जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा Ø अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा
बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : देशभरात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.
परंतु या दिवशी रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात हा राष्ट्रीय
मतदार दिवस शुक्रवारी (दि.२३) साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील
यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुधीर
खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, राजेद्र
पोळ, अनिल गोडगे, डॅा. जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील व जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००


Comments
Post a Comment