Thursday 31 December 2020

DIO BULDANA NEWS 31.12.2020

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 483 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 32 पॉझिटिव्ह

       31  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 515 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 483 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 390 तर रॅपिड टेस्टमधील 93 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 483 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  मोताळा तालुका : पिं. देवी 1, दे. राजा शहर : 8, सिं. राजा तालुका : वडजी 3, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, पातुर्डा 1,  शेगांव शहर : 2, नांदुरा तालुका : खातखेड 2, पिंप्री अढाव 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : गोंधनपूर 1, गारडगांव 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : शिरपूर 1,सागवन 1, ढासाळा 1      संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 32 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 31  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 11, बुलडाणा : अपंग विद्यालय 3, स्त्री रूग्णालय 8, आशिर्वाद कोविड हेल्थ सेंटर 9.  

  तसेच आजपर्यंत 89229 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12140 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12140 आहे. 

  तसेच 1686 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 89229 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12518 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12140  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 227 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 151 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

खरीप हंगामातील अंतिम पीक पैसेवारी जाहीर

·                    जिल्ह्यातील अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे

  बुलडाणा,(जिमाका) दि.31 : खरीप हंगाम सन 2020-21 मधील जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1419 गावांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशांच्या आत आली आहे.   जिल्ह्याची तालुकानिहाय अंतिम पीक पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे.  तालुकानिहाय गावांची संख्या  व अंतिम पीक पैसेवारी :  बुलडाणा – गावे 98, अंतिम पीक पैसेवारी 48 पैसे, चिखली : गावे 144, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, दे. राजा : गावे 64, अंतिम पीक पैसेवारी 48 पैसे, मेहकर : गावे 161, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, लोणार : गावे 91, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, सिं. राजा : गावे 114, अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे, मलकापूर : गावे 73, अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे, मोताळा : गावे 120, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, नांदुरा : गावे 112, अंतिम पीक पैसेवारी 44 पैसे, खामगांव : गावे 145, अंतिम पीक पैसेवारी  47 पैसे, शेगांव : गावे 73, अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे, जळगांव जामोद : गावे 119, अंतिम पीक पैसेवारी 37 पैसे आणि संग्रामपूर तालुक्यात गावे 105 व अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 1419 गावांची 50 पैशाच्या आत अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

                                                *******

                    कोविड साथरोगावर नियंत्रणासाठी शासनाचे निर्बंध व सूट 31 जानेवारी पर्यंत लागू

  बुलडाणा,(जिमाका) दि.31 : कोरोना विषाणू अर्थात कोविड साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार 29 डिसेंबर 2020 च्या शासन आदेशानुसार जिल्ह्यासाठी शासनाकडून वेळोवेळी शिथिल करण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू करण्यात आलेल्या ओहत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी आदेश, निर्देश व नियमावली निर्गमीत करण्यात आली आहे.  त्यानुसार जिल्ह्यात 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी लागू असणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता 1860 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदींनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी कळविले आहे.

                                                                        **********

ग्रामपंचायतच्या 4 हजार 809 जागांसाठी 13 हजार 625 अर्ज दाखल

  • एकूण उमेदवारांची संख्या 13 हजार 362

  बुलडाणा,(जिमाका) दि.31 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या  निवडणूकांचे वारे जोमाने वाहत आहेत. निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी काल 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या  शेवटच्या दिवशी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. निवडणूक आयोगाने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन अर्जही सादर करण्याची मुभा दिली होती. तसेच वेळही वाढवून देण्यात आली. त्याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जांचा धो.. धो पाऊसच पडला. जिल्ह्यात 13 हजार 362 उमेदवारांकडून तब्बल 13 हजार 625 अर्ज दाखल करण्यात आले आहे.  

         जिल्ह्यात एकूण 527 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी 23 डिसेंबर पासून अर्ज सादर करणे सुरू झाले. तर 30 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारिख होती. जिल्ह्यात तालुकानिहाय निवडणूक ग्रामपंचायती,  एकूण अर्ज व उमेदवार संख्या : बुलडाणा – ग्रामपंचायती  51, उमेदवार 1572 व अर्ज 1609,  चिखली : ग्रामपंचायती  60, उमेदवार 1447 व अर्ज 1487, दे. राजा : ग्रामपंचायती  26, उमेदवार 597 व अर्ज 648, सिं. राजा : ग्रामपंचायती  43, उमेदवार 956 व अर्ज 992, मेहकर : ग्रामपंचायती  41, उमेदवार 1153 व अर्ज 1162, लोणार : ग्रामपंचायती  16, उमेदवार 424 व अर्ज 425, खामगांव : ग्रामपंचायती  71, उमेदवार 1804 व अर्ज 1843, शेगांव : ग्रामपंचायती  34, उमेदवार 800 व अर्ज 816, जळगांव जामोद : ग्रामपंचायती  25, उमेदवार 654 व अर्ज 661, संग्रामपूर : ग्रामपंचायती  27, उमेदवार 742 व अर्ज 742, मलकापूर : ग्रामपंचायती  33, उमेदवार 757 व अर्ज 757, नांदुरा : ग्रामपंचायती  48, उमेदवार 1184 व अर्ज 1188 आणि मोताळा : ग्रामपंचायती  52, उमेदवार 1272 व अर्ज 1295.

    अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 13 हजार 362 उमेदवारांकडून 13 हजार 625 अर्ज दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी निवडणूक असणाऱ्या 16 ग्रामपंचायती लोणार तालुक्यात आहे. तसेच उमेदवार संख्याही 424 व अर्ज 425 आहे. सर्वात जास्त उमेदवार संख्या 1804 खामगांव तालुक्यात असून अर्ज 1843 आहेत.  

****

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे

  • समाज कल्याण विभागाचे आवाहन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

   तरी सन 2020-21 या वर्षाकरीता  प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्याकरीता मुदत देण्यात आली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‍शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                ******

 

 

 

Wednesday 30 December 2020

DIO BULDANA NEWS 30.12.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 728 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह

•       40 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 773 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 728 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 556 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 728 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  मोताळा तालुका : पिं. देवी 10, बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : मासरूळ 1,  दे. राजा शहर : 5, दे. राजा तालुका : दे. मही 1, सरंबा 1,  चिखली तालुका : मेरा 1, उंद्री 1, सातगांव भुसारी 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, बाभुळखेड 1, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 2,  खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : आंबेटाकळी 1, गारडगांव 1,  शेगांव शहर : 4, शेगांव तालुका : पहुरजिरा 1, गव्हाण 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान रामनगर, बुलडाणा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 40  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  दे. राजा : 1, खामगांव : 3, नांदुरा : 5, जळगांव जामोद : 3, बुलडाणा : 1, अपंग विद्यालय 2, आयुर्वेद महाविद्यालय 1, सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 8,  मलकापूर : 9, चिखली : चुनावाला हॉस्पीटल 7,  

  तसेच आजपर्यंत 88746 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12109 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12109 आहे. 

  तसेच 1686 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 88746 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12486 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12109  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 226 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 151 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******


जिल्हा सामान्य रूग्णालयात पीसीपीएनडीटी कार्यशाळा उत्साहात

  बुलडाणा,(जिमाका) दि.30 : पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी  व मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नर्सिंग स्कूल हॉलमध्ये पीसीपीएनडीटी कार्यशाळा आज 30 डिसेंबर 2020 रोजी उत्साहात पार पडली. दिप प्रज्वलनाने कार्यशाळेला सुरूवात करण्यात आली. कार्यशाळेमध्ये मुलींच्या जन्मदर वाढविणे, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना काय काय करावे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ता यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ घोलप, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बागर, जिल्हा सल्लागार समितीच्या  डॉ वैशाली पडघान,  विधी समुपदेशक ॲड वंदना काकडे, शासकीय अभियोक्ता ॲड संतोष खत्री, शाहीना पठाण, अधिसेविका श्रीमती राठोड आदी उपस्थित होते.

    कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ. घोलप म्हणाले, पीसीपीएनडीटी कायदा हा लिंग चाचणी करणाऱ्यांसाठी  कर्दनकाळ आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. स्त्री जन्मासाठी समाजमन बदलले पाहिजे. मुलापेक्षा मुलगी बरी हा संस्कार झाला पाहिजे.  ॲड वंदना काकडे यांनी यावेळी समुचित प्राधिकारी यांचे कर्तव्य सांगितली. तसेच सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना कुठ कुठल्या गोष्टींची तपासणी करावी,  तपासणीमध्ये काय काय बघावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ वैशाली पडघान म्हणाल्या,  जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे गरजेचे आहे.  मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी गावागावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता, मदतनीस यांनी मोलाची भूमिका अदा केली पाहिजे. ह्या तीनही घटक समाजात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाजमन बदलवू शकतात.

  शाहीना पठाण यांनी मुलीचे समाजातील, वैयक्तिक आयुष्यातील, देशासाठी असलेले महत्व पटवून दिले. त्यांनी समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहनही केले. तसेच याप्रसंगी ॲड संतोष खत्री यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील बारकावे कथन केले. त्यांनी कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.   संचलन सचिन सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन के. पी भोंडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी  आहारतज्ज्ञ सचिन सोळंकी, के. पी भोंडे, विवेक जोशी आदींनी प्रयत्न केले. कार्यशाळेला वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

                                                            *****

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

  • जानेवारी ते जुन 2020 दरम्यानचा कार्यक्रम
  • नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

     बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  - माहे जानेवारी ते जुन 2021 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. तसेच ज्या दिवशी शासकीय सुट्टी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी सदर शिबीर कार्यालय घेण्यात येणार आहे.

    शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे  जानेवारी 2021 मध्ये : जळगाव जामोद 4 जानेवारी, शेगाव 6 व 25, मेहकर 8 व 27, लोणार 18, खामगांव 11 व 29,  चिखली 13 , दे.राजा 15, नांदुरा 20, मलकापूर 12 व 21, सिंदखेड राजा 22 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये : जळगाव जामोद 3 फेब्रुवारी, शेगाव 4 व 22, मेहकर 5 व 24,  लोणार 12, खामगांव 8 व 26,  चिखली 9 , दे.राजा 11, नांदुरा 19, मलकापूर 10 व 17, सिंदखेड राजा 18 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. मार्च 2021 मध्ये :  जळगाव जामोद 3 मार्च, शेगाव 5 व 25, मेहकर 8 व 26,  लोणार 17, खामगांव 10 व 30,  चिखली 12 , दे.राजा 15, नांदुरा 19, मलकापूर 9 व 22, सिंदखेड राजा 23 मार्च 2020 रोजी होणार आहे. एप्रिल 2021 : जळगाव जामोद 5 एप्रिल, शेगाव 6 व 26, मेहकर 8 व 28,  लोणार  16, खामगांव 9 व 30,  चिखली 12 , दे.राजा 15, नांदुरा 19, मलकापूर 7 व 20, सिंदखेड राजा 22 एप्रिल रोजी होणार आहे. मे 2021 : जळगाव जामोद 3 मे, शेगाव 5 व 25, मेहकर 7 व 27,  लोणार 17, खामगांव 10 व 28,  चिखली 11 , दे.राजा 12, नांदुरा 19, मलकापूर 6 व 21, सिंदखेड राजा 24 मे रोजी होणार आहे. जुन 2021 : जळगाव जामोद 4 जुन, शेगाव 7 व 25,  मेहकर 8 व 28, लोणार 16, खामगांव 10 व 30,  चिखली 11 , दे.राजा 14, नांदुरा 18, मलकापूर 9 व 21  सिंदखेड राजा 23 जुन रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच या शिबिरांचा इच्छूकांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                            *****

बुलडाणा उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहीता लागू

  • उमेदवारांना प्रचारवेळी वाहन ताफ्यात एकाच वाहनाची परवानगी
  • मतदान केंद्रांपासून आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी
  • जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये

  बुलडाणा,(जिमाका) दि.30 : बुलडाणा उपविभागात बुलडाणा व चिखली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 18 जानेवारी 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 उपविभागात लागू करण्यात आले आहे.  त्यानुसार बुलडाणा उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे कालावधीत उमेदवारांना प्रचाराचेवेळी त्यांचे वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणूकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

    प्रचार कार्यासाठी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे.  उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधीत निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली  भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत. उपविभागात मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय येथून होणार असल्याने व तहसिल कार्यालयात मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्ष प्रस्तावित असल्याने तहसिल कार्यालयाच्या आवारात केवळ 4 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसेच मिरवणूकीने येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटरचे आत मिरवणूक थांबविणे बंधनकारक असणार आहे.  तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात कोविड 19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास बंदी असणार आहे. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधीत अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे बुलडाणाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी रूपेश खंडारे यांनी कळविले आहे.   

******

 

Tuesday 29 December 2020

DIO BULDANA NEWS 29.12.2020

 


कोविड लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे

-         जिल्हाधिकारी

  • कोरोना लसीकरण तयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक
  • सर्व खाजगी डॉक्टर, स्टाफ यांची नोंदणीक करावी
  • निवडणूकीच्या धर्तीवर राहणार लसीकरण कार्यक्रम

  बुलडाणा,(जिमाका) दि.29 : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. याबाबत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नियमित तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहणार आहे. तरी या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.  

   या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी सादरीकरण केले. सादरीकरणावेळी ते म्हणाले, लसीकरण टप्पेनिहाय करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खाजगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी - कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात 50 वर्षाच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणासाठी को विन ॲपवर नोंदणी आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टर, नर्सेस त्यांचा स्टाफ, यंत्रणेतील हेल्थ वर्कर, पोलीस, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नोंदणी करावी. नोंदणीसाठी महसूल यंत्रणेने पुढाकार घ्यावा. आपआपल्या तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरची नोंदणी होईल, याची काळजी घ्यावी.

       तसेच लसीकरण स्थळ हे तीन भागात असावे. यामध्ये पहिल्या भागात प्रतीक्षा खोली, दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लसीकरण खोली, तर तिसऱ्या भागात निरीक्षण खोली असणार आहे. निरीक्षण खोलीमध्ये 30 मिनीटापर्यंत लसीकरण केलेल्या व्यकतीला ठेवण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर तारिख, स्थळ व वेळेचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. एसएमएस दाखविल्यानंतर लसीकरण बुथमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याठिकाणी ओळखपत्र तपासण्यात आल्यानंतर लसीकरणासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या डोससाठी एसएमस पाठविण्यात येणार आहे. लसीकरणानंतर एसएमएसमध्ये एक लिंक येणार असून त्यामधून प्रमाणपत्र जनरेट होणार आहे.  प्रत्येक लसीकरण स्थळ लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर सॅनीटाईज करण्यात येणार आहे. लसीकरण स्थळ हे समाज मंदीर, शाळा, मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, एखादी खाजगी जागा असणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. लस ही इंजेक्टीबल असून डिस्पोजेबल सिरींजची असणार आहे. ही सिरींज एकावेळी एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण स्थळामध्ये कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सोशल डिस्टसिंगचे कडक पालन करण्यासाठी त्यापद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर वेस्ट मॅनेजमेंटचीही व्यवस्था असणार आहे. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिक्षक, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

 

 

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 493 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 5 पॉझिटिव्ह

•       52 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 498 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 493 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 421 तर रॅपिड टेस्टमधील 72 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 493 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 2, जळगांव जामोद शहर : 2, लोणार शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 5 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 52 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  शेगांव : 10, बुलडाणा : अपंग विद्यालय 8, आयुर्वेद महाविद्यालय 1,  दे. राजा : 5, खामगांव : 5, नांदुरा : 3, चिखली : 11, मेहकर : 1, चिखली : 6,  जळगांव जामोद : 2,      

  तसेच आजपर्यंत 88018 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12069 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12069 आहे. 

  तसेच 1327 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 88018 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12441 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12069 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 222 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 150 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

दुध उत्पादक संघ, कंपनी, शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड लाभ देण्यासाठी विशेष मोहिम

  बुलडाणा,(जिमाका) दि.29 :  जिल्ह्यात शेतकऱ्यांकरीता शेती सोबत जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेळी व मेढी पालन, कुक्कुटपालन, व्यवसाय प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामध्ये अल्प अंत्यल्प भुधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांचा कल या व्यवसायाकडे वाढल्याने दिसुन येत आहे. केंद्रशासन व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाने सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीड कार्डची सुविधा (केसीसी) उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहकारी दुध सोसायटी, दुधसंघ, दुध उत्पादन कंपनीच्या सभासद असलेल्या दुध उत्पादन शेतकरी व पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक

केसीसी कार्ड योजनेचा लाभ देणेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

     या मोहिमेच्या पहील्या टप्प्यात सहकारी दुध सोसायटी, दुधसंघ, दुध उत्पादक कंपनीच्या सभासद असलेल्या दुध उत्पादक शेतकरी व पशुपालक ज्यांचेकडे किसान क्रेडीड कार्ड नाही त्यांना पशुसंवधर्‍न विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ प्रथम देण्यात येईल. ज्या दुध उतपाक शेतकऱ्यांकडे शेती असून त्यांचेकडे किसान क्रेडीड कार्ड असेल तर त्यांना किसान क्रेडीड कार्डची पत मार्यादा वाढवून मिळेल, परंतु व्याज सवलत रुपये 3.00 लक्ष पर्यंतच्या कर्जासाठी राहील. कर्जाकरीता व्याज सवलत दर 2 टक्के राहील. तर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ देण्यात येईल. सर्वासाधारणपणे कोणत्याही तारणाशिवाय पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीड कार्ड कर्ज मर्यादा (खेळते भांडवल) रुपये 1.60 लक्ष आहे. परंतु जो पशुपालक शेतकरी सहकारी दुध सोसायटी, दुधसंघ, दुध उत्पादक कंपनीशी संलग्न आहे आणि कर्ज परत करण्याची त्रिपक्षिय करार (दुध सोसायटी, संघ, बँक आणि शेतकरी) यांच्याकडून कर्ज परत करण्याची हमी देत असेल. त्यांना कोणत्याही तारणा शिवाय रुपये 3.00 ला च्या मर्यादेत पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदी करीता नसुन त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे.

     तसेच सद्यास्थित राज्यातील 17.87 लक्ष शेतकरी पशुपालक हे राज्यातील 72 दुध संघशी संलग्न आहेत. या पशुपालक शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीड कार्ड योजनेचा लाभ देण्याचा अपेक्षित असून सद्यास्थितीत राज्यातुन 2.58 लक्ष सहकारी दुध सोसायटी दुध संघाकडील पशुपालक शेतकऱ्यांनी विविध बॅकाकडे किसान क्रेडीड कार्डसाठी अर्ज सादर केले असून बँकस्तरावर मोठया प्रमाणात अर्ज काही कारणामुळे प्रलंबित ठेवले किंवा नाकारले जात आहे.

         शेतकऱ्यांनी अपुर्ण भरलेले अर्ज, केसीसी अंतर्गत कडबाकुटी यंत्रव  पशुधन खरेदीसाठी केलेले अर्ज, काही केसीसी धारकांनी कर्जाची रुपये 3.00 लक्ष पर्यंतची मर्यादा पुर्ण केलेली असल्याने, काही दुधसंघ त्रिपक्षिय करार करण्यास तयार नसलेले. (दुध सोसायटी, संघ, बँक, आणि शेतकरी, ज्याबँकध्ये पशुपालकांचे दुधचे पैसे जमा केले जातात त्याच बँकमध्ये केसीसीचे अर्ज सादर न केल्याने अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000000

--

Monday 28 December 2020

DIO BULDANA NEWS 28.12.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 397 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह

•       77 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 451 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 397 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 330 तर रॅपिड टेस्टमधील 67 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 397 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा तालुका : पिं. देवी 11, काबरखेड 1,  दे. राजा शहर : 9, चिखली शहर : 4, चिखली तालुका : वळती 1, मेरा खु 2, देऊळगांव घुबे 1, ढासाळा 1,  खामगांव तालुका: पिं. राजा 1, गारडगांव 1,  आवार 1, खामगांव शहर : 4, शेगांव शहर : 3, संग्रामपूर तालुका : खिरोडा 1,  शेगांव तालुका : भोनगांव 1, बुलडाणा शहर : 8, जळगांव जामोद शहर : 2, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली रोड, बुलडाणा येथील 63 वर्षीय महिला रूग्णाचा  मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 77 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 16,  दे. राजा : 14, सिं. राजा : 5, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 3, अपंग विद्यालय 27, शेगांव : 6, मलकापूर : 1, चिखली : 3, मेहकर : 2.      

  तसेच आजपर्यंत 87525 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12017 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12017 आहे. 

  तसेच 1204 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 87525 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12436 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12017 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 269 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 150 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

शासकीय खरेदीसाठी तूरीची नोंदणी सुरू

  • 6000 रूपये प्रति क्विंटल हमी भाव
  • जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 : हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तूरीला 6 हजार रूपये प्रति क्विंटल हमी भाव असून या भावाला तूरीची खरेदी होणार आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

    त्यामध्ये बुलडाणा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, दे. राजा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, लोणार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, मेहकर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, शेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिं. राजा आणि माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे. राजाचे केंद्र सिं. राजा यांचा समावेश आहे. या खरेदी केंद्रांवर तूरीची खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधीत खरेदी केंद्रांवर जावून तूर खरेदीकरीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

                                                                        ही कागदपत्रे आवश्यक

तूर नोंदणीकरीता शेतकऱ्यांना आधार कार्ड, सात बारा ऑनलाईन पिकपेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

************

मलकापूर उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहीता लागू

  • उमेदवारांना प्रचारवेळी वाहन ताफ्यात एकाच वाहनाची परवानगी
  • मतदान केंद्रांपासून आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी
  • जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 : मलकापूर उपविभागात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 18 जानेवारी 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 उपविभागात लागू करण्यात आले आहे.  त्यानुसार मलकापूर उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे कालावधीत उमेदवारांना प्रचाराचेवेळी त्यांचे वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणूकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

    प्रचार कार्यासाठी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे.  उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधीत निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली  भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत. उपविभागात मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय येथून होणार असल्याने व तहसिल कार्यालयात मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्ष प्रस्तावित असल्याने तहसिल कार्यालयाच्या आवारात केवळ 4 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसेच मिरवणूकीने येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटरचे आत मिरवणूक थांबविणे बंधनकारक असणार आहे.  तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात कोविड 19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास बंदी असणार आहे. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधीत अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मनोज देशमुख यांनी कळविले आहे.    

******

घिर्णी येथील बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 :मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील 16 वर्षाच्या बालिकेचा बालविवाह 7 जानेवारी 2020 रोजी होत आहे. अशी माहिती 17 डिसेंबर 2020 रोजी चाईल्ड लाईन यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. त्यानंतर लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, चाईल्ड लाईनचे समन्वयक, समुपदेशक यांनी मुलीच्या वयाचे पुरावे मिळवून मुलीचा होणारा विवाह हा बालविवाह आहे की नाही याची शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर संबंधीत यंत्रणेशी  संपर्क केला आणि मुलीला तिच्या आई वडिलासह बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्यासमोर हजर करण्यात आले.

    मुलीसह कुटूंबाला माहिती देऊन हा बालविवाह रद्द केल्याबाबतचा जबाब लिहून घेण्यात आला. तसेच असा विवाह पार पाडल्यास काय कार्यवही होऊ शकते याची माहिती मुलीच्या कुटूंबाला देण्यात आली. अशाप्रकारे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या समक्ष बाल विवाह रद्द करण्यात आला.  ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तथा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यावतीने जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक मोहिम राबवित आहे. जिल्ह्यात कुठेही, शहरात, गावात जर बालविवाह होत असेल, तर तात्काळ चाईल्ड लाईन यांना किंवा टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क करावा. तसेच संबंधीत यंत्रणेस व कार्यालस संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

                                                                                                **********

 

Thursday 24 December 2020

DIO BULDANA NEWS 24.12.2020

 पक्क्या लायसन्सच्या चाचणीकरीता कोटा उपलब्ध

  • 31 डिसेंबर 2020 पर्यंत सकाळी 8 वाजेपासून मिळणार कोटा

  बुलडाणा,(जिमाका) दि.24 : कोविड 19 च्या कारणामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे परिवहन आयुक्त यांच्या सुचनेनुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत लर्निंग लायसन्सची विधीग्राह्यता वाढविण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत अशा विधीग्राह्यता समाप्त होत असलेल्या लायसन्सची संख्या लक्षात घेता अशा नागरिकांना व अर्जदारांना अपॉईंटमेंट उपलब्ध नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून 24 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पक्क्या लायसन्सच्या चाचणीकरीता सकाळी 8 वाजल्यपासून कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची नोंद शिकाऊ अनुज्ञप्तीधारक विधीग्रह्यता वाढविण्यात आलेल्या व्यक्तींनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

                                                                                ***********

कोरोना अलर्ट : प्राप्त 378 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 43 पॉझिटिव्ह

•       45 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 421 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 378 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 314 तर रॅपिड टेस्टमधील 64 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 378 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, शेगांव शहर : 13, खामगांव शहर : 5, दे. राजा शहर : 5, चिखली शहर : 1, चिखली तालुका : शिंदी हराळी 1,  संग्रामपूर तालुका : पातुर्डा खुर्द 1, मलकापूर शहर : 3, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : दाभाडी 1, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : खैरा 1, लोणार तालुका : गोत्रा 1,    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : अपंग विद्यालय 11, जळगांव जामोद : 3,  मेहकर : 1, शेगांव : 2, सि. राजा : 4, नांदुरा : 6, दे .राजा : 2, खामगांव : 12,  चिखली : 7,   

तसेच आजपर्यंत 85670 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11816 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11816 आहे. 

  तसेच 1167 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 85670 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12309 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11816 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 345 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 148 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

           

 

 

   जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सुट्टीच्या दिवशी स्वीकारणार

  • ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जात पडताळणी कार्यालय राहणार सुरू

  बुलडाणा,(जिमाका) दि.24 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा कार्यालय ग्रामपंचायत निवडणूकीचे जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सुट्टीच्या दिवशीही स्वीकारणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक सन 2020-21 या कालावधीत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज पडताळणी कार्यालयास प्राप्त होत आहे. सदर अर्ज स्वीकृतीची शेवटची मुदत 30 डिसेंबर 2020 आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय 25, 26 व 27  डिसेंबर 2020 या शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू असणार आहे. या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. जेणेकरून कोणताही ग्रामपंचायत उमेदवार विहीत मुदतीत सदर प्रस्ताव जात पडताळणी कार्यालयास सादर करण्यापासून वंचित राहणार नाही. तरी ग्रामपंचायत निवडणूकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी केले आहे.

                                                                        *********

'राष्ट्रीय युवा संसद' मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!

  • नेहरू युवा केद्राव्दारा 28 व 29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन
  • नेहरू युवा केंद्राचेवतीने आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.24 :  तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातंर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्राव्दारा राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष  असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे. तर राष्ट्रीय स्तरावर प्रथम बक्षीस 2 लाख, द्वितीय 1.5 लाख, तृतीय बक्षीस 1 लाख रूपये आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तर राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतच स्पर्धा राहणार आहे.

    स्पर्धेचे विषय राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 भारत में शिक्षा को बदल देगी, उन्नाव भारत अभियान - समुदायों की शक्ति को उजागर करना और उनके उत्थान के लिए प्रौद्योगिकियों का उपयोग करना, नए सामान्य होने की सूरत में ग्रामीण अर्थव्यवस्था को खोलना,  शून्य बजट प्राकृतिक खेती किसानों के लिए एक वरदान है हे आहेत.  जिल्हास्तरीय विजेता स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व राज्यस्तरीय विजेता स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेकरीता पात्र राहील.

    बुलडाणा जिल्ह्याची युवा संसद दि.28 आणि 29 डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी पुरावा, पासपोर्ट फोटोसह विहीत नमुन्यातील अर्ज नेहरू युवा केंद्र, बुलडाणा कार्यालयात दि.27 डिसेंबर 2020 पर्यंत जमा करावे . अधिक माहितीसाठी फोन क्र.07262-295332 किंवा qnykbuldana@gmail.com यावर संपर्क साधावा.  जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने संसद घेण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

                                                                                **********

 


--

Tuesday 22 December 2020

DIO BULDANA NEWS 22.12.2020

 इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार

  • अनुसुचित जमाती प्रवर्गाचा विद्यार्थी असावा

बुलडाणा,(जिमाका) दि.22 :प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअकोला अंतर्गत येत असलेल्या जिल्हयातील अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्याकत येणार आहे.  लाभ घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडुन  प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध आहेत.

तरी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन  तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख 10 फेब्रुवारी 2021 आहे. तसेच इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री  ध्ये प्रवेश घेण्यासाठी  विद्यार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असावा. तसेच पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा. या योजनेचा लाभ घेउु इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा  लाख च्या आत असणे आवश्यक आह. तहसिलदाराचे प्रमाणपत्र असावे.  इयत्ता ली प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून  ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या विदयार्थाचे पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे. आदिम जमातीच्या विदयार्थाची तसेच विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या व दारिद्र रेषेखालील  कुटूंबातील अनुसूचीत जमातीच्या विदयार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.

  विदयार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईलया योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल. वर्ग 2 साठी शिकत असलेल्या शाळेमधल मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत विदयार्थाची जोडावी. अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे ममता विधळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

                                                **************

राज्यामध्ये जिल्ह्याची मका खरेदी अव्वल..!

  • शेतकऱ्यांच्या खात्यात खरेदीपोटी 15 कोटी रूपये जमा

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी भावाने मका, ज्वारी, बाजरी खरेदी सुरु आहे. आतापर्यत मका खरेदीसाठी 11331 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 4 हजार 577 शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 हजार 788 शेतकऱ्यांनी 1 लक्ष 40 हजार 925 क्विंटल मका खेरदी करण्यात आलेला आहे. सदर खरेदीची रक्कम रुपये 26.7 कोटी असुन त्यापैकी 15 कोटी रक्कम ही ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. राज्यात मका खरेदीबाबत जिल्ह्याने राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मका खरेदी जिल्ह्याची झाली आहे.

              तसेच जिल्ह्यामध्ये ज्वारी खरेदीसाठी 2 हजार 737 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 1647 शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी  एसएमएस पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 1 हजार 282 शेतकऱ्यांची 17 हजार 122 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे. सदर खरेदीची रक्कम रुपये 4.48 कोटी असून त्यापैकी 2 कोटी रक्कम ही ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सहकार्यामुळे राज्यामध्ये जिल्ह्याची अव्वल स्थानावर खरेदी होवू शकली आहे. शासनाने मका खरेदीची मुदत दि. 31 डिसेंबर 2020 दिलेली असली तरी राज्यातील मार्केटिंग फेडरेशनला केंद्रशासनाने दिलेले उद्दिष्ट पुर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद झाले असल्याने शासनाने पुढील आदेशापर्यत मका खरेदी बंद राहणार आहे. पुढील आदेश प्राप्त होताच मका खरेदी सुरु करण्यात येईल. मात्र ज्वारीच्या खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण न झाल्याने ज्वारीची खरेदी दि. 31 डिसेंबर 2020 पर्यत सुरु राहणार आहे, असे जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                *******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 172 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 37 पॉझिटिव्ह

•       40 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 209 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 172 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 94 तर रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 172 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : शेलसूर 1, शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : भोनगांव 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आडोळ बु 2, मडाखेड 2, मलकापूर शहर : 1, नांदुरा तालुका : आलमपूर 4, नांदुरा शहर : 1, चिखली तालुका : अंचरवाडी 1, अंत्री खेडेकर 1, कोलारा 1, नायगांव 1,  चांधई 1, दहीगांव 1,  चिखली शहर : 2,  मोताळा शहर : 1, दे. राजा शहर : 2, खामगांव शहर : 3,  मूळ पत्ता चिंचवड, पुणे 1, जळगांव खांदेश येथील 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 40 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 12, दे . राजा : 4, सिं. राजा : 8, बुलडाणा : अपंग विद्यालय 9, आयुर्वेद महाविद्यालय 3, मेहकर : 4.  

तसेच आजपर्यंत 85028 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11719 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11719 आहे. 

  तसेच 1071 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 85028 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12227 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11719 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 361 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 147 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबर रोजी वेबिनारचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे 24 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने लोकसंवाद अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईद्वारा 24 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचा विषय ग्राहक संरक्षण कायदा 2019 नवीन स्वरूप हा आहे. या वेबीनारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम, विभागाचे सचिव विलास पाटील, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव, ग्राहक न्यायालय विधिज्ञ संस्थचे अध्यक्ष उदय वारूंजीकर, आयोगाचे सदस्य, मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी युट्यूब चॅनेल https://youtube/ts5DOIWQV_M या लिंकवर क्लिक करावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                                                *****


Monday 21 December 2020

DIO BULDANA NEWS 21.12.2020

 जिल्हास्तर युवा महोत्सवाचे 25 ते 26 डिसेंबर रोजी आयोजन

  • महोत्सव ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने होणार

 बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालयद्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. केंद्र शासनामार्फत सन 1994 पासुन राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.  यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात.  याकरीता राज्यामध्ये जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा संघ निवडण्यात येतो.

            त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 15 वर्ष पुर्ण व 29 वर्षाआतील वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.25 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे.  सदर युवा महोत्सवामध्ये (१) एकांकींका (इंग्रजी व हिंदी), सांघीक-(2) लोकनृत्य, (3) लोकगीत, (4) शास्त्रीय वाद्य-बासरी, तबला, मृदुंग, विणा, सितार, हार्मोनियम-लाईट, गिटार, इ. (५) शास्त्रीय नृत्य-भरत नाट्यम, मनिपुरी, ओडीसी, कथक, कुचिपुडी, इ. (६) शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी, कर्नाटकी), इत्यादी कला प्रकारांचा समावेश असुन त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील कलावंतांनी आपले अर्ज दि. 23 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, क्रीडानगरी, बुलडाणा येथे सादर करावे.  बाबनिहाय प्रवेश अर्जानुसार स्पर्धकांची वेळ निश्चीत करुन त्या-त्या स्पर्धकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात येतील.  तसेच ज्या स्पर्धकांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील, त्यांना लिंकद्वारे कळविण्यात येईल.  त्यानुसार ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येवुन प्रथम क्रमांकाचा स्पर्धक विभागीय युवा महोत्सवाकरीता अमरावती येथे पात्र होईल.  सहभागी कलावंत (स्पर्धक) यांनी आपले प्रवेश अर्ज, मोबाईल नंबर, पत्ता, संस्थेचे नांव आदींसह या कार्यालयामध्ये नोंदणी करावी.  त्यानंतरच कार्यक्रमाची रुपरेषा संबंधितांना कळविण्यात येईल. 

            देशात कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन एकत्रीकरण करण्यास मनाई आहे.  त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी कळविले आहे.

                                                                        **************

पिंजरा पद्धतीने करण्यात येणार मत्स्यसंवर्धन

  • प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, पाच पिंजऱ्यांकरीता अनुदान अनुज्ञेय

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : राज्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच पिंजऱ्यांकरीता अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. तरी या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तशी वाढ झाल्यास वाढीव पिंजऱ्यावरील अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजना पाच पिंजऱ्यांची असली, तरी एकूण 18 पिंजऱ्यांपर्यंत म्हणजे 13 पिंजरे स्वखर्चाने किंवा संपूर्ण 18 पिंजरे स्वखर्चाने जलाशयात टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  याबाबत कोणत्या जलाशयात किती पिंजरे टाकण्याची तरतूद उपलब्ध आहे. याबाबतची माहिती ही संबधीत जिल्ह्याच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना या कक्षातून मिळणार आहे. पिंजरा योजनेतंर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीस अनुदान लाभ मिळू न शकल्यास स्वखर्चाने या योजनेचा लाभ घेता येणार आहे. स्वखर्चाने लाभ घेण्यास इच्छूक असल्यास तसे अर्ज करताना स्पष्ट नमूद करावे. अनुदान योजना लाभार्थी अंतिम झाल्यावर जागा उपलब्धतेनुसार सर्व विना अनुदानित पिंजरा योजनेचा अर्जदारांचा विचार करण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त स. इ. नायकवडी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

कोरोना अलर्ट : प्राप्त 534 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह

•       42 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 588 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 534 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 507 तर रॅपिड टेस्टमधील 27 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 534 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 17, बुलडाणा तालुका : सातगांव म्हसला 3, चिखली शहर : 12,  चिखली तालुका : शेलूद 3, दे. घुबे 2, किन्होळवाडी 1, धोडप 1, नायगांव बु 1, मेरा बु 1, पळसखेड 2, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, सोनाटी 1, वाडेगांव 1,  खामगांव शहर : 4, नांदुरा शहर : 3,  संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे पंचमुखी नगर, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा  उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :   बुलडाणा : अपंग विद्यालय 2,  खामगांव : 7, दे . राजा : 15, सिं. राजा : 6, शेगांव : 5, मलकापूर : 2, चिखली : 5.

तसेच आजपर्यंत 84856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11679 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11679 आहे. 

  तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 84856 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12190 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11679 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 364 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 147 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********

 


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

  • जिल्हाधिकारी यांना ध्वज लावून शुभारंभ
  • माजी सैनिकांचे गुणवंत पाल्यांचा गौरव

  बुलडाणा,(जिमाका) दि.21 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलनाचा शुभारंभ आज 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत यांनी ध्वज लावून निधी संकलन शुभारंभ केला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते माजी सैनिक प्रभाकर सवडतकर यांचा पाल्य मनिष व माजी सैनिक समाधान दराडे यांची पाल्या कु. शिवानी यांना इयत्ता 10 वी मध्ये गुणवत्ता यादी विशेष स्थान प्राप्त केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून प्राप्त प्रशस्तीपत्र व धनाकर्ष देऊन गुणवंतांना गौरविण्यात आले.  

   यावर्षी कोविड साथरोग लक्षात घेता सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम कमी उपस्थितीत व मर्यादीत स्वरूपात घेण्यात आला. मागील वर्षी जिल्ह्यास शासनाने 48 लक्ष 38 हजार रूपयांचे ध्वजदिन निधी संकलीत करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र कोरोनामुळे जिल्ह्यास प्राप्त उद्दिष्टांपैकी 80 टक्के उद्दिष्ट जिल्ह्याने पुर्ण केले आहे. यावर्षी शासनाने जिल्ह्यास दिलेले 48 लक्ष 38 हजाराचे उद्दिषष्ट 100 टक्के पुर्ण किंवा त्यापेक्षा जास्त पुर्ण करण्यात येणार आहे. सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व कुटूंबियांच्या काही अडचणी असतील, त्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेमार्फत सोडवाव्यात. तसेच याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व विभाग सहकार्य करतील, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.  

                                                                                                ************

 डिएलएड प्रथम वर्षासाठी आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

  • शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेशासाठी विशेष फेरी
  • www.maa.ac.in  या संकेत स्थळावर 26 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

  बुलडाणा,(जिमाका) दि.21 : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिकत्‍ असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या www.maa.ac.in  या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. याबाबत सविस्तर सुचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी. खुल्या प्रवर्गासाठी 49.50 टक्के व इतर संवर्गासाठी 44.50 टक्के गुण आवश्यक आहेत.

   प्रवेश अर्ज 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन भरण्यात येणार आहे. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त 22 ते 27 डिसेंबर 2020 पर्यंत करण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या संवर्गासाठी 200 व इतर संवर्गाकरीता 100 रूपये आहेत.  यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून ॲप्रोव करून घेतला आहे. मात्र प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरूस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रोव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉग ईन मधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत: इमेल / लॉगईन मधून प्रिंट घ्यावी. त्यानंतरच अध्यापक विद्यालयात चार दिवसांच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर प्रवेशासाठी कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.