माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले
बुलढाणा,
(जिमाका) दि. 19 : जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी ‘आपदा
मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात तातडीने मदत कार्य करण्यासाठी
माजी सैनिकांच्या अनुभवाचा वापर करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार
आहे.
आपदा
प्रशिक्षण 9 ते 20 फेब्रुवारी 2026 या
कालावधीत होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागी होणाऱ्या सर्व माजी सैनिकांची
राहण्याची (निवासी), चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक आपदा मित्राला 5 लाख रुपयांचे विमा
संरक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी माजी
सैनिकाचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे दि. 27
जानेवारी 2026 पर्यंत ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो व आधार कार्डसह अर्ज विहित
मुदतीत सादर करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment