बुलढाण्यात महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा
बुलढाणा, (जिमाका) दि.
01: जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु
व मध्यम उपक्रम, निर्यातदार, नवउद्योजक तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यातीच्या
नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन
२०२६” या विशेष कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी, २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात
आले आहे. जिल्हा निर्यात प्रचालन समिती आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने,
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी
क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये निर्यात
धोरण, निर्यातवृद्धीची प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी तसेच शासनाकडून
उपलब्ध असलेल्या विविध सवलती व योजनांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात
येणार आहे.
स्थानिक उद्योगांनी जागतिक
बाजारपेठेत आपली उत्पादने पोहोचवावीत, निर्यात क्षमतेत वाढ करावी आणि व्यवसाय विस्ताराच्या
संधी साधाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही कार्यशाळा सकाळी ९ ते दुपारी
२ वाजेपर्यंत चालणार असून, जिल्ह्यातील उद्योग आणि निर्यात क्षेत्रासाठी मार्गदर्शक
ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत
सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजक, निर्यातदार व उत्पादकांनी आजच
https://forms.gle/xwEXi7TrCahKqbYp6 या ऑनलाईन लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन
प्रमोद लांडे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.
००००
Comments
Post a Comment