Monday 31 August 2020

DIO BULDANA NEWS 31.8.2020

 आदिवासी विदयार्थ्यांची एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुल प्रवेश परीक्षा रद्द

  • मागील सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :आदिवासी विदयार्थ्यांना एकलव्य रेसीडेन्शीयल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी ची परिक्षा

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. ही परिक्षा ऑनलाईन होणार होती; परंतु परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअकोला यांच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळाजिल्हा परिषदनगरपालीका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी, 6 वी, 7 वी, 8 वी  व 9 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विदयार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेतत्यांच्या मागील सत्रातील गुणाच्या आधारे विदयार्थ्यांची निवड होणार आहे.

   सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विदयार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरले आहे त्यांनी आता पाचव्या वर्गातील प्रथम सत्राचे गुणभरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहे. हाच निष्कष 7 वी, 8 वी व 9 वी रिक्त जागेवरील प्रवेशासाठीही लागु करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकदर 900 पैकी विदयार्थ्यांनी किती गुण मिळविले त्याआधारे निवड यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांच्या गुणाऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विदयार्थ्यांच्या अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला संपर्क/मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. विदयार्थ्याची जन्म तारीख

आवश्यक आहे. विदयार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन केलेली गुणपत्रेकेची प्रत png,jpeg,jpg,pdf  हया स्वरुपात असावी.) शाळेतील एकापेक्षा जास्त विदयार्थ्यांचे आवेदपत्र भरलेले असतीलतर प्रत्येक विदयार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करावे.

      आवेदनपत्र भरलेल्या सर्व विदयार्थ्यांनी किंवा संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लींकवर भरावयाचे आहे. त्याकरिता मुख्याध्यापक यांनी संबंधीत विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे गुण 900 पैकी गुण नोंदवायचे आहे. (मराठीइंग्रजीहिंदीगणितविज्ञानसमाजशास्त्रकलाक्रिडा व कार्यानुभव असे एकुण 9 विषय) वर्ग 1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्यांना देण्यात येणा-या प्रगती पुस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते. त्यामुळे सर्व संबंधीत विदयार्थ्यांचे त्यांच्या शाळेकडुन गुण प्राप्त करुन मुख्याध्यापकांनी लिंकमध्ये 15 सप्टेबर, 2020 पर्यत भरावयाचे आहेत, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळवीले आहे.                         

**********

       फिट इंडीया फ्रीडम रन मोहिमेला सुरुवात

  • राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम संपन्न

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :  क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठी यांचेहस्ते हारार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यालयातील क्रीडा अधिकारी आर.आर. धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळेविजय बोदडेसुरेशचंद्र मोरेविनोद गायकवाडकैलास डुडवाकृष्णा नरोटेगणेश डोंगरदिवे तसेच जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे कबड्डी/मैदानी/हॅण्डबॉलचे खेळाडू उपस्थित होते.

    याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्व.मेजर ध्यानचंद यांचे जिवनावर प्रकाश टाकुन माहिती दिली. तसेच क्रीडा दिनाचे औचित्य साधून फिट इंडीया फ्रीडम रन या मोहिमेचा प्रारंभ करुन ऑनलाईन विविध खेळ विषयक चर्चा सत्र सेमिनारचे आयेाजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व स्पोर्टस् झोन ऑफ मलकापुर मार्फत करण्यात आले. या चर्चा सत्रात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी टी.ए.सोर यांनी स्व.मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती विद केली. तसेच क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. नितीन बऱ्हाटे आरोग्य चिकीत्सक यांनी आरोग्य विषयक व डायट बद्दल माहिती दिली. तसेच चंद्रकांत साळुंके यांनी फिजीकल फिटनेस बद्दल माहिती दिली. सदर चर्चासत्र हे प्रा.नितीन भुजबळविजय पळसकर व स्पोर्टस् झोन ऑफ मलकापुरचे पदाधिकारी यांनी यशस्वी करण्यास मदत केली.

   तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा दिन बाबत व फिट इंडीया फ्रीडम रन मोहिमेबद्दल माहिती व दि.29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत  फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन ही चळवळ राबविण्यात येत आहे.  तुम्ही कोठेहीकधीही धावु / चालु शकता किंवा सायकलींग करु शकता या उपक्रमामागील संकल्पना आहे.  सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरुन सादर करावयाचा आहे.

  सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर www.fitindia.gov.in     https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfGpaDej3yOnzQk_0BlRbNSz48N3VtyJAbGOIxBwSV1T1R7Pg/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0  या ब्लॉगवर फॉर्म भरुन नोंदणी केल्याची नोंदीचा स्क्रीनशॉट dsportsbld@gmail.com या ई-मेल आयडीवर व 9970071172 या व्हाटस्अप मोबाईल नंबर वर अहवाल सादर करावा.  तसेच पुर्ण माहिती भरल्यानंतर आपणास ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

   तरी वरीलप्रमाणे फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थाशासकीय कार्यालयेविविध संघटनाक्रीडा संघटनाक्रीडा मंडळक्रीडाप्रेमीखेळाडूयुवक-युवतीनागरीक यांनी सहभागी होऊनकार्यक्रम संपल्या नंतरचा सविस्तर अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा dsportsbld@gmail.com या मेलवर सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

निवृत्ती वेतन धारकांनी आपली माहिती कोषागार कार्यालयाला सादर करावी

  • 30 सप्टेंबर अंतिम मुदत
  • जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन  

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन धारक, कुटूंबनिवृत्ती वेतन धारकांची माहिती निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. तरी निवृत्ती वेतन धारकांनी आपली ‍ माहिती कोषागार कार्यालयाकडे शक्य तितक्या लवकर सादर करावी. या माहितीमध्ये पुर्ण नाव, पत्ता, पीपीओ क्रमांक, पॅन कार्ड, भ्र्मणध्वनी / दूरध्वनी क्रमांक, असल्यास ई मेल आयडी आणि आधार क्रमांक आदींचा समावेश असावा. ही माहिती to.buldhana@zillamahakosh.in या ई मेलवर पाठविण्यात यावी. सदर माहिती पाठविण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2020 आहे.

  केंद्र शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गणनेमध्ये बदल केले असून नवीन कर आकारणी प्रक्रिया आणि जुनी कर आकारणी प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानुसार निवृत्तीवेतन धारकांनी आपल्याला हवी असलेली कर आकारणी प्रक्रीया निवडून जिल्हा कोषागार कार्यालयाला to.buldhana@zillamahakosh.in या ई मेलवर आपले नाव, पीपीओ क्रमांक, बँक शाखेबाबत 15 ऑक्टोंबर पर्यंत कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.     

                                                                                    ***********      

शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सादर करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीची योजना महाडीबीटी पोर्टलमध्ये अंतर्भूत आहे.  शैक्षणिक सत्र सन 2019-20 वर्षाकरीता विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क व इतर योजनेचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता कार्यान्वीत होते. महाडीबीटी प्रणालीवर सन 2019-20 या शैक्षणीक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क  व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर एकूण 934 अर्ज प्रलंबीत असल्याचे डॅशबोर्डवरून दिसत आहे.

   महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालयास भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा शुल्क व इतर योजनेचे प्रथम हप्ता शिष्यवृत्तीकरीता अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयास मंजुरीकरीता सादर करण्यासाठी 10 सप्टेंबर 2020 ही अंतिम मुदतवाढ  शासनातर्फे देण्यात येत आहे. तरी महाविद्यालय प्राचार्यांनी अर्ज तात्काळ दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, इतर योजनांचे प्रथम हप्ता शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा या कार्यालयास महाडीबीटी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्यात यावेत. शासनाकडून दिलेल्या अंतिम मुदतीनंतर प्रलंबीत अर्ज ऑटो रीजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, याची गांभीर्याने महाविद्यालयाने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनीता राठोड यांनी केले आहे.

                                                ******        

नॅशनस डिफेन्स ॲकेडमी परीक्षेकरीता नागपूरसाठी एसटी सोडणार विशेष बसेस

  • विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

     बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : नॅशनल डिफेन्स ॲकेडमी व नेव्हल ॲकेडमी परीक्षा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो वीद्यार्थी जाणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने नागपूर येथे जाणे व येणेकरीता 4 व 5 सप्टेंबर रोजी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच 6 व 7 सप्टेंबर 2020 रोजीसुद्धा परती करीता बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे- येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. संपर्कासाठी आगारांचे क्रमांक पुढीलप्रमाणे बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173.                                       

                                            ******    

कोरोना अलर्ट : प्राप्त 231 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 63 पॉझिटिव्ह

  • 48 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 294 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 231 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 63 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 162 तर रॅपिड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 231 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 2, दाल फैल 1,सिंधी कॉलनी 4, कॉटन मार्केट रोड 1, सती फैल 1,  खामगांव तालुका : घाटपुरी 1, लोणी गुरव 1,  नांदुरा तालुका : नायगांव 4, चिखली शहर : 2,  चिखली तालुका : आंधई चांधई 1, मोहाडी 1, शेलगांव जहागीर 1,  जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 2,  शेगांव शहर : मटकरी गल्ली 1, रोकडीया नगर 1, चंदूबाई प्लॉट 1, जगदंबा नगर 1, राधाकृष्ण मॉल 1,  शेगांव तालुका : कालखेड 2,  बुलडाणा शहर : 5, जिल्हा रूग्णालय 2, शिवाजी नगर 1, बुलडाणा तालुका : धाड 1,  सागवन 7,  मलकापूर शहर : सराफा बाजार 2, उपजिल्हा रूग्णालय 1, यशोधाम 2, गौरक्षण प्लॉट 1, पारपेठ 2,  मलकापूर तालुका : अनुराबाद 1,सिं. राजा तालुका : दे. कोळ 1, साखरखेर्डा 1,  मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : उटी 1,  सिं. राजा शहर : 1,     संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 63  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 48 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, संग्रामपूर तालुका : वसाडी 1, शेगांव शहर : जानोरी रोड 1, लखपती गल्ली 1, नांदुरा तालुका : वसाडी बु 3, नायगांव 4,  नांदुरा शहर : सिंधी कॅम्प 1,मोताळा तालुका : गोतमारा 8, दे. राजा तालुका : अंभोरा 1, असोला 2, दिग्रस 13,  दे. राजा शहर : 5, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1.     

   तसेच आजपर्यंत 17776 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2171 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2171 आहे. 

  आज रोजी 1109 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 17776 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2171 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 915 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*

Saturday 29 August 2020

DIO BULDANA NEWS 29.8.2020

 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची प्रलंबित कामे मोहिम राबवून पुर्ण करा

-         कृषी मंत्री दादाजी भुसे

  • पीएम किसान योजनेत आणखी लाभार्थी शेतकरी वाढवा
  • नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे
  • शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था करावी
  • ग्रामपंचायत पातळीवर कृषि विषयक समिती स्थापन करणार
  • तालुका पातळीपर रोप वाटीका तयार करणार

बुलडाणा,(जिमाका) दि.29: शेतकऱ्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी, आर्थिक पाठबळ देण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीचे काम होत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या कल्याणाचे काम प्रभावीपणे होवू शकते. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. या योजनेतंर्गत प्रलंबित असलेली सर्व कामे विभागाने मोहिम राबवून पुर्ण करावी, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज  दिल्या. ‍

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज कृषी विषयक योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेतना ते बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, आमदार सर्वश्री डॉ संजय रायमूलकर, संजय गायकवाड,  राजेश एकडे, जिल्हाधिकारी षण्मुखराजन, तसेच सभागृहात माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, कृउआस सभापती जालींदर बुधवत आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

   प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचे सांगत कृषी मंत्री म्हणाले, या योजनेचा लाभ न मिळालेल्या किंवा तांत्रिक अडचणीत असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा. त्यासाठी एक विशीष्ट ड्राईव्ह राबवावा. पोकरा योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी नेमून योजनेच्या कामांचा अहवाल तयार करावा. तसेच कामांना गती द्यावी. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांचे एक खाते ‘नील’ झाले असल्यास व दुसरे खाते थकीत असल्यास बँकांनी अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. जिल्हा बँकेने कर्जमाफीचे मिळालेल्या पैशांमधून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.

 ते पुढे म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्याच्या कुटूंबातील सात बारा उताऱ्यावर नोंद असलेल्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये शेतकरी कुटूंबाला लाभ देण्यात यावा. याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. मूंग, उडीद व सोयाबीन पिकाचे सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे पुर्ण करावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी विभागाने रस्त्याच्या कडेला किंवा मोक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. ही जागा तात्पुरत्या स्वरूपात देवून उत्पादक ते थेट ग्राहक या पद्धतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. जे विकेल ते पिकेल या शासनाच्या नवीन उपक्रमानुसार पीक पद्धती ठरवावी. शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. लॉकडाऊन काळात कुणालाही अन्नधान्य, भाजीपाला व फळांची कमतरता जाणवली नाही. तसेच चढ्या भावाने विक्रीही झाली नाही. याचे सर्व श्रेय शेतकरी राजाचे आहे. तसेच कृषि विभागानेही या काळात बांधावर खत बियाणे पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, असे गौरवोद्गारही कृषि मंत्री यांनी यावेळी काढले.

  अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटीका तयार करण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले, यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे यांची रोपे स्थानि‍क स्तरावर उपलब्ध होवून शेतकऱ्यांचे पैसे, वेळ वाचणार आहे. तसेच कृषि विषयक एक समिती ग्रामपंचायत पातळीवर कार्यान्वीत करण्यात येणार आहे. समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ तयार करण्यात येणार आहे. सध्या राज्यात 3500 शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभव, ज्ञानाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कृषि विषयक ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा. आठवड्यातील 3 ते 4 दिवस गावात फिरावे, बांधावर जावे व शेतकऱ्यांना योजना, नवीन माहिती, उपक्रम आदींची माहिती द्यावी.  

  यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, पोकरा योजनेतील कामे गांभीर्याने पुर्ण करावी. सकारात्मकतेने कामे करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा. या योजनेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी. कृउबास सभापती जालींदर बुधवत यांनी बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय उभारण्याची मागणी केली. आमदार सर्वश्री संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे यांनी यावेळी विविध मागण्या करीत आपल्या भागातील प्रश्न मांडले. बैठकीत जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सादरीकरण केले. पोकरा योजनेविषयी अधिकची माहिती मुंबई येथील अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीचे आभार प्रदर्शन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी, संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                    *************    

 


Friday 28 August 2020

DIO BULDANA NEWS 28.8.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 536 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 105 पॉझिटिव्ह

  • 83 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 641 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 536 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 105 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 94 व रॅपिड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 444 तर रॅपिड टेस्टमधील 92 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 536 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 4, पोलीस वसाहत 1, तहसील कार्यालय 1, शामल कॉलनी 2, सुदर्शन नगर 1, नगर परिषद जवळ 7, अमृत नगर 1, वाडी 2, आठवडी बाजार 1, रेखा प्लॉट 2,    खामगांव तालुका : अटाळी 1, निमखेड 1,  चिखली तालुका : सातगांव भुसारी 1, किन्ही सवडत 1, चांधई 2, कारखेड 1, दहीगांव 1, सोमठाणा 1,  चिखली शहर : 5, खामगांव रोड 1, सिं. राजा तालुका : सोयंदेव 1, उमरद 2, किनगांव राजा 2, वाघाळा 2, सिं. राजा शहर : 1,   दे. राजा तालुका : दे. मही 1, धोत्रा नंदई 1, दे. राजा शहर : 3, बुलडाणा शहर : 10, विश्वास नगर 1, इकबाल नगर 1, वानखडे ले आऊट 3, विठ्ठलवाडी 1,  बुलडाणा तालुका : कासारखेड 1, सव 1, जागदरी 1,   मेहकर तालुका : जायगांव 4, बरटाळा 1, जानेफळ 1, डोणगांव 13, मेहकर शहर : 2,  मलकापूर शहर :2,  संत गजानन नगर 1, जळगांव जामोद शहर : 3, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : भोनगांव 1, माटरगांव 1, नांदुरा शहर : 2, भीमनगर 1,  मोताळा तालुका : खेर्डी 2, मूळ पत्ता वडाळा ता. जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 105  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे  उपचारा दरम्यान बुलडाणा येथील 82 वर्षीय पुरूष  रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 83 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार शहर : 1, खामगांव शहर  : 1,  इंदिरानगर 1, गांधी चौक 3, जगदंबारोड 1, सती फैल 2, रेखा प्लॉट 3, शिवाजी नगर 1, वनारे ले आऊट 2, बालाजी मंदीराजवळ 3, शुक्ला ले आऊट 4, सुटाळा 1, जोशी नगर 1, घाटपुरी नाका 1,    दे. राजा शहर : 13, माळीपुरा 1,  दे. राजा तालुका : बोराखेडी बावरा 11, दिग्रस 3, बोराखेडी 1,   मोताळा तालुका : खरबडी 1, नांदुरा शहर : विठ्ठल मंदीराजवळ 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 3, हिवरखेड 2,  मलकापूर शहर : 1, राधाकृष्ण अपार्टमेंट 4, मंगल गेट 1,  मलकापूर तालुका : वजिराबाद 1, दाताळा 1,  बुलडाणा शहर : 1, परदेशीपुरा 1, राम मंदीराजवळ 1, गाडगे नगर 1,  चिखली तालुका : डोंगरशेवली 1, हातणी 1,  मेहकर शहर : 3, चिखली शहर : 1, संभाजी नगर 1, गांधी नगर 1, जळगांव जामोद तालुका : निमखेड 2.      

   तसेच आजपर्यंत 16955 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2051 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2051 आहे. 

  आज रोजी 768 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 16599 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2911 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2051 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 815 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 45 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************

 

DIO BULDANA NEWS 28.8.2020

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • खेळविषयक वेबीनारचे आयोजनही होणार
  • 2 ऑक्टोंबर पर्यंत ‘फिट इंडिया फ्रीडम रन' उपक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याचे दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगर) यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  त्याप्रमाणे जिल्‍ह्यात विविध क्रीडा दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    क्रीडा दिनाचे औचित्य साधुन ऑनलाईन विविध खेळ विषयक चर्चासत्र , वेबीनारही आयोजीत करण्यात येणार आहे.  तसेच कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  त्यामुळे आरोग्य विभागाशी संपर्क साधुन सामाजिक अंतर राखुन रक्तदान शिबीरांचे आयोजन करणे, फिटनेसबाबत आरोग्य तपासणी करणे, लोकांमध्ये रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी (इम्युनिटी) जागृकता निर्माण करणे, शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण पाहणेकरीता, Oxymeter ने तपासणी करणे व इत्यादींची माहिती पटवुन देणे.  केंद्र शासन / राज्य शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक सामाजिक अंतर राखुन सर्व खबरदारी व मार्गदर्शक सुचना पाळत कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात येणार आहे.

      केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेऊन, फिट इंडिया फ्रीडम रन हा नविन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.  नियमित व्यायामाकरीता प्रोत्साहीत करण्यासाठी सर्वांना लठ्ठपणा, आळस, चिंता, आजार इत्यादी पासुन मुक्त होण्यासाठी व मदत करण्यासाठी  फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन ही चळवळ दि.29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे.  तुम्ही कोठेही, कधीही धावु / चालु शकता किंवा सायकलींग करु शकता या उपक्रमामागील संकल्पना आहे. 

   स्वयंचलीतपणे किंवा कोणत्याही ट्रॅकींग ॲप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या / चाललेल्या / सायकलींग अंतराचा मागोवा घेता येणार आहे किंवा ॲप वापर शक्य नसल्यास क्रीया पुर्ण झाल्यानंतरचा फोटो यापैकी एक अपलोड करता येईल. सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरुन सादर करावयाचा आहे. 

     सर्वांनी धावने / चालने / सायकलींग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर www.fitindia.gov.in    https:/ /docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfGpaDej3yOnzQk_0BlRbNSz48N3VtyJAbGOIxBwSV1T1R7Pg/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0  या ब्लॉगवर फॉर्म भरुन नोंदणी केल्याची नोंदीचा स्क्रीनशॉट  dsportsbld@gmail.com या ई-मेल आयडीवर व 9970071172 या व्हाटस्अप मोबाईल नंबर वर अहवाल सादर करावा. तसेच पुर्ण माहिती भरल्यानंतर आपणास ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. अडचणींसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांचेशी मोबाईल क्रमांक 9970071172 संपर्क साधावा. ज्यांना क्रीडा दिन रोजी या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही अशा सर्वांना दि.29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत  आपल्या सोईच्या वेळेनुसार सहभागी होता येणार आहे.

  तरी वरीलप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा दिन व फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, विविध संघटना, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, क्रीडाप्रेमी, खेळाडू, युवक-युवती, नागरीक यांनी सहभागी होऊन, कार्यक्रम संपल्यानंतरचा सविस्तर अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा  dsportsbld@gmail.com या मेलवर सादर करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

                                                            ******

 

गणपती विसर्जन घरीच करावे; गर्दीत जाणे टाळा

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जागतिक कोविड 19 या साथरोगाचे प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 पर्यंत गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने, घरच्या घरी साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांना परवानगी देण्यात येवू नये, असा निर्णय जिल्हा शांतता समितीच्या 20 जुलै रोजी आयोजित बैठकीत घेण्यात आला. तसेच श्रींच्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येवू नये असे निर्देशही देण्यात आले. तरी नागरीकांनी 1 सप्टेंबर रोजी होणारे श्रींचे विसर्जन घरच्या घरी करावे. कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 श्रीगणेश मूर्ती शाळू मातीची किंवा पर्यावरण पूरक असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा पुढील वर्षी भाद्रपद महिन्यात विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनावेळी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटूंबीयांचे कोरोना साथरोगापासून रक्षण करता येईल. श्रींच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी सुरक्षीततेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये. संपूर्ण उत्सवादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल लावणे व वारंवार स्वच्छ हात धुणे या नियमांचे पालन करावे. तसेच विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी कमीत कमी नागरिकांनी थांबण्याचे निर्देश असून ते पाळावे, असे आवाहनही अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        *******

कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता अकोला येथून शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, दु. 3.30 वाजता बुलडाणा येथे आगमन, दु. 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कृषि विषयक संबंधीत विषयांची जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती, बुलडाणा येथे क्षेत्रीय भेटी सायं 6 वा बुलडाणा येथून जळगांव मार्गे मालेगांव जि. नाशिककडे प्रयाण करतील.


Thursday 27 August 2020

DIO BULDANA CORONA ALERT 27.8.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 401 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 62 पॉझिटिव्ह

  • 27 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 463 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 401 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपिड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 363 तर रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 401 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : 4, विकमशी चौक 3,  अभय नगर 1, कदमापूर ता. खामगांव : 1,  शेगांव : रोकडीया नगर 1, मोदी नगर 1, धनगर नगर 1, व्यंकटेशन नगर 5, धानुका 1, शासकीय रूग्णालय 1, मंगलम नगर 1, एसबीआय कॉलनी 1, माळीपुरा 1,   चिंचखेड ता. शेगांव : 1,तिव्हाण ता. शेगांव : 1, सागोन ता. शेगांव : 1,  मोताळा :7, तपोवन ता. मोताळा : 3, दे. राजा : 4,  कारखेडा ता. चिखली : 1, किन्ही सवडत ता. चिखली : 1, जांभोरा ता. चिखली : 1,   कि. राजा. सिं. राजा : 1, वाघाळा ता सिं. राजा : 2, लोणार : 2,  बिबी ता. लोणार : 2, बुलडाणा : 4, वावरे ले आऊट 2, धाड ता. बुलडाणा : 1,  सावरगांव ता. बुलडाणा : 1,सागवन ता. बुलडाणा : 1, मेहकर : 2, जानेफळ ता. मेहकर : 1, मलकापूर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 62  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे  उपचारा दरम्यान बुलडाणा येथील 82 वर्षीय पुरूष व सागवन ता. बुलडाणा येथील 58 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आजपर्यंत सर्वात आज 27 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 5, नगर परिषद मागे 1, जुना गांव 1,   साखरखेर्डा ता. सिं.राजा : 2, खामगांव : जुना फैल 1, गोपाल नगर 1, सराफा 1, वामन नगर 1, समता कॉलनी 1, देशमुख प्लॉट 2, शंकर नगर 2,  शेगांव : देशमुखपुरा 1, माळीपुरा 1,  जलंब ता. शेगांव : 2, धा. बढे ता. मोताळा : 1, चिखली : 1, मेहकर : 1, निमखेड ता. जळगांव जामोद : 1, किन्ही सवडत ता. चिखली : 1,

   तसेच आजपर्यंत 16419 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1968 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1968 आहे. 

  आज रोजी 910 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 16419 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2806 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1968 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 794 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 44 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************

 

Tuesday 25 August 2020

DIO BULDANA NEWS 25.8.2020

 सुट्टी असल्याने आजचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

बुलडाणा,(जिमाका) दि.25: जिल्हा सामान्य रूग्णालय येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. दर महिन्याच्या चौथ्‌या बुधवारी तपासणी होत असते. मात्र या बुधवारला 26 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ गौरी पुजन निमित्ताने जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 26 ऑगस्ट रोजी होणारे अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान नाक घसा संबंधीत दिव्यांग तपासणी बाबतचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील सदर अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण व कान नाक घसा संबंधीत दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

********

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.25: दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगसाठी मोफत्‍ प्रशिक्षण देते. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची शासन मान्यता आहे. तसेच एमएस सीआयटी संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासनाची मान्यतासुद्धा आहे. या संस्थेला अखिल स्तरावरील फिक्की अवार्ड प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत्‍ प्रवेश देणे सुरू आहे. संस्थेत सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस ऑफीस, मोटार अँड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, एमएससीआयटी आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. यासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असून केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

   संस्थेत प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत्‍ प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, उज्ज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायाकरीता बीज भांडवल योजना आदी सोयी सवलती आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज जि. सांगली पिनकोड 416410 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत्‍ मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पुर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झालयानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येणार आहे. तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 0233-2222908, 7972007456, 9922577561, 9975375557 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक यांनी केले आहे.

                                                *****

 

 

 

 

 

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 321 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह

  • आजपर्यंत सर्वात जास्त 112 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 375 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 321 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 52 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 309 तर रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 321 अहवाल निगेटीव्ह आहेत.  

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. मही ता. दे. राजा : 1, दे. राजा : 7,  मोताळा : 1, धा. बढे ता. मोताळा : 1,  मेहकर : रामनगर 4, मलकापूर : 4,  उपजिल्हा रूग्णालय 2,  भालगांव ता. चिखली : 4, काटोडा ता. चिखली 4, मेरा बु ता. चिखली : 1, बुलडाणा : 4, जोहर नगर 1, वानखेडे ले आऊट 7,  धामणगांव ता. बुलडाणा : 4, मासरूळ ता. बुलडाणा : 1, खामगांव : 2, बाळापूर फैल 1, सती फैल 2, वाडी 1, किसान नगर 1, नटराज गार्डनजवळ 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 54  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आजपर्यंत सर्वात जास्त 112 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा :भगवान कॉलनी 7, भक्ती निवास जवळ 1,  शनिवार पेठ 2, शिवाजी नगर 1, बस स्थानकाजवळ 2, सिवील कॉलनी 1,  असोला जहागीर ता. दे. राजा : 2, असोला ता. दे. राजा : 14,  खामगांव : 1, सुटाळा 1, वामन नगर 1, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ 7, आठवडी बाजार 1, देशमुख प्लॉट 2, रेखा प्लॉट 1, शेगांव रोड 1, शिवाजी नगर 1, विनायक नगर 1,    मलकापूर : 1,  सिंधी कॉलनी 1, गौलखेड 1,  उपजिल्हा रूग्णालय 2, दाताळा ता. मलकापूर : 2,  टाकळी ता. बुलडाणा : 1, सागवन ता. बुलडाणा : 1, हतेडी ता. बुलडाणा : 4,  बुलडाणा : 1,  तेलगू नगर 1, इंदिरा नगर 1,  दिवठाणा ता. चिखली : 1, अमडापूर ता. चिखली : 3, अंचरवाडी ता. चिखली : 5,  चिखली : 4, सवणा ता. चिखली : 2, शेगांव : ब्राम्हणपूर 2, भैरव चौक 1, ब्राम्हणवाडा 2, मोदी नगर 1, ओम नगर 1, माळीपुरा 2,    वारुडी ता. सिं. राजा : 1, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 4, जामोद ता. जळगांव जामोद : 1,  बिबी ता. लोणार : 1,  अंजनी ता. मेहकर : 1, गवंढळा ता. मेहकर : 1, नागापूर ता. मेहकर : 1,  जानेफळ ता. मेहकर : 4, मेहकर : 4,   नांदुरा : नवाबपुरा 5, खैवाडी 2.

   तसेच आजपर्यंत 15633 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1895 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1895 आहे. 

  आज रोजी 1174 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15633 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2689 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1895 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 752 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************

 


--

Monday 24 August 2020

DIO BULDANA NEWS 24.8.2020

 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

  • 28 ऑगस्ट 2020 पर्यंत अंतिम मुदत
  • अर्ज swfs.applications@gmail.com ईमेलवर सादर करावा

बुलडाणा,(जिमाका) दि.24: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परिपूर्ण अर्ज भरून व आवश्यक कागदपत्रांसह 28 ऑगस्ट 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकृतीसाठी स्कॅन कॉपी swfs.applications@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावा. जे विद्यार्थी ई मेल द्वारे अर्ज पाठवतील त्यांनी ई मेल द्वारे पाठविलेल्या अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च रोड, पुणे 41100 येथे सादर करावी.

     योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील असावा, राज्याचा रहीवासी असावा, पदव्युत्तर अभ्यास क्रमासाठी  35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असणार आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये व लंडन स्कुल ऑफ इकॉनिमिक्स  मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे, मात्र द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत दोन वर्ष कालावधीचाच एम.बी.ए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेत स्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे विद्यार्थीदेखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास  पात्र असतील. परदेशातील शिक्षणसंस्था ही जागतिक क्रमवारीत 300 च्या आत असावी. अटी व शर्ती या सविस्तर जाहीरातीप्रमाणे व शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.

योजनेचा असा मिळणार लाभ

विद्यापीठाने प्रमाणीत केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम, तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती योजनेतंर्गत लागू करण्यात आलेले इतर शुल्क, आरोग्य विमा, व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्ती धारकासाठी अनुज्ञेय असणार आहेत. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी 15,400 युएस डॉलर, तर इंग्लडसाठी 9900 जी बी पौंड इतका अदा करण्यात येतो. विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर भारतात परत येण्याससाठी कमीत कमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा इकॉनॉमी क्लास विमान प्रवास दर दिला जाणार आहे. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी युएसए व इतर देशासाठी 1500 युएस डॉलर व इंग्लडकरीता 1100 जी.बी पौंड इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये पुस्तके, अभ्यास दौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

     सध्या कोविड – 19 या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणतेही कारण न देता सदर योजनेची प्रक्रिया रद्द करणे, प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलणे यासह योजने / निवड, अंमलबजावणीबाबतचे सर्व अधिकार शासन स्वत:कडे राखून ठेवत आहे. यावर्षी 11 मे 2020 च्या जाहीरातीचे अनुषंगाने ज्या विद्यार्थ्याने अर्ज केलेले  आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.

 

****

कोरोना अलर्ट : प्राप्त 165 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 55 पॉझिटिव्ह

  • 95 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 220 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 165 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 165 अहवालांचा समावेश आहे.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 4, परदेशीपुरा 1,  वार्ड क्रमांक दोन 2, पैनगंगा अपार्टमेंट 8, हाजी मलंग दर्गाजवळ 1, धाड ता. बुलडाणा : 1,  नांदुरा : 2, संकल्प कॉलनी 4, सिनेमा रोड 1, नवाबपूरा 1, कृष्णा नगर 1, रसलपुर ता. नांदुरा : 1,  शेगांव :  गजानन सोसायटी 1, जुना चिंचोली रोड 1, जळगांव जामोद : 1, दुधलगांव ता. मलकापूर : 3, तपोवन ता. मोताळा : 13, धा.बढे ता. मोताळा : 1, बोराखेडी ता. मोताळा : 1,  चिखली : 3,  मूळ पत्ता पातोंडा जि. अकोला : 1, आलेगांव ता. पातूर जि. अकोला : 1, अकोलखेड ता. अकोट जि. अकोला : 1, वाकी जि. अकोला : 1,  

 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 95 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली :13,  गांधीनगर 1, कालिंका मंदीराजवळ 2, पोलीस स्टेशनजवळ 2, सरस्वती नगर 1,  बागवानपुरा 1,  जळगांव जामोद : 9, दे. राजा : 7, चांदेश्वरी मंदीराजवळ 1, अहिंसा नगर 1, दुर्गापुरा 1, शनिवार पेठ 1, बालाजी फरस 3, असोला जहागीर ता. दे. राजा : 3,   शेगांव : दसरा नगर 1, बालाजी फैल 1, आदर्श नगर 3, उपजिल्हा रूग्णालय 1,   किनगांव राजा ता. सिं. राजा : 1, सिंदखेड राजा : 1, आंबेवाडी ता. सिं. राजा : 1, शेंदुर्जन ता. सिं. राजा : 1,    मलकापूर : पंत नगर 1, खामगांव : राठी प्लॉट 1, रॅलीस प्लॉट 5, भुसावल चौक 2,  पिं. राजा ता. खामगांव : 2, जानेफळ ता. मेहकर : 4, मेहकर : 1, डोणगांव रोड 2, पिं. काळे ता. जळगांव जामोद : 11, सुलतानपूर ता. लोणार : 7, लोणार : 2, अळसणा ता. शेगांव : 1,  

   तसेच आजपर्यंत 15312 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1783 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1783 आहे. 

  आज रोजी 1162 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15312 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2635 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1783 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 810 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************


Sunday 23 August 2020

DIO BULDANA NEWS 23.8.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 113 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह

  • 54 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.23: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 136 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 113 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 21 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 99 तर रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 113 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दसरखेड : 1, बुलडाणा : 3, चिखली : 1, भालगांव ता. चिखली : 1, लोणार : 2, बिबी. ता लोणार : 1,  दे. राजा : 9, शेगांव : सदगुरू नगर 1, गजानन सोसायटी 4, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 23  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज बिबी ता. लोणार येथील 38 वर्षीय पुरूष व्यक्तीचा उपचारादम्यान आज मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 54 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2,  मच्छी ले आऊट 1, सरस्वती नगर 2, लांडे ले आऊट 1, संगम चौक 1, युनीयन बँक अपार्टमेंट 1, जुना गाव 2, सुवर्ण नगर 3, जिल्हा न्यायालय 2, शासकीय सामान्य रूग्णालय 1, टिळकवाडी 1,  धाड ता. बुलडाणा : 1,   खरबडी ता. मोताळा : 3, मोताळा : 1, ग्रामीण रूग्णालय 3, खामगांव : इंदिरा नगर 1, देशमुख प्लॉट 2, सिंधी कॉलनी 2, गोतमारा ता. मोताळा : 2, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 3, शेगांव : भैरव चौक 1, सोनेवाडी ता. चिखली : 1, मलकापूर : 1, पिं. काळे ता. जळगांव जामोद : 9, जानेफळ ता. मेहकर : 1, दुसरबीड ता. सिं. राजा : 1, बोराखेडी ता. मोताळा : 1, धा. बढे ता. मोताळा : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, मावंदीर ता. संग्रामपूर : 1, लोणार : 1.       

   तसेच आजपर्यंत 15147 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1688 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1688 आहे. 

  आज रोजी 587 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15147 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2580 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1688 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 850 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************

                                   ज्ञानगंगा व पलढग मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

  • अंढेरा लघु पाटबंधारे प्रकल्पही भरला
  • नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा,(जिमाका) दि.23: जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा व मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरलेआहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. पलढग प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत साठा 7.51 दलघमी असून पुर्ण संचय पातळी 403.20 मीटर आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा प्रकल्पाचा संकल्पीत साठा 33.93 दलघमी आहे, तर पुर्ण संचय पातळी 404.90 मीटर आहे. हा प्रकल्पही पुर्ण क्षमतेना भरला असून सांडवा प्रवाहीत झाला आहे. तसेच दे. राजा तालुक्यातील अंढेरा हा लघु पाटबंधारे प्रकल्प आज सकाळी 6 वाजता 100 टक्के भरला आहे.

    सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत येत असलेला ज्ञानगंगा 100 टक्के भरला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पुर्ण भरून सांडवा प्रवाहीत होवू शकतो. हीच परिस्थिती पलढग प्रकल्पाची सुद्धा आहे. त्यामुळे नदीला धरणाचे खाली पूर येण्याची शक्यता आहे. ज्ञानगंगा नदीकाठावरील 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, सारोळा, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, पिं. राजा, घाणेगांव, ज्ञानगंगापूर, दौडवाडा, नांदुरा तालुक्यातील वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, भुईसिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा ईसापूर, दादगांव आणि शेगांव तालुक्यातील डोलारखेड व वरध गावांचा समावेश आहे. असे शाखा अभियंता, सिंचन शाखा, तांदुळवाडी यांनी कळविले आहे.

                                        

Friday 21 August 2020

DIO BULDANA NEWS 21.8.2020

 कोरोना संसर्ग सुरक्षीतता पाळून महामंडळाची प्रवाशी वाहतूक सुरू

  • प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात कोविड-19 च्या संकटात आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुक  दि. 20 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात आली आहे. सदर प्रवाशी सेवा कोरोना संसर्ग सुरक्षीततेचे सर्व नियम पाळून सुरू राहणार आहे. अशा सुरक्षीत सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्कचा वापर करुन सामाजिक अंतर ठेवून प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.

     एस. टी महामंडळ आता  सज्ज झाले असून आपल्या सुरक्षित प्रवास, सामाजिक अंतर ठेवून बसेस निर्जंतुकीकरण करुन माहे जानेवारी 2020 मध्ये जे प्रवास भाडे होते, त्याच प्रवास भाडे दरामध्ये प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे.  अधिक माहिती करीता विभागीय नियंत्रण कक्षाशी अथवा संबंधित आगार व्यवस्थापकांशी थेट संपर्क साधावा.  नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी बुलडाणा आगार 07262-242788, चिखली 07264-242084, खामगाव 07263-252224, मेहकर 07268 -224554, मलकापूर 07267-222170, जळगांव जामोद 07266-221453, शेगांव 07265-252028 असे

आहे. तरी या सुरक्षीत प्रवाशी सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

0000000

आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने दि.20 ऑगस्ट 2020 आंतरजिल्हा प्रवाशी बसेस सुरु केल्या आहेत. सदर प्रवाशी वाहतूक बसेस 50 टक्के आसन (प्रत्येक बसमध्ये फक्त22) क्षमतेने प्रवाशांना पुर्वीच्या दराने प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक राहील. बसेस पुर्णत: निर्जंतुकीकरण करुन चालविण्यात येणार आहेत. तसेच आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक बुलडाणा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

   प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार फेऱ्यामध्ये वाढ करण्यात येईल, प्रवाशांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक राहील. प्रवाशांसाठी ईपासची आवश्यकता राहणार नाही. तरी या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

आंतरजिल्हा बसेसचे वेळापत्रक

   बुलडाणा आगारातून  अकोला सकाळी 8 व दुपारी 2, औरंगाबाद सकाळी 5.30, 6.15, दुपारी 1, 1.30, 3.30, भुसावळ सकाळी 6.45, जामनेर सकाळी 7.15, नागपुर सकाळभ्‍ 9, 11 व दु 1.30, अमरावती सकाळी 6.30, 8, 10.15, दु. 12 व सायं 4,   लातुर सकाळी 8.30, पुणे सकाळी 9.15, रात्री 9.15, पंढरपुर सकाळी 7.30, यवतमाळ दुपारी 3.30, धुळे सकाळी 7.15, परतवाडा, दु. 1,  चिखली आगार येथून औरंगाबाद दु. 12.30, दु. 3.15,  जळगांव खां स 6.15, 11.45,नाशिक सकाळी 8.15, नागपुर सकाळी 9.15, पुणे सकाळी 7.30 व सायं 6.30,  त्र्यंबकेश्वर सकाळी 9.30, शिर्डी सकाळी 6, खामगांव आगार येथून अकोला दर अर्ध्यातासाला विना वाहक, नाशिक सकाळी 9.45, शिर्डी सकाळी 6.15, सकाळी 7.05, सकाळी 9.45,  नांदुरीगड (सप्तश्रंगीगड) सकाळी 8.30, औरंगाबाद सकाळी 9.30,  मेहकर आगार येथून पुणे सकाळी 8, पंढरपुर सकाळी 8.15, नागपुर सकाळी 7.30, त्र्यंबकेश्वर सकाळी 7, लातुर सकाळी 9.45, जळगांव खांदेश सकाळी 6, 7, 8, 9 व सकाळी 10, अकोला सकाळी 6.30, मलकापुर आगार येथून पुणे सकाळी 6.45 व सायं 6.30, वाशिम सकाळी 9, औरंगाबाद सकाळी 4.45, 5.15, 6, 7, 7.30, 7.45, 8.15, 8.45, 9.30, 10.15, 11.15, 12, दु. 2, वझर सरकटे सकाळी 8.45, जळगांव जामोद आगार येथून अकोला सकाळी 6.25, 9.30, 1.30, 2.15, पुणे सकाळी 8, 9.15, नागपुर सकाळी 10, औरंगाबाद सकाळी 5.30, दु. 2.30.  शेगांव आगार येथून अकोला दर अर्ध्या तासाला विना वाहक, चंद्रपुर सकाळी 9, शिर्डी सकाळी 9.15, पुणे सकाळी 7, पंढरपुर सकाळी 7.30, नागपुर सकाळी 10.30, यवतमाळ दु. 1.15, औरंगाबाद सकाळी 6.15 व 8.30 वाजता .

********

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवसथापन करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : गलाबी बोंडअळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसीपीएल्ला (सान्डर्स) ती गण लेपिडोप्टेरा आणि कुळ जेलेचिडी मध्ये वर्गीकृत आहे. हया किडीचे मुळ उगमस्थान भारत, पाकीस्तान आहे. मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते. मादी अंडी पात्या, फुलावर, नविन बोंडावर, देठावर आणि कोवळया पानांच्या खालच्या बाजुस घालते. अंडीचा आकार 0.5 मि मि लांब व 0.25 मिमि रुंद असतो. अंडी लांबट व चपटी असुन रंगाने मोत्यासारखी चक चकीत असतात. पंधरा दिवसाचे बोंड अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते. अंडी उबवण्याचा काळ हा 3 ते 6 दिवसाचा असतो. पहिल्या दोन अंतरीक अळी अवस्था पांढूरक्या असतात आणि तिसऱ्या आंतरीक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात.

   उष्ण भागात अळी अवस्था ही 9 ते 14 दिवसांची असते. पुर्ण वाढलेल्या अळीची लांबी 10 ते 13 मिमि असून डोके गडद रंगाचे असते. कोष साधारण 10 मि‍मि लांब बदामी रंगाचा असून अवस्था 8 ते 13 दिवसात पुर्ण केल्या जाते. जिवनक्रम 3 ते 6 आठवडयात पुर्ण होतो. पतंग 8 ते 10 मिमि तपकिरी करडया रंगाचा असून पंखावर काळे ठिपके असतात. पतंग कोषातून सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर निशाचर असतात आणि दिवसाला मातीत किंवा जमिनीच्या भेगात लपून बसतात. खाध्य वनस्पती अभावी गुलाबी बोंडअळी 6 ते 8 महिनेपर्यत निद्रावस्थेत राहते.

    उघडलेल्या बोंडावरती डाग हे गुलांबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीला येणाऱ्या फुलोऱ्यावस्थेत आणि पिकांच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते. कामगंध सापळयामध्ये नर पतंग अडकल्यास कामगंध सापळयाद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग आकर्षित होतात. डोम कळी फुले पुर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात. हिरव्या बोंडावर दिसणारे डाग हिरव्या बोंडावर दिसणारे. डाग हे गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव लक्षण आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र अंदाजे 1.5 ते 2 मिमि व्यासाची लहान छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.

                                                  गुलाबी बोंडअळी येण्याचे कारणे

जास्त कालावधीच्या संकरीत वानाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीला यजमान वनस्पतीचा अखंडीत खाद्य पुरवठा. असंख्य संकरीत वाण ज्यांचा फुलोरा आणि फळधारणेचा कालावधी वेगवेगळा असतो. जो गुलाबी बोंडअळीच्या एकापाठोपाठ येणाऱ्या पिढीला अखंडीत पुरवठा करतो. जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्चा कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्यामुळे येणाऱ्या कापसाच्या पिकांसाठी गुलाबी बोंडअळीचे स्त्रोतस्थान म्हणून काम करते. पुर्वहंगामी (एप्रिल-मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जुन- जुलै मध्ये येणाऱ्या कमी तिव्रतेच्या गुलाबीबोंड अळीसाठी लाभदायक ठरतो. गुलाबी बोंडअळीचे क्राय 1 एसी 2 एबी या दोन्ही जनुकाप्रती प्रतिकार निर्माण होतो. त्यामुळे त्या बोलगार्ड 2 वरती सहजपणे जगू शकतात. संकरीत वानाची बोंडातील बियामध्ये वेगवेगळे असलेल्या विषाच्या प्रमाणामुळे लवकर प्रतिकार निर्माण होतो. ही परिस्थिती निवडक प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी अतिशय आदर्श ठरते. सुरुवातीला पेरलेले पिक आणि अगोदरचे पीक यांच्या सलग उपलब्धतेमुळे गुलाबी बोंडअळीला वर्षभर निरंतर खाद्य पुरवठा होतो. त्यामुळे त्यांच्या अनेक पिढया एक वर्षात तयार होतो. ज्यामुळे गहन निवडक दबाव तयार होऊन प्रतीकार तयार होण्यास मदत होते. गैर बीटी कपाशीची (रेफुजी) आश्रय पिक म्हणून वापर न करणे. वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव.

    अशा करा उपायोजना :  कापुस पिकाचा हंगाम डिसेंबर ते जनवारी दरम्यान संपुष्टात आणणे. अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकांच अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीने प्रादृर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठवण करु नये. बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जुन महिन्यात पेणी करावी. बीटी बियाण्यासोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी. पतंगाच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीच्य प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवळी निरीक्षण करावी. ज्या ठीकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीया अंडयावर उपजिविका करणारा परोपजीवी मित्र किटक 60000 एकर या प्रमाण एका आठवडयाच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तिनदा प्रसारण केलयास चांगले नियंत्रण मिळते. लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क 5 टक्के निम तेल 5 मिली प्रती लिटरची एक फवारणी करावी. मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटनाशकाची फवारणी (लेबल क्लेम) प्रमाणे करावी. जहाल विषारी व उच्च विषारी किटनाशकाची फवारणी टाळावी. किटनाशकाचा मिश्राणचा कोटेकोरपणे वापर टाळावा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपुर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायरेथ्रोईड, असिफेट, फिप्रोनील इत्यादी चा वापर करु नये. बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळया झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पाहावी. खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करुन त्वरीत नष्ट करावीत. आर्थिक नुकसान पातळी (8 पतंग, कामगंध सापळा, दिन किंवा एक अळी,10 फुले किंवा एक अळी 10 हिरवी बोंडे) ओलांडल्यास तक्त्यात दिलेल्या रासायनिक किटनाशकांचा गरजेनुसार वापर करावा. स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र वेचनी करुन विक्री अथवा योग्य साठवणूक करावी. तसेच किडग्रस्त कापुस त्वरीत नष्ट करावे. सुतगिरणी, जिनिंग मिलमध्ये साठवलेल्या किडग्रस्त कापसात सुप्तावस्थेत असलेल्या अळयांपासून निघनाऱ्या पंतगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावे.

              गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली किटनाशके

सप्टेंबर महिन्यात किटकनाशक क्विनॉलफॉस प्रती 10 लीटर पाण्यात 25 टक्के एएफ 20 मिली, किंवा थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी प्रती 10 लीटर पाण्यात 20 मिली मात्रा,  ऑक्टोबर महिन्यात क्लोरपायरीफॉस 20 टक्के इसी 25 मिली प्रती 10 लीटर पाण्यात किंवा थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी 20 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात, नोव्हेंबर महिन्यात फेनव्हलरेट 20 टक्के इसी किंवा सायपरमेथ्रिन 10 टक्के इसी 10 मिली प्रती 10 लीटर पाण्यामध्ये फवारणी करावी, असे  आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे यांनी केले आहे.