उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यात तीन दिवसीय दुखवटा

 



 

बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा आशाताई अनंतराव पवार यांचे आज, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि. २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या तीन दिवसांत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावण्यात यावे. तसेच दुखवटा कालावधीत कोणत्याही प्रकारचे शासकीय अथवा सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तसेच, शासनाच्या सूचनेनुसार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये व आस्थापना बंद राहतील, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जारी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या