अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनांतील लाभार्थ्यांना 15 जानेवारीपर्यंत विशेष मुदत
बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांतर्गत ज्या लाभार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र
(LOI) दि. 1 जानेवारी 2025 पूर्वी निर्माण झाले आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना बँकेकडून
कर्ज मंजुरी प्राप्त झाली आहे, अशा सर्व प्रकरणांसाठी दि. 15 जानेवारी 2026 पर्यंत
पोर्टलवर बँक मंजुरीपत्र अपलोड करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे.
या विशेष सुविधेचा लाभ
घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नावलीस
योग्य उत्तरे देणे आवश्यक आहे. प्रश्नावली पूर्ण केल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना
बँक मंजुरीपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर सुविधा तात्पुरत्या स्वरूपाची
असून, लाभार्थ्यांनी दि. 15 जानेवारी 2026 पूर्वीच बँक मंजुरीपत्र पोर्टलवर अपलोड करावे,
असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment