अन्न व औषध प्रशासन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; माजी सैनिकांचा गौरव, संविधान मूल्यांचा जागर
बुलढाणा, (जिमाका) दि. 30 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अन्न
व औषध प्रशासन कार्यालय येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रजासत्ताक
दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार
करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी सहाय्यक आयुक्त(औषधे) तथा कार्यक्रम अध्यक्ष गजानन प्रल्हाद घिरके यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तंबाखू मुक्ती शपथ तसेच भारतीय संविधान शपथ
घेण्यात आली. संविधानातील मूल्ये अधिक दृढ व्हावीत या उद्देशाने संविधान विषयक गीताचे
सादरीकरण करण्यात आले. यावेळी शासकीय कर्तव्य निष्ठापूर्वक व सचोटीने पार पाडणाऱ्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुभेदार
मेजर एकनाथ उबरहंडे, सुभेदार गजानन वैद्य, हवालदार पांडुरंग जाधव, सुभेदार संजय चिंचखेडे,
सुभेदार रमेश गवई, सुभेदार अशोक शेळके, सुभेदार गजानन उबरहंडे, नायक बजरंग निकम, नायक
त्र्यंबक नेमाने, हवालदार समाधान जाधव व हवालदार संदीप जाधव यांच्यासह अनेक माजी सैनिकांचा
गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुभेदार अशोक शेळके व हवालदार संदीप जाधव यांनी सैन्य
दलातील अनुभव कथन करून उपस्थितांना प्रेरणा दिली.
अन्न
व औषध प्रशासन, बुलढाणा यांच्या वतीने उपस्थित सर्व माजी सैनिकांचा जाहीर सत्कार करून
कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजाननजी
शिंदे तसेच किराणा दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष अमरचंदजी कोठारी यांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात गजानन प्रल्हाद घिरके यांनी राष्ट्रप्रेम, सैनिकांचा
देशासाठी असलेला त्याग, संविधानाचे महत्त्व तसेच जिल्ह्यातील केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेचे
उल्लेखनीय कार्य यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन श्रीकांत मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरक्षा अधिकारी
अक्षय भोपाळे, प्रमुख लिपिक जयंत झोपे, रोखपाल मुकुंद खुर्दे, डेटा एंट्री ऑपरेटर विजय
जाधव, आशिष देशमुख, अजाबराव घेवंदे व कारभारी मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास
राजू पाटील (उपाध्यक्ष, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन), अभिजीत निंबाळकर, गणेश बंगाळे,
निलेश गावंडे, रवी वाढते, धर्मेश कमानी, मुंदडा, सोनोने यांच्यासह अनेक औषधी विक्रेते
व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment