नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

 


Ø  जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा आदेश जारी

बुलढाणा (जिमाका), दि. 24 :  बुलढाणा जिल्ह्यात सन 2026 या वर्षासाठी तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब जयंती निमित्त सोमवार दि. 12 जानेवारी 2026, रक्षाबंधन निमित्त सोमवार दि. 28 ऑगस्ट 2026 तसेच जेष्ठागौरी पुजन निमित्त गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2026 या दिवशी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे.

ही सुट्टी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी लागू आहे. तथापि, हा आदेश बुलढाणा जिल्ह्यातील दिवणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू राहणार नाही , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या