य आहे, त्या सर्व उपाययोजना करा तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेत वन विभागाकडे असलेला चारा राखीव ठेवण्याचे आदेश पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी संबधित यंत्रणेला दिले.

 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एजन्सीनिहाय आराखडा तयार करून वेगवेगळी कामे हाती घेताना बंधारे बांधकाम करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेणेकरून वांरवार पडणाऱ्या दुष्काळावर मात करता येईल, असे सांगून श्री. वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना शेततळी, तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि तलाव खोलीकरणाची कामे करावीत जेणेकरुन पुढील वर्षी अधिकचा पाणीसाठा जमा होईल, असे ते म्हणाले.

  दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, पशुधन वाचविण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत तालुकानिहाय आढावा घ्यावा. पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता आतापासून नियोजन महत्त्वाचे आहे. पशूधनाचीही सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल. पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने चारा लागवडीचे नियोजन करावे. दुष्काळी परिस्थिती जरी वाढली तरी कोणत्याही परिस्थितीत चाराटंचाई निर्माण होणार नाही, ही बाब गांभीर्यपूर्वक विचारात घेत चारा लागवडीचे क्षेत्रनिहाय नियोजन करावे. पीककर्जाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. 

दुष्काळी परिस्थितीत गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शिवारात देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करावी. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत आतापासून प्रत्येक पातळीवर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

तसेच कृषी विभाग, तांडावस्ती आराखडा, रमाई घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना संदर्भातील बैठकीत त्यांनी आढावा घेतला. त्याशिवाय सिंदखेडराजा, शेगाव आणि लोणार विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठक, पाणंद रस्ते, वसंतराव नाईक तांडावस्ती योजना, जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा दक्षता समिती व हुतात्मा स्मारकाबाबत आढावा बैठक घेतली.

खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी शिधापत्रिकाधारकांना करण्यात येणाऱ्या शिध्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना करताना मासिक शिधा वितरण करताना आणि गोदामांची तपासणी करताना लोकप्रतिनिधींनाही सोबत घ्यावे. शेतकऱ्यांना पीककर्ज, जिल्हा क्रीडा संकुल, पाणंद रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

 आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा पाणीटंचाईवर मात करताना जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवला जात असताना इतर जिल्ह्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच भविष्यात जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पडल्यास टँकर तात्काळ उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यासोबत शेतकऱ्यांच्या अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींची देयके वेळेत अदा करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.

 आमदार संजय रायमूलकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या बांधकामाकडे पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांचे लक्ष वेधत अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असल्याची खात्री करूनच कामे करण्याच्या सूचना दिल्या.

  संजय गायकवाड यांनी नळयोजना सौरऊर्जेवर लवकर सुरू केल्यास पाणीपुरवठा योजनांच्या अडचणी दूर होतील, असे सांगून जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या बाबींकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यासाठी जिल्हास्तरीय प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला केल्या.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रास्ताविकातून खडकपुर्णा प्रकल्पात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे सिंचनासाठी पाणी देता येणार नसल्याचे सांगून, या प्रकल्पातून केवळ पिण्यासाठीच पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. कारण जानेवारीपासून पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ते नियोजन करत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पांमुळे पाण्याची पूर्तता करता येऊ शकते असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे पाणी देणेही आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे सिंचन आणि पिण्यासाठी पाणी राखीव ठेवताना प्रशासन सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांच्या आढावा बैठका घेण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

   ******

विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांपर्यंत योजना पोहचवा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ

 


बुलडाणा, दि.२३(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बुलडाणा जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धीरथांना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची यशस्वीपणे प्रचार व प्रसिद्धी व्हावी, त्यातून त्यांना याबाबत माहिती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 'विकसित भारत संकल्प यात्रे'स प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. या यात्रेसाठी जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यामध्ये निवड झाली असून, आज गुरुवार दि. २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात झाली. जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि ग्राम पंचायत क्षेत्रात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

******