Thursday 29 July 2021

DIO BULDANA NEWS 29.7.2021

 

माती व पाण्याच्या समृद्धीतूनच समृद्ध गाव साकार होईल 

-         जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृदसंधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.

   पाणी फाउंडेशनकडून 2020  पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण 39 तालुक्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सहभागी गावाकरिता फेब्रुवारीमध्ये मिनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वॉटर कप द्वितीय पुरस्कार विजेते गाव सिंदखेड ता. मोताळा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संबोधीत करताना जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प राजेश लोखंडे,  वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. ढवळे, जि.प सदस्य निरंजन वाडे, गटविकास अधिकारी श्री. मोहोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार  आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, गावाच्या सामुहिक प्रयत्नातून सातत्यपूर्ण काम करीत राहिल्यास मोताळा तालुक्याचा नावलौकिक देशपातळीपर्यंत पोहोचेल. गावाच्या विकासाकरिता जिल्हा प्रशासनाचे पूर्ण क्षमतेने सहकार्य असणार आहे.  उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड यावेळी म्हणाले, नरेगा योजनेच्या माध्यमातून लखपती कुटुंब समृद्ध कुटुंब ही संकल्पना राबविण्यात येत आहे.  नरेगाची काम करण्याची पद्धत, आता बदलली असून मागेल ते काम  देण्याची कार्यपद्धती सध्या रोजगार हमी योजने मार्फत राबविण्यात येत आहे. रोजगार हमीच्या योग्य नियोजनातून गावातील बेरोजगारी तसेच आर्थिक अडचण निश्चितपणे सोडवल्या जाऊन शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करता येते.

   कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करत असलेल्या सर्व गावांची कामगिरी समाधानकारक राहीली आहे. तसेच समृद्ध गाव स्पर्धेबरोबरच गावाने गावाची एकी आणि नेकी टिकवून ठेवावी.  त्याच्या जोरावर गावाचा विकास करावा. सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी सिंदखेड समृद्ध गाव स्पर्धेमध्ये करीत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यामध्ये पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेली गवत नर्सरी, बांधावरील वृक्ष लागवड, सोबतच 67 एकर वरती केलेली वृक्ष व गवत लागवडीच्या पाहणीचा समावेश आहे.

  संपूर्ण शिवारफेरी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने गाव करीत असलेल्या कामाची पाहणी करून निरीक्षण केले. गावाची पुढील वाटचाल समजून घेतली. सन्मान सोहळ्यामध्ये जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, पोखरी, चिंचपूर, पोहा, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापुर खु, चिंचखेड नाथ आणि सिंदखेडा या 13 गावांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच पोफळी, लपाली, खामखेड, कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक या 7 गावांना सन्मानपत्र देऊन गौरवित करण्यात आले.  मोताळा तालुक्यातील विजयी गावांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर सन्मान सोहळ्यामध्ये श्रीमती कामिनीबाई राजगुरू, उबाळखेड यांना युएनडीपी, जलशक्ती मंत्रालय आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर वुमन वारियर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव भोसले, पाणी फाउंडेशन, विभागीय समन्वयक यांनी  तर आभार प्रदर्शन दिलीप मोरे यांनी केले.

****

कोरोना अलर्ट : प्राप्त 2120 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

  • 04 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2123 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 499 तर रॅपिड टेस्टमधील 1621 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2120 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : अंचरवाडी 1, चिखली शहर : 1, दे. राजा तालुका : डोढ्रा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 04 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 635882 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86556 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86556 आहे.

  आज रोजी 1527 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 635882 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87250 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86556 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

****

राष्ट्रीय लोक अदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशान्वये जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2021 रोजी बुलडाणा व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकमेकांवर विजय मिळविल्याचा आनंद फक्त एक दिवस टिकतो पण तडजोड करून तसे प्रकरण एकमेकांना विश्वासात घेवून मिटविल्यास आपल्या जिवनातील विरोधक कमी होतात व त्याने आपण जास्त प्रगती करतो. त्यामुळे एकमेकांवर विजय मिळविण्याचा विचार करण्यापेक्षा तडजोड करून खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस कमी होवून एकमेकांबद्दल प्रेमाने सद्भावना निर्माण होते.

   यानानीना विचार करुन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये 1 ऑगस्ट रोजी जिल्हयात सुध्दा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संधीचा लाभ पक्षकारांनी भेटून दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे  निकाली काढावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्र. अध्यक्ष तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे, प्राधिकरणाचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार सावळे यांनी केले आहे.

  सदर लोकअदालतीत मोटार व्हेईकल अक्ट चे प्रकरणेसुद्धा तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले असून त्यात तडलोड शुल्क न्यायालयीन दैनंदिन प्रक्रियेपेक्षा कमी आकारण्यात येणार आहे.  पक्षकारांनी या संधीचा फायदा जरूर घ्यावा.  लोकअदालतीत कोविड -१९ बाबत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व दोन गज सामाजिक दुरी ठेवणे बंधनकारक आहे. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर प्रकरण सामजस्याने निकाली निघेल व आपला वेळ व खर्च वाचेल, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.

******

वृद्ध आई – वडीलांना मुले सांभाळत नसल्यास समाज कल्याणकडे तक्रार करावी

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : वृद्धांना त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांमध्ये वृद्धांसाठी विशेष कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्याचा आधार घेवून प्राप्त तक्रारींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाकडून केला जाणार आहे. मुले सांभाळ करीत नसतील, तर अशा वृद्धांच्या तक्रारींची सुनावणी घेण्याचे, त्यांना पोटगी मिळवून देण्याचे अधिकार कायद्याने महसूल विभागातील विभागीय प्रांत अधिकाऱ्यांकडे आहेत.

  अनेक सरकारी योजनांमध्ये वृद्धांना खास सवलती आहेत. त्यामुळे या योजनांची माहिती होणे, दावा करणे, तक्रार असल्यास ती देणे यासाठी प्रत्येक जिल्हा कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात वरिष्ठ लिपीक दर्जाचा अधिकारी प्रमुख असेल. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल तो घेणार आहे. त्यासाठी कायद्याच्या आधारे पाठपुरावा करेल व तक्रारीचे निवारण करून घेईल. योजनांची माहितीही त्याच्याकडून वृद्ध नागरिकांना दिली जाईल. तक्रारदार व सरकारी यंत्रणा यांच्यातील समन्वयक म्हणून तो काम करेल, असे सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे.

****

इमाव आर्थिक विकास महामंडळाचे विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त

  • पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी विविध योजनेचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यासाठी बिजभांडवल योजनेचे 36, थेट कर्ज योजनेचे रक्कम रु. 1 लक्षपर्यंत 133, वैयक्तीक व्याज परतावा कर्ज योजनेचे 85 व गट कर्ज व्याज परतावा योजनेचे 12 चे  उद्दिष्ट प्रप्त झाले आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

  महामंडळाची 20 टक्के बीजभांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातुन राबविण्यात येत आहे. एकूण मंजुर कर्ज रकमेत महामंडळाचा सहभाग 20 टक्के,  बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी सहभाग 5 टक्के आहे. कर्जाची मर्यादा रू. 5 लाख व कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.  थेट कर्ज योजना  ही महामंडळामार्फत राबवली जाते. कर्ज मर्यादा रू. 1 लाख आहे. लाभासाठी अर्जदाराचा सिबल क्रेडीट स्कोअर किमान 500 आवश्यक आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. नियमीत कर्ज परतफेड करणा-या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही.

  वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. कर्ज मर्यादा रू.10 लाख (ऑनलाइन ) महामंडळाच्या वेब पोर्टलवर नाव नोंदनी आवश्यक आहे. कर्ज रकमेचे हप्ते नियमीत भरल्यास व्याजाची रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळा मार्फत जमा करण्यात येईल. कुटूंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.8 लाख पर्यंत असावी. अर्जदार इतर मागास प्रवर्गातील  असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एकत्रित कुटूंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षीक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा, वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्र निकषात बसणाऱ्या अर्जासाठी व अधिक माहिती तसेच अटी/ शर्तीसाठी आधार कार्ड,  जात प्रमाणपत्रासह जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262-248285 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. बुलडाणा यांनी केले आहे.

*****

 

 

 

धर्मादाय संस्थांनी पुरग्रस्तांसाठी मदत करावी

  • सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापूरामुळे खुप मोठी जिपीत हानी व नुकसान झालेले आहे. महापूर, दरड कोसळल्यामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी, मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, त्यांना जिवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत शासन त्यांचे परीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना करीत आहेच. मात्र सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, स्थापन झालेल्या धर्मादाय संस्था यांनी सदर कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

    जेणेकरून गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गरजुंना धर्मादाय संस्थांनी शक्य ती मदत करावी. आर्थिक स्वरूपातील मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बचत खाते क्रमांक 10972433751, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400001, शाखा कोड 00300, आयएफएस कोड SBIN0000300 यावर धनादेश किंवा डिडी द्वारे शक्य तितक्या लवकर करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त प्र. श्रा. तरारे यांनी केले आहे.   

ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय

मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात

व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा विस्कळीत नसल्यामुळे ऑगसट महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 2 ऑगस्ट रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

   या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

    तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

******

Wednesday 28 July 2021

DIO BULDANA NEWS 28.7.21

 नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू अथवा अपंगत्व आलेल्या 

शेतकरी कुटुंबीयांचे विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावे

*कृषी विभागाचे आवाहन 

बुलडाणा, (जिमाका) दि २८:  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये एक ते दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन विमा प्रस्ताव सादर करावा.विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी,जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करणेकामी ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी. या विमा सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 220 812 असा आहे.अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 40 30 किंवा 1800 200 40 30 यावर पूर्व सूचनेची नोंद करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


****

 अभियान राबवून जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करणार

- ना.डॉ.राजेंद्र शिंगणे 


      बुलडाणा, (जिमाका) दि २८: कॅन्सर अर्थातच कर्करोग, या आजारामुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेकांचा मृत्यू होतो. कॅन्सरवर अद्यापही प्रतिबंधक लस मिळालेली नाही. परंतु जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. हीच बाब हेरून जिल्ह्यात अशा स्वरूपाचे अभियान राबवून जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार करावा, अशा सूचना   राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा कॅन्सर मुक्त करण्याचा निश्चयही व्यक्त केला.

   यासंदर्भात स्थानिक विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे व त्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कर्करोगासंदर्भात व्यापक जनजागृती केल्यास व याचे वेळीच निदान व उपचार झाल्यास आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो असा विश्वास कँसर प्रकल्पाचे सल्लागार  डॉ नंदकुमार पानसे यांनी यावेळी व्यक्त केला. 

     कॅन्सर वरील उपचारास मोठ्याप्रमाणात खर्च येतो. हा उपचार खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असून जिल्ह्यात कॅन्सर जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास  जिल्ह्यातील लाखों सामान्य लोकांना याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे अभियान जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना पालकमंत्री ना.डॉ शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस कँसर प्रकल्पाचे सल्लागार  डॉ नंदकुमार पानसे, विजया दुलंगे, प्रदीप सोळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. लाड, सह.जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ उपस्थित होते.

******

कोरोना अलर्ट : प्राप्त 2504 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

बुलडाणा,(जिमाका) दि. २८ : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील  एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून  634  तर रॅपिड टेस्टमधील 1870 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2504 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेला अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली शहर : डी.पि.रोड 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 नवीन रूग्ण आढळला  आहे. 

   तसेच आजपर्यंत 633762 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86552 आहे.

  आज रोजी 1504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 633762 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87247 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86552 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 23 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 


Tuesday 27 July 2021

DIO BULDANA NEWS 27.7.2821

 अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन

इच्छूकांनी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा (जिमाका), दि. 27 : केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ,नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजीत केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धासाठी विवीध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविले जातात.
राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा विवीध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रशायकीय विभागात/ कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेले कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू/ कर्मचा-यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धेतून ज्या खेळाडू/कर्मचा-यांना भाग घ्यावयाचा असेल (प्रत्येक खेळ प्रकारासाठी स्वतंत्र विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.) त्यांनी दि. 31 ऑक्टोंबर 2021 पुर्वी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी जांभरून रोड, बुलडाणा येथे संपर्क साधून विहीत नमुण्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घेवून, दिनांक 10.11.2021 पर्यंत, आवेदन पत्र सुअक्षरात भरुन, आपल्या कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे तीन प्रतीत अर्ज, आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करण्यात यावे , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
*******

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील गळीत, नगदी व कडधान्य पिकांचा समावेश
बुलडाणा, (जिमाका) दि 27: सन 2014-15 पासुन सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य 60-40 टक्के प्रमाणे आहे. या योजनेचा उद्देश क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे. जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा आहे.  तसेच अपरंपारिक भातपड क्षेत्रावर कडधान्य / गळीतधान्य पिकाच्या क्षेत्र वृद्धी व उत्पादकतेत वाढ करणे हा आहे. 
     राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांचा समावेश आहे. तसेच पौष्टिक तृण धान्य पिके, नगदी पिकात कापूस पिकाचा समावेश आहे. अभियानामध्ये  पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके (आंतरपिक), मुलभूत बियाणे खरेदी (गळीतधान्य), प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण आदींचा समावेश आहे.  शेतकऱ्यांचे शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी राईस मिल, मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच (FPO साठी), भात शेतीमध्ये मत्स्यपालन, तेलघाणी इ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी अभियान अंतर्गत केली जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०२१-२२ साठी अन्नधान्य पिकांसाठी रु. २२४८४.०० लाखाचा, गळीतधान्य व वृक्षजन्य तेलबिया पिकांसाठी रु. ७०६२.५५ लाखाचा आणि नगदी पिकांसाठी रू.739.00 लाखाचा कार्यक्रम मंजूर आहे. 
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य/गळीतधान्य/नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. महा-डीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक/ कृषि पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 
*****
*कोरोना अलर्ट : प्राप्त 1394 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 06 पॉझिटिव्ह*
बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1400 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1394 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व  रॅपीड टेस्टमधील  3 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून  302  तर रॅपिड टेस्टमधील 1092 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1396  अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, वकाणा 1,  संग्रामपूर शहर :  1, चिखली तालुका : डोढरा 1, अंत्री खेडेकर 1, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 06 रूग्ण आढळले आहे. 
   तसेच आजपर्यंत 631258 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86552 आहे.
  आज रोजी 1556 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 631258 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87246 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86552 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

Thursday 22 July 2021

DIO BULDANA NEWS 22.7.2021

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 838 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 4 पॉझिटिव्ह

  • 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 842 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 838 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 562 तर रॅपिड टेस्टमधील 276 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 838 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 1,  चिखली तालुका : खोर 1, मोताळा तालुका : वाघजळ 1, बुलडाणा तालुका : दहीद 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 04 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 05 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 624139 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86539 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86539 आहे.

  आज रोजी 895 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 624139 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87227 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86539 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 669 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

****

जिल्ह्यात पावसाची संततधार…!

  • सरासरी 36.6 मि.मी पावसाची नोंद
  • लोणार तालुक्यात अतिवृष्टी ; 77.4 मि.मी पाऊस

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : जिल्ह्यात पर्जन्यराजाने चांगलीच मनसोक्त बरसात केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सुर्यदर्शन होत नसून सारखी पावसाची रिपरिप सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे तुरळक स्वरूपात बरसणारा पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ करीत आहे. जिल्ह्यात लोणार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात अली असून जिल्ह्यातील सर्वात जास्त 77.4 मि.मी पाऊस झाला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची बुलडाणा : 35.5 मि.मी (326.3), चिखली : 41.4 (414.6), दे.राजा : 42.5 (325.2, सिं. राजा : 55.3 (483), लोणार : 77.4 (444.5), मेहकर : 50.3 (549.6), खामगांव : 26.7 (347.2), शेगांव : 43.3 (165.9), मलकापूर : 14.1 (174.2), नांदुरा : 12.8 (210), मोताळा : 15.9 (225.2), संग्रामपूर : 32.3 (292.6), जळगांव जामोद : 28.7 (143.3) जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4101.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 315.5 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 143.3 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 19.69 दलघमी (28.41), पेनटाकळी :19.494 दलघमी (32.49), खडकपूर्णा :6.450 दलघमी (6.90), पलढग : 1.17 दलघमी (15.63), ज्ञानगंगा : 23.90 दलघमी (70.44), मन : 21.84 दलघमी (59.31), कोराडी : 15.20 दलघमी (100), मस : 7.35 दलघमी (48.88), तोरणा : 2.68 दलघमी (34.01) व उतावळी : 11.92 दलघमी (60.31).

