Thursday 30 July 2020

DIO BULDANA CORONA ALERT 30.7.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 339 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 75 पॉझिटिव्ह

  • 45 रूग्णांची  कोरोनावर मात

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 339 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 75 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 218 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 339 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  नांदुरा : तेलीपुरा 36,42 वर्षीय पुरूष, आनंद चौक 21, 25,48, 17 वर्षीय पुरूष, 25, 22, 3, 19 वर्षीय महिला, दरबार गल्ली 40 वर्षीय पुरूष, 32 वर्षीय महिला, गायत्री नगर 52 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगा,   चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 65, 53, 18, 19 वर्षीय पुरूष, 60, 5, 45, 22, 14, 42 वर्षीय महिला, धानोरा खुर्द ता. नांदुरा :  75 वर्षीय महिला, माकोडी ता. मोताळा: 70 वर्षीय पुरूष, मलकापूर : सिंधी कॉलनी 26 वर्षीय पुरूष, उपजिल्हा रूग्णालय 23, 32 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष, टाकळी : 16, 30 वर्षीय पुरूष, 3 वर्षीय मुलगी, बुलडाणा : तेलगू नगर 34, 32 वर्षीय महिला, जिल्हा रूग्णालय 40 वर्षीय महिला, इंदिरा नगर 28, 25 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरूष,  दिवठाणा : 64 वर्षीय पुरूष, अमडापूर ता. चिखली : 50 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला. चिखली : 39 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय पुरूष,  सवणा ता. चिखली : 65, 70 वर्षीय महिला, अंचरवाडी ता. चिखली : 32 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरूष, शेगांव : 90, 40 वर्षीय पुरूष, भैरव चौक 55 वर्षीय महिला, असोला ता. दे. राजा: 55, 77, 70, 46 वर्षीय महिला, 68, 55, 50,86, 70, 30,8, 7 वर्षीय पुरूष, दे.राजा : भक्ती निवासजवळ 80 वर्षीय पुरूष, भगवान कॉलनी 35 वर्षीय पुरूष, दे. मही ता. दे. राजा : 55 वर्षीय पुरूष, खामगांव : स्टेट बँकजवळ 58, 29, 36 वर्षीय महिला, 36, 5, 63, 4 वर्षीय पुरूष, फरशी 45 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 75  रूग्ण आढळले आहे. तसेच आज उपचारादरम्यान निंभोरा, ता. जळगांव जामोद येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा खामगांव कोविड केअर सेंटर येथे मृत्यू झाला आहे.

        तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : 59 वर्षीय महिला, मुरारका हायस्कूलजवळ 22 वर्षीय पुरूष, पिं.राजा ता. खामगांव : 39 वर्षीय पुरूष, 11 वर्षीय मुलगी,  चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 80 वर्षीय पुरूष, खामगांव : 63, 58 वर्षीय पुरूष,  नांदुरा रोड 53, 24 वर्षीय पुरूष, अमृत नगर 54 वर्षीय पुरूष, चांदमारी 42 वर्षीय पुरूष, कृष्णपुरा सोसायटी 70 वर्षीय पुरूष, पुरवार गल्ली 44 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल 52 वर्षीय पुरूष, सराफ गल्ली 37 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 1 वर्षीय मुलगी, 22, 80, 45 वर्षीय महिला, 35, 30 वर्षीय पुरूष, पहुरजिरा ता. शेगांव: 45 वर्षीय पुरूष,  नांदुरा : 38, 24, 50, 40 वर्षीय पुरूष, 41, 46, 70, 18 वर्षीय महिला,  सिंधी कॉलनी 32 वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द 57 वर्षीय पुरूष, 55, 48 वर्षीय महिला, गैबी नगर 55, 39, 35 वर्षीय पुरूष, 28,47 वर्षीय महिला, आठवडी बाजार 55 वर्षीय महिला, राम मंदीराजवळ 34 वर्षीय पुरूष,  येरळी ता. नांदुरा 35, 33 वर्षीय पुरूष, चांदुर बिस्वा ता. नांदुरा 40 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा. तसेच नांदुरा येथील 18 वर्षीय मुलगी व 65 वर्षीय पुरूष अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. 

   तसेच आजपर्यंत 8394 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 744 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 744आहे. 

  आज रोजी 383 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 8394 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1209 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 744 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 436 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 29 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

 

DIO BULDANA NEWS 30.7.2020

चार लघुपाटबंधारे प्रकल्प 100 टक्के; सांडवा प्रवाहीत

  • नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा,(जिमाका) दि.30: सततच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. जळगांव जामोद तालुक्यातील प्रकल्पांचा अपवाद वगळता लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब होण्याच्या मार्गावर आहेत. खामगांव तालुक्यातील हिवरखेड क्रमांक 1 व 3 व ढोरपगांव तसेच टाकळी लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले असून सांडवा प्रवाहीत झालेला आहे.

    सिंचन शाखा जळगांव जामोद यांचे कार्यक्षेत्रातील लघु पाटबंधारे प्रकल्प टाकळी, सिंचन शाखा तांदुळवाडी कार्यक्षेत्रातील ढोरपगांव, हिवरखेड 1 व 3 हे 100 टक्के पाण्याने भरला आहे. या पाचही लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास सदर धरणांचा केव्हाही पूर्ण क्षमतेने सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.  ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदी काठावरील 6 गावांना  सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्ञानगंगापूर, कासारखेड, पिं.राजा, भालेगांव, ढोरपगांव व वडजी भेंडी गावांचा समावेश आहे. तसेच टाकळी धरणाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदीला पूर येवून खामगांव तालुक्यातील भालेगांव व कुंबेफळ ही दोन गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे, असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी कळविले आहे.

                                                                                                *******

जिल्ह्यात श्रावणधारांची जोरदार बरसात…!

  • सरासरी 15.6 मि.मी पावसाची नोंद
  • मेहकर तालुक्यात सर्वात जास्त 23.5 मि.मी पाऊस

बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासूनच वरूणराजा कृपादृष्टी ठेवीत दमदार बरसत आहे. सुरूवातीच्या पेरणी झालेली पिके आता फुल, फळधारणेच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद, भुईमूग, तिळ आदी पिकांना फुले आसली आहेत. तर मका, ज्वारी, कापूस पक्वतेच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत सध्या होत असलेला पाऊस पिकांना लाभदायक आहे. मात्र सततचे ढगाळ वातावरण किंडीसाठी पोषकही आहे. काल जिल्ह्यात श्रावणधारांची जोरदार कमी अधिक प्रमाणात बरसात पाहायला मिळाली आहे.  जिल्ह्यात मेहकर तालुक्यात सर्वात जास्त 23.5 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 15.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची

बुलडाणा : 6.6 मि.मी (473.2), चिखली : 15.7 (401.9), दे.राजा : 18.8 (338.4), सिं.राजा : 21.1 (426.7), लोणार :7.5 (332.2), मेहकर : 23.5 (373.2), खामगांव : 14.9 (320.8), शेगांव : 8 (384.6), मलकापूर : 23.4 (483.4), नांदुरा : 21 (406.6), मोताळा : 16.3 (276.4), संग्रामपूर : 11.6 (457.8), जळगांव जामोद : 14.2 (433)

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5108.2 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 392.9 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 276.4 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.

    जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 40.31 दलघमी (58.15), पेनटाकळी : 34.99 दलघमी (58.35), खडकपूर्णा :68.17 दलघमी (72.99), पलढग : 2.90 दलघमी (38.62), ज्ञानगंगा : 25.27 दलघमी (74.48), मन : 26.49 दलघमी (71.93), कोराडी : 9.80 दलघमी (64.81), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 3.75 दलघमी (47.53) व उतावळी : 14.84 दलघमी (74.99).          

                                                                        **********

 

खास वितरण व्यवस्थेने पोहोचणार भाऊरायाला ‘राखी’..!

  • महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये डाक विभाग सज्ज

बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  भावनांची आसक्ती असणारा रक्षा बंधन हा सण थोड्याच दिवसांवर येवून ठेपला आहे. कोरोना विषाणू संसर्गाने यावर्षी सणांचा उत्साह पाहायला मिळत नसला, तरी भारतीय संस्कृतीत सणांचे महत्व काही औरच आहे. त्यामध्ये राखी हा सण आपले महत्व अधोरेखीत करून आहे. दरवर्षी राखींचे टपाल हाताळण्यासाठी डाक विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षी देखील राखी सणासाठी महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील डाक विभाग खास वितरण व्यवस्थेसह सज्ज झाला आहे.  

  राखी टपालाची प्राधान्य क्रमानुसार बुकींग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफीसमध्ये करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी हा सण अधिक महत्व गृहीत धरत आहे. कारण आपल्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधामुळे सणासाठी भेट घेता येणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ – बहिण कंटेन्टमेंट झोन किंवा सीलबंद इमारतीमध्ये राहत असतील. या कोविड काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात नक्कीच आनंद येईल, अशी डाक विभागाची धारणा आहे.

   रक्षाबंधनाचा सण 3 ऑगस्ट 2020 असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट रविवार रोजी पोस्ट कार्यालयांमध्ये राखी वितरणाची विशेष वितरण व्यवस्था केलेली आहे. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी आपल्या भाऊरायाला पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचा वापर करावा, असे आवाहन बुलडाणा डाक अधिक्षक यांनी केले आहे.

                                                                        *****

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा

  • 10 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  मातंग समाजातील इयत्ता 10 वी, 12वी, पदवी व पदविका, अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या लाभासाठी गुणांनुसार विद्यार्थ्यांची  जिल्हा निहाय निवड केली जाते. मातंग समाजातंर्गत येणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या 12 पोट जातीतील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो आदीसह सादर करणे आवश्यक आहे. या योजनेकरीता अर्ज साद करण्याची अंतिम तारिख 10 ऑगस्ट 2020 आहे, तरी अंतिम दिनांकाची प्रतीक्षा न करता इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

                                                            *******

शेतमजुरांना कार्यक्षमता वाढविण्यासाठी मिळणार कौशल्य आधारीत प्रशिक्षण 

बुलडाणा,(जिमाका)दि. 30 : शेतीची उत्पादन्न वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची कटाई, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरूस्ती, रोपवाटीकेतील कामे, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी आदी सर्व कामे ही कौशल्यावर आधारीत आहे. याकरीता शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होऊन शेतकऱ्यांना सुध्दा मोठा फायदा होणार आहे.

    ग्रामिण भागात रोजगार निर्मितीस चालनासुरक्षितता व आरोग्य संरक्षणकार्यक्षम व्यवसायिक सेवांची शेतक-यांना उपलब्धतापर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 1 लक्ष मजूरांना प्रशिक्षित करण्याचे उदिदष्ट ठरविले असून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरूवात करण्यात आलेली आहे. तसेच शेतमजुराचे प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्राशिक्षणाचे प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार असून त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

   सद्यास्थितीमध्ये कापूस व मका या प्रमुख पिकासाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशक योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.

सदर प्रशिक्षणाबाबत संबंधीत शेतमुजरांनी जिल्हयातील प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा.  ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे अवाहन  संचालक, आत्मा यांनी केले आहे.

                                                            ********

                        अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य

  • बटेर पालन, शेळी पालनकरीता मिळणार अर्थसहाय्य

बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ओटीएसपी योजनेतंर्गत 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. पारधी समाजातील नागरिकांना बटेर पालन, शेळी पालन व्यवसाय करीता सदर अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. शेळी पालनासाठी 10 शेळ्या व 1 बोकड करीता  जिल्ह्यातील एकूण 40 लाभार्थ्यांकरीता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे.

  सदर योजनेच्या अर्जाचा नमुना पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. या योजनेतंर्गत अर्ज 5 ऑगस्टपासून स्वीकारण्यात येणार असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2020 राहणार आहे. योजनेतंर्गत 500 जापनीज बटेर पालन नुसार एका लाभार्थ्यास 500 जापनीज बटेर पक्ष्यांचे वाटप करण्यात येईल. या पक्षांकरीता शेड, मांडव, पाडवी आदी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत: स्थानिक साहित्यातून करावयाची आहे.

  लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर लाभार्थ्याने पक्षी संगोपनाकरीता उपरोक्त प्रकल्पात नमूद आकारमानानुसार निवाऱ्याची (पिंजरा) सोय केलेली असणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्यास पक्षी पुरवठा करण्यात येणार नाही. निवाऱ्याची सेाय उपलब्ध असल्याबाबत संबंधीत पशुवैद्यकीय संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. पारधी समाजातील नागरिकांना 10 शेळ्या व 1 बोकड करीता 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. एका लाभार्थ्यास 10 शेळी व 1 बोकडचे वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही योजनेमध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग अर्जदारांचा समावेश असणे आवश्यक आहे. अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीने यापूर्वी सदर योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो लावण्यात यावा.

  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याच दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. अशा प्रवृत्तींपासून सावध रहावे. लाभार्थ्यास योजेनचा लाभ हा सन 2020-21 च्या प्राप्त तरतूदीस अधीन राहून देण्यात येणार आहे.  तरी पात्र इच्छूक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                            *******

 

   

 

Wednesday 29 July 2020

DIO BULDANA CORONA ALERT 29.7.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 304 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 33 पॉझिटिव्ह

  • 9 रूग्णांची  कोरोनावर मात

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 337 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 304 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 35 तर रॅपिड टेस्टमधील 269 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 304 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा: भगवान कॉलनी 62, 40, 13, 15 वर्षीय पुरूष, 11, 19 वर्षीय महिला, शनिवार पेठ 60, 36 वर्षीय महिला, असोला जहांगीर ता. दे. राजा : 23 वर्षीय दोन महिला, लोणार : 20, 23 वर्षीय पुरूष, 40, 39 वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार : 18 वर्षीय पुरूष, निंभोरा ता. जळगांव जामोद : 65, 23 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, खामगांव: 42, 70 व 40 वर्षीय पुरूष, सुटाळा 27, 14 वर्षीय महिला, 17, 45 वर्षीय पुरूष, वामन नगर 59 वर्षीय महिला, बालाजी नगर 54 वर्षीय पुरूष, शिवाजी वेस 4 वर्षीय मुलगी, 56, 25 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष,  देशमुख प्लॉट 72 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 53 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33  रूग्ण आढळले आहे. तसेच आज उपचारादरम्यान हिवरा आश्रम, ता. मेहकर येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा बुलडाणा कोविड केअर सेंटर येथे मृत्यू झाला आहे.

        तसेच आज 9 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : दसरा नगर 10 वर्षीय मुलगा, चिखली : 40 वर्षीय दोन पुरूष, 4 वर्षीय मुलगा,  15, 32, 62, 24 वर्षीय महिला, डोणगांव ता. मेहकर : 22 वर्षीय पुरूष.      

   तसेच आजपर्यंत 8055 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 697 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 697 आहे. 

  आज रोजी 407 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 8055 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 697 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 409 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 28 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

DIO BULDANA NEWS 29.7.2020

सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा किडीचे व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 :  सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचा प्रौढ भुंगेरा फिक्‌क्ट तपकिरी रंगाचा, 7 ते 10 मि.ती लांब असतो. मादी नरापेक्षा मोठी असते. सोयाबीन पिक वाढीच्या सुरूवातीच्या काळात मादी भुंगेरा सोयाबीन पिकाचा देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालते. त्यामुळे जमिनीलगतच्या अन्न पुरवठा बंद होतो आणि खपाच्या वरचा भाग वाळुन जातो. या चक्री कापात चक्री भुंग्याचा मादी भुंगेरा 8 ते 72 अंडी घालतो.

  अंडी अवस्था 4 ते 8 दिवस असते. अंड्यातुन बाहेर पडेलली अळी दंडगोलाकृती , पिवळसर पांढरी, गुळगुळीत असून तिचा डोक्यावरील भाग जड असतो. तीच्या धडाच्या खालील भागावर उभरट ग्रंथी असतात. पुर्ण वाढ झालेली अळी 19 ते 22 मि.मी लांब असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सोयाबीनचे देठ, फांद्या व खोड पोखरून पोकळ करते  व अळी अवस्था 32 ते 62 दिवसांची असते. या किडीचा प्रादुर्भाव पीक दीड ते दोन महिन्याचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडासारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. नंतरच्या काळात खापेवरील फांदी वाळलेली दिसते व आतून खोड पोखरल्या गेल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून उत्पादनात लक्षणीय घट येते.

   असे करा व्यवस्थापन : सोयाबीनची पेरणी करतांना अती दाट किंवा अति विरळ पेरणी टाळावी. सोयाबीनच पेरणीकरीता बियाण्याचा दर अंतर शिफारशीप्रमाणेच ठेवावे. चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे आढळणारी किडग्रस्त पाने, वाळलेली फांदी यांचा आतील भाग किडीसह नष्ट करावा. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकात चक्रीभुंगा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल किंवा सोयाबीन पिकात 3 ते 5 चक्रीभुंगा प्रती मीटर  ओळीत आढळल्यास किंवा सरासरी 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झाडे आढळून आल्यास किटकनाशकाची गरजेनुसार योग्य निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.

   प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी 20 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा थायक्लोप्रीड 21.4 टक्के एस.सी 2 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा क्लोरॅनटानीप्रोल 18.5 एस.सी 2 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा इथिऑन 50 टक्के इ. सी 15 ते 30 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के ई.सी 12.5 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा थायोमेथॉझॉम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा साहेलोथ्रीन 9.5 टक्के 2.5 मिली अधिक 10 लीटर पाणी या प्रमाणात घेवून कोणत्याही एका किटकनाशकाची इतर एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या घटकाचा वापर करून गरजेनुसार व योग्य निदान करून फवारणी करावी.

  रासायनिक किडनाशके वापरण्यापूर्वी लेबलक्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबलक्लेम शहानिशा शिफारशीप्रमाणे आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेवून योग्य  शिफारशीत प्रमाणात योग्य वेळीच फवारणी करावी. अनेक रसायने एकत्र करून फवारणी टाळावी. मुदत बाह्य झालेली किडनाशके व एक्स्पायरी झालेली किडनाशके यांची फवारणी टाळावी. प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेवून किडीचे योग्य निदान करून व आर्थिक नुसानीची पातळी लक्षात घेवून लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे किडनाशकाचा वापर करणे केव्हाही हितावह व योग्य असते. वर निर्देशीत किटकनाशके फवारतांना लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे फवारणीसाठी निर्देशीत पाण्याची मात्रा प्रति हेक्टर वापरावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.    

********

इयत्ता 10 वीचा जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के

  • अमरावती विभागातून जिल्हा प्रथम
  • मुलांचा 95.18, तर मुलींचा 97.24 टक्के निकाल
  • 172 शाळांनी गाठली निकालाची शंभरी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 :  इयत्ता 10 वी चा निकाल आज जाहीर करण्यात आला. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निकाल कधी लागणार असा प्रश्न असताना मंडळाने आज लावलेला निकाल महत्वपूर्ण आहे. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यात इयत्ता 12 वी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून सर्व निकालात  मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 96.10 टक्के लागला आहे. निकालामध्ये जिल्हा अमरावती विभागातून प्रथम आहे.

  जिल्ह्यात इयत्ता 10 वीची परीक्षा मार्च 2020 मध्ये पार पडली. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण 43 हजार 922 विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी 43 हजार 669 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 41 हजार 419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 78 मुले, तर 17 हजार 951 मुली आहेत. त्यापैकी 21 हजार 04 मुले आणि 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. एकूण 38 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 95.18  असून मुलींची टक्केवारी 97.24 आहे.

   इयत्ता 10 वीच्या परीक्षेकरीता जिल्ह्यात नियमित विद्यार्थी 40 हजार 250 प्रवेशित झाले होते. त्यापैकी 40 हजार 29 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 14 मुले व 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 16 हजार 87 विद्यार्थी डिस्टीक्शन, 13 हजार 731 विद्यार्थी ग्रेड 1, 7 हजार 109 विद्यार्थी ग्रेड 2 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.  जिल्ह्यात दहावीच्या निकालात तब्बल 172 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामध्ये एस.डी पाटील माध्यमिक विद्यालय, डिडोळा बु व सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे विद्यालय गिरोली यांचा समावेश आहे.  त्याचप्रमाणे जिल्ह्यात 3640 विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षा दिली. त्यापैकी 3030 पुर्नपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 83.24 आहे.  पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेस नोंदणी केलेले मुले 2720 व मुली 952 आहेत. त्यापेकी 2696 मुलांनी, तर 944 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी 2176 मुले व 854 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेची मुलांची टक्केवारी 80.71 व मुलींची 90.47 टक्के आहे. जिल्ह्यात इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा प्रशासनाने अभिनंदन केले आहे.

                                                                        ******

Tuesday 28 July 2020

DIO BULDANA न्यूज 28.7.2020,2


कोरोनाला रोखण्यासाठी त्री-सुत्री कार्यक्रम राबवावा 
             - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे                            
                 
              *चिखली येथे कोरोना संसर्ग परिस्थिती आढावा सभा
   बुलडाणा, (जिमाका) दि.28:  दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याला चिखली तालुका देखील अपवाद नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियमित मास्क वापरने, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आणि वारंवार हात धुणे हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी व्यक्त केले. ते चिखली येथे आयोजित कोरोना आढावा सभे दरम्यान बोलत होते.
     यावेळी माजी आमदार राहुल बोन्द्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, नगराध्यक्षा प्रिया बोन्द्रे, जि.प. सदस्य ज्योती खेडेकर, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषद मुख्याधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे,  उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, न.प.मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह शहरातील डॉक्टर, व्यापारी, पत्रकार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी शहरातील मान्यवरांच्या समस्या व सूचना ऐकून घेण्यात आल्या.  पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. परंतु जनतेने नियमांचे पालन न केल्यास काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे जनतेने नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या,  जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दर शनिवारी रविवारी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. प्रशासनाला गरज भासेल तेव्हा आम्ही सर्व खाजगी डॉक्टर प्रशासनाला सहकार्य करू असे आश्वासन याप्रसंगी चिखली मेडिकल असोसिएशनने दिले. सभेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते 
*****""*"""***

DIO BULDANA CORONA ALERT 28.7.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 286 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 41 पॉझिटिव्ह
• 16 रूग्णांची  कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 329 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 286 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 41 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 21 व रॅपिड टेस्टमधील 20 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 63 तर रॅपिड टेस्टमधील 223 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 286 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : आडगांव राजा ता. सिं. राजा : 60 वर्षीय महिला, मेहकर : 60, 36 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर 82 वर्षीय महिला, लोणी गवळी ता. मेहकर : 15, 17, 18 वर्षीय महिला, डोणगांव ता. मेहकर : 60, 30, 6, 39, 56 वर्षीय पुरूष, 55, 30 वर्षीय महिला, जळगांव जामोद : चौबारा 29 वर्षीय पुरूष, दे. राजा : दुर्गापूरा  43 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ 31 वर्षीय पुरूष, असोला जहांगीर ता. दे. राजा : 45 वर्षीय पुरूष, 27, 42 वर्षीय महिला, खामगांव : महावीर चौक 34, 32, 29 वर्षीय पुरूष, सुटाळा 50 वर्षीय महिला, करवीर कॉलनी 66 वर्षीय पुरूष, केशव नगर 46 वर्षीय महिला, चिखली : 53, 20, 56, 2 वर्षीय पुरूष, 47, 49, 19, 34, 51,33, 55, 45  वर्षीय महिला,  जनुना ता. खामगांव : 65 वर्षीय पुरूष, मलकापूर : 21 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय महिला  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 41  रूग्ण आढळले आहे.
        तसेच आज 16 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा : 28, 45 वर्षीय पुरूष, मलकापूर : लख्खानी चौक 39 वर्षीय महिला, चिखली : आनंद नगर 32, 30 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 57 वर्षीय महिला,  70 वर्षीय दोन पुरूष, खामगांव : 38, 60 वर्षीय पुरूष, महावीर चौक 22, 50, 31 वर्षीय महिला, 39, 3 वर्षीय पुरूष,  खालखेड ता. नांदुरा : 56 वर्षीय महिला.    
   तसेच आजपर्यंत 7751 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 688 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 688 आहे.  
  आज रोजी 184 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7751 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1101 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 688 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 386 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 27 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

DIO BULDANA NEWS 28.7.2020

बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करावी

  • कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचना

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : कोविड 19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या  पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर सूचना खालीलप्रमाणे आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या

संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.  त्यासअनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी.  

   सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.  प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ के. एम. ठाकरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

कर्जमाफी यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

  • जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
  • मयत शेतकऱ्यांच्याबाबत वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ही महत्वाकांक्षी  योजना जाहीर केलेली आहे. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत आहेत. योजनेच्या निकषानुसार यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते.

   आजरोजी जिल्ह्यात योजनेतंर्गत 1 लक्ष 73 हजार 258 शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी 1 लक्ष 61 हजार 146 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची अद्यापही आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. तरी ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून उद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्रावर जावून कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचे पालन करून तात्काळ आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच कर्जमुक्तीच्या यादीमधील जे शेतकरी मयत आहेत, अशा शेतकऱ्यांच्याबाबत त्यांचे वारसाने संबंधित बँकेमध्ये जावून त्यांची कर्जखात्यास वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Sunday 26 July 2020

DIO BULDANA NEWS 26.7.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 164 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 61 पॉझिटिव्ह
  • 67 रूग्णांची  कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 225 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 164 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 61 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपिड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 75 तर रॅपिड टेस्टमधील 89 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 164 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव : आदर्श नगर 38 व 52 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, पाजवा नगर 32 वर्षीय पुरूष, खामगांव : 25, 52 वर्षीय पुरूष,  सुटाळा 57, 35, 51 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, महावीर चौक 3 वर्षीय मुलगा, 69, 32 वर्षीय पुरूष, देशमुख प्लॉट 35, 15 वर्षीय महिला,  राठी प्लॉट 55 वर्षीय पुरूष, रॅलीस प्लॉट 59, 37, 31 वर्षीय महिला, 3, 6 वर्षीय मुलगा, पिं. राजा ता. खामगांव : 15 वर्षीय मुलगा,    धाड ता. बुलडाणा : 27, 55,50  वर्षीय पुरूष, 25, 32 वर्षीय महिला, लोणार : 60 वर्षीय पुरूष, दिवठाणा : 65 वर्षीय महिला, चिखली : नगर परिषदजवळ 50, 52, 50 वर्षीय महिला, 22, 52 वर्षीय पुरूष,राऊतवाडी 35 वर्षीय पुरूष, माळीपुरा 38 वर्षीय पुरूष,सरस्वती नगर 26 वर्षीय पुरूष, सिंदखेड राजा : 25 वर्षीय पुरूष, आंबेवाडी ता. सिं. राजा : 32 वर्षीय पुरूष, दे. राजा : अहिंसा नगर 55 वर्षीय पुरूष, लोणी गवळी ता. मेहकर : 47, 12, 13, 35 वर्षीय पुरूष, 17, 70, 30 वर्षीय महिला,  साखरखेर्डा ता. सिं. राजा : 33 वर्षीय महिला, अमडापूर ता. चिखली : 26 वर्षीय पुरूष, अंचरवाडी ता. चिखली : 95, 16, 45, 9, 14 वर्षीय महिला, 14, 50, 50, 28 वर्षीय पुरूष,  दे. राजा : 65, 32 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष,         संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 61  रूग्ण आढळले आहे.
      तसेच आज 67 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव :31, 56 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष,  सिवील लाईन 45 वर्षीय पुरूष, शेगांव रोड 55 वर्षीय पुरूष, नॅशनल स्कूलजवळ 38 वर्षीय पुरूष, सीपीडी रोड 30 वर्षीय पुरूष, बस स्थानकाजवळ 55 वर्षीय महिला, जलंब नाका 25 वर्षीय पुरूष,  हिवरखेड ता. खामगांव : 55 वर्षीय महिला, पोस्ट ऑफीसजवळ 44 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल 25 वर्षीय दोन पुरूष, 27 वर्षीय पुरूष,  सुटाळा 20 वर्षीय महिला, शिवाजी नगर 38, 46, 42 वर्षीय महिला, वाडी 26, 47, 70 वर्षीय महिला, शंकर नगर 32, 28, 52 वर्षीय पुरूष, 60, 54, 19, 20, 46, 60, 45 वर्षीय महिला, दाल फैल 40 वर्षीय महिला, नवा फैल 75 वर्षीय पुरूष, कोठारी प्लॉट 31 वर्षीय पुरूष, रेखा प्लॉट 8, 45 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, जलालपूरा 50 वर्षीय महिला, भुसारी गल्ली 73, 32, 35, 44, 6, 36 वर्षीय पुरूष, 28, 33, 45, 22, 65 वर्षीय महिला, 6 महिन्याची मुलगी, मलकापूर : 38 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 25, 59 वर्षीय पुरूष, वडगांव हसनपूरा 50 वर्षीय महिला, शेगांव : जमजम नगर 36, 25 वर्षीय महिला, बालाजी फैल 62 वर्षीय पुरूष, चारमोरी 60 वर्षीय महिला, खिरानी मळा 19 वर्षीय महिला, उमेश नगर 46 वर्षीय महिला, दसरा नगर 30 वर्षीय पुरूष, देशमुखपुरा 58 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरूष, धनगर फैल 75 वर्षीय महिला,  जानोरी ता. शेगांव : 24 वर्षीय पुरूष, खेर्डी ता. बुलडाणा : 5 वर्षीय मुलगा, कुंबेफळ ता. सिं. राजा : 56 वर्षीय महिला.               
   तसेच आजपर्यंत 7224 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 653 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 653 आहे. 
  आज रोजी 233 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7224 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1005 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 653 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 327 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 25 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
ज्ञानगंगा प्रकल्प 68; तर ढोरपगांव लघु प्रकल्प 84 टक्के भरला
  • नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.26: सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत असलेला मध्यम प्रकल्प ज्ञानगंगा 68 टक्के व ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये 84 टक्के पाण्याने भरला आहे. या दोन्ही धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण क्षमतेने भरून सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. ज्ञानगंगा नदीकाठावरील 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदूळवाडी, पिं.राजा, घाणेगांव, ज्ञानगंगा (काळबाई), वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, नांदुरा तालुक्यातील नांदुरा, भुईसिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, वरूड, डोलारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा ईसापूर, दादगांव व दौडवाडा गावांचा समावेश आहे. तसेच ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदी काठावरील 6 गावांना  सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्ञानगंगापूर, कासारखेड, पिं.राजा, भालेगांव, ढोरपगांव व वडजी भेंडी गावांचा समावेश आहे, असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी कळविले आहे.
*********

कोविड केअर सेंटरमधील सुविधांचा दर्जा उच्च ठेवावा
-          पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
  • खामगांव येथे कोरोना संसर्ग परिस्थिती आढावा सभा
बुलडाणा,(जिमाका) दि. 26 : कोरोनाचा संसर्ग खामगांव शहरात वाढत आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णाच्या हाय रिस्कमधील व्यक्तींची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या तपासण्यादेखील वाढल्या  आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये संशयीत व्यक्ती दाखल करण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत खामगांव शहरातील कोविड केअर सेंटरमधील सुविधांचा दर्जा उच्च ठेवून दाखल व्यक्तींना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
  यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिताताई डवरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार श्री. रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
    जवळच असलेली व खामगावसाठी धोकादायक ठरणारी अकोला जिल्हा सीमा सील करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री म्हणाले, या सीमेवर मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात यावी. बंदोबस्त  चोख ठेवावा. विनाकारण येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. सीमेवर आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी. कारणास्तव येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. संशयीतांना बाहेर काढून विलगीकरण करावे. शहरातील भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात यावी. एकाच ठिकाणी भाजीपाला विक्रीमुळे गर्दी होणार याची काळजी घ्यावी. शहरात ठिकठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना जागा देवून एकाच ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी टाळावी.
  पालकमंत्री पुढे म्हणाले, शहरात जरी कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या वाढत असली, तरी घाबरून जावू नये. तपासण्या वाढल्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे. तसेच शहरातील बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही चांगले आहे.  शासन, प्रशासन खामगांवच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. येथील कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खामगांवसाठी मास्क, सॅनीटायझर, औषधांचा साठा विपुल प्रमाणात ठेवण्यात यावा. यामध्ये कमतरता येवू नये. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. अत्यावश्यक कामासाठी निघाल्यास तोंडावर मास्क किंवा रूमाल वापरावा, घरात आल्यावर हात धुवावे, लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवानही पालकमंत्री यांनी यावेळी केले. सभेला खामगांव शहरातील व्यापारी, नागरिक उपस्थित होते.
                                                                                                                ************

Saturday 25 July 2020

DIO BULDANA NEWS 25.7.2020,2

जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'चेस द कोरोना' ही मोहीम राबविणार
-         पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात दिवसेदिवस वाढतच चालला असून याला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. जिल्ह्यामध्ये संशयित तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलित करण्यात येणार आहे. संशयीतांचे एक्स-रे काढून तपासणी करण्यात येवून यामध्ये ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून येत असल्यास त्या व्यक्तीचा चेस्ट एक्स-रे काढून त्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अशी व्यापक ‘चेस द कोरोना’ मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
   जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी ‍जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनामध्ये कोरोना सनियंत्रण समिती टास्क फोर्सची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, कोरोना सनियंत्रण समितीचे सदस्य डॉ. लद्धड, डॉ. तायडे आदी उपस्थित होते.
    पालकमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी चेस द कोरोना मोहिम राबविल्यास कोरोनाचा वाढत्या संसर्गाला आळा घालणे सोपे जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी जिल्हा  कडकडीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरीक या बंद ला उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो व प्रशासनाला अशीच साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच याप्रसंगी औषधांचा साठा व इतर अनुषंगिक बाबींचा आढावाही  पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतला.
************

देऊळगाव राजा येथे 20 बेडचे कोरोना हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार
-पालकमंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा,(जिमाका) दि. 25 :  देऊळगाव राजा तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  याला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. सिंदखेड राजा मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आपली प्राथमिकता आहे. मतदारसंघामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे 20 बेडचे कोरोना हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार आहे.  या काळात खाजगी दवाखाने देखील पूर्वरत सुरू करण्यात यावे,  असे आवाहन पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
  तालुक्यामध्ये पॉझिटिव रुग्णांचा व संशयितांचा वाढता संसर्ग बघता या पार्श्वभूमीवर आज देऊळगावराजा येथे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर,  नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, तहसीलदार सारीका भगत, नगरपालिका अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
  पालकमंत्री यावेळी म्हणाले, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे सुरू होणाऱ्या कोरोना रुग्णालयास 1975 रॅपिड ॲटींजेंट किट, 50 थर्मल स्कॅनर, 199 पल्स ऑक्सीमीटर व इतर औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कोरोना रुग्णालयासाठी आवश्यक असणारे फिजिशियन व इतर स्टाफ तात्काळ नियुक्त करण्यात येणार आहे. शहरामध्ये वार्ड निहाय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून यामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. या टास्क फोर्समध्ये नागरिकांनी सहभाग द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
    नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, मास्क, सॅनिटायझर याचा उपयोग करावा. नियम व कायदे पाळल्यास हे संकट निश्चितच लवकर दूर होईल असा विश्वासही यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***************

DIO BULDANA NEWS 25.7.2020,1

कोरोना अलर्ट : प्राप्त 165 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 29 पॉझिटिव्ह
  • 71 रूग्णांची  कोरोनावर मात, आतापर्यंत एका दिवसात सर्वात जास्त सुट्टी झालेले रूग्ण
बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 194 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 165 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 29 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 86 तर रॅपिड टेस्टमधील 79 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 165 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे. राजा : चांदेश्वरी मंदीराजवळ 19, 67, 52 वर्षीय पुरूष, 42, 75, 7, 13 व 60 वर्षीय महिला, खामगांव : देशमुख प्लॉट 13, 40 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, सराफा गल्ली 37 वर्षीय पुरूष, सुटाळा 51 वर्षीय पुरूष, फरशी 36 वर्षीय पुरूष, पुरवार गल्ली 57 व 16 वर्षीय महिला,  पिं. राजा ता. खामगांव : 36 वर्षीय महिला, मलकापूर : पंत नगर 65 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 72 वर्षीय महिला, शेगांव : बालाजी फैल 70, 30, 60 वर्षीय पुरूष, 1 महिन्याचे बाळ,  30, 20, 17, 29, 60 वर्षीय महिला, पहुरजिरा ता. शेगांव : 43 वर्षीय महिला  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 29  रूग्ण आढळले आहे. यापैकी दे. राजा येथील 88 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
      तसेच आज 71 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. एका दिवसात सुट्टी झालेल्या रूग्णांची ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे.  सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :
मलकापूर : 45 वर्षीय पुरूष, संत ज्ञानेश्वर नगर 11, 16 वर्षीय पुरूष, 73 वर्षीय महिला,  मेहकर : जामा मस्जिदजवळ 60 वर्षीय महिला, 15 वर्षीय दोन तरूणी, 9 वर्षीय मुलगा, बुलडाणा : मुठ्ठे ले आऊट 58 वर्षीय पुरूष, कोथळी ता. मोताळा : 47 वर्षीय पुरूष, खामगांव : जलंब नाका 20 वर्षीय पुरूष, 21 वर्षीय महिला, शिवाजी नगर 55, 30 वर्षीय पुरूष, 45, 36 वर्षीय महिला, बाळापूर फैल 22 वर्षीय दोन महिला, 28, 40  वर्षीय महिला,  17, 15 वर्षीय पुरूष, भुसारी गल्ली 53 वर्षीय पुरूष, बोबडे कॉलनी 29, 35 वर्षीय महिला, देशमुख प्लॉट 27 वर्षीय पुरूष, पन्हाळ गल्ली 54 वर्षीय पुरूष, पीडब्ल्यूडी क्वॉर्टर 37 वर्षीय पुरूष, यशोधरा नगर 22 वर्षीय पुरूष, सिवील लाईन 20, 45 वर्षीय महिला, रायगड कॉलनी 28 वर्षीय पुरूष, राठी प्लॉट 29 वर्षीय पुरूष, भालेगांव ता. खामगांव : 66 वर्षीय महिला,    दे .राजा : वाल्मिक नगर 65, 31, 36, 37, 30, 11, 9 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी 51, 19 वर्षीय पुरूष, 43, 45 वर्षीय महिला, अग्रसेन चौक्‍ 29 वर्षीय पुरूष, 2 वर्षीय मुलगा, 65 वर्षीय महिला,  जुना जालना रोड 57 वर्षीय पुरूष, 45, 23, 51, 20, 17 वर्षीय महिला, बालाजी नगर 34 वर्षीय पुरूष, 56, 26 वर्षीय महिला, दुर्गापुरा 22, 37 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, जुन्या नगर परिषदे जवळ 24, 59 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 52 वर्षीय महिला, जळगांव जामोद : 5 वर्षीय मुलगी, शेगांव : 60 वर्षीय महिला,दसरा नगर 19 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला,  देशमुखपुरा 28 वर्षीय पुरूष, धनगर फैल 12 वर्षीय मुलगा.        
   तसेच आजपर्यंत 7060 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 586 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 586 आहे. 
  आज रोजी 286 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7060 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 944 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 586 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 333 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 25 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
खडकपूर्णा प्रकल्पातून 45 हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात
  • सध्या 5 दरवाजे 10 से. मी ने राहणार उघडे
बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रकल्पाच्या उर्ध्व भागात तथा पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला होता. परिणामी हा मोठा प्रकल्प 74 टक्क्यांपेक्षा जास्त भरला होता. त्यामुळे पूर नियंत्रणाकरीता प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता. त्यानुसार नदीकाठावरील जिल्ह्यातील 19 गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. प्रकल्पातून पूर्ण 19 वक्रद्वारे 60 से. मी ने उघडून 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला. सध्या धरण पाटबंधारे विभागाच्या नियमांनुसार उद्दिष्टपातळी पर्यंत आले असल्यामुळे धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
  सद्यपरिस्थितीत प्रकल्पाचे 5 दरवाजे 10 से. मी ने उघडे ठेवण्यात आले आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील  नागरिकांनी  सावध राहावे, असा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
*********
मस प्रकल्पाने गाठली शंभरी..!
  • नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.25: पाटबंधारे उपविभाग खामगांव यांचे अंतर्गत सिंचन शाखा हिंगणा कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मस 100 टक्के  पाण्याने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात येणार  आहे. या सांडव्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मस नदीकाठावरील खामगांव तालुक्यातील हिंगणा, कारेगांव, संभापूर, शेंद्री, लासूरा जहा, उमरा लासूरा व चितोडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पूर आल्यास ही नदीकाठावरील जिल्ह्यातील गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे. असा इशारा उपविभागीय अधिकारी,  पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी दिला आहे.
**********

