कारागृहातील बंद्याची क्षयरोग तपासणी
बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : कारागृहातील बंद्यामध्ये क्षयरोगाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय, बुलढाणा व जिल्हा कारागृह, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा कारागृहामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व क्षयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधिक्षक मेघा शंकर बाहेकर या होत्या. जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्षा गुट्टे, यांनी बंद्यांना क्षयरोगाबाबत जागृतीपर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या टीमने बंद्यांची आधुनिक एक्स-रे मशिनव्दारे कारागृहातील एकुण 337 बंद्याची क्षयरोग तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोग संशयित बंद्यांचे थुंकीचे नमुने घेण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश नाईक, तुरुंगाधिकारी, मिश्रक गोपाल खोंडे, चंद्रकांत महाले, कारागृह शिपाई व जिल्हा क्षयरोग कार्यालयाची टीम डॉ. खिरोडकर, सिध्देश्वर सोळंकी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी सुभाष राजपूत, अनिल भोके तसेच सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0000




Comments
Post a Comment