100 टक्के पाणीसाठा असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पांची माहिती

जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे 6 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. ते पुढीलप्रमाणे : टाकळी ता. खामगांव, निमखेड ता. खामगांव, शिवणी जाट ता. लोणार, बोरखेडी ता. लोणार,  गांधारी ता. लोणार, गारखेड ता. सिं. राजा,

*****

खरीप हंगाम 2021 साठी पिक स्पर्धा जाहीर

  • शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत खरीप हंगामात पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

  या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.  पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या  सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 अर्ज असणार आहे.

स्पर्धेत दाखल करण्याची तारीख व बक्षीस

मूग व  उडीद पीकसाठी 31 जुलै, भात, ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी 31 ऑगस्ट असणार आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात देण्यात यावे.  

  पिक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप : स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस तालुका पातळी प्रथम 5 हजार रूपये, द्वितीय 3 हजार रूपये व तृतीय बक्षीस 2 हजार रूपये असणार आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक 10 हजार रूपये, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रूपये आहे.  विभाग पातळीवर प्रथम 25 हजार रूपये,  20 हजार रूपये व  15 हजार रूपये बक्षीस असणार आहे. तसचे राज्य पातळीवर प्रथम बक्षीस 50 हजार, द्वितीय 40 हजार रूपये व तृतीय बक्षीस 30 हजार रूपये असणार आहे.

     पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै  पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषि विभागाचेवतीने करण्यात आले आहे.

********

--

Tuesday 20 July 2021

DIO BULDANA NEWS 20.7.2021

 

चिखली तालुक्यातील महिला समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे

  • 22 जुलै 2021 अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.20 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र सुरू करणे, त्यांना संरक्षण किंवा मदत मिळवून देणे या दृष्टीने राज्य शासनामार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. ज्या स्वयंसेवी संस्थांना समुपदेशन केंद्राचे प्रस्ताव सादर करावयाचे असल्यास जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास सादर करावेत. सदर प्रस्ताव चिखली तालुक्यातील केंद्रासाठी मागविण्यात येत आहेत.  या योजनेतंर्गत मान्यता व अनुदान मिळविण्यासाठी संस्था ही नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संस्था महिला व बाल विकास क्षेत्रात किमान तीन वर्ष कार्यरत असावी. संस्थेस महिला व बालकांच्या क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.

   अर्हता असणाऱ्या पात्र इच्छुक संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज, संस्थेची संक्षिप्त माहिती, संस्थेच्या योजना व कार्याबाबतचा मागील तीन वर्षाचा वर्षनिहाय अहवाल, संस्थेचा मागील 3 वर्षाचा सनदी लेखापालाची स्वाक्षरी असलेला वर्षनिहाय लेखा परीक्षण अहवाल, संस्थेने समुपदेशनाचे कार्य केल्याबाबतचा कार्याचा स्वतंत्र अहवाल, सांख्यिकी माहिती, संस्थेचे मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट, संस्था नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात, संस्थेची घटना व नियमावलीत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा, प्रत जोडावी, कर्मचारी वर्गाची शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात, संस्थेने वेळोवेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे छायात्रिचे, कागदपत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे जोडावी, संस्थेच्या कार्यरत पदाधिकारी व कार्यकारीणीचे नाव, पत्ता, व्यवसाय व दुरध्वनी क्रमांकासह यादी जोडावी, सदर प्रस्ताव 22 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करावे. इच्छूक संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज व योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, डॉ जोशी नेत्रालय जवळ, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.

*****

   

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करावे

• 31 जुलै 2021 अंतिम मुदत

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20: सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

माहे जुन 2021 अखेरचे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे व त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 31 जुलै 2021 आहे. तरी सर्व आस्थापना /उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .07262- 242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा झळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

**********

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुगा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20: जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पाऊस मानानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पिक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या शेतक-यांनी जुलै महिण्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबिनची पेरणी केली आहे. अशा सोयाबीन पिकांवरसुद्धा पुढील काही दिवसात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडींच्या प्रादुर्भावांची सु्द्वा शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधूंनी जागरूक राहून किडीचे व्यवस्थापन करावे.

   किडींची ओळख व नुकसान:  खोडमाशी लहान चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मि. असते. अंड्यातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडांचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतिल भाग पोखरुन खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोष लालसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते.  मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशी अळी तसेच कोष फांद्यात,खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते.  शेंगातील दाण्याचे वजन कमी हाकवून उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

   चक्रीभुंगाची मादी पानाच्या टेठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारण: 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्याध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातुन निघालेली अळी पानाचे देठ आणी फांदीतुन आत जाते. मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडींचा प्रादुर्भाव मुंग, उडीद,चवळी या पिकावर सुद्धा होऊ शकतो. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारण: दिड महिन्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही. पण किडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात, परिणामी उत्पादनात घट येते. पिवळे चिकट सापळे लावून नियमीत माशांचा प्रादुर्भाव पाहणे (25/हे), खोडमाशी व चक्रिभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने फांद्या यांचा आतील किडसह नायनाट करावा.    

   खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर ( सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींचे नियंत्रणसाठी इथियॉन 50 टक्के 30 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के 6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिपोल 18.5 टक्के 3.0 मिली किंवा थायोमेथॅक्झॉम 12.6 टक्के + लँब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी टक्के 2.5 मिली यापैकी कोणतेही एक किटकाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे, असे

आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.

0000

 

बिटी कापूस पिकावरील मावा व तुडतुडे किडींचे एकात्मीक व्यवस्थापन करावे

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20: सद्या परिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणी तुडतुडे ह्या रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडींचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवड्यापासून आढळून येतो, तर तुरतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आढळून येतो. मावा ही किड रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवी असून आकाराने अंडाकृती गोल असते. मावा पानाच्या खालच्या बाजुने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून त्यातील रस शोषण करतो. प्रादुर्भाव ग्रस्त पाने प्रथम निस्तेज होवून नंतर कोकडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते या शिवाय मावा आपल्या शरीरातुन गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे झाडे चिकट व काळसर होतात.

   तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्याच्या पिलांना पंख नसतात आणि ते नेहमी लांबीला तिरके चालतात. तुडतुडे नेहमी पानाच्या खालच्या बाजुला राहून त्यातील रस शोषण करतात, अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होवून नंतर तपकीरी रंगाचे झाढाची वाढ खुंटते आणि अशा झाडांना पात्या, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात. या किडींचा प्रादुर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या 10 मावा/पान किंवा 2 ते 3 तुडतुडे/ पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

 एकात्मीक व्यवस्थापन : वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने, इतर पाला पाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा, वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणाचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तणे तसे अंबाडी, रानभेंडी इ. नष्ट करावी.  मृद परिक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. जेणे करून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. पिक दाटणार नाही. पर्यायाने अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील, बिटी कपाशीच्या बियाण्याला ईमीडाक्लोप्रीड किंवा थायोमेझो्क्साम किटकनाशकांची बिज प्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक या किडीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये. रसशोषक किडींवर उपजिवीका करणारे नैसर्गीक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकीडे, क्रायसोपा, ॲनॅसयीस, प्रजातीचा परोपजीवी किटक ई. संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास रसशोसक किडींच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझारीडेक्टीन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारीत डब्लु.एस.पी.30 मिली किंवा ॲझारीक्टीन 5 टक्के (डब्लू/डब्लू एन.एस.के.ई.) 20 मिली.  सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकांचा 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा. बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली, डॉयफेंथ्युरॉन 50 टक्के पा. मि. भुकटी 12 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करून कपाशी पिकाची संरक्षण करावे असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी बुलडाणा यांनी केले आहे.

 

0000

 

आरोग्य विभागाअंतर्गत 22 जुलै रोजी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20:  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्याच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयी 22 जुलै 2021 रोजी सर्व रोग निदान शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय बुलडाणा येथे दि 22 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 2 वर्षापासून उद्भवलेली कोरोना रोगाची परिस्थिती आतापर्यंत आरोग्य विभागाने अत्यंत काळजीपुर्वक हाताळलेली आहे. कोरोना रोगाचा सामना यशस्वीरित्या पार पाडला आहे. परंतु ज्याप्रमाणे कोरोना हा एक रोग आहे, त्याचप्रमाणे मनुष्याला त्याच्या आरोग्याशी निगडीत अजुन ब-याच समस्या असतात. परंतु कोरोना काळ असल्यामुळे त्याला त्याच्या अन्य रोगावर पाहीजे, त्याप्रमाणात लक्ष देता आले नाही. त्यासाठी सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन केले,  तर तळागळातील जनतेला त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करता येईल.

    याच हेतुने जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात जिल्हाभरातील आरोग्य संस्था मधील विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी सेवा देणार आहे.या शिबीरात ॲलोपॅथी, हामिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी पद्वतीने रोगाची चिकित्सा व निदान करण्यात येणार  आहे. शिबीरामध्ये रोगनिदान करण्यासाठी आवश्यक असणा-या विविध चाचण्या जसे क्ष किरण तपसणी, सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी, ई.सी.जी. व प्रयोगशाळेशी निगडीत चाचण्या सुद्वा लगेच करण्यात येणार आहे. सदर शिबीराचा लाभ जिल्ह्यातील जनतेने आपल्या आरोग्य विषक समस्या सोडविण्यासाठी घ्यावा,  असे आवाहन जिल्हा शल्यचिहित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

******

शिकाऊ उमेदवारांनी आस्थापनेशी संपर्क साधून आवेदन भरावे

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20:  शिकाऊ उमेदवारी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 111 वी ची कार्यवाही करण्यात येणार आहे. परीक्षेसंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबतचे सविस्तर वेळापत्रक संस्थेच्या सुचना फलकावर लावलेले आहे. तसेच 15 एप्रिल 2021 पर्यंत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारांनी सदर वेळापत्रकात दिलेल्या विहीत मुदतीत विहीत कार्यवाही पुर्ण करावी. शिकाऊ उमेदवारांनी ज्या आस्थापनेमधून शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली आहे. त्या आस्थापनेशी संपर्क साधून परीक्षा आवेदनपत्र भरण्यात यावे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक संबंधित आस्थापनेस पाठविण्यात आलेले आहे, असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र, खामगांव यांनी कळविले आहे.

*******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1585 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 7 पॉझिटिव्ह

  • 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1592 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1585 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 539 तर रॅपिड टेस्टमधील 1046 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1585 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका: हतेडी बु 1, चौथा 1, जळगांव जामोद शहर : 1, दे. राजा तालुका: नागणगांव 1, नांदुरा तालुका : पातोंडा 1, मेहकर शहर : 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 07 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अंबोडा ता. नांदुरा येथील 67 वर्षीय महिला व जळगांव जामोद येथील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 05 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 620651 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86528 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86528 आहे.

  आज रोजी 1329 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 620651 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87216 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86528 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 669 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

Saturday 17 July 2021

DIO BULDANA NEWS 17.7.2021


 नविन महामार्गाचे काम सुरू असतानाच ब्लॅक स्पॉट शोधावे

               - खासदार प्रतापराव जाधव
*रस्ता सुरक्षा समिती बैठक
बुलडाणा, (जिमाका) दि. १७: राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जंक्शन मिळवताना त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याची 'लेव्हल मेंटेन'  करताना अडचणी आलेल्या आहेत.  त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. तरी महामार्गाचे काम सुरू असतानाच ब्लॅक स्पॉट शोधून आताच त्यात दुरुस्ती करून घेण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या. 
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन १६ जुलै रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, बुलडाणा कृऊबास सभापती जलींधर बुधवत, जि. प सभापती राजेंद्र पळसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे आदी उपस्थित होते. 
  मराठवाड्यातून येणाऱ्या  शेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर - जानेफळ दरम्यान अपघाती वळण असल्याचे सांगत खासदार श्री. जाधव म्हणाले, हे वळण आत्ताच अपघात मुक्त करण्यात यावे. येथील  स्लोप देखील दोषपूर्ण आहेत. सदर स्लोपही व्यवस्थित करावा. तसेच चिखली - मेहकर मार्गावर लव्हाळा नजीक पुलावर वाहन आदळते.  परिणामी, वाहन पुला खाली जाऊ शकते. इतका दोष त्या पुल निर्मितीच्या कामांमध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे अमडापुर वरुन साखरखेर्डा कडे जाताना  अंडर ब्रिज मधून मोठे वाहन  मुख्य रस्त्यावर येऊ शकत नाही. हीच परिस्थिती साखरखेर्डा वरून चिखली कडे येताना मोठी वाहने वळण घेतानाही अडचणी आहेत. त्यामुळे एखादे वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. 
    राष्ट्रीय महामार्गामधून शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यात उतरतानाही चुका आहेत. लेवल व्यवस्थित केलेली नाही. यासंबंधी एक समिती नेमून त्याचा अहवाल मागवावा. यात पीडब्ल्यूडी, पोलीस आणि आरटीओ यांचे अधिकारी नेमावेत असेही निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले. बैठकीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी माहिती दिली. बैठकीला संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
***********

एस. टी च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा
*महामंडळाचे आवाहन 
बुलडाणा, (जिमाका) दि १७: एस.टी.महामंडळाव्दारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबवत असते. प्रवाशांना प्रवास सुखकर व सोपा होण्यासाठी अशीच एक सुविधा एस.टी.महामंडळाकडुन सुरू करण्यात आली आहे. ती सुविधा आहे,  स्वाईप मशिन व्दारे पासेसची व आरक्षण काढताना  आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशिन सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संदिप रायलवार ,विभाग नियंत्रक व अमृतराव कच्छवे,विभागीय वाहतुक अधिकारी,रा.प.बुलडाणा यांनी केले आहे.
*****

 भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि १७: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा  दिनांक 16 जुलै 2021 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम तसेच वेबिनारस चे आयोजन करण्यात आले. वेबिनार मार्फत जल साक्षरता अभियान सर्व स्तरावर पोहचविण्यासाठी  गट विकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, जलसुरक्षक, भूगोल व भुगर्भशास्त्र विषयाचे विदयार्थी तसेच राष्ट्रीय सेवा सुरक्षा दल/नेहरु युवा केंद्राचे विदयार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, व शेतकारी यांना यु-टयूबवर वेबिनार, झुम ऑप याच्या माध्यमातून जल साक्षरता, भूजलाचे पुनर्भरण, पाण्याचा ताळेबंद, भूजल अधिनियम कायदा व त्यांचे विनियमण या संबंधी सर्व माहिती देण्यात आली.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्याने जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषाताई पवार , जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना भेट देवून विभागातर्फे पुष्पगुच्छ  देण्यात आले. सर्व सन्माननिय पदाधिकारी/अधिकारी यांनी यंत्रणेस भावी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या . 
या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिना निमित्त या कार्यालयातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांना अमंत्रीत करुन पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे, यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ए.डी.मंगरुळकर, सहाय्यक भूवैज्ञानिक, श्रीमती. पाटील, कनिष्ठ भूवैज्ञानिक, एस.एन. डव्हळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक व श्रीमती. एस.जी बैनाडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले.  

Friday 16 July 2021

DIO BULDANA NEWS 16.7.2021

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 1920 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह

  • 14 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1942 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1920 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 707 तर रॅपिड टेस्टमधील 1213 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1920 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : मंडपगांव  1, वाकी खु 1, दे. मही 1, चिंचखेड 1, दे. राजा शहर : 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, शेगांव शहर : 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 2, आसलगांव 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : बेराळा 3, शेलूद 1, मेरा बु 1, सवडत 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 14 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 611900 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86484 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86484 आहे.

  आज रोजी 1830 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 611900 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87190 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86484 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 40 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

****


योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून सर्वांगिण विकास साधावा

- खासदार प्रतापराव जाधव

दिशा समिती बैठक

* आदर्श सांसद ग्राम योजनेतून गावांचा विकास करा

* महानेट, भारत नेट प्रकल्प पुर्ण केलेल्या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींना नेट कनेक्टीव्हीटी द्या

* जिगांव प्रकल्पातील पुनर्वसन दर्जेदार करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास साधावा,  अशा सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जि.प सभापती राजेंद्र पळसकर आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात समितीचे अशासकीय सदस्य, लोक प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

   सांसद आदर्श ग्राम योजनेत निवडलेल्या गावांमध्ये विविध योजनांच्या समन्वयातून विकास कामे करण्याच्या सूचना करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, घाटबोरी, घाटपुरी, शेलूद, धानोरा व पिंप्री गवळी ही गावे सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेली आहे. या गावांमध्ये नाविण्यपूर्ण कामे करण्यत यावीत. ग्रामसचिवालय इमारत, ग्रा.पं कार्यालय व शाळेवर सौर उर्जा संयंत्र लावणे, पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर आणणे, अंगणवाडी बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व भूमिगत गटार योजना कामे या गावांमध्ये करण्यात यावीत. त्यासाठी विविध विभागांनी त्यांच्याकडील कामे करताना या गावांमध्ये प्राधान्याने कामे घ्यावीत. या गावांमधील शाळा आयएसओ करून गावात वाचनालये, अभ्यासिका देण्यात याव्यात.   

    ते पुढे म्हणाले, म्हाडा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलामध्ये लाभार्थ्यांची निवड नगर पालिका व म्हाडाने संयुक्तपणे करावी. त्यापूर्वी नगर पालिका क्षेत्रात लाभार्थी सर्वेक्षण करून नगर पालिकेकडून संभाव्य लाभार्थ्यांची यादी घ्यावी. एकात्मिक गृहनिर्माण योजनेतंर्गत जिल्ह्यात घरकुले बांधण्यात आली आहेत. मात्र ही घरकुले खऱ्या लाभार्थ्यांना मिळाली की नाही, त्याची पडताळणी करून कारवाई करावी. बोगस लाभार्थी राहत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. रस्ता निर्मिती करताना कुठलीही तडजोड करण्यात येवू नये. डिपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) मध्ये चेंज ऑफ स्कोप नुसार बदल करून समाज हिताची कामे घ्यावीत. जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्पयातील 22 गावांचे पुनर्वसन करायचे आहे. या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे दर्जेदार व्हावीत. अंदाजपत्रकानुसार कामे करावीत, कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जावे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून लागणा-या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा.   

    गौण खनिजमधून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या सूचना करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, रेती घाटांची सुरक्षीतता महत्वाची आहे. रेती घाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेतीघाट सुरक्षीत करावे. या घाटांचे दर 15 दिवसांनी मोजमाप करून अहवाल घ्यावा. भारत नेट, महानेट प्रकल्पातंर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मलकापूर, नांदुरा, बुलडाणा व चिखली या 4 तालुक्यांमध्ये कामे पूर्ण करण्यात आली आहे. मात्र संबंधीत विभागाने कामे हस्तांतरीत करताना ती पूर्ण झाली की नाही, याची चाचपणी करावी. यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीला नेट कनेक्टीव्हीटी देण्यात यावी. त्यानंतर ग्रामस्थांचे ऑनलाईन कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये काढून द्यावीत.

  जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यात आले. मात्र त्यापैकी 108 अंगणवाडी बांधकाम अपूर्ण आहेत. ती कामे शासनाची मंजूरात घेवून प्राधान्याने पूर्ण करावी. अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा तपासावा. सँपल नुसार पोषण आहार देण्यात येतो की नाही, नियमानुसार     पोषण आहाराचे वजन आहे किंवा नाही याची संबंधित विभागाने तपासणी करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. शाळांना मानव विकास मिशनमधून साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्याचा दर्जा तपासावा. साहित्य निकृष्ट असल्यास संबंधीत पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले.  यावेळी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

*****

 

अवैधरित्या गर्भपात औषधे विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : मे. मनिष मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स, जांभरुण रोड, मुठठे लेआउट, बुलडाणा या ठिकाणी 12 जुलै रोजी अवैधरित्या गर्भपातासाठी वापर होत असलेल्या एमटीपी किट अवैध रित्या खरेदी करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. सदर माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून गर्भपातासाठी लागणारी (Gestapro Kit) हे औषध बनावट ग्राहकाला विक्री केल्याचे आढळल्याने मे मनिष मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स, मुठ्ठे लेआउट , जांभरुण रोड, बुलडाणा व सदर दुकानात उपस्थीत अन्य एक व्यक्ती यांचेकडुन एकुण 5 किट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सदर दोन्ही आरोपीविरुध्द शहर पोलीस स्टेशन बुलडाणा येथे प्रथम खबर अहवाल नोंदविला आहे.

 पुढील तपास पोलीस स्टेशन बुलडाणाहे करीत आहे. सदर कारवाई सह आयुक्त (ओषधे ) अमरावती विभाग यु बी. घरोटे यांचे मार्गदर्शनाखाली श्री बर्डे, सहायक आयुक्त, (औषधे ) व गजानन प्र. धिरके, औषध निरीक्षक यांनी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन यांनी इशारा दिला की, अवैधरित्या गर्भपाताची औषधे खरेदी अथवा विक्री करतांना कुणी आढळल्यास औषधे व सौदर्य प्रसाधने कायदयानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. स्त्री भूण हत्या हे समाजविघातक कार्य आहे. तरी जनतेनी आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या प्रिक्रीप्शनवर व डॉक्टरांच्या सल्याने सदर औषधीचा वापर करावा, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

*****

 

Wednesday 14 July 2021

DIO BULDANA NEWS 14.7.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2713 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 16 पॉझिटिव्ह

  • 19 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2729 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2713 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 8 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 606 तर रॅपिड टेस्टमधील 2107 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2713 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : लोणार तालुका : टिटवी 2, बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : हतेडी 1,  शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : लासुरा 1, खामगांव शहर : 1, दे. राजा तालुका : नागणगांव 2, सरंबा 1, मेहकर शहर : 1, चिखली तालुका : मनुबाई 2, धंदरवाडी 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 16 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 607578 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86452 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86452 आहे.

  आज रोजी 1622 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 607578 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87155 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86452 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 37 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

****

कृषी योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे ई सेवा केंद्रावर सादर करावी

  • 21 जुलै अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2020-21 अंतर्गत पहिली सोडत 8 एप्रिल 2021 रोजी निघाली. यामध्ये एकूण 1333 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार सर्व लाभार्थ्यांच्या याद्या पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर लावून प्रत्येक लाभार्थ्याला आवश्यक असणारी कागदपत्रे कळवून ऑनलाईन अपलोड करण्याकरीता अवगत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही 616 लाभार्थ्यांनी 7/12, नमुना 8 अ, उत्पन्नाचा दाखला, यापूर्वी कोणत्याच योजनेमधून विहीरीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, आधार संलग्न बँक खाते, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, सामुहिक जमीनधारक असल्यास कर्ता बाबत प्रतिज्ञालेख अपलोड केलेली नाहीत. तरी निवड झालेल्या लाभार्यिांनी त्वरित आवश्यक असणारी कागदपत्रे ई- सेवा केंद्रावर जावून 21 जुलै 2021 पर्यंत अपलोड करावीत.

सदर योजनेकरीता कालावधी कमी असल्यामुळे आपली निवड रद्द झाल्ज्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच काही शंका किंवा अडचण आल्यास सविस्तर माहितीसाठी पंचायत समितीच्या कृषि अधिकारी यांचेशी मार्गदर्शनासाठी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

*****

                       अटी व शर्तींच्या अधीन राहून वनपर्यटनास परवानगी

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : राज्यात कोविड 19 च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरीएंटचा धोका वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 26 जुनच्या आदेशाप्रमाणे 28 जुन 2021 चे सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात श्रेणी 3 मध्ये असलेले निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व वनपर्यटन केंद्र सुरू करण्यास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रीय संरक्षीत स्मारके, स्थळे व संग्रहालये ही कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या मानक प्रणाली चे नुसार विहीत अटी व शर्तीनुसार अभ्यांगताकरीता उघडण्यात येत आहे.

    शासनाने कोविडच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर, सॅनीटायझर व सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. बंदीस्त प्राण्यायंच्या ठिकाणी पर्यटक यांना जाण्यास प्रतिबंध असेल. वाहनांमुळे बफर परिक्षेत्रात रस्ते खराब होणार नाहीत व संरक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक असणार आहे. पर्यटकाला प्रवेश देतेवेळी पायाने ऑपरेट होणारे सॅनीटायझर मशीन किंवा संपर्कहीन हँड सॅनीटायझर मशीन वापरणे बंधनकारक आहे. या ठिकाणी वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपहार गृह, होम स्टे व इतर उपक्रम आदी कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा अवलंब करून सुरू करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असून सायं 5 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपरोक्त नमूद बाबी सकाळी 7 ते दु 4 या कालावधीत सुरू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधत्मक कायदा, भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलमान्वये शिक्षेस पात्र असेल, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आदेशीत केले आहे.

*****

 

 

 

लिंग विनिश्चीत केलेल्य वीर्य मात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशींच्या कृत्रिम रेतनात वापर होणार

  • राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना, वीर्य मात्रा वाटप करण्यास मान्यता प्रदान
  • शेतकरी, पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : जिल्ह्याकरीता केंद्र शासनाने केंद्र सहाय्यित योजना (60:40) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चीत केलेल्या वीर्य मात्रांचा (Sex Sorted Semen) क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमाअंतर्गत

वापर करणे साठी प्रशासकिय मान्यता प्रदान केलेली आहे.  त्यानुसार राज्य शासनाने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणानुसार राज्यातील गाई- म्हशींमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार विर्य मात्रा देण्यात येणार आहे.  सन 2021-22 पासुन पुढील पाच वर्षाच्या कालावधी करीता 575 रूपये प्रति लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्रा या प्रमाणे एकुण 11000 लक्ष लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्राची (Sex Sorted Semen) वाटप करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे.

   तरी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी अथवा पशुपालकांनी आपल्या गाई- म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करण्याकरीता लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्राचा वापर करावा. त्या करीता 81 रूपये कृत्रिम रेतनापेटी दर आकारणी केलेली आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.

*********

            गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम

  • कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान

बुलडाणा,(जिमाका) दि.14 :  सन 2021-22बुलडाणा जिल्हयात राज्यातील गायी म्हशीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2015 च्या सेवा हमी कायदयामध्ये समाविष्ठ करण्यात आलेली आहे. तरी सन 2021-22 या वर्षासाठी या योजनेमध्ये पशुपालकांनी सहभाग घेवुन आपल्या दुधाळ जनावरांची नोंद नजिकच्या पशुवैदयकिय संस्थेस पुरविण्यात आलेल्या विहित नमुण्यात भरुन त्यांच्यामार्फत पशुसंवर्धन कार्यालयास त्वरीत सादर करावे.

     नोंद झालेल्या दुधाळ जनावरांच्या पशुपालकाने एक एसएमएस केल्यास त्यांच्या दुधाळ जनावरांना लगेच नजिकच्या पशुवैदयकीय दवाखन्या मार्फत दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन केल्या जाते. कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासराना 25000 रुपये अनुदान देण्यात येते. तरी या योजने मध्ये समाविष्ठ होण्यासाठी अर्ज पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यलयास दिनांक 31 जुलै 2021 पर्यंत देण्यात यावे.

    तरी जिल्हयातील सर्व पशुपालकांनी आपल्या दुधाळ जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.  ही योजना पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येते. या योजनेसाठी " गाय वाचवा व वंशावळ वाढवा व  स्वस्थ पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान "असे बोधवाक्य नेमले आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.

******

--