कुसुम मोहिमे अंतर्गत जिल्हा कारागृहात 314 बंदीवानांची कुष्ठरोग तपासणी

 


बुलढाणा, दि. 30 (जिमाका) : राज्य शासनाच्या 'कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र'(कुसुम) कुष्ठरोग शोध मोहीम 2025-26 अंतर्गत आज बुलढाणा जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत कारागृहातील एकूण 314 बंदीवानांची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यात आली.

ही मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बुलढाणा कारागृहात झालेल्या या तपासणी दरम्यान आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाच्या चमूने बंदीवानांना कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आरोग्य शिक्षण दिले. यावेळी  आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. हरी एस. पवार, जिल्हा कारागृहाचे कारागृह अधीक्षक मेधा बाहेकर उपस्थित होते.

भारत सरकारने 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार पूर्णपणे थांबवण्याचे ध्येय ठेवले आहे. याच उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील वंचित आणि जोखमीच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 18 हजार 851 व्यक्तींची तपासणी  करण्यात येणार असून यासाठी  170 आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांची टीम कार्यरत आहे. कारागृहाप्रमाणेच जिल्ह्यातील इतर संवेदनशील वस्तींमध्येही ही मोहीम राबवली जाणार आहे. कुष्ठरोगाचे वेळीच निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी