Thursday 27 January 2022

DIO BULDANA NEWS 27.1.2022

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 574 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 243 पॉझिटिव्ह

  • 323 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 817 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 574 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 243 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 232 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 459 तर रॅपिड टेस्टमधील 115 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 574 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 29, बुलडाणा तालुका : धामणगांव 1, डोंगरखंडाळा 1, नांद्राकोळी 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : उबाळखेड 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : वळती 2, भालगांव 1, अंचरवाडी 1, मलकापूर शहर : 2, मेहकर शहर : 30, मेहकर तालुका : घाटबोरी 2, चिं.बोरे 1, पांग्रा डोळे 3, दाभा 1, लोणी गवळी 3, शिवपूरी 1, उकळी 1, मादनी 2,लोणार शहर : 2, लेणार तालुका : कि. जट्टू 6, तांबोळा 1, मांडवा 1, बिबी 1, कुंबेफळ 1,खामगांव शहर : 77, खामगांव तालुका : गोंधनापूर 1, शेलोडी 1, घारोड 1, पिं. देशमुख 2, मुरंबा 2, उमरा 1, बोरी अडगाव 1, शहापूर 1, विहीगांव 3, गवंढळा 1, रामनगर 1, अटाळी 6, आंबेटाकळी 1, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 1,शेगांव शहर : 2, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 3, उकलगांव 1, वानखेड 4, दुर्गादैत्य 1,नांदुरा शहर : 8, नांदुरा तालुका : निमगांव 6, वडाळी 5, पि. धांडे 1,    अशाप्रकारे जिल्ह्यात 243 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 323 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 771703 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 89150 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 89150 आहे.  आज रोजी 2140 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 771703 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 92154 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 89150 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 2325 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 679 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                            ******

कर्जमुक्ती योजनेतंर्गत मयत कर्जदारांची माहिती बँकांनी अद्ययावत करावी

       बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  राज्यात  1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुल शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) वर अपलोड करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीत योजनेच्या सेंट्रल टीम मार्फत बँकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन सदर सुविधेची कार्यपद्धती बँकांना ई-मेलद्वारे सेंट्रल टीमवरुन पाठविण्यात आली होती.

    तथापि याबाबत अद्याप बँकांच्या स्तरावर कार्यवाही प्रलंबित असल्याचे दिसून येते. सदर बाबत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अध्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी अंतिम संधी म्हणून सदर सुविधा दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यानंतर अशी सुविधा बँकांना उपलब्ध राहणार नाही व ज्या मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवर सादर न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची राहील, याची नोंद घ्यावी. तसेच मयत कर्जदार सभासदाच्या वारसांनी संबंधीत बँकेशी संपर्क साधून वारसाचे कागदपत्रे संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन संगमेश्वर बदनाळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

शेतकरी प्रशिक्षण प्रक्षेत्र भेटीसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय अनुसंधान परीषदे अंतर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठ प्रक्षेत्र फलोत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे यांच्या शेतावर 5 दिवशीय प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्यावतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, मेहकर यांनी केले आहे.

अर्जदारासाठी अटी : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे निवड करण्यात येईल, शेतकऱ्याच्या नावे 7/12 व नमुना 8 अ असावा, वयोमर्यादा 18 ते 45 असावी, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स असावी, पासपोर्ट आकराचा एक फोटो असावा.

                                                                                ******

 

Wednesday 26 January 2022

पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताकच्या वर्धापन दिनाचा सोहळा

 





 कोरोनावर मात करीत जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताकच्या वर्धापन दिनाचा सोहळा थाटात
  • कर्जमुक्ती योजनेतून 1 लक्ष 69 हजार 596 शेतकऱ्यांना 1139 कोटींचा लाभ
  • शिव भोजन थाळी योजनेतून 23 लक्ष 41 हजार 169 लाभार्थ्यांना लाभ
  • 10 लक्ष 42 हजार 591 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस

बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला आपण सामोरे जात आहे. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश येत आहे. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

    भारतीय प्रजासत्ताकाचा 72 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जि.प अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विभागप्रमुख, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

  कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्ह्यात 18 वर्ष वयोगट पुढील लाभार्थ्यांना 16 लक्ष 80 हजार 836 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 10 लक्ष 42 हजार 591 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 ते 18 वर्ष वयाच्या किशोरवयीन 57 हजार 48 लाभार्थ्यांनी आजपावेतो लसीचा पहिला डोस घेतला आहे.  मागील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा भविष्यात निर्माण न होण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.      

   जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. खरीप हंगाम सन 2021 मध्ये माहे जुन ते ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 2.17 लक्ष हेक्टर क्षेत्र बाधित झाले. निकषानुसार 96 हजार 457 शेतकऱ्यांच्या 74.87 कोटी रूपयांची नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 1 लक्ष 25 हजार 21 शेतकऱ्यांना 99.91 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 69 हजार 596 लाभार्थी शेतकऱ्यांना 1139 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे.

    ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र पाच रूपये दरात दर्जेदार जेवण देण्यासाठी शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत 23 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून 2021 वर्षात 9 लक्ष 36 हजार थाळी सवलतीच्या दरात वितरीत करण्यात आली आहे. तसेच दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार 400 क्विंटल धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे.   जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये आतापर्यंत 53 हजार 327 व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 831 कामे सुरू असून त्यावर 4 हजार 275 मजूरांची उपस्थिती आहे.   

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, पुढील 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 257 कोटी वित्तीय मर्यादेपेक्षा 57 कोटी रूपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला 315 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून गाव तेथे वाचनालय, रस्ते निर्मिती व आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून आजपर्यंत 18 हजार 117 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात  जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे.  जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 6 गावांचे पुनर्वसन पुर्ण करण्यात आले आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे.

       भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यात लावता येणार आहे.  जिल्ह्यात मागील वर्षात 25 जप्ती कारवायांमध्ये एकूण 49 लक्ष 37 हजार 200 रूपये किमतीच्या प्रतिबंधीत  अन्न पदार्थाचा  साठा जप्त करण्यात आला आहे.  प्रत्येकाला दरडोई 55 लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जल जिवन मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 622 योजना जल जिवन मिशन अंतर्गत असून 158 योजना प्रगती पथावर आहे.  कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रि सुत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविड सारख्या साथरोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रि सुत्री प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

       कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांना राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी परेड रिपोर्टींग केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. साहेबराव सोळंकी यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                                                        ********

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पारितोषिकांचे वितरण

       बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2020-21 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना स्मृतिचन्ह देण्यात आले. 

   जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडून पोलीस प्रशिक्षण केंद्रात उल्लेखनिय सेवा दिल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट पोलीस पदक 2020 सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश नाथाजी इंगळे यांना प्रदान करण्यात आले.

जिल्हा क्रीडा व युवा पुस्कार 2020-21 अंतर्गत स्वामी सुधाकर दळवी यास पुरूष गटातील जिल्हा क्रीडा पुरस्कार, कु. मोनाली चंद्रहर्ष जाधव हिस महिला गटातील जिल्हा क्रीडा पुरस्कार, मिहीर नितीन अपार यास जिल्हा क्रीडा विशेष पुरस्कार व विजय भाऊराव पळसकर, मलकापूर यांना जिल्हा क्रीडा विशेष गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा सामान्य रूग्णालय, चोपडे हॉस्पीटल बुलडाणा, अमृत हृदयालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हृदयालय व सामान्य रूग्णालय खामगांव यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.  

****

कर्जमुक्ती योजनेतंर्गत मयत कर्जदारांची माहिती बँकांनी अद्ययावत करावी

       बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  राज्यात  1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुल शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) वर अपलोड करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2021 ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत योजनेच्या सेंट्रल टीम मार्फत बँकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन सदर सुविधेची कार्यपद्धती बँकांना ई-मेलद्वारे सेंट्रल टीमवरुन पाठविण्यात आली होती.

    तथापि याबाबत अद्याप बँकांच्या स्तरावर कार्यवाही प्रलंबित असल्याचे दिसून येते. सदर बाबत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अध्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी अंतिम संधी म्हणून सदर सुविधा दि. 29 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यानंतर अशी सुविधा बँकांना उपलब्ध राहणार नाही व ज्या मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवर सादर न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची राहील, याची नोंद घ्यावी. तसेच मयत कर्जदार सभासदाच्या वारसांनी संबंधीत बँकेशी संपर्क साधून वारसाचे कागदपत्रे संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

                                                                                                                **********

Tuesday 25 January 2022

DIO BULDANA NEWS 25.1.2022

 


श्रवण यंत्राच्या उपयोगामुळे जीवनमान सुसह्य होण्यास मदत

-          पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • सिंदखेड राजा येथे श्रवण यंत्र वाटप कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधाराण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी दिव्यांग, कर्णबधीर यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी आज 25 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोफत श्रवण यंत्र वाटप या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातही कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गरजवंतांना याचा फायदा व्हावा, अशी आमची भावना आहे. त्या अनुषंगाने गरजवंतांनी या श्रवण यंत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशन, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद,  बुलडाणा जिल्हा नियोजन निधी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवण यंत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन सिंदखेड राजा स्थित काळा कोट येथील संग्रहालय येथे करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजुभाऊ तायडे,  जि.प समाज कल्याण सभापती सौ पुनमताई राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. तडस, उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे, तहसीलदार सुनील सावंत,  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्ह्याचे नरेश  शेळके, पंचायत समिती सभापती सौ मीनाताई बंगाळे, जि.प सदस्य सर्वश्री दिनकर बापू देशमुख, राम जाधव, पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराजे जाधव, सतीश काळे, सीताराम चौधरी, शाम मेहत्रे, गणेश झोरे, शेख आजीम, पंचायत समिती माजी उपसभापती सुनील जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. संचालन ॲड संदीप मेहेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र अंभोरे यांनी मानले.

***********

ई श्रम पोर्टलवर जिल्ह्यात 1 लक्ष 66 हजार 158 कामगारांची नोंदणी   

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : जिल्ह्यात ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1 लक्ष 66 हजार 158 एवढ्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत. विट भट्टी, खाणी अशा ठिकाणी पोहचून कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेवून नोंदणी करून घ्यावी. ई श्रम पोर्टलवर जिल्ह्याकरीता 10 लक्ष 226 एवढे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विट भट्टी व इतर व्यवसायांच्या मालकांनीही आपल्या कामगारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. असंघटीत बांधवांनी नोंदणी करून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे.

   जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटीत कामगारांसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती,बुलडाणा यांच्यासमवेत झालेल्या ई श्रम पोर्टल व असंघटीत कामगारांसाठीच्या योजनांबाबत 24 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी श्री. राठोड आदी उपस्थित होते.  योजनेमध्ये नोंदणी विनामूल्य असून असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत वार्षिक अंशदान केंद्रशासन भरणार आहे. या योजनेत बांधकाम कामगार, विटभट्टी कामगार, शेतमजूर, फेरीवाले फळ-भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, असंघटीत क्षेत्रातील व सुमारे 300 उद्योग व व्यवसाय येतात. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सद्यस्थिती केंद्र शासनामार्फत ई-श्रम कार्ड योजना राबविण्यात येत आहे. योजनेत नोंदणी करण्याकरीता असंघटीत कामगारांचे वय 16 ते 59 वर्ष असावे. तो प्राप्ती कर भरणारा नसावा, ईपीएफ व ईएसआयसी चा सदस्य नसावा.

  असंघटीत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रूपये अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचप्रमाणे अपघातात पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रूपये व अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रूपयांची तरतूद या विमा योजनेत आहे.  त्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, वारसदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणी ऑनलाईन ई-श्रम पोर्टलवर स्वत: नोंदणी करता येते. किंवा सीएससी केंद्रावर जावून अथवा www.eshram.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येते, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी श्री. राठोड यांनी दिली आहे.

                                                                        ******

प्रजासत्ताक दिनी शासकीय सुट्टीमुळे दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द    

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. येणाऱ्या 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे चौथ्या बुधवारी 26 जानेवारी 2022 रोजी जिल्हा रूग्णालय येथील अस्थिव्यंग, नेत्र संबधित दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय येथील सदर दिव्यांग तपासणी शिबिरास येवू नये, आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणर नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

                                                            *********  

डॉ झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावे

· 11 फेब्रुवारी 2022 अंतिम मुदत

· प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना पायाभुत सुविधांसाठी अनुदान देण्यात येत आहे. सदर अनुदान जास्तीत जास्त 2 लक्ष रूपये इतक्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे. तरी इच्छूक पात्र मदरशांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावे. सदर प्रस्ताव 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे. मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत, अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्या मदरसांना स्कीम फॉर प्रोव्हाईडींग क्वालीटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णय तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, ऊर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     प्रस्ताव 11.10.2013 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सादर करावे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या पात्र निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम दिनांकाची प्रतिक्षा न करता तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

                                                                        ************

कोरोना अलर्ट : प्राप्त 1067 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 211 पॉझिटिव्ह

  • 206 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1278 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1067 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 211 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 92 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 119 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 98 तर रॅपिड टेस्टमधील 969 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1067 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 63, बुलडाणा तालुका : माळविहीर 2, देऊळघाट 1, भादोला 2, चांडोळ 7, मासरूळ 1,अटकळ 1,पळसखेड नागो 1, तांदुळवाडी 1, बिरसिंगपूर 1, मोताळा  शहर : 2, मोताळा तालुका : वडगांव 1, अंत्री 4, धरणगांव 2, टाकळी 2, डिडोळा 2, वाघजळ 1, बोराखेडी 1, शेलगांव बाजार 2, पिंपळपाटी 1, मलकापूर शहर : 10, मलकापूर तालुका : दाताळा 1, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, सोनाळा 1, खामगांव शहर : 11, खामगांव तालुका : हिवरखेड 3, नांद्री 1, दिवठाणा 1, मांडका 1, रोहणा 1, हिवरा बु 2, नांदुर शहर : 14, नांदुरा तालुका : महाळुंगी 2, वसाडी 1, निमगांव 2, दहीवडी 1, वडनेर 2, टाकरखेड 2, बेलुरा 5, खैरा 1, शेगांव शहर : 2, दे. राजा शहर : 8, दे. राजा तालुका : तुळजापूर 1, गिरोली 1, किन्ही पवार 1, मेंडगांव 2, लोणार तालुका : कारेगांव 1, पिंपरी 2, हिवरखेड 1, सैंधव 1, चोरपांग्रा 1, चिखला 1, भुमराळा 1, बिबी 1,   वेणी 2, चिखली शहर : 6,  तालुका : भालगांव 2, तेल्हारा 1, शेलगांव जहा 1, ढासाळा 1,  कोलारा 2, जळगांव जामोद शहर : 2, सिं. राजा शहर : 1,  अशाप्रकारे जिल्ह्यात 297 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 206 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 770130 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 88487 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 88487 आहे.  आज रोजी 537 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 770130 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 91628 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 88487 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 2462 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 679 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  


--

Monday 24 January 2022

राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...

 राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...

· हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका

बुलडाणा,(जिमाका) दि.24 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.

    राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 - लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मी.मी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3- लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4- लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8- लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 - लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मी.मी असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मी.मी, मोटार कारसाठी 225 बाय 150 मी.मी आणि टेबलसाठी 150 बाय 100 मी.मी असावा.

    भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे. हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.  

********

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे 25 जानेवारी रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.24 : भारत निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका ही थीम देण्यात आली आहे. या थीमने 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोविड 19 च्या निर्बंधाच्या अनुषंगाने सदर कार्यक्रम जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शपथ घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने https://meet.google.com/oez-ehrq-rmb या लिंकचा वापर करून सर्व महाविद्यालये, मतदार, नागरिक यांना सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात नवमतदारांना प्रातिनिधीक तत्वावर इपिक कार्ड चे वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी 25 जानेवारी 2022 रोजी जिल्हास्तरावरून आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमामध्ये सोबतच्या लिंकचा वापर करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.

DIO BULDANA NEWS 24.1.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 582 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 297 पॉझिटिव्ह

  • 186 रूग्णांना मिळाली सुट्टी, 1 मृत्यू

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 879 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 582 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 297 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 284 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 375 तर रॅपिड टेस्टमधील 207 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 582 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 79, बुलडाणा तालुका : साखळी 1, हतेडी 2, रायपूर 1, करवंड 1, डोंगरखंडाळा 1, उमाळा 1, नांद्राकोळी 4, चिखली शहर : 27, चिखली तालुका : भालगांव 1, शेलूद 1,सावरखेड 1, कवठळ 1, अंत्री कोळी 1, अमडापूर 1, शेलगांव जहा 1,  खोर 1, मंगरूळ इसरूळ 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : बोराखेडी 1, दे.राजा तालुका : अंढेरा 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, शेगांव शहर : 54, शेगांव तालुका : पलोदी 1, लासुरा 1, चिंचोली 2, जवळा बु 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : काकोडा 1,  सोनाळा 34, टुनकी 1, बावनबीर 1, खामगांव शहर : 43, खामगांव तालुका : टेंभुर्णा 2, पि. राजा 1,वझर 1,पारखेड 2, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : जिगांव 1, माळेगांव गोंड 1, जळगांव जामोद तालुका : काजेगांव 1, मडाखेड बु 1, इलोरा 1, चावरा 1, खेर्डा 1, बोराळा खु 1, जळगांव जामोद शहर : 1,  परजिल्हा : अकोट 1, मनात्री ता. तेल्हारा 1, डोंगरगांव ता. बाळापूर 2,  अशाप्रकारे जिल्ह्यात 297 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 186 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वसंतवाडी, खामगांव येथील 86 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 769063 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 88281 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 88281 आहे.  आज रोजी 293 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 769063 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 91417 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 88281 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 2457 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 679 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********

उन्हाळी हंगामासाठी भुईमुग बियाणे ग्राम बिजोत्पादन योजनेतंर्गत अनुदानावर उपलब्ध

  बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :   उन्हाळी 21-22 हंगामासाठी राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियांनातर्गत बियाणे व लागवड साहित्य उपभियान मध्ये भुईमुग बियाण्याकरीता ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर बियाणे विक्री महाबीज अकोला मार्फत जिल्ह्यासाठी विक्रेते व उपविक्रेत्यांमार्फत सुरु होत आहे.

    सदरील योजनेमध्ये भुईमुग पिकामध्ये टॅग – 24 या वाणाचे बियाणे उपलब्ध आहे. भुईमुग 20 किलो बॅग ची मूळ किंमत 3 हजार 300 रूपये व अनुदान 1 हजार 400 रूपये प्रती बॅग आहे.  अनुदानित किंमत 1 हजार 900 रूपये प्रती बॅग आहे. जिल्ह्यासाठी भुईमुग पिकाचे 1 हजार क्विंटल बियाण्याचे लक्षांक कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेले आहे. या योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या मात्रेमधून एका शेतकऱ्याला एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत 40 किलो पर्यंत अनुदानावर मिळणार आहे.

तरी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी (MahaDBT) प्रणाली व्दारे 28 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज ऑनलाईन करणे बंधनकारक आहे. तसेच महाडीबीटी पोर्टल व्दारे निवड पत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी कळविले आहे.

                                                                        *********


जिल्हा वार्षिक योजनेसाठी जिल्ह्याला 57.78 कोटी वाढीव तरतूद मंजूर

  • जिल्हा वार्षिक योजनेची वित्तीय मर्यादा 257.22 कोटी
  • जिल्हा वार्षिक योजनेच्या वाढीव 57.78 कोटीसह एकूण 315 कोटी रूपये

  बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण2022-23 साठी जिल्ह्याची 257.22 कोटी रूपयांची वित्तीय मर्यादा आहे. या वित्तीय मर्यादेच्या आराखड्यात 57.78 कोटी रूपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा पुढील आर्थिक वर्षाचा आराखडा वाढीव तरतूदीसह 315 कोटी  रूपयांचा झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण2022-23  राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन आज 24 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग कक्षात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहा जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.  

    यावेळी जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेल्या सि.राजा व लोणार पर्यटन विकास आराखड्यासाठी वेगळी तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच लोणार व सिं.राजा पर्यटन विकासासाठी स्वतंत्र निधी मिळणार असल्यामुळे आराखडाही गतीने पुढे जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेकरीता वाढीव तरतूदीसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

                                                            **********


कोरोना नियमांचे कडक पालन करून शाळा सुरू कराव्यात

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • 28 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे नियोजन

  बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  जिल्ह्यातील 1 ते 12 पर्यंतच्या सर्वच शाळा कोरोना नियम, शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात. शाळांमध्ये सॅनीटायझेशन, सोशल डिस्टसिंग व हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेण्यात यावी, अशा सूचना आज पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

   शाळा सुरू करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री परिस्थितीचा आढावा घेत बोलत होते. याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनीषाताई पवार, आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, श्री. मुकूंद आदी उपस्थित होते.  

   कोरोनाचे सर्व नियम शळांना पाळण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, 28 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. शाळेत सर्वांना मास्क वापण्याची सक्ती करावी. याबाबत शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सुचना निर्गमीत कराव्यात, असे आदेशही पालकमंत्री यांनी दिले.

    शाळा सुरू करणेबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 27 जानेवारी 2022 पर्यंत आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. शाळा दररोज किमान 3 ते कमाल 4 तास कालावधीसाठी घेण्यात यावी. इयत्ता 9 वी ते 12 वीच्या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये सकाळ / दुपार अशा दोन पाळी वर्ग भरविण्यात यावे. मैदानावरील खेळ, स्नेह संमेलन, दैनिक परिपाठ आदी गर्दीच्या कार्यक्रम आयोजनावर बंदी राहील.    विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला असल्यास शाळेत येण्याबाबतची सक्ती करण्यात येवू नये. विद्यार्थ्यांच्या पालकांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देवून जनजागृती करावी. लसीकरण न झालेल्या शिक्षकांना शाळेत प्रवेश देवू नये. शाळेत उपस्थित राहण्याकरीता पालकांची लेखी संमती आवश्यक राहणार आहे. एका बाकावर शक्यतो एकच विद्यार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी. तसेच दोन बाकांमध्ये सुरक्षीत अंतर राखण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्याची व्यवस्था करावी. शालेय परीसराची नियमित स्वच्छता राखावी, असे शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक आदेशात नमूद आहे.

                                                                        ********

   

                     


घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील भुखंड वाटप तातडीने करावे

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • तेल्हारा गावातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करावी

    बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड व पांढरदेव गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी कालबद्ध कार्यवाही करावी.  घानमोड व मानमोड येथील पुर्नवसित गावाच्या जागेवरील भूखंडाचे तातडीने वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील पुनर्वसन आणि तेल्हारा येथील नागरी सुविधांबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. माचेवाड, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

   पालकमंत्री डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, घानमोड व मानमोड येथील भूखंडावर अतिक्रमण असल्यास आहे, त्याच स्थितीत त्याच जागेवर भुखंड देवून पुनर्वसन करण्यात यावे. याबाबत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे पांढरदेव येथील भूखंडांचे सीमांकन करून घ्यावे. सीमांकन झाल्यानंतर विनाविलंब भुखंडाचे वाटप करावे. यामध्ये दिरंगाई करू नये. निधी, भूखंड वाटप व नागरी सुविधांच्या कामांचा कालबद्ध  कार्यक्रम आखावा. या कार्यक्रमाचे वेळापत्रकच उपोषणकर्त्यांना देवून उपोषण कर्त्यांचे समाधान करावे. तसेच काही भूखंडावर घरे असल्यास व ती पडलेली असल्यास त्या घरांचे जुन्याच मुल्यांकनानुसार मुल्यांकन करावे.

  ते पुढे म्हणाले, भूसंपादन प्रकरणे निधीअभावी व्यपगत झाली आहेत. या प्रकरणांमध्ये तातडीने निधी मागणी प्रस्ताव संबंधित यंत्रणेने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा.  तसेच पारंपारिक पद्धतीने भुसंपादन केल्यापेक्षा सरळ खरेदी पद्धत अवंलबवावी. यामुळे गतीने भुसंपादन होवून मोबदलाही तातडीने देणे शक्य होईल.  तेल्हारा या गावाने स्वेच्छा पुनर्वसन केले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे, या गावाने शासनाचा मोठा निधी वाचविला आहे. त्यामुळे तेल्हारा येथील भूखंड मालकांची नावे नमुना 8 वर चढवावी. त्यासाठी लाभार्थीनुसार भुखंड वाटप करून हा प्रश्न सोडवावा. तसेच गावातील नागरी सुविधांची कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. याबाबत स्वतंत्र बैठकही घेण्यात येईल.    त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मासरूळ व अमडापूर गटातील प्रलंबित, नवीन प्रस्तावित कामे पुर्ण करावी. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा अंतर्गत निधीची तरतूद करावी. पांदण रस्ते, जामठी येथील शाळा खोल्यांचे बांधकाम तातडीने पुर्ण करावे. अमडापूर गटातील स्मशान भूमी सौंदर्यीकरण, पाझर तलाव दुरूस्ती करावी.

   यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनीसुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यासाठी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले यांनीसुद्धा यापूर्वी उपोषणकर्त्यांच्या मंडपाला भेद देवून विनंती केली आहे. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीनेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        ************

जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा, प्रजासत्ताक दिनी वितरण

    बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनलाय, द्वारा क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ता यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.  जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, बुलडाणा मार्फत सन 2020-2021 या वर्षाकरीता  स्वामी सुधाकर दळवी (गुणवंत खेळाडू-पुरुष),  कु.मोनाली चंद्रहर्ष जाधव (गुणवंत खेळाडू-महिला), विजय भाऊराव पळसकर (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक), मिहीर नितीन अपार (विशेष जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार) पुरस्कारार्थींची निवड करण्यात आलेली आहे.  

    या पुरस्काराचे स्वरुप  दहा हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असुन, 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचेहस्ते व जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

 

 

 

   सन 2020-21 या वर्षीचा गुणवंत खेळाडू (पुरुष) हा पुरस्कार स्वामी सुधाकर दळवी या खेळाडूस प्रदान करण्यात येत आहे.  या खेळाडूने मागील पाच वर्षात सन 2016-17 व 2018-19 या वर्षीच्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तर सन 2018-19 मध्ये दोन रजत पदक प्राप्त केले आहे.

   सन 2020-21 या वर्षीचा गुणवंत खेळाडू (महिला) हा पुरस्कार कु. मोनाली चंदहर्ष जाधव या खेळाडूस प्रदान करण्यात येत आहे. या खेळाडूने मागील पाच वर्षात रांची (झारखंड) या ठिकाणी संपन्न झालेल्या  7 वी ऑल इंडीया आर्चरी चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्ण पदक तर कट्टक (ओडीसा) या ठिकाणी संपन्न झालेल्या 39 वी ऑल इंडीया सिनीयर नॅशनल आर्चरी चॅम्पीयनशीप मध्ये रजत पदक प्राप्त केले . दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

     सन 2020-21 या वर्षीचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार विजय भाऊराव पळसकर यांना प्रदान करण्यात येत आहे. मागील 10 वर्षात आट्यापाट्या या खेळात जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करुन पदक विजेते खेळाडू घडविलेले आहे. ते सद्या तालुका क्रीडा संकुल मलकापुर येथे आपल्या खेळाचा नियमित प्रचार व प्रसार करीत आहे. सन 2020-21 या वर्षीचा विशेष जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार हा पुरस्कार मिहीर नितीन अपार यांना प्रदान करण्यात येत आहे. या खेळाडूने पोलंड येथे झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीप मध्ये भारतीय संघाकडून सहभागी घेवून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

                                                            ******

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन

• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

• 31 जानेवारीपर्यंत चालणार मेळावे

बुलडाणा,(जिमाका)दि.24 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 24 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे.

   या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

     रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना रोजगार संधी सोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                            *****

Sunday 23 January 2022

DIO BULDANA NEWS 23.1.2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात 

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवाद
बुलडाणा, (जिमाका) दि. २३ : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, अधिक्षक शामला खोत यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
000

कोविड उपचार सुविधांची माहिती “मोबाइल अॅप'द्वारे मिळणार एका क्लिकवर
बुलडाणा, (जिमाका) दि. २३ : कोविडचे निदान झाल्यावर उपचार सुविधांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'एमएचसीसीएमएस' (MHCCMS) अर्थात कोविड केअर) मॅनेजमेंट सिस्टीम या मोबाईल अॅप ची निर्मिती केली असून या मध्यमातुन नागरिकांनी माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिकआरोग्य विभागाने हे अॅप तयार केले असून www.mahacovid.jeevandayee.gov. in ही  अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक आहे.
    या शिवाय गुगल प्ले स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यावर आपण आपला जिल्हा, तालुका आदी निवडल्यावर आपल्या भागातील उपलब्ध बेड संख्या, कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड उपलब्ध आहेत. त्यातही ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सुविधा, अतिदक्षता विभाग, साधे बेड या प्रमाणे वर्गिकरण ऊपलब्ध आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्धता व अशी विविध प्रकारची माहिती यात उपलब्ध करण्यात आली आहे.या शिवाय अन्य जिल्ह्यातील माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच त्या त्या रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना ही माहिती पाहता येणार आहे. जेणेकरून त्यांना आपल्या घरातील रुग्णाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन मिळेल. या शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना युजर आयडी व पासवर्ड द्वारे, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता याबाबतची माहितीही जिल्हास्तरावरील नियोजनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.  सर्व नागरिकांनी या अॅप चा वापर कोविड उपचार सुविधा माहितीसाठी करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने  केले आहे.
*******
एफडीए ची चिखली एमआयडीसी मध्ये कारवाई
बुलडाणा, (जिमाका) दि. २३ : अन्न व औषध प्रशासन (म. राज्य), बुलडाणा अर्यालयाचे अन्न सुरक्षा  जी. के. वसाने यांनी प्रशासनाच्या गुप्त वार्ता शाषेस प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) स. ए.सूर्यवंशी यांचे समवेत मनिष सुरेश अग्रवाल यांच्या मालकीच्या मे. यश ट्रेडर्स, प्लॉट नं. ए ७, एम, आय डी. सी., चिखली येथे १२ जानेवारी रोजी फुटाना (भुना चना) उत्पादक आस्थापनेची तपासणी करण्यात आली. सदर आस्थापनेत हरभऱ्यावर प्रक्रिया करून त्यात हळद पावडर, आयोडीनयुक्त मीठ, व खाद्य रंगाचा वापर करून फुटाणा (भुना चना) चे उत्पादन होत असल्याचे आढळले. आस्थापनेची तपासणी करण्यात आली व हरभऱ्यांवर प्रक्रिया करून भुना चना उत्पादन करणाऱ्या आस्थापनेतुन भुना   चना व भुना चना उत्पादनासाठी आवश्यक घटक अन्न पदार्थाचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले आहेत.
   सदर उत्पादन प्रक्रियेत हा रंगाचा वापर करण्यात मेत असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा च मानदे कायद्यान्वये Tatrazine Special या रंगाच्या अन्न पदार्थाच्या उत्पादनात वापरास परवानगी नाही. सदर आस्थापनेत भुना चना व भुना चना उत्पादनासाठी आवश्यक घटक अन्न पदार्थाचा ११ लक्ष २८ हजार २६७ रुपये किंमतीचा साठा भेसळयुक्त असल्याचे आढळल्याने जन आरोग्याच्या दृष्टीने जप्त करून अन्न व्यवसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवला आहे. सदर नमुने पृथः करणासाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. सदर नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, चिखली येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन चिखली करीत आहे, असे सहायक आयुक्त श्री. केदारे यांनी कळविले आहे.
*****