DIO BULDANA NEWS 25.7.2020

जिल्ह्यात 51 हजार 409 शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल कापूस खरेदी..!
  • कोरोना संसर्ग व पावसाच्या काळातही खरेदी
  • राज्यात 10 वर्षात प्रथमच विक्रमी कापूस खरेदी
बुलडाणा, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे टाळेबंदीची परिस्थिती आहे. तसेच दमदार पाऊस जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे असलेला कापूस खरेदी करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीतही कापूस पणन महासंघ व भारत कापूस निगमच्या माध्यमातून जिल्ह्यात 51 हजार 409 शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटलची ‘पांढऱ्या सोन्याची’  खरेदी करण्यात आली आहे.
  कोविड 19 आजारापूर्वी शासनाकडून कापूस खरेदी नियमित सुरू होती. मात्र कोविड संसर्गानंतर परिस्थिती बदलली. टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कापूस खरेदीला काही प्रमाणात ब्रेक लागला. मात्र राज्य शासनाने ही परिस्थितीसुद्धा व्यवस्थित हाताळत कापूस खरेदी सुरू केली. जिल्ह्यात कोविड 19 आजारापूर्वी कापूस पणन महासंघाकडून जिल्ह्यात 5 हजार 899 शेतकऱ्यांकडून 2 लक्ष 36 हजार 95 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर याच काळात सीसीआयकडून 32 हजार 303 शेतकऱ्यांच्या 9 लक्ष 76 हजार 665 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
  कोविड 19 आजाराच्या संसर्गानंतर शासनाने कापूस खरेदी करण्यास सुरूवात केली. याकाळात कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम पाळून कापूस खरेदी करण्यात आली. कोविड च्या परिस्थितीत कापूस पणन महासंघाने  5 हजार 856 शेतकऱ्यांच्या 1,55,406 क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी केली. तर सीसीआय च्या माध्यमातून 7 हजार 351  शेतकऱ्यांकडून 2 लक्ष 33 हजार 381 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे या दोन्ही काळात कापूस पणन महासंघाने 11 हजार 755 शेतकऱ्यांचा 3 लक्ष 91 हजार 502 क्विंटल कापसाची खरेदी केली.  तसेच भारतीय कापूस निगम अर्थात सीसीआयकडून एकूण 39 हजार 654 शेतकऱ्यांच्या 12 लक्ष 10 हजार 46 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.आतापर्यंत कोरोना संसर्ग व पावसाच्या काळात एकूण 51 हजार 409 शेतकऱ्यांच्या 16 लक्ष 1 हजार 548 क्विंटल कापसाची शासनाकडून झालेली विक्रमी खरेदी करण्यात आली आहे.
  कोरोना प्रादुर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमी दरापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.त्यानुसार शासकीय खरेदीचे नियोजन करून कोरोनाच्या काळात सीसीआय व कापूस पण महासंघाने आतापर्यंत राज्यात मागील 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एएफएक्यु दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कापूस शिल्लक असलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचासुद्धा कापूस खरेदी करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या संकटसमयी राज्य शासनाने विक्रमी कापूस खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.   
********
कोरोना बाधीत मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला विरोध करणाऱ्यांवर होणार कारवाई
  • जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
बुलडाणा, दि.25 (जिमाका) : कोविड आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून विविध ठिकाणी कोरोना बाधीत रूग्णांचे मृत्यू होत आहे. कोविड 19 बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्मशान भूमीमध्ये स्थानिक नागरिक, समुहाकडून विरोध होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढे कोविड बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास प्रशासन व नातेवाईक यांच्यादृष्टीने योग्य अशा कुठल्याही स्मशानभुमीत स्थानिक नागरिक, समूहाकडून विरोध होत असल्यास सदर विरोध हा आपत्ती व्यवस्थापनास अडथळा आणल्याचे गृहीत धरून त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार उचित कारवाई करण्यात येणार आहे.  कोणत्याही परिस्थितीत कोविड बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास विरोध होवून विलंब होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहे.
  कोविड बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर सोडीयम हायपोक्लोराईट द्रवाणे निर्जंतुकीकरण करण्यात येते. सदर मृतदेह प्लॅस्टीक पिशवीमध्ये अथवा रूग्णालयाने पुरविलेल्या बॅगमध्ये बंद करून बॅगचा बाह्यभाग हा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईटने निर्जंतुक केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्काराकरीता देण्यात येतो. अशा मृतदेहावर स्मशानभूमीत होणारा स्थानिक, समूहाचा विरोध हा उचित नाही, असेही आदेशात नमूद आहे.
                                    

Thursday 23 July 2020

DIO BULDANA NEWS 23.7.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 220 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 39 पॉझिटिव्ह
• 40 रूग्णांची  कोरोनावर मात
बुलडाणा, (जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 259 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 220 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 38 व रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 201 तर रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 220 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  जळका भडंग ता. खामगांव : 16 वर्षीय पुरूष, खामगांव : 36 वर्षीय पुरूष,42 व 16 वर्षीय महिला, प्रशांत नगर 20 वर्षीय पुरूष, केशव नगर 38 वर्षीय पुरूष, फाटकपुरा 45 वर्षीय महिला, बाळापूर फैल 52 वर्षीय पुरूष,   शेगांव : गुरूकुंज नगर 32 वर्षीय पुरूष, दसरा नगर 30 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरूष,  निंभा ता. जळगांव जामोद : 75 वर्षीय पुरूष, पिं. राजा ता. खामगांव : 47, 28 व 6 वर्षीय महिला, 4 वर्षीय मुलगा, चिखली : 40 वर्षीय दोन महिला, 30 व 65 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, दे. राजा : 38 व 28 वर्षीय महिला, 88 वर्षीय पुरूष,  लोणार : 36 वर्षीय महिला,   जळगांव जामोद : 33, 61, 43, 51, 50 वर्षीय महिला, नांदुरा : 46, 70, 41 व 18 वर्षीय महिला, 24, 30, 32, 40 व 50 वर्षीय पुरूष,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 39  रूग्ण आढळले आहे.
        तसेच आज 40 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : करवंड ता. चिखली : 80 वर्षीय महिला, मलकापूर : 47 वर्षीय पुरूष, लख्खानी चौक 20 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरूष, 39 वर्षीय पुरूष, शेगांव : रॉक नगर 27 वर्षीय पुरूष, चारमोरी 40 वर्षीय पुरूष, जमजम नगर 71 व 6 वर्षीय महिला, 18, 40 व 30 वर्षीय पुरूष,  लोहरा ता शेगांव : 28 वर्षीय पुरूष,  दे. राजा : अहिंसा मार्ग  51, 52, 28, 25, 22 वर्षीय पुरूष, सुलतानपूर ता. लोणार : 35 व 6 वर्षीय पुरूष, खामगांव : दाल फैल 26 वर्षीय पुरूष, वाडी 22 व 50 वर्षीय महिला, सती फैल 38 वर्षीय पुरूष, 75 व 50 वर्षीय महिला, नांदुरा : 45 व 9 वर्षीय पुरूष, गारखेड ता. सिं.राजा : 38 व 15 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय महिला, वर्दडी ता. सिं. राजा : 52 वर्षीय पुरूष, बुलडाणा : 51 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 50 वर्षीय पुरूष, चिखली : बागवानपुरा 21 वर्षीय पुरूष, इंदिरा नगर 29 व 61 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरूष,  शेलूद ता. चिखली : शिक्षक कॉलनी 52 वर्षीय पुरूष, गुंजाळा ता. चिखली : 70 वर्षीय पुरूष,   शेगांव : 64 वर्षीय महिला रूग्ण व लोणार येथील 36 वर्षीय महिला रूग्ण अकोला रेफर करण्यात आला आहे.    
   तसेच आजपर्यंत 6695 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 479 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 479 आहे.  
  आज रोजी 158 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6695 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 873 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 479 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 370 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 24 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

DIO BULDANA NEWS 23.7.2020,1

कोरोनाबाधीतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या जिजाऊंच्या लेकींची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल…!
  • प्रशस्तीपत्र देवून करणार सन्मान
बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  आपण सध्या एका आरिष्टयामधून जात आहोत.. ते आरिष्ट्य आहे कोरोना साथरोगाचे.. सर्वांना आसमान दाखविणाऱ्या या साथरोगाने सर्वांना छळले आहे. कोरोना… हा शब्दच आता सर्वांना नकोसा झाला आहे. त्यामध्ये कोरोनाबाधीत म्हटले, तर नकोरे बाबा..मग तो जिवंत असो वा मृत.. असाच प्रकार देऊळगाव राजा नगरीत 21 जुलै रोजी घडला. निमित्त होते कोरोनाबाधीत 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूचे.
    या व्यक्तीच्या देहावर कोरोनाच्या भयामुळे कुणीही अंत्यसंस्कार करण्यास तयार होत नव्हते. अशा परिस्थितीत दे.राजाच्या जिगरबाज, निडर मुख्याधिकारी निवेदीता घार्गे व वैद्यकीय अधिक्षक डॉ आसमा शाहीन या जिजाऊ- सावित्रींच्या लेकींनी कोरोनाबाधीत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. या कर्तृत्वामुळे, धैर्यामुळे त्यांची सर्व स्तरातून पाठ थोपटली जात आहे. त्यांच्या या कार्याची दखल थेट जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीसुद्धा घेतली आहे.
   देऊळगांव राजा शहरात अहिंसा मार्ग भागात राहणाऱ्या कोरोनाबाधीत वृद्ध व्यक्तीचा 21 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.  कोरोनाने वृद्ध व्यक्तींच्या कुटूंबीयांनाही सोडले नाही. कुटूंबातील व्यक्तीही बाधीत असल्यामुळे दे. राजा येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होत्या. त्यामुळे बाधीत मृत व्यक्तीच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळचे नातेवाईक, कुटूंबीय येवू शकले नाही. मुख्याधिकारी निवेदीता घार्गे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वर्गरथ पाठवून मृतदेह वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यविधीकरीता नेण्यात आला. कुंटूंबीय कोरोनाबाधीत असल्यामुळे उपचारार्थ दाखल होते. त्यामुळे ते येवू शकले नाही. तसेच नगर पालिकेचे कर्मचारीसुद्धा कोरोनाची धास्ती व भिती असल्यामुळे अंत्यंसंस्कार करायला आले नाही. त्याचप्रमाणे अंत्यसंस्काराला आणण्यात आलेला मृतदेह हा कोरोना बाधीत रूग्णाचा असल्यामुळे स्थानिकांनी सुद्धा विरोध केला.
   अशा सर्व विरोधाभासी परिस्थितीत या दोन्ही सावित्रीच्या लेकी पुढे आल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता, कुठलेही भय न बाळगता या महिला अधिकाऱ्यांनी पिपिई किट घालून स्वत: मृतदेहावर अंत्यसंसकार केले.  त्यांच्या या धाडसाची चर्चा सर्व जिल्ह्यात होत आहे. या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा त्यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करणार आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी जिजाऊ, सावित्रीच लेकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्यावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांनी समाजाने कुठे तरी याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या या भयावह काळामध्ये या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेटकऱ्यांकडूनही त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे. तरी अशा या कर्तृत्वाचा सन्मान जिल्हा प्रशासन करणार आहे. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाला एक उभारी मिळेल.. एवढे मात्र निश्चित..
******
कडबा कटर यंत्राचे 50 टक्के अनुदानावर वाटप..!
बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  जिल्ह्यात दुध उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने चाऱ्याचा विनीयोग पुर्णपणे होणे गरजेचे आहे. चारा वाया जावू न देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प (एनडीडीबी), राष्ट्रीय कृषि विकास योजना व राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेतंर्गत 50 टक्के अनुदानावर कडबा कटर यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. सदर योजनेतंर्गत डीबीटी नुसार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी स्वत: नामांकित कंपनीकडून कडबा कटर यंत्र खरेदी करावे. त्याचे जिएसटीचे देयक, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करून त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खात्यात 50 टक्के अनुदानाची रक्कम  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव पशुधन विकास अधिकारी (वि) संबंधीत पंचायत समिती यांचेकडे सादर करावा. या यंत्राद्वारे चारा कापणी केल्यामुळे चारा वाया जात नाही. चाऱ्यावरील खर्च कमी होतो व चाऱ्याची पौष्टीकता वाढून दुधातील फॅट, एसएनएफ वाढण्यास मदत होते. त्यामुळे दुध उत्पादनात वाढ होते. तरी जास्तीत जास्त पशुपालकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****  

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी…!
  • सरासरी 11.9 मि.मी पावसाची नोंद
  • बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 26.1 मि.मी पाऊस
बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस कमी अधिक प्रमाणात भाग बदलून हजेरी लावत आहे. कुठे दमदार, तर कुठे तुरळक स्वरूपात पाऊस आपले अस्तित्व दाखवित आहे. सध्या शेतीच्या आंतरमशागतीची कामे कोळपणी, निंदणे जिल्ह्यात गतीने सुरू आहे. अनेक भागात खत टाकणे, फवारणी आदी कामेही सुरू आहेत. अशा परिस्थितीत उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना काल दमदार पावसाने सुखावले. जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 26.1 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 11.9 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 26.1 मि.मी (396.3), चिखली : 15.6 (312.5), दे.राजा : 2.8 (291.8), सिं. राजा : 14.3 (370.8), लोणार : 4.5 (292.3), मेहकर : 11.8 (289.4), खामगांव : 14.3 (251.9), शेगांव : 5.6 (342.4), मलकापूर : 21.8 (436), नांदुरा : 17.7 (350.4), मोताळा : 20.3 (227.9), संग्रामपूर : निरंक (426.8), जळगांव जामोद : निरंक (376.4)
 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4364.9 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 335.8 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 227.9 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.
    जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 37.87 दलघमी (54.63), पेनटाकळी : 31.33 दलघमी (52.24), खडकपूर्णा :65.49 दलघमी (70.12), पलढग : 1.63 दलघमी (21.70), ज्ञानगंगा : 21.88 दलघमी (64.49), मन : 22.37 दलघमी (60.74), कोराडी : 8.74 दलघमी (57.80), मस : 11.58 दलघमी (76.99), तोरणा : 3.60 दलघमी (45.63) व उतावळी : 11.56 दलघमी (58.41).          
*******
            जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल
  • आता सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत मुभा
  • जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश
  • पिक विमा भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सरएससी केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण एक महिन्यासाठी 21 जुलै रोजीच्या आदेशानुसार लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली.  या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू केली.
   सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय आदी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होते. या वेळेमध्ये आता बदल करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय आता सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी सायं 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी कमी वेळ मिळत आहे, परिणामी शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज दाखल करण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्र शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय संचारबंदी लागू असतांना इतर कोणतीही व्यक्ती, वाहने, रस्त्यावर, बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरताना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम 2005, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला असे समजण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल,   असे आदेशात नमूद आहे.
********