स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या
स्वयं अर्थसहाय्यिता
नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियमानुसार नवीन शाळांना मान्यता व विद्यमान
शाळांना दर्जावाढीचा प्रस्तावाची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये
जिल्ह्यातील दोन नवीन शाळांना मान्यता व एका शाळेच्या दर्जावाढ मान्यतेसाठी
शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावासंदर्भात कोणाची हरकत असल्यास पंधरा
दिवसाच्या आत सदस्य सचिव क्षेत्रस्तरीय प्राधिकरण तथा उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद
यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी(मा) यांनी केले आहे.
महाराष्ट्र
स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 व नियम 2020 अंतर्गत नवीन शाळा मान्यता व विद्यमान शाळांची दर्जावाढ करण्याच्या
प्रस्तावांबाबत राज्यस्तरीय प्राधिकरणाची बैठक दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात
आली. त्यानुसार प्राधिकरणाकडे प्राप्त झालेल्या शाळांची यादी www.mahasfs.org व www.education.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दोन नवीन शाळांना
मान्यता तर एका शाळांची दर्जावाढीची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे.
दर्जावाढ शाळा : वैभव माध्यमिक विद्यालय, वर्दडी बु. ता. सिंदखेड
राजा जि.बुलढाणा या शाळांची उच्च प्राथमिक ते माध्यमिक शाळेला जोडून उच्च माध्यमिक
11 व 12 वी सर्व शाखा कला, वाणिज्य शाख मराठी आणि विज्ञान शाखा इंग्रजी माध्यम असा
जर्दावाढीची शिफारस आहे.
नवीन शाळा : 1) राजर्षी
शाहू ज्युनिअर कॉलेज, चिंचपुर ता.खामगाव जि.बुलढाणा या शाळेची उच्च माध्यमिक 11 ते
12 वी कला,वाणिज्य व विज्ञान प्रकारात 2) स्व. सुशिलाबाई जैस्वाल पब्लिक स्कुल,
पान्हेरा ता.मोताळा जि.बुलढाणा या शाळेची
प्राथमिक ते उच्च माध्यमिक 11 व 12 वीच्या सर्व शाखा याप्रमाणे शिफारस आहे.
महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 दि. 19 जानेवारी 2013
नियम 6(2) नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीस संदर्भात कोणाची हकरत असल्यास
पंधरा दिवसाच्या आत सादर करावी. अन्यथा सदर निर्णयास कोणाचीही हकरत नाही, असे
गृहीत धरुन पुढील निर्णय घेतले जातील. उशिरा आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार
नाही, यांची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment