Thursday 27 April 2023

DIO BULDANA NEWS 27.04.2023

 



सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरुद्ध 12 गुन्हे

*दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा, दि. 27 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी, दि. 26 एप्रिल रोजी अवैध दारूविक्रीविरूद्ध 12 गुन्हे नोंद केले. सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी, दि. 25 एप्रिल रोजी अवैध हातभट्टीवर कारवाई करून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत्‍ 12 वारस गुन्हे नोंदवून 12 आरोपींसह हातभट्टी 228 लिटर, रसायन 5 हजार 156 लिटर, देशी मद्य .90 लिटर, विदेशी मद्य 1.24, असा 2 लाख 8 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मद्य विक्री करणाऱ्या चिखली तालुक्यातील सावखेड भोई येथील आशिर्वाद ढाबा आणि अशोका ढाबा येथे मद्यसेवन करणाऱ्या दोन ढाबा मालक आणि सहा ग्राहकांवर म. दा. का. १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार कार्यवाही करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२३ ते दि. 27 एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण 101 गुन्हे नोंदवून 97 आरोपी आणि ५ वाहनासह बिअर ८७ लिटर, देशी मद्य ३८५ लिटर, हातभट्टी 947 लिटर, विदेशी मद्य १३७ लिटर आणि सडवा 22 हजार 481 लिटर असा 13 लाख 48 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञाप्तीधारक यांच्या अनुज्ञाप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास त्यांची अनुज्ञाप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

00000

टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट भरती

*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह दि. 10 मे 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत डाकघर कार्यालयात उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

एजंटसाठी वय वर्षे 18 ते 50 दरम्यान असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी, बेरोजगारीत किंवा स्वयम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा किसान विकास पत्रच्या स्वरुपात पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल.

प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. नियुक्तीनंतर आयआरडीएची परवाना परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहिल. दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड झेरॉक्स, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र अर्जासह असणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी डाक कार्यालयास संपर्क साधावा किंवा maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000





जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मानसिक आरोग्य तपासणी

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दि. 26 एप्रिल 2023 रोजी मानसिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

शिवाजी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. विश्वास खर्चे, डॉ. महेश बाहेकर, सायकोलॉजिस्ट सिद्धार्थ जाधव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता हरिदास अंभोरे उपस्थित होते.

यावेळी मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात जीवनातील मानसिक ताण खूप वाढले आहे. मानवी जीवन अत्यंत तणाव आणि चिंताग्रस्त झाले आहे. आपल्याला अनेक समस्यांना बऱ्यावाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा गोष्टी वारंवार घडल्यास मनावर खूप दडपण येते, चिंता व बैचेनी वाढू लागते. यामधूनच अनेक प्रकारच्या मानसिक रोगामध्ये प्रचंड वाढ होत आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणेही खूप गरजेचे आहे. झोप न येणे, मनात उदास वाटणे, कामात मन न लागणे, भूक न लागणे,आत्मविश्वास कमी होणे, चिडचिड होणे, डोके भारी वाटणे, आत्महत्येचे विचार मनात येतात. याप्रकारचे मानसिक आजारी हे आपल्या शेजारी आढळल्‍यास त्यांना उपचार आणि मार्गदर्शन करु शकतो, अशी माहिती देण्यात आली.

मानसिक आजारी नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत विविध उपक्रम चालविण्यात येतात. याबाबत अधिक माहितीकरीता जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण खोली क्र. 12 मध्ये संपर्क साधावा. याठिकाणी सकाळी 8.30 ते 1 किंवा मानसिक आरोग्य विनामुल्य समुपदेशन हेल्पलाईन नंबर 14416 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मनोविकृती परिचारीका पुजा मधुकर वानखेडे, केस रजिस्टर चंद्रकांत जामहोड उपस्थित होते.

000000

मत्स्य उद्योजकांची रविवारी बैठक

बुलडाणा, दि. 27 : मत्स्यव्यवसायाबाबत माहिती देण्यासाठी रविवार, दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजता व्हीडीओ कॉन्फरंस घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यपालक, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाकरिता राबविण्यात येत आहे मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा शाश्वत विकास व जबाबदार विकासाद्वारे नीलक्रांती घडवून आणणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मच्छिमार, मत्स्यपालक आणि इतरामध्ये विभागाच्या उपक्रमांबाबत माहिती पोहचविणे आणि जनजागृती करणे या हेतूने सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, बसस्टँडसमोर, बुलढाणा आणि शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर  येथे व्हीडीओ कॉन्फरंस आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यपालक, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु. ग. गावडे यांनी केले आहे.

00000

Wednesday 26 April 2023

DIO BULDANA NEWS 26.04.2023

 किसान सन्मान निधीच्या लाभासाठी ई-केवायसी बंधनकारक

*भूमी अभिलेख नोंदी, बँक खाती आधारला जोडावी लागणार

बुलडाणा, दि. 26 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील 14व्या हप्त्याचा लाभ मिळविण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थींच्या भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे, लाभार्थींची बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, ई-केवायसी प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये यांना दोन हजार रूपये प्रती हप्त्याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रूपये प्रती वर्षी थेट लाभ बँक खात्यात जमा करण्यात येतो. या योजनेच्या सुरूवातीपासून एकूण 13 हप्त्यात राज्यातील 110.39 लाख लाभार्थींना रक्कम 23,607.94 कोटी लाभ दिला आहे. केंद्र शासन स्तरावर योजनेच्या एप्रिल, 2023 ते जुलै 2023 कालावधीतील 14व्या हप्त्याचे नियोजन सुरू आहे. माहे मे 2023मध्ये या हप्त्याचा लाभ दिला जाईल.

भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थींनी संबंधित तहसिलदार तथा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याकडून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण या दोन्ही बाबींची पुर्तता लाभार्थीने स्वत: करायची आहे. लाभार्थीने स्वत:च्या सोईनुसार ई-केवायसी पडताळणीसाठी pmkisan.gov.in या पीएम किसान पोर्टलवर लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करावी. तसेच बँकेत समक्ष जाऊन बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे. या तीनही बाबींची पूर्तता केलेल्या पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचा लाभ अदा करणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. 

पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी हे राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र राहतील. त्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे अतिरिक्त सहा हजार रूपये वार्षिक देय राहील. पीएम किसान योजनेच्या 14व्या आणि पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील लाभार्थ्यांनी आजअखेर पूर्तता केली नसलेल्यांनी तीनही बाबींची दि. 30 एप्रिल 2023 पूर्वी पूर्तता करावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

00000






एकाच दिवशी नऊ अवैध दारूचे गुन्हे नोंद

*एक लाखाचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा, दि. 26 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी, दि. 25 एप्रिल रोजी अवैध हातभट्टीवर कार्यवाही केली. या विशेष मोहिमेत ९ वारस गुन्हे नोंदवून ९ आरोपींसह हातभट्टी ७९ लिटर, रसायन २ हजार ८८९ लिटर, देशी मद्य ४४.८, विदेशी मद्य २.८८, असा १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई निरीक्षक के. आर. पाटील, आर. आर. उरकुडे, दुय्यम निरीक्षक आर. एम. माकोडे, ए. आर. आडळकर, जवान अमोल तिवाने, अमोल सोळंकी, पी. एच. पिंपळे, नितीन सोळंके, मोहन जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख यांनी सहभाग घेतला.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२३ ते दि. २६ एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण ९४ गुन्हे नोंदवून ९० वारस गुन्ह्यासह ८९ आरोपी आणि ५ वाहनासह बिअर ८७ लिटर, देशी मद्य ३८५ लिटर, हातभट्टी ७५० लिटर, विदेशी मद्य १३७ लिटर आणि सडवा १८ हजार ४१ लिटर असा ११ लाख ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध मद्य विक्री करणारे संतोष दगडु भोसले यांच्या मालकीच्या हॉटेल वैभव, मौजे रायपूर याच्यावर, तसेच अवैध मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर म. दा. का. १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञाप्तीधारक यांच्या अनुज्ञाप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास त्यांची अनुज्ञाप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

00000



जागतिक वसुंधरा दिवस साजरा

बुलडाणा, दि. 26 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने संस्थेचे संचालक संदीप पोटे आणि कर्मचारी, तसेच ब्युटीपार्लर प्रशिक्षणार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी वसुंधरेचे संरक्षण करणे महत्वाचे असल्याबद्दल विध्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

00000

राष्ट्रीय लोकअदालतीचे रविवारी आयोजन

बुलडाणा, दि. 11 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा आणि तालुकास्तरावर रविवार, दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

तडजोड करुन खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस कमी होवून एकमेकांबद्दल प्रेमाची सद्‌भावना निर्माण होते. याबाबीचा विचार करुन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, तसेच पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये दाखल किंवा दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे निकाली काढावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष विजय सावळे यांनी केले आहे.

०००००

उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांनी संरक्षण करावे

* जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उष्णतेची लाट आणि उष्माघातापासून बचावासाठी तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपड्यांचा वापर करावा, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबुपाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे ठंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याचे वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

उष्ण कालावधीत लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे

00000000

लेख

लघु पौष्टीक तृणधान्ये : ओळख आणि महत्व

          कृषि क्षेत्राच्या विकास कार्यात लघु तृणधान्य पिके (राळावरईबर्टीनाचणीकोडोबाजरी व इतर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षितच राहिली होतीपरंतुया पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सद्यपरिस्थितीत उत्तम आरोग्यासाठी आणि आहार विषयक जनजागृतीमुळे या पिकांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेया सर्व गोष्टींचा विचार करता भारत सरकारने 13 एप्रिल 2018 च्या राजपत्राद्वारे राळानाचणीबर्टीकोडोबाजरी आणि ज्वारी इपिकांचा त्याच्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे पौष्टिक तृणधान्य (Nutri Cereals) यावर्गात समावेश करुन अधिसूचित केले आहे.

          येणाऱ्या काळात सर्व जनतेला जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच आरोग्य संपन्नपौष्टिक शाकाहार उत्तमरित्या मिळण्याकरिता या दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख आणि महत्व घेऊन सुधारित पध्दतीने लागवड करुन उत्पादकता वाढवणे ही काळाची गरज आहे.

1) वरई (Little Millet):

          वरई यापिकास वरि / कुटकी या नावाने सुध्दा ओळखले जातेपौष्टिक तृणधान्य गटातील इतर पिकांच्या मानाने यापिकाचे धान्य सर्वात लहान आकाराचे असल्यामुळे याला इंग्रजीमध्ये लिटील मिलेट (Little Millet) असे म्हणतात.

          भारतातील पारंपारिक पिकातील हे एक पीक असून भारतात बऱ्याच ठिकाणी याची लागवड होतेमहाराष्ट्रात या पिकाची लागवड अमरावती (चिखलदराधारणी), अहमदनगर (अकोले), नाशिकनंदुरबारपुणेकोल्हापूरसातारापालघररायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इभागात केली जातेदुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे वरई हे प्रमुख अन्न आहेउपवासाकरिताही याचा प्रमुख अन्न म्हणून भाताच्या स्वरुपात सेवन करतात.

          वरई हे एकदल प्रकारातील पीक असून याची उंची वाणानुसार 30 ते 150 सें.मीपर्यंत वाढतेपाने गवताच्या पात्याप्रमाणे असून मऊ किंवा त्यावरती लव असतेखोडकाडीसारखे बारीक व सरळ वाढणारे आहेभात पिकासारखे फुले येत असून 4 ते 2सें.मीलांबीच्या लोंब्या येतातदुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे पिक असून जास्त पर्जन्यमान प्रदेशात चांगले उत्पन्न मिळते.

आहारविषयक महत्व :

या पिकाला एक उपवासाचे धार्मिक महत्व असल्यामुळे या  पिकात पौष्टिक घटक भरपूर असून सुध्दा याचा समावेश दैनंदिन आहारातन होता फक्त उपवासाच्या दिवशीच होत आहे.

घटक / पीक

प्रथिने (ग्र.)

कर्बोदके (ग्र.)

तंतुमय पदार्थ (ग्र.)

स्निग्धांश (ग्र.)

खनिजद्रव्ये (ग्र.)

फॉलिक आम्ल (मि.ग्र.)

लोह

मि. (ग्र.)

वरई

12.5

70.4

7.2

3.1

1.5

36.20

5.0

भात

6.8

77.4

0.5

0.5

0.6

9.32

4.0

वरई धान्यातील पोषक घटकांचा विचार करता आपल्या दैनंदिन आहारातील गहू आणि भातापेक्षा वरईचा आहारात समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच आवश्यक आहे.

·        बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारावर उपयुक्त.

·        तंतुमय पदार्थामुळे मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक.

·        शरीरातील साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका.

·        अबाल वृद्धांकरिता पौष्टिक अन्न.

·        स्त्रियांमधील अनियमित मासिक पाळीच्या समस्यावर उपयुक्त.

·        वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या वाढविण्या करिता उपयोगी.

·        ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुटेन अलर्जी असलेल्या लोकांसाठी एक पर्यायी धान्य आहे.

·        या पिकाच्या धान्याचा ग्लायसिमिक  इन्डेक्स कमी असल्यामुळे मधुमेहीरुग्नासाठी याचे सेवन लाभदायक आहे.

अनुकुल हवामान : वार्षिक पर्जन्यमान – 2500 मी.मीसमुद्रसपाटीपासून 2100 मीउंचीपर्यंत प्रदेशात होतातवाढीसाठी पोषक तापमान – 23 ते 270c.

जमिन : हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याचीअतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पन्न मिळत नाहीउताराच्या जमिनीमध्ये लागवड करतांना अशा जमिनीमध्ये मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावीशेवटच्या कुळवाच्या पाळीपुर्वी हेक्टरी 15-20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.

लागवड : वरई पीकाची लागवड पेरणी-टोकणरोप लागण पध्दतीने करतातया पिकांची रोपलागण पध्दत पारंपारिक आणि प्रचलित आहेयासाठी प्रथम रोपवाटीका गादी वाफ्यावर तयार करुन 20-25 दिवसांची रोपे पुर्नलागवडीसाठी वापरतातदोन ओळीत 22.5 सें.मीतर दोन रोपांमध्ये 10 सें.मीअंतर ठेवून रोपण करावेयासाठी 4 ते 5 किलो बियाणे वापरावे.

रोपवाटीका : 1 एकर क्षेत्र लागवडीकरिता 2 ते 3 गुंठे, 8 ते 10 सें.मीउंचउतारानुसार लांबी ठेवावीगादीवाफ्यावर किलो शेणखत प्रति चौ.मीप्रमाणात बी पेरणीपुर्वी थर द्यावादोन ओळीत 7-8 सें.मीअंतर ठेऊन 1-2 सेंमी खोलीवर बियाणे गादीवाफ्यावर पेरावेप्रतिगुंठा 1 किलो युरिया द्यावा.

बीजप्रक्रिया : बियाणे पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3-4 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावे. ॲझेचिरियम ब्रासिलेब्स आणि ॲस्पर जिलस अवोमोरीया जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात केल्यास उत्पन्नात 10-15% वाढ होते.

पाणी व्यवस्थापन : लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20-25 दिवसांनी पहिले पाणी आणि 40-45 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

आंतर मशागत : तणामुळे उत्पन्नात 25% पर्यंत घट होतेती टाळण्यासाठी लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करुन पीक तणमुक्त ठेवावेआवश्यकतेनुसार तणनाशक वापरावेयासाठी पेरणीपूर्व आयसोप्रोल्युरॉन 1.0 किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी अथवा पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2, 4 डीसोडीयम क्षार (80%) क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी याप्रमाणात फवारणी करुन पिक तणमुक्त ठेवावे.

खत व्यवस्थापन : 40:20:2किलोनत्रस्फुरद प्रति हेक्टरी पैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद लागवडीच्या वेळेस द्यावे.

आंतरपीक : या पीकामध्ये आंतर पीक म्हणून उडीदतीळसोयाबीनतुर ही पीके 2 : 1 या प्रमाणात घेता येतात.

पिक संरक्षण : लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव होतोतो रोखण्यासाठी क्वीनॉलफॉस 2 मि.लीप्रति लिपाणी याप्रमाणात फवारणी करावी.

सुधारित वाण : फुले एकादशी – सरासरी धान्य उत्पादन 12 ते 14 क्विं/हेकडबा उत्पादन 20-25 क्विं/हे., कालावधी 120-130 दिवस.

काढणी आणि मळणी : पीक पक्व झाल्यानंतरलोंबीतील दाणे झडण्याच्या आत जमिनीलगत पिकाची कापणी करुन मळणी करावीधान्य स्वच्छ करुन उन्हात वाळवून हवेशीर ठिकाणी साठवणूक करावीकडब्याच्या पेंढ्या बांधून गुरांच्या चाऱ्यासाठी गंजी रचून ठेवावी.

 

लेखन

डॉ. दिनेश गोपीनाथ कानवडे

डॉ. चंद्रकांत पंढरीनाथ जायभाये

00000