बंद पडलेल्या डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा पुनर्जीवित करण्याची संधी

 


बुलढाणा (जिमाका), दि. 21 : भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा या योजना नागरिकांना विमा-सुरक्षा देण्यासाठी राबविण्यात येतात. मात्र, काही विमाधारकांनी नियमित हप्ता न भरल्यामुळे त्यांच्या विमा बंद पडलेल्या आहेत. अशा बंद पडलेल्या विमा पुनर्जीवन करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून पुनर्जीवित करण्यात येणाऱ्या विमा पॉलिसींवरील दंडामध्ये सूट देण्यात येणार आहे.

डाक संचालनालय, पोस्टल जीवन विमा, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार दि. 14 जानेवारी 2026 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत विशेष पुनर्जीवन मोहिम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपली बंद पडलेली विमा पॉलिसी पुनर्जीवित करून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर गणेश आंभोